स्वामी समर्थ आरती
स्वामी समर्थ आरती
जय देव जय देव,
जय जय अवधूता ।
अगम्य लीला स्वामी
त्रिभुवनी तुझी सत्ता ॥ ध्रु ॥
तुझे दर्शन होतां
जाती ही पापें ।
स्पर्शनमात्रे विलया
जाती भवदुरितें ।
चरणी मस्तक ठेवुनि
मनि समजा पुरतें ।
वैकुंठीचे सुख
नाही या परते ॥ १ ॥
जय देव जय देव,
जय जय अवधूता ।
अगम्य लीला स्वामी
त्रिभुवनी तुझी सत्ता ॥ ध्रु ॥
सुगंध केशर भाळी
वर टोपी टीळा ।
कर्णी कुंडल शोभति
वक्षस्थळी माळा ।
शरणागत तुज होता
भय पडले काळा ।
तुझे दास करिती
सेवा सोज्वळा ॥ २ ॥
जय देव जय देव,
जय जय अवधूता ।
अगम्य लीला स्वामी
त्रिभुवनी तुझी सत्ता ॥ ध्रु ॥
मानवरूपी काया
दिससी आम्हांस ।
अक्कलकोटीं केला
यतिवेषें वास ।
पूर्णब्रह्म तूंची
अवतरला(सी) खास ।
अज्ञानी जीवांस
विपरित हा भास ॥ ३ ॥
जय देव जय देव,
जय जय अवधूता ।
अगम्य लीला स्वामी
त्रिभुवनी तुझी सत्ता ॥ ध्रु ॥
निर्गुण निर्विकार
विश्व व्यापक ।
स्थिरचर व्यापुनि अवघा
उरलासी एक ।
अनंत रूपे धरिसी
करणें मायीक ।
तुझें गुण वर्णिता
थकले विधिलेख ॥ ४ ॥
जय देव जय देव
जय जय अवधूता ।
अगम्य लीला स्वामी
त्रिभुवनी तुझी सत्ता ॥ ध्रु ॥
घडता अनंत जन्मी
सुकृत हे गांठी ।
त्याची ही फलप्राप्ती
सद्गुरुची भेटीं ।
सुवर्ण ताटी भरली
अमृतरस वाटीं ।
शरणागत दासावरि
करी कृपादृष्टी ॥ ५ ॥
जय देव जय देव
जय जय अवधूता ।
अगम्य लीला स्वामी
त्रिभुवनी तुझी सत्ता ॥ ध्रु ॥