मानसपूजा (श्री ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा )
मानसपूजा (श्री ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा )
आतां हृदय हें आपुलें ।
चौफाळुनियां भलें ।
वरी बैसऊं पाउलें |
श्रीगुरूंचीं ॥ १ ॥
ऐक्यभावाची अंजुळी ।
सर्वेंद्रिय कुड्मुळी ।
भरुनियां पुष्पांजुळी ।
अर्घ्य देवों ॥ २ ॥
अनन्योदकें धुवट ।
वासना जे तन्निष्ठ ।
ते लागलेसे अबोट |
चंदनाचें ॥ ३ ॥
प्रेमाचेनि भांगारें ।
निर्वाळूनि नूपरें ।
लेवऊं सुकुमारें ।
पदें तियें ॥ ४ ॥
घणावली आवडी ।
अव्यभिचारें चोखडी ।
तिये घालूं जोडी ।
आंगोळिया ॥ ५ ॥
आनंदामोदबहळ ।
सात्त्विकाचें मुकुळ ।
तें उमललें अष्टदळ ।
ठेऊं वरी ॥ ६ ॥
तेथे अहं हा धूप जाळूं ।
नाहं तेजें वोवाळूं ।
सामरस्यें पोटाळूं ।
निरंतर ॥ ७ ॥
माझी तनु आणि प्राण ।
इया दोनी पाठवा लेऊं
श्रीगुरुचरण ।
करूं भोगमोक्ष निंबलोण ।
पायां तयां ॥८॥
इया श्रीगुरुचरणसेवा ।
हों पात्र तया दैवा ।
जे सकळार्थमेळावा ।
पाटु बांधे ॥ ९ ॥