ज्ञानदेवांची आरती
ज्ञानदेवांची आरती
ज्ञानदेवांची आरती ॥
आरती ज्ञानराजा ॥ महाकैवल्यतेजा ॥
सेविती साधुसंत ॥ मनु वेधला माझा ॥ ध्रु० ॥
लोपलें ज्ञान जगीं ॥ तनेणती कोणी ॥
अवतार पांडुरंग ॥ नाम ठेविलें ज्ञानी ॥ आरती ॥ १ ॥
कनकांचे ताट करीं ॥ उभ्या गोपिका नारी॥
नारद तुंबरु हो ॥ साम गायन करी ॥ आरती ॥ २ ॥
प्रगट गुह्य बोले ॥ विश्व ब्रह्मची केलें ॥
रामा जनार्दनीं॥ पायीं ठकचि ठेलें ॥ आरती ॥ ३ ॥