संत चोखोबा
विठ्ठल विठ्ठल गजरी ।
अवघी दुमदुमली पंढरी ॥ ध्रु ॥
होतो नामाचा गजर ।
दिंड्या पताकांचा भार ॥ १ ॥
ज्ञानदेव निवृत्ती सोपान ।
अपार वैष्णव ते जाण ॥ २ ॥
हरि कीर्तनाची दाटी ।
तेथे चोखा घाली मिठी ॥ ३ ॥