संत नरहरी सोनार
नाम फुकाचे फुकाचे ।
देवा पंढरीरायाचे ॥ ध्रु ॥
नाम अमृत हे सार ।
हृदयी जपा निरंतर ॥ १ ॥
नाम संतांचे माहेर ।
प्रेम सुखाचे आगर ॥ २ ॥
नाम सर्वांमधे सार ।
नरहरी जपे निरंतर ॥ ३ ॥