ताल्युक्यातील ब्रेकिंग न्यूज/चालु घडामोडी
राहुरी शहर व तालुक्यातील चालू घडामोडी मी राहुरीकर तर्फे फोटोंसहीत, कमी वेळेत खास राहुरीकरांसाठी उपलब्ध करुन देत आहोत. फोटो मोठा करुन बघण्यासाठी फोटोवर एक सिंपल क्लिक करावे. आपणांकडेही काहि ब्रेकींग न्यूज असल्यास त्वरीत पुढिल पत्त्यावर मेल करा, नावासहीत प्रसिद्ध केली जाईल.
संपर्क: meerahurikar@gmail.com, pandenilesh@gmail.com
दि. ०१ फेब्रुवारी रोजी केशर पेट्रोल पंपासमोर मारुती-८०० या गॅस गाडीने पेट घेतला, ताबडतोब ऍंब्युलन्स बोलाविण्यात येवून आग आटोक्यात आणली, सुदैवाने गॅसचा स्फोट झाला नाहि आणि मोठी जिवित हानी टळली.
दि २९ जानेवारी राहुरी कॉलेजच्या पुढे झालेला अपघात. या अपघातात ११ जणांवर नियतीने झडप घातली. सविस्तर लेख वाचण्यासाठी पुढिल लिंक वर क्लिक करा. http://nileshmpande.blogspot.com/2007/01/blog-post_30.html
दि. २७ एप्रिल २००७ रोजी रात्री ८:३० ला हॉटेल भाग्यश्री समोरील पेट्रोल पंपावर १०-१२ जणांचा दरोडा पडला. एकुण २५,०००/- चा माल लंपास झाला.
३१ मार्च २००७- आतंकवादि अफजलला फाशी देण्याच्या मागणीसाठी राहुरी तालुक्यातुन मा. राष्ट्रपतिंना ५ लाख पत्रे पाठविण्यात आले
१ एप्रिल २००७- ग्रामदैवत श्री. खंडोबाच्या यात्रेनिमित्त पारंपारिक पद्धतीने बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.
२६ मे- राहुरी तालुका ब्रम्हव्रुंद संघटना आयोजित अधिक मास निमित्त श्री शुक्लेश्वर मंदिर येथे श्री विश्णु याग सोहोळा संपन्न झाला, त्या निमित्त झालेली शोभायात्रा.
१५ जून २००७- राहुरी कारखान्याचा गळीत हंगामाचा कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी मंचावर मा. संचालक मंडळ उपस्थित होते.
१५ जून २००७- गरीब शालेय विद्यार्थांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. त्या प्रसंगी मा. प्रसादराव तनपुरे, नगराध्यक्श कोळपकर, मुख्याधिकारी रविंद्र जाधव.
३० जून २००७- राहुरी नगरपरिषदेतर्फे वॊर्ड नं १८ मधील पट्ट्यची शाळा येथे ’सुदॄढ बालक स्पर्धा घेण्यात आली, त्याचे बक्षिस वितरण करताना
०२ जून २००७- दुधाला भाववाढ मिळावा म्हणून खडांबे फाटा, राहुरी येथे नगर मनमाड रस्तावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, त्यास हिंसक वळ्ण लागून एस टी बसच्या काचा फोडण्यात आल्या.
०३ जून २००७- अहमदनगर जिल्ह्याचे वरदान मुळा धरण ५०% भरले.
This website is Developed & Owned by
Mr. Nilesh Pande, Rahuri (M.S.) Hello- __________