ग्रामीण रुगणालाच्या उता-याचा प्रश्न सुटला !
सात-बारावर 'जिल्हा शल्यचिकित्सक' असे नांव, सुसज्ज इमारतीचा मार्ग मोकळा
ग्रामीण रुगणालाच्या उता-याचा प्रश्न सुटला !
सात-बारावर 'जिल्हा शल्यचिकित्सक' असे नांव, सुसज्ज इमारतीचा मार्ग मोकळा
ग्रामीण रुग्णालयाच्या सात-बारा उता-यावर 'जिल्हा शल्यचिकित्सक' असे नांव लागण्याचा विषय अखेरीस राहुरीतच सुटला. या प्रकरणात व्यवहार्य तोडगा काढण्याचे महसूल यंत्रणेने ठरविले आणि गेल्या पाच वर्षांपासूनचा हा विषय मार्गी लागला. प्रांताधिकारी सुहास मापारी यांच्या आदेशानुसार तहसीलदार राजेंद्र वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी शिवाजी टेमकर यांनी यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे नवीन अद्ययावत इमारतीचे काम मार्गी लागण्याची अपेक्षा वाढली आहे.
येथे 23 जानेवारी 2004 ला ग्रामीण रुग्णालय मंजूर झाले. त्या वेळी त्याच्या ज
जागेच्या उपलब्धीचा मोठा प्रश्न होता. त्यासाठी नगरविकास आराखडयात जागा राखीव केली गेली. परंतु ती मिळविण्यात अनेक अडचणी समोर आल्या. त्यावर पर्याय म्हणून सध्या पालिकेचे रुगणालय जेथे आहे, त्या जागेतच हे रुगणालय असावे असा विचार झाला. ही जागा सात-बारा रेकॉर्डला 25 गुंठे आहे, तर सिटी सर्व्हेकडे याची नोंद तीस गुंठे आहे. प्रत्यक्षात मात्र ही जागा चाळीस गुंठे आहे. पालिकेने जागा हस्तांतरणासाठी पहिला ठराव 30 डिसेंबर 2008 ला संमत केला, परंतु त्या ठरावात पालिकेले काही अटी घातल्या. या अव्यवहार्य अटींमुळे हा विषय जिल्हास्तरावरच रेंगाळला. पाहिलकेला जिल्हा शल्यचिकित्सकांनी याबाबत पत्र दिल्यावर पालिकेने सुधारित ठराव 18 जानेवारी 2010 ला संमत केला. त्यानुसार जिल्हा शल्यचिकित्सकांनी जागा हस्तांतराशिवाय हा विषय पुढे सरकू शकत नाही हे वास्तव लक्षात आणून दिले. सात-बारा उतारा रेकॉर्डला 'जिल्हा शल्यचिकित्सक' असे नांव लावण्यासाठी पत्र राहुरी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांना लिहिले. त्यांनी प्रांताधिका-यांना पत्र दिले. विषय तेथेच अडकला. गेली सहा'सात वर्षे तत्कालीन नगराध्यक्ष डॉ. उषा तनपुरे, माजी आमदार प्रसाद तनपुरे यांनी विविध पातळयांवर याचा पाठपुरावा केला.
जागा देणारी यंत्रणा राहुरी पालिका, तर जागा ताब्यात घेणारी यंत्रणा जिल्हा शल्यचिकित्सक असे दोघेही हस्तांतरास राजी असल्याचे अखेरीस प्रांताधिकारी सुहास मापारी यांनी सात-बारा उता-यावर 'जिल्हा शल्यचिकित्सक' असे नाव लावले जावे, अशा सूचना केल्या व विषय मार्गी लागला. आता ही जागा त्यांनी ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरु केली आहे.
- दैनिक सकाळ दि. 19 जून 2012
हे संकेतस्थळ श्री. निलेश मनोहर पांडे यांनी डेव्हलप केल आहे.
पत्ता- ७५५, मेन रोड, शिवाजी चौक,
विद्या मंदिर प्रशाले जवळ, राहुरी,
संपर्क- (२४२६) २-३-४-५-६-८
भ्रमणध्वनी- ९८५०१ ९२७८०
९९२३५ ९२७८०