खुडसरगांवचे ग्रामदैवत 'कालभैरव'

       अमृतवाहिनी प्रवरा नदीच्‍या दक्षिण तिरावर वसलेले खुडसरगांव हे एक राहुरी तालुक्‍यातील लहानशे खेडेगांव आहे.  या गांवचे जमीन क्षेत्र 600 हेक्‍टर असून गांवची लोकसंख्‍या 1400 इतकी आहे.  गांवातील नदीकाठची जमीन मलईची भारी अशी आहे.  या गांवातील मुख्‍य पिके आज ऊस, गहूं, हरभरा, कपाशी ही असून ज्‍वारी, बाजरी, मका आदी पिके अल्‍प प्रमाणात घेतली जातात.  सन 1970 पर्यंत प्रवरा उजव्‍या कालव्‍याचा लाभ मिळत असे.  त्‍यामुळे शेती पाण्‍याचा पुरवठा त्‍याकाळी चांगला होता. 

     साधारणतः 1971 ते 75 च्‍या कालावधीत या भागातील पाटाचे हक्‍काचे पाणी गेल्‍याने पिक पाणी जेमतेम असेच होते.  मुसळवाडी येथे प्रवरा नदीच्‍या उजव्‍या कालव्‍याचा तलाव होता. आता सदर तलाव मुळा नदीवरील ज्ञानेश्‍वर जलाशयाच्‍या डाव्‍या कालव्‍याने भरला जात आहे.  कालव्‍यातून पुढे खुडसरगांव, मालुंजे खुर्द, माहेगांव आदी गावांना पाणी पुरवठा होत आहे.  त्‍यामुळे पुन्‍हा 1975 नंतर या गांवच्‍या शेती उत्‍पादनाला गती मिळालेली आहे.

     अशी गांवचे ग्रामदैवत कालभैरव आहे.  पूर्वीच्‍या समुद्रमंथन काळात या भागांत देव आणि दानव वास्‍तव्‍य करीत होते. त्‍यावेळी देवांचे रक्षक त्‍यांना 'राण' म्‍हटले जात.  त्‍यापैकीच 'कालभैरव' या भागांत वास्‍तव्‍यात होते म्‍हणून स्‍थापना होवून ग्रामदैवत मानले गेले असल्‍याचे लाेक चर्चेतून ऐकावयास मिळते.

     कालभैरव हे देवांचे गण म्‍हणजेच संरक्षक असल्‍याने त्‍यांना गव्‍हाची पोती व गुळापासून तयार केलेला 'मलिदा' हा नैवेद्यच चालतो, अन्‍य नाही.  तसेच या देवाच्‍या वास्‍तव्‍यामुळे संगीतबा-या तमाशाचा फडाचा कार्यक्रम देखील यात्रेवेळी या गांवात नसतांत कारण त्‍यावेळी उत्‍साही कार्यकर्त्‍यांनी वर्गणी जमवून गांवात शोभेचे दारुकाम व तमाशाचे फड संगीतबा-याचा कार्यक्रम आयोजित केला असता असा कार्यक्रम रंगात आला त्‍यावेळी कालभैरवाया मंदिराजवळील मागील बाजूस असलेले कडूनिंबाचे झाड अचानक पेटले होते. ते विझविण्‍याचा प्रयत्‍न केला परंतु झाड लवकर विझेना.  ज्‍यावेळी संगितबारीचा कार्यक्रम बंद केला, त्‍यावेळी त्‍यावेळी पेटलेल्‍या झाडाच्‍या ज्‍वाला एकदम थंड झाल्‍या.  त्‍यावेळी अनेक ग्रामस्‍थांनी हा देवाचा कोप होता, तेव्‍हा या पुढे तमाशाचे फड व संगीत बा-यांचे कार्यक्रम न ठेवण्‍याचा निर्णय ग्रामस्‍थांनी घेतला.

     आता यात्रेच्‍या दिवशी म्‍हणजे चैत्रशुध्‍द चतुर्दशीला या ग्रामदैवताची पुजाअर्चा करुन गुळपोळी, मलिदा व अंबिल घुग-या बनून देवून यात्रा साजरी केली जाते.

     या दैवताचे दुसरे महत्‍व म्‍हणजे सर्पदंश झालेल्‍या व्‍यक्‍तीला या दैवतासमोर ठेवल्‍यास सर्पविष उतरले जाते अशी परंपरा आजही या गांवात आहे.

- कैलास देठे, खुडसरगांव

 हे संकेतस्थळ श्री. निलेश मनोहर पांडे यांनी डेव्हलप केल आहे.

पत्ता-  ७५५, मेन रोड, शिवाजी चौक,

विद्या मंदिर प्रशाले जवळ, राहुरी,

संपर्क- (२४२६) २-३-४-५-६-८

भ्रमणध्वनी- ९८५०१ ९२७८०

              ९९२३५ ९२७८०

फेसबुक प्रोफाईल