राहू केतू के संग श्री शनि देवस्‍थान

    संपूर्ण भारतात अहमदनगर जिल्‍हा हा साधु-संतांची पावनभूमी म्‍हणून ओळखला जातो.  शिर्डी आणि शिंगणापूर यांच्‍या मध्‍यवर्तित तसेच नगर- मनमाड राज्‍यमार्गावर आणि मुळा नदीच्‍या तिरावर वसलेले राहुरी शहर तसे तालुक्‍याचे ठिकाण आहे.  राहुरी तालुक्‍यातील मुळा धरण आणि महात्‍मा फुले कृषी विद्यापीठ यांमुळे राहुरी तालुका हा संपूर्ण देशभर परिचयाचा आहे.  महाराष्‍ट्राचे कुलदैवत तुळजापूरची आई तुळजाभवानीचे माहेर घर म्‍हणून राहुरी शहर हे संपूर्ण महाराष्‍ट्रात परिचयाचे आहे.  राहुरी शहराला हे राहुरी हे नांव संबोधण्‍यामागे दानवांपासूनचा इतिहास सांगितला जातो.

     वयोवृध्‍द लोकांच्‍या अध्‍यायिकानुसार असे सांगितले जाते की, देव व दानवांच्‍या समुद्रमंथनातून चौदा रत्‍ने बाहेर पडली, यातील दोन रत्‍ने की जे अमृत आणि सुरा म्‍हणजे दारु ही रत्‍ने दानव पळवून नेतात, तेथे दानव अमृतासाठी एकमेकांशी भांडत असतातृ  त्‍यावेळेस श्री महाविघू हे मोहिनूरुप धारण करुन येतात, या मोहिनीरुपावरुन दानव भाळले जातात आणि अमृत व सुराची वाटप करण्‍याची विनंती करतात.  त्‍यावेळेस देव आणि दानवांच्‍या पंक्‍ती ब

बसतात तर या देवांच्‍या पंक्‍ती जेथे बसलेल्‍या असतात त्‍या ठिकाणस देवआळी असे नांव पडले म्‍हणजेच सध्‍याचे देवळाली प्रवरा हे ठिकाण होय.

     देवांना अमृत वाटतांना चंद्र आणि सुर्य यांच्‍यामध्‍ये राहू नांवाचा दानव देवरुपात येवून बसतो आणि अमृत प्राशन करतेवेळी चंद्र, सुर्य आणि इतर देव मोहिनी रुपातील श्री महाविष्‍णूना खूणावतात तेव्‍हा श्री महाविष्‍णू मोहिनी रुपातच राहू राक्षसाचा शिरच्‍छेद करतात.  त्‍यावेळेस ते शिर ज्‍या मार्गाने वळण घेत असतात त्‍या मार्गास तालुक्‍यातील वळण असे नांव पडल्‍याचे सांगितले जाते. ज्‍या ठिकाणी ते शिर ओरडतात, त्‍या ठिकाणांस आरडगांव असेही सांगितले जाते. ज्‍या ठिकाणी ते शिर येवून पडते त्‍या ठिकाणी राहू या नांवामुळेच राहुरी असे नांव पडलेले आहे.  तसेच ज्‍या शेजारीच केतू या राक्षसाची शिळा ही देव-दानव युध्‍दात पडलेली आहे अशी अख्‍यायिका सांतिगतली जाते.  महापूरामध्‍ये ही शनि महाराजांची शिळा वाहून आल्‍याचे सांगितले जाते.

     राहुरी शहरातील श्री शनि महाराजांची वैशिष्‍टे म्‍हणजे शिळा स्‍वयंभू आहे, तसेच शिळेवर शनि महाराजांचा चेहरा हा आपणांस स्‍पष्‍टपणे पहावयास मिळतो.  म्‍हणजेच चेह-यावर नांक, डोळे, कान तसेच भारदस्‍त मिशा असे सर्व काही स्‍पष्‍ट पहावायास मिळतात.  शिळा ही चार ते पाच फूट उंचीची आहे.  शिळेशेजारीच राहू आणि केतूच्‍या शिळा आणि शितलामातेच्‍या पादुका आपणांस पहावयांस मिळतात.  संपूर्ण महाराष्‍ट्रामध्‍ये असे एकमेव देवस्‍थान आहे की ज्‍या ठिकाणी राहू केतू आणि शनि हे तीन ग्रह एकत्र आहेत.  प्रत्‍येकी मानव जातीच्‍या जन्‍मकुंडलीमध्‍ये राहू, केतू आणि शनि हे ग्रह त्रास देत असतात, त्‍यामुळे त्‍यांची पूजा अर्चा, अभिषेक किंवा शांती ही करावीच लागते, यासाठी संपूर्ण महाराष्‍ट्रातच काय पण संपूर्ण भारतामधून या ठिकाणी विधी करण्‍यासाठी भावीक येत असतात.

     अशाच या धार्मिक ठिकाणी श्री शनैश्‍वर मित्रमंडळ सेवाभावी हे गेल्‍या आठ ते दहा वर्षांपासून कार्यरत आहे.  श्री शनैश्‍वर मित्रमंडळ हे कार्यरत झाल्‍यापासून या ठिकाणी दररोज पहाटे चार-पाच वाजचा चौथा-याची साफसफाई करतात, पहाटेच्‍या वेळी भक्‍तीगिते, भावगिते लावली जातात आणि पूजाअर्चा व आरती केली जाते.  त्‍यामुळे भकतीमय व आनंदी वातावरण होवून जाते.  दर शनिवारी मंडळाच्‍या वतीने प्रसाद देणगीतून सकाळी आठ वाजता साबुदाना खिचडी किंवा नायलॉन चिवडा, केळी, चिक्‍कू, खजून किंवा शेंगादाणा, काजू-खडीसाखर अशा प्रकारचा प्रसाद भाविकांना वाटला जातो.  तसेच दर शनिवारी सायंकाळी 6.30 ते 7 वाजेच्‍या दरम्‍यान श्री गणपती, हनुमान व शनि महाराजांची महाआरती केली जाते.  कोजागिरी पौर्णिमेच्‍या निमीत्‍ताने मंडळाच्‍या वतीने भाविकांना दूध वाटप केले जाते, असे असंख्‍य धार्मिक व सामाजिक उपक्रम मंडळामार्फत राबविले जातात.

     तसेच प्रत्‍येक महिन्‍याच्‍या अमावस्‍येला शनि जयंती आणि शनि अमावस्‍येला इ. कार्यक्रम मंडळाच्‍या वतीने मोठया प्रमाणात साजरे केले जातातृ  दर शनि अमावस्‍येला या मंडळाच्‍या वतीने भाविकांना दोन ते तीन क्विंटल साबुदाना खिचडी तयार करुन दिली जाते.  दर शनि अमावस्‍येला मंडळाच्‍या वतीने सव्‍वापाच मीटरचा सुशोभीत झेंडा तयार करुन मंडळाचे कार्यकर्ते पायी शिंगणापूरला जावून देवस्‍थानावर झेंड चढवितात.  आरतीचे बुकींग हे खूप अगोदरच करावे लागते. 

     शहरातून आणि संपूर्ण तालुक्‍यातून या ठिकाणी दर्शनासाठी दररोज वर्दळ आपणांस पाहावयास मिळते.  अशा भक्‍तीमय व आनंदमयी वातावरणामुळे या ठिकाणी दर शनि अमावस्‍येला संपूर्ण महाराष्‍टा्रतून मोठया संख्‍येने भाविक राहुरीला दर्शनासाठी येत असतात, म्‍हणूनच या ठिकाणाला "प्रति शिंगणापूर" म्‍हणून संबोधले जाते.

 हे संकेतस्थळ श्री. निलेश मनोहर पांडे यांनी डेव्हलप केल आहे.

पत्ता-  ७५५, मेन रोड, शिवाजी चौक,

विद्या मंदिर प्रशाले जवळ, राहुरी,

संपर्क- (२४२६) २-३-४-५-६-८

भ्रमणध्वनी- ९८५०१ ९२७८०

              ९९२३५ ९२७८०

फेसबुक प्रोफाईल