मनोकामना पूर्ण करणारे भगवान चिदंबर
मनोकामना पूर्ण करणारे भगवान चिदंबर
देसवंडी, ता. राहुरी येथे मुळा नदीच्या पवित्र संगमावरती निसर्ग सानिध्यामध्ये पक्षाया गुंजरवामध्ये, भक्तांच्या भक्तीच्या विटेवर प्रसन्न चित्ताने उभी असलेली भगवान चिदंबरांची मूर्ती पंढरपूरया परब्रम्हाणी पणू आठवणच करुन देते. अनेक भक्तांच्या भक्तीपोटी मुरगोड, कर्नाटक मध्ये विसावलेल्या परब्रम्हाला देव मुळा नदीच्या तटाची ओढ लागली व स्वतः स्व्प्न दृष्टांत देऊन मंदिराची जागा दाखवून भगवान चिदंबर भक्तांच्या प्रेमासाठी या पवित्र संगमावरती येवून उभे राहिले.
भगवान श्रीराम, श्रीकृष्ण अवतारांच्या सारखाच अगदी अलिकडे सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी भगवान महादेवांचा पुर्णब्रम्ह चिदंबर महास्वामींा अवतार झाला. सनामतन वैदिक धर्माला आलेली ग्लानी, अन्याय व वाढती दृष्ट प्रवृत्ती यांचा नाश करण्यासाठी व धर्माची पुनर्स्थापना, लोकशिक्षण, लोकोध्दार करण्यासाठी दीच्या ाला भक्तीपोटी मुरगोड हा अवतार झाला. मद्रास येथील चिदंबर क्षेत्रातील नटराज शिवांनी म्हणजेच शंकर भगवंतांनी कर्नाटकातील गोठे गांवातील सुशील, धर्मविद्या असलेल्या मार्तंड दिक्षीत व लक्ष्मीमाता यांनी पुत्रप्रापतीसाठी केलेल्या उग्र तपश्चर्येपोटी कार्तिक वद्य षष्ठीला मार्तंड दिक्षीतांया घरी जन्म घेतला. धर्मस्थापना हेच ज्याचे ब्रीद आहे. धर्मस्थापनेसाठी पृथ्वीतलावरती सगुण साकार रुपात भगवान चिदंबर नावाने अवतारीत झाले. स्वामींनी श्रीराम, कृष्णाप्रमाणे अनेक दिव्यलिला केल्या. समस्त जन शिवभजनी लावले. स्वतः परब्रम्ह चिदंबर नांव घेवून प्रकट झाले. धर्माप्रमाणे वागून त्यांनी वैदीक सनातन धर्माची प्रतिष्ठा लावली. धर्मरक्षणासाठी अवतार हे कृतीतून दाखवून दिले. त्यांना कोणतीही गोष्ट अशक्य नाही असे त्यांनी लिलेतून बोध केला. बालपणी गजगौरी व्रतातील मातीचा हत्ती चालण्यास लावून त्यांनी वेदवंताचे सामर्थ्य दाखवून दिले. स्वामींनी त्यांच्या अवतार कार्यात फक्त कृपा आणि कृपत्य केली. स्वामींवर सूड बुध्दीने वागणा-या द्वेष करणा-या अनेक जणांना चमत्कार दाखवून चूकांची जाणीव करुन दिली व सर्वांवर कृपा करुन त्यांना परमार्थाला लावले. कलियुगात चिदंबर नामस्मरण करणा-यांचे कल्याण होईल असे वचन स्वतः स्वामींनीच दिले. चिदंबर नामाचा महिमा अपार आहे. चिदंबर नामाचा जम करणा-यांना प्रारब्ध शिल्लक राहत नाही. चिदंबर नामशक्तीचा महिमा अगाध आहे याची प्रचिती स्वामींच्या देसवंडी येथील मंदिरात गेल्यावरच करते. चिदंबर स्वामींच्या अवतार कार्यात सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी झालेलया लिला आजही श्रीक्षेत्र देसवंडी येथे येणारा भाविक अनुभवतांना दिसतो. प्रत्येकाची मनोकामणा पूर्ण करणारे चिदंबर क्षेत्र म्हणून देसवंडीचा लौकीक वाढलेला आहे. भक्तांच्या भक्तीने आनंदी होवून भक्तवत्सल भगवान चिदंबर सर्वांच्या मनोकामना पूर्ण करतो. चिदंबर महास्वामींच्या उपासनेत महाराष्ट्रातील मोठा जनपरिवार आहे. श्रीक्षेत्र देसवंडी येथे वैदिक शास्त्रानुसार व गुरु परंपरेप्रमाणे स्वामींची नित्य पूजा विधी होतो, पहाटेच्या नित्य काकड आरती, सकाळची नित्य नैमित्तीक पूजा आरती, दुपारी धुपारती, सायंकाळी 6 वा. नित्य आरती, रात्री 9 वा. शेजारती या प्रमाणे पुजाविधी नियमाने केला जातो. दर शनिवारी स्वामींची पालखी मोठया उत्साहाने काढली जाते. पालखी सोहळयासाठी हजारो भाविक दूरवरुन येत असतात. चिदंबर सेवेत तरुण वर्ग मोठया प्रमाणात कार्य करताना दितसो. दिचंबर सेवा समिती अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करीत असते. गुरफंच्या प्रेरणेने दरमहा एकतरी यज्ञकार्य होते. संतांच्या पुण्यतिथी, देवांच्या जयंती व थोर पुरुषांच्या जयंती व पुण्यतिथीचे सर्व उत्सव चिदंबर क्षेत्र देसवंडी येथे पार पडतात. तसेच शिवपुराण, देवी भागवत, श्रीमद भागवत अशा कथाज्ञानयज्ञांचे आयोजनही समिती करते. दर शनिवारी अन्नदानही होते. चिदंबर महास्वामींची महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मंदिर उभे राहिली आहेत. नारायणगांव, संगमनेर, ओझर, विंचूर, पिंप्रीअवघड, खामगाव, मानोरी, पांढरीपूल, धुळे, तांदूळवाडी, सातारा अशा अनेक ठिकाणी स्वामींची मंदिरे आहेत. तसेच चिदंबर सेवा समिती महाराष्ट्रासह कर्नाटकात कुंदगोल, हुबळी, दावणगिरी, गोण्णागर या ठिकाणी सवामींच्या मंदिराच्या उभारणीचे कार्य जोरात सुरु आहे. तसेच स्वामींचे अवतार कार्य विषयीचा चित्रपट पूर्णावस्थेत असून भाविकांसाठी तोही लवकरच प्रदर्शित होत आहे.
गुरुंच्या माध्यमातून आयुष्याची दिक्षा बदलून चिदंबर सेवा करण्याची प्रेरणा घेवून अनेक भावीक आनंदी जीवन जगत आहेत. आपणही चिदंबर नामाची अनुभूती घ्यावी एकदा चिदंबर म्हणावे व त्याचेच होवून जगावे. जगण्याचा आनंद निश्चितच गवसेल. अशा या जाग.त चिदंबर महास्वामी देवस्थान श्रीक्षेत्र देसवंडी येथे येवून जीवन कृतकृत्य करुन घ्यावे. व चिदंबर माझा मी चिदंबराचा म्हणत आनंदाने जगावे शिव चिदंबर
- उमाकांत कुलकर्णी्वामींच्या रतेञ ल्याण होईल
्वामींच्या रतेञ ल्याण होईल
हे संकेतस्थळ श्री. निलेश मनोहर पांडे यांनी डेव्हलप केल आहे.
पत्ता- ७५५, मेन रोड, शिवाजी चौक,
विद्या मंदिर प्रशाले जवळ, राहुरी,
संपर्क- (२४२६) २-३-४-५-६-८
भ्रमणध्वनी- ९८५०१ ९२७८०
९९२३५ ९२७८०