राहुरी तालुक्यातील प्रेक्षणीय स्थळांबाबत आपणांजवळ आणखी माहिती व फोटोज असतील तर पुढिल पत्त्यावर ई-मेल करा, त्याचे स्वागत होईल.
संपर्क:- nileshpande@zapak.com
श्री संत महिपती महाराज मंदिर, ताहाराबाद, ता. राहुरी:-
श्री संत महिपती महाराजांचे राहुरी तालुक्यात कुठेही नाहि असे भव्य मंदिर राहुरी शहरापासून सुमारे १५ किमी अंतरावर आहे. मंदिराचा जिर्नोद्धार नुकताच झाला आहे. महिपती महाराज हे श्री विठ्ठलाचे भक्त होते, त्यांनी रुक्मिनी स्वयंवर हा ग्रंथ लिहिला. आषाढ महिन्यातील दुस-या एकादशीला येथे प्रचंड अशी यात्रा भरते, त्या ३-४ दिवसांच्या कार्यक्रमासाठी लांबून लांबून भक्तांच्या पायी दिंड्या येतात. श्री महिपती महाराज असतांना दरवर्षि पंढरपुरला पायी दिंडीने जात. एका वर्षी त्यांना शरीरस्वास्थ्यामुळे पंढरपुरला जाण्यास जमले नाही. परंतु पांडुरंगावरच्या अफाट भक्तिने प्रभावित होवून पांडुरंग स्वत: महिपती महाराजांना भेटावयास आले होते. त्या एकादशीला श्री पांडुरंग भेटायला येतात अशी अख्यायीका आहे.
श्री ज्ञानेश्वर सागर (मुळा धरण):-
श्री गणपती मंदिर, मार्केट यार्ड, राहुरी:-
नगर-मनमाड रस्त्यावरील मार्केट यार्ड राहुरी येथे प्राचिन असे श्री गणपती मंदिर आहे. श्री गणपती स्वयंभु आहेत. लग्नाच्या मिरवणूकित प्रत्येक नवरदेवास या गणपतीचे दर्शन घ्यावे लागते. महिन्याच्या दर
This website is Developed & Owned by
Mr. Nilesh Pande, Rahuri (M.S.) Hello- ९८५०१९२७८० / ९२७०५८७९८९