शेतक-यांचा आधार - राहुरी सहकरी साखर कारखाना
मुळा आणि प्रवरा नदीच्या दुवाबात वसलेल्या व साधारणपणे वर्षाकाठी १३ ते १८ इंच पर्जन्यमान, विस्तीर्ण शेते, पाण्यावाचून उजाड पडलेली राने हे तालुक्याचे १९५० मधले चित्र होते. जेथे पाण्याची उपलब्धता होती तेथे मोसंबी शिवाय काहीच नव्हते. क्वचित कुठे तरी इंजिनाचा आवाज येत असे. अशा या ओसाड तालुक्याचे रूप पूर्ण पणे बदलून गेले आहे. प्रवरानगर, लोणी येथे डॉ. कै. विठ्ठलराव विखे पाटील यांनी पहिला सहकारी साखर कारखाना सुरु केला. कै. डॉ. धनंजय गाडगीळ, कै. डॉ. जीवराज मेहता, कै. डॉ. वैकुंठभाई मेहता, यांच्या प्रेरणेतून या तालुक्यातही जागृती झाली. तालुक्यात सहकारी तत्वावर साखर कारखाना सुरु करण्याची संकल्पना पुढे आल्यावर देवळाली प्रवरा येथे ५ मे १९५४ रोजी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर डॉ. दादासाहेब तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. कै. चंद्रभान डाकले शेठ, माजी आमदार कै. लक्ष्मणराव बळवंत कदम पा., अनंतराव शंकर धावडे, बाबूजी रामजी पाटील, कै. शिवराम राजुळे, कै. विश्वनाथ दादा मुसमाडे, कै. किसन गंगाराम पाटील, मुन्शिबेग पापाबेग इनामदार, कै सदाबा बोरावके, कै. सावालेराम सोनावणे, जिजाबा रभाजी करपे, चिमणाजी पटेल, कै. वासुदेवपन्त हरी कुलकर्णी, माजी आमदार जनार्धन टेकावडे यांची समिती नेमण्यात आली. तालुक्याच्या दृष्टीने हा प्रयोग नवीन होता. काही प्रमाणात विरोध होता. अनेक अडचणींवर मत करीत कारखान्याची उभारणी झाली.
कारखान्याची सुरुवातीची गाळप क्षमता १२५० टन होती. उसाचे तालुक्यातील क्षेत्र ८०० ते १२०० एकर होते. ते वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मोसंबीच्या बागांची जागा उसासारख्या नगदी पिकाने घेतली. कारखाना सुरु झाल्यापासून आजपर्यंत हजारोंना रोजगार पुरविला आहे. या परिसरास कारखाना संजीवजी देणारा ठरला आहे.
श्रीरामपूर चे स्व. चंद्रभान डाकले शेठ यांना पूर्वीच आंबी-दवणगाव येथे खाजगी साखर कारखान्याचे लायसन्स मंजूर झाले होते व ते उभारणार होते. आंबी-दवणगाव भाग राहुरी तालुक्याच्या अगदी टोकाला असल्याने त्याचा फायदा तालुक्यातील अतिशय थोड्या प्रवरा परिसरातील गावांनाच व श्रीरामपूर तालुक्यालाच जास्ती झाला असता. परंतु राहुरी तालुक्यातील शेतकरी मंडळींचे सहकारी कारखान्याचे स्वप्न प्रत्यक्षात यावे म्हणून राहुरी कारखान्याचे प्रवर्तक डाकले शेठ यांचेकडे गेले. व तुम्ही खाजगी कारखाना उभारू नका. आम्हाला पूर्ण राहुरी तालुक्याला फायदा व्हावा या दृष्टीने आम्ही सहकारी साखर कारखाना तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी उभारण्याच्या प्रयत्नात आहोत असे सांगितले. व तुमचे लायसन्स वर आम्हाला कारखाना उभारण्यास तुमचे लायसन्स द्या अशी विनंती केली. व त्या लायसन्स वर आजचा राहुरी कारखान्याची निर्मिती झाली.
कागद कारखाना-
केवळ साखर उत्पादित करूनच कारखाना थांबला नाही, तर १९७३ मध्ये सुमारे ४० लाख रुपये खर्च करून कारखान्याने आसवाणी विभाग सुरु केला. आसवाणी प्रकल्पाची दैनंदिन क्षमता ३५ हजार लिटर आहे. त्यामुळे सुमारे ३ ते ४ कोटी रुपये मिळतात. यालाच जोडून कारखान्याने १९८४ मध्ये सुमारे १२ कोटी रुपये खर्चून कागद प्रकल्प कार्यान्वित केला. कागद प्रकल्पाची क्षमता २५ टन आहे. जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील नावाजलेल्या कारखान्यांमध्ये राहुरी कारखान्याचा समावेश होतो. उस क्षेत्रासाठी केलेल्या जाणीवपूर्वक प्रयत्नांमुळे तालुक्यात उसाच्या क्षेत्रात व उत्पादनात वाढ होऊ लागली.
This website is developed by
Computronics Cyber Cafe,
Prop. Nilesh Manohar Pande,
Main Road, Shivaji Chowk, Rahuri,
Tal. Rahuri, Dist Ahmednagar
Phone: (02426) 2-3-4-5-6-8
Mobile: 9850192780 /9890366002