ग्रामीण भागातील 'ग्रँड मास्टर्स'
ग्रामीण भागातील 'ग्रँड मास्टर्स'
बुध्दीबळाच्या खेळाने बुध््दीमत्ता, मनाची एकाग्रता व अभ्यासाची क्षमता सुध्दा वाढवून यशाचे उत्तुंग शिखर गाठता येते. हे अहमदनगर जिल्हयात राहुरी सारख्या ग्रामीण भागातील शाळकरी मुलांनी देशाला दाखवून दिले आहे. ते विद्यार्थी म्हणजेच.... राहुरी येथील प्रसिध्द ह्दयरोग तज्ञ डॉ. आण्णासाहेब गागरे व डॉ. सुमंगल गागरे यांचे सुपूत्र शार्दूल गागरे व कुमारी शाल्मली गागरे हे बंधू-भगिनी आहेत. देशातील मुंबई, चेन्नई, दिल्ली, तिरुपती, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, केरळ, औरंगाबाद, परभणी आदि प्रमुख ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय बुध्दीबळ स्पर्धेत विजयश्री खेचून आणल्यानंतर गेल्या दोन वर्षात या लहानग्या खेळाडूंनी बुध्दीबळाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भरघोस यश मिळवून भारतासाठी सोनेरी व ब्रॉंझपदक मिळविण्याची कामगिरी केली आहे. हे दोन्हीही बुध्दीबळपटी राहुरी फॅक्टरी येथील डि पॉल इंग्लिश मिडीयम स्कूलचे विद्यार्थी आहेत.ण्
बुध्दिबळाचा खेळ तसा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आजही नाविन्यपूर्ण आहे. या खेळातील नवलाई व यश पाहून कोणीही भारवल्याशिवाय रहात नाही. या दोन्ही भावंडांच्या बुध्दीबळ खेळातील यशाचे गमक काय ? असा प्रश्न सध्या राज्यातील व देशातील खेळाडूंसमोर निर्माण झाला आहे.
राहुरी येथील ह्दयरोगतज्ञ डॉ. आण्णासाहेब गागरे व त्यांची पत्नी सुमंगल गागरे हे दाम्पत्य तसे मूळचे कानडगांव येथील रहिवासी आहेत. राहुरीत वैद्यकीय सेवेस प्रारंभ केलयानंतर ते टाईमपास म्हणून बुध्दिबळ खेळ खळत असत. पुढे या खेळाचा त्यांनी अभ्यास केला. त्यानंतर त्यांना बुध्दीबळाचा छंद जडला. हा छंद त्यांच्या मुलांकडे संक्रमित झाल्याने शार्दुल व कु. शाल्मली हे जागतिक पातळीवरील बुध्दिबळ स्पर्धेत यशस्वी झाले.
त्यांच्या बुध्दीबळाच्या खेळाला जपण्यासाठी डॉ. गागरे दाम्पत्याने वैद्यकीय सेवेतील लक्ष कमी करुन बुध्दिबळाकडे वळविले आहे. जागतिक बुध्दिबळ स्पर्धेत सहीभागी होतांना हॉस्पिटल बंद ठेवून मुलांबरोबर जावे लागते. मुलांचे बुध्दीबळातील यश जिल्ह्यातील मातब्बर पदाधिका-यांना वाखाणले. त्यांनी साखर कारखाना, श्री साई संस्थान, बाजार समिती व अन्य खासगी नेत्यांनी आर्थिक मदतही केली पण ही मदत तशी तुटपुंजी ठरली आहे. जागतिक पातळीवर स्पर्धेच्या तयारीसाठी खास कोचिंगची त्यांचा गरज आहे. हा प्रचंड खर्च गागरे कुटूंबियांना न परवडणारा आहे. केंद्र व राज्य शासन व प्रायोजकांच्या आर्थिक सहकार्यानेच त्यांच्या जागतिक खेळाची कामगिरी यशस्वी होऊ शकते.
कु. शाल्मली हीने भारताच्या सब ज्युनिअर टिमतर्फे स्पेनमध्ये शासनदार कामगिरी करुन 'इंटरनॅशलन वूमन मास्टर' चा पहिला वॉर्म संपादन केला. तेथे झालेल्या ओपन ग्रँडमास्टर टुर्नामेंटमध्येही 16 वर्षांखालील गटात तिने प्रथम पारितोषिक व सुंदर ट्रॉफी मिळविली. मागील वर्षीही तिची कामगिरी अतिशय कौतुकास्पद होती. तिने तुर्की येथे झालेल्या जागतिक बुध्दीबळ स्पर्धेत भारताचे नेतृत्व करुन बॉंझ मेडल मिळविले आहे. दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय 'कॉमनवेल्थ' स्पर्धेत 14 वर्षांखालील गटात ब्रॉंझ मेडल पटकाविले. 13 वर्षीय वयोगाटात असूनही कु. शाल्मली हीने चेन्नई येथील बुध्दीबळ स्पर्धेत भारताची सब ज्युनिअर नॅशलन चँपियन ठरली. यापूर्वी तिरुपती येथे झालेल्या नॅशनल स्कूल टीम चॅम्पीयनशीपमध्ये तिने वैयक्तिक व सांघिक सुवर्णपदक मिळविले आहे. शार्दूल गागरे यानेही बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवून बुध्दीबळ स्पर्धेत अल्पावधीतच उंच भरारी घेतली आहे.
दुबई येथे झालेल्या आशियायी स्पर्धेत त्याने भारताला 'सुवर्णपदक' मिळवून दिले आहे. कु. शाल्मली व शार्दुल गागरे या भावंडांचे बुध्दिबळातील यश राज्यासाठीच नव्हे तर देशासाठी महत्वाची कामगिरी ठरत आहे. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
F.M. Shardul Gagare
Achievement versus G.M. and I.M.
· Win with Grandmaster Pravin Thipsay, 2010- Jalgaon
· Draw with Grandmaster Abhijeet Kunte, 2010- Jalgaon
· Draw with Grandmaster R.R. Laxman, 2012- Delhi
· Draw with Grandmaster Dibendca Baruva, 2012- Chennai
· Draw with Grandmaster Neelotpal das, 2012- Chennai
· Draw with Grandmaster Neeltpal das, 2012- Delhi
· Win with International Master Somak Palit, 2011- Delhi
· With with International Master Himanshu Sharma, 2010- Gurgaon
· Win with International Master K. Ratnakar, 2010- Chennai
· Win with International Master S. Nitin, 2010- Chennai
· Win with International Master Shiven Khosala- Calicut
· Draw with International Master Swapnil Phopode- Delhi
· Win with International Master D.P. Singh- Aurangabad
· Win with International Master G.B. Prakash, 2010- Orisa
· Win with International Master Shivanandan, 2010- Mumbai
· Draw with International Master Vaibhav Suri, 2011- Delhi
· Draw with International Master Arvind Shastry, 2010- Manalore
· Draw with International Master Rahul Sargama, 2010- Thenglore, Gurgaon
· Draw with International Master Venkatesh, 2010- Drisa
· Draw with International Master Shayam Nikhil, 2010- Chennai
· Draw with International Master B.T. Murlikrishnan, 2010- Manglore
· Draw with International Master Bala, 2010- Manglore
· Draw with International Master P. Kartikeyan, 2011- Mumbai
· Draw with International Master Sekhar Sahu, 2008- Goad
· Draw with International Master Situru N., 2010- Mumbai
WIM Shalmali Gagare
Achievement versus G.M. and I.M.
· Draw with Grandmaster Dibendu Barua, 2010- Mumbai
· Draw with Grandmaster Deepan Chakrawarthy, 2010- Mumbai
· Draw with Grandmaster Burmakin, 2009- Spain
· Draw with Grandmaster Teske Henrike, 2009- Spain
· Draw with Grandmaster Vularkedji, 2009- Gurgaon
· Draw with Grandmaster Westernen Heikf, 2009- Spain
· Draw with Grandmaster Haslinger Stewart, 2009- Spain
· Win with International Master K. Priyadarshan, 2008- Spain
· Win with International Master Arun Kartik, 2010- Mumbai
· Win with International Master Emodi Gyula, 2009- Spain
· Draw with International Master P. Kartikeyan, 2010- Mumbai
· Draw with International Master P.P. Singh, 2008- Sangali
· Draw with International Master D.P. Singh, 2009- Goa
· Draw with International Master Shyamsundar, 2008- Spain
· Draw with International Master Somak Palit, 2010- Delhi
· Draw with International Master Enanov Jordan, 2009- Spain
· Draw with International Master Colovic Alekxander, 2009- Spain
· Draw with International Master Roeder Matthis, 2009- Spain
· Draw with International Master Jackobsen Ole, 2008- Spain
· Draw with International Master Debasis Das, 2009- Spain
· Win with WIM Saimeera, 2009- Spain
· Win with WIM Bhakti Kulkarni, 2008- Iran
· Draw with WGM Saumiya, Swamithan, 2009- Spain
· Draw with WGM Podmini Raut, 2008- Delhi
· Draw WGM Sopiko Guramisha Villi, 2009- Spain
· Win with WIM Nuygen Thaimaihung, 2008- Turkey
शार्दूल व कु. शाल्मलीच्या बाबत आणखी बातम्या पहाण्यासाठी येथे क्लिक करा..
हे संकेतस्थळ श्री. निलेश मनोहर पांडे यांनी डेव्हलप केल आहे.
पत्ता- ७५५, मेन रोड, शिवाजी चौक,
विद्या मंदिर प्रशाले जवळ, राहुरी,
जि. अहमदनगर, महाराष्ट्र.
संपर्क- (२४२६) २-३-४-५-६-८
भ्रमणध्वनी- ९८५०१ ९२७८०
९९२३५ ९२७८०