मराठी विनोद-३
लग्न म्हंजे काय रे भाऊ? देशोदेशीच्या लग्नविषयक म्हणी. लग्न म्हणजे...
● साहसी पर्वतारोहण. (हंगेरी)
● वेड्याला शहाणे बनवणारा एक उपचार. (ग्रीस)
● एक विहीर, जिच्यात फारच थोडे जण पोहू शकतात. (पशिर्या)
● भावनेच्या उसळणाऱ्या लाटांना सापडलेला किनारा. (तुर्कस्थान)
● जीवनाचा उष:काल म्हणजे प्रेम आणि संधिकाल म्हणजे लग्न. (फ्रान्स)
नविन मराठी सायबर म्हणी
रिकाम्या मँनिटरला स्क्रीनसेव्हर फार
आपलाच किबोर्ड नि आपलाच माऊस
व्हायरसच्या मनात ऎंटीव्हायरस
नावडतीचा पीसी स्लो
हार्डडीस्क सलामत तो सोफ़्टवेअर पचास
हा मदरबोर्ड आणि हा प्रोसेसर
लॅपटॅपचे बिरहाड पाठीवर
सीडींचा बाजार व्हायरसचा सुकाळ
वरुन पेंटीयम आतुन फ़ोर एट सिक्स
जुन्या प्रिंटरला खडखडाट फार
गेम्स नकोत पण व्हायरस आवर
दिल्लीचे तख्त
इतिहासाच्या तासाला पुरंदरे मास्तरांनी झोपलेल्या राजुला ऊठवुन विचारलं
"काय रे! दिल्लीचे तख्त कोणी फोडले ?"
राजु खडबडुन जागा होत " देवाशप्पथ सांगतो सर ! मी नाही फोडले "
पुरंदरे मास्तरांनी हा किस्सा दुपारी शिक्षकांच्या खोलीत सांगितला
तेव्हा जोशी बाई सोडुन सगळे हसले. जोशी बाई मात्र गंभीरपणे बोलल्या " कोण राजु ना ? एक नंबरचा वाह्यात मुलगा आहे. त्यानेच फोडले असेल.
आई : बाळा, शाळेतुन लवकर का आलास ?
बाळ : मी संजयला मारले म्हणुन मला लवकर घरी पाठवले.
आई : अरे पण संजयला का मारलेस ?
बाळ : मला लवकर घरी यायचे होते म्हणुन !!!
नन्या : आई आई, मन्या येतोय. आधी सगळी खेळणी आत ठेवूयात कपाटात.
आई : का रे? मन्या तुझी खेळणी घेऊन जाईल का?
नन्या : नाही गं, तो स्वत:ची खेळणी ओळखेल ना!!!!
''हाय जॅक!''
विमानात एकजण अचानक उठून उभा राहिला आणि ओरडला, ''हाय जॅक!''
... तत्क्षणी हवाई संुदरीच्या हातातला ट्रे खाली पडला आणि ती थरथरू लागली, पर्सरसह निम्म्याहून अधिक प्रवाशांनी हात वर केले आणि उरलेले भयव्याकुळ होऊन रडू लागले...
... तेवढ्यात समोरून एक प्रवासी उठून उभा राहिला आणि पहिल्या प्रवाशाला पाहून ओरडला, ''हाय टॉम!!!!!''
मोठी झाल्यावर तू काय करणार आहेस?
बाबा : पोरी, मोठी झाल्यावर तू काय करणार आहेस?
मुलगी : काही नाही. आई बनेन, शिक्षण घेईन, लग्न करीन. आणखी काय करणार?
बाबा : योजना चांगल्या आहेत तुझ्या बेटा. फक्त जे काही करशील ते योग्य क्रमाने कर, म्हणजे झालं!!!
कुविचार
दारू हे कुठल्याही प्रश्नचं उत्तर असू शकत नाही...
... ... पण, ती काही काळासाठी प्रश्नचा विसर तर पाडते!!!
कष्टाचे फळ कधी ना कधी, उशिराने का होईना, मिळतेच...
... आळसाचे फळ मात्र तात्काळ मिळते!!!!
This Website is Developed & Owned by
Mr. Nilesh Pande, Rahuri
Hello- 9850192780 / 9270587989