मराठी विनोद
आपणांकडेही काही मजेशिर विनोद असतील तर
nbond007@gmail.com वर मेल करा, प्रसिद्धी दिली जाईल.
पुणेरी प्रेम
एकदा पाचव्या मजल्यावर राहणा-या लेल्यांच्या मुलाने तळमजल्यावरच्या नेन्यांच्या मुलीवर प्रेम बसते. संध्याकाळी कोणी घरी नसताना भेटायचं असं ठरतं. वरती यायची खुण म्हणून लेल्यांच्या मुलगा पाच रुपयांचं नाणं खाली टाकणार हे देखील ठरलेलं असतं.
संध्याकाळी लेल्यांचा मुलगा ते नाण खाली टाकतो आणि कु. नेन्यांची वाट बघत बसतो. जवळपास पाऊन तासाने ती वरती येते. तेव्हा तो वैतागलेला असतो. त्याला समजावताना ती म्हनते,
’अरे मी नेन्यांची मुलगी आहे, पाच रुपये वाया जाऊ नये म्हणून मी खाली पैसे शोधत बसले’.
त्यावर तो म्हणतो,
’अगं मी पण लेल्यांचा मुलगा आहे, मी पैसे खाली टाकताना दो-याने बांधून खाली टाकले, आणि आवाज झाल्याबरोबर मी ते वरतून खेचून घेतले.
हुशार मुली
मुली मुलांपेक्षा खुप हुशार आहेत.
दत्तो वामन पोतदार पुणे विद्यापीठाचे कुलगुरू असतांना दिक्षांत समारंभात भाषण करताना म्हणाले,
’मेरीट लिस्ट बघितल्यावर असं दिसतय कि, या वेळी मेरीट मध्ये येणा-या मुलींची संख्या मुलांपेक्षा खुप जास्त आहे. म्हणजेच मुली मुलांपेक्षा खुप हुशार आहेत’.
असं म्हटल्यावर मुलींनी टाळ्यांचा कडकडाट केला.................
दत्तो वामन पुढे म्हणाले.. पण मुलांनी नाराज व्हायचं कारण नाही.. कारण या हुशार मुली शेवटी तुम्हालाच मिळणार आहेत..
हॊटेलमधील विनॊदी भावफलक
’पाककलानिपूण’ गृहिणीही जेव्हा स्वयंपाकाला कंटाळतात तेव्हा हॊटेल रामनाथ कडे सहकुटूंब वळतात!
llश्री स्वामी समर्थll
जवामर्द कोल्हापुरी मिसळ
हमदर्द दहीवडा
दिलबहार इडली सांबार
दिलकश पावपॆटीस
सही र सही मलईयुक्त दही
ताक धिना धिन समधुर ताक
समाधानी राईस प्लेट
खानदानी पोळी भाजी
लाजबाब गोल (चेंडू) भजी
मनमोहक कांदा (खेकडा) भजी
मस्त रे बटाटा (तबकडी) भजी
सुपर जंबो बटाटे वडा
रस्सा भाजी
सुकी भाजी
This Website is Developed by
Mr. Nilesh Manohar Pande, Rahuri
Hello- 9850192780 / 9890366002