मराठी विनोद- 2
स्वगत (मनातल्या मनात)
स्वगत म्हणजे मनातल्या मनात. विवाहाची आमंत्रणपत्रिका आल्यावर आपण हळूच 'आहेर आणू नये’ हे वाक्य बघतो व सर्वानी फुकटचे जेवण हादडायला जायचं एका सेकंदात मनात ठरवितो तशागत. ऎकणारा समोरचाचे खोटे कौतुक करीत असतो. पण मनातल्या मनात काय म्हणतो ते पुढे पहाच- मनातल्या मनात
बोलणारा (उघड): (आनंदाने) साहेब पेढे घ्या. ८ वर्षांनी पोर झाल. मुलगा झाला साहेब.
ऎकणारा (मनात): (मग ऎवढी वर्षे काय करीत होतास?)
बोलणारा: साहेब हि माझी पत्नी सोनाली.
ऎकणारा: (मग एवढे दिवस तुझ्याबरोबर फिरत होती ती कोण?)
बोलणारा: साहेब, मुलगा १० वी ला बोर्डात ५ वा आला.
ऎकणारा: (तो शेवटी का येईना, मला काय करायचय?)
बोलणारा: साहेब, बढती मिळाली. उद्या पार्टी ठेवली आहे.
ऎकणारा: (ऎवढे वर्षे चमचेगिरी केली त्याचा फायदा झाला म्हणायचा)
बोलणारा: हे फोटोचे अल्बम्स पाहत बसा.
ऎकणारा: (आग लाव त्या अल्बम्सला. वैताग च्यायला)
विनोदी फलक
आमचे येथे सर्व भाषेतील झेरॊक्स काढून मिळतील.
रंग ओला आहे, विश्वास नसेल तर हात लावून पहा
साने येथेच राह्तात, उगीच भलतीकडे चौकशी करीत बसू नये.
आमचे येथे हापूस आंबे, कोकम आणि परकर मिळतील.
कुत्र्यापासून सावध रहा. नको तिथे चावल्यास साठे जबाबदार राहणार नाहीत.
वाचनालयात शांतता राखावी, अन्यथा कधिही आत न घेण्यासाठी बाहेर काढले जाईल.
येथे एरंडोलचा डोस देण्यात येईल. (पुढील क्रिया मात्र घरी जाऊन करावी)
मधुमेही व्यक्तिच्या दारावरील पाटी: ”साखरेचे खाणार त्याला देव नेणार”
कुठल्याश्या एका शाशकीय कार्यालयाच्या वाचनालयात म्हणे, वाचनालयाबाहेर पुस्तक नेण्यास बंदि असल्याने, प्रत्येक पुस्तकावर ’”हे पुस्तक मी अमुक अमुक कार्यालयाच्या ग्रंथालयातून चोरून आणले आहे असे लिहीले होते.
”तीनदा दार वाजवूनही उघडले नाही, तर समजावे की मालकांना आपणास भेटावयाचे नाहि. (आता तीनदा दार वाजवूनही उघडले नाही, तर मालक हयात आहेत हे आम्ही कशावरून समजावे बरे?)
पुस्तक-वह्या-वर्तमानपत्रे रद्दी खरेदीकरण केंद्रावरील फलक- ”चित्रपटाला जायचे आहे? आई-बाबा पैसे देत नाहित, मग वह्या पुस्तके आम्हाला द्या की…"
एका घराबाहेरची पाटी- ”देशपांडे कुठे राहतात हे आम्हाला माहीत नाही, उगीच बेल वाजवून विचारू नये"
”आम्ही वस्तू विकत आणतो, कृपया उधार मागू नये"
"केवळ पैसे दिले म्हणजे येथे काहीही करता येईल असे समजू नये, त्यासाठी शहरामध्ये इतर अनेक जागा आहेत. आमच्या सौजन्याला मर्यादा आहेत याचे भान ठेवावे"
उधार मागून अपमान करून घेऊ नये ही नम्र सुचना
येथे वाचायचे चष्मे मिळतील पण आपणांला अक्षर ओळख आहे ना? मागाहून तक्रार चालणार नाही.
पोपट
पाण्याचा पोपट कसा करायचा-पाणी तापवायचं आणि आंघोळच करायची नाही
बादलीचा पोपट कसा करायचा- नळाखाली बादली ठेवायची आणि नळच सुरु करायचा नाही
नळाचा बादलीचा आणि पाण्याचा पोपट कसा करायचा-नळच सुरु करायचा आणि बादलीच काढुन घ्यायची
This Website is Developed & Owned By
Mr. Nilesh Pande, Rahuri
Hello- 9850192780 / 9270587989