राहुरी रेल्वे स्थानकावर मालधक्का विकसित होण्यास वाव
राहुरी रेल्वे स्थानकावर मालधक्का विकसित होण्यास वाव
राहुरी रेल्वे स्थानकार दोन वर्षांपासून 'जिंदाल स्टील अॅन्ड पॉवर लिमिटेड' चा भरीव रॉड व वायरचा डेपो सुरु झाला आहे. त्यामुळे स्थानकावर मालधक्का विकसित होणे गरजेचे आहे. असा मालधक्का विकसित करण्यात नगर व श्रीरामपूर येथे असलेल्या अडचणी विचारात घेतल्या, तर राहुरीच्या स्थानकाजवळ त्यासाठी खाजगी जागा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. रेल्वे खात्याने या दृष्टीने पाहिले जाहिजे व लोकप्रतिनिधींनीही याचा पाठपुरावा केला पाहिजे.
जिंदल उद्योगसमुहास तनपुरे साखर कारखान्याचे संचालक सुधाकर तनपुरे यांनी दोन वर्षांपूर्वी त्यांची पाच एकर जागा भाडयाने दिली. डॉ. उषा तनपुरे यांनी मालधक्का विकासातील अडीअडचणी सोडविल्या. रायगड, छत्तीसगड येथून भरीव रॉड या डेपोत येतात. ते जिंदल उद्योगसमुहाच्या सिन्नर येथील कारखान्यात पाठविले जातत. समूहाचा हा राज्यातील नागपूरनंतरचा या प्रकारचा दुसरा प्रकल्प आहे. हा प्रकल्प ग्रामीण भागात असावा, ही कंपनीची भुमीका हेाती. या डेपोमुळे कंपनीकडून रेल्वेस वर्षाकाठी 24 कोटी रुपये उत्पन्न मिळते.
राहुरीतून महिन्याकाठी 15 ते 16 हजार टन भरीव रॉड सिन्नर येथे पाठविले जातात. या डेपोमुळे 35-40 मजुरांना हक्काचे काम मिळाले आहे. या डेपोमुळे उपहारगृहे, खानावळी, वाहन दुरुस्ती, इलेक्ट्रीकल कामे आदि व्यवसायही वाढले आहेत. या डेपोचे स्थानिक समन्वयक म्हणून अभियंता अविनाश गाडे काम पाहतात.
दौंड-मनमाड लोहमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम वेगात सुरु आहे. राहुरी स्थानकावरील चारही मार्गांचे विद्युतीकरण झाले, तर 'जिंदाल' चा हा डेपो हलवावा लागेल. ती वेळ येऊ न देता तीन मार्गांचेच विद्युतीकरण केले जाते. किंवा चाहही मार्गांचे विद्युतीकरण केले गेले, तर मालधक्का म्हणून पाचवा मार्ग व स्वतंत्र फलाट विकसीत केला पाहिजे. स्थानकाया परिसरात कृषी विभागाची व खाजगी जागा मोठया प्रमाणात उपलब्ध आहे. सध्या मालधक्यावरुन कांदा व साखर रेल्वेने जाते. भविष्यात रासायनिक खतांचा रेक, तसेच कोळसा व सिमेंट डेपो विकसीत होण्यास वाव आहे. त्यामुळे रेल्वेला उत्पन्न मिळवून देणारे स्टेशन म्हणून राहुरी स्थानक विकसित करण्यात मोठा वाव आहे. सर्व बाबी अनुकूल असूनही कोणीही त्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. खासदार दिलीप गांधी व भाऊसाहेब वाकचौरे यांनी याचा पुरवठा करावा, अशी मागणी राहुरी स्टेशन परिसर विकास समितीचे अध्यक्ष बाळासाहेब पेरणे यांनी केली आहे.
- दै. सकाळ, दि. 10 जून 2012.
हे संकेतस्थळ श्री. निलेश मनोहर पांडे यांनी डेव्हलप केल आहे.
पत्ता- ७५५, मेन रोड, शिवाजी चौक,
विद्या मंदिर प्रशाले जवळ, राहुरी,
संपर्क- (२४२६) २-३-४-५-६-८
भ्रमणध्वनी- ९८५०१ ९२७८०
९९२३५ ९२७८०