ब्रेकींग न्युज/चालु घडामोडी
राहुरी शहर व तालुक्यातील चालू घडामोडी मी राहुरीकर तर्फे फोटोंसहीत, कमी वेळेत खास राहुरीकरांसाठी उपलब्ध करुन देत आहोत. फोटो मोठा करुन बघण्यासाठी फोटोवर एक सिंपल क्लिक करावे. आपणांकडेही काहि ब्रेकींग न्यूज असल्यास त्वरीत पुढिल पत्त्यावर मेल करा, नावासहीत प्रसिद्ध केली जाईल.
संपर्क: nileshpande@zapak.com
११ डिसेंबर २००७- काल रात्री पंढरी मंगल कार्यालयामागे राहणा-या डॊ. खाबिया यांच्या घरी चोरट्यांनी दरोडा टाकला. किती एवज लंपास झाला याची माहिती अद्याप मिळू शकली नाहि. (छाया- कल्पना आर्ट)
२० नोव्हेंबर २००७- कृषी उत्पन्न बाजार समिती, राहुरी येथे शेतक-यांना कांद्यास अत्यंत कमी भाव मिळाला. त्याच्या निषेधार्थ लिलाव बंद पाडून नगर-मनमाड रस्त्यावर दुपारी २ तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आला. (छाया- देवराज मन्तोडे)
१८ नोव्हेंबर २००७- जिल्हा बैन्क निवडणूकीत राहुरी गटातुन मा. प्रसादराव तनपुरे साहेब आणि रामदास पा. धुमाळ (नाना) विजयी झाले. पैकी रामदास पा. धुमाळ यांच्या निवडीनंतर झालेला जल्लोश. (छाया- कल्पना, राहुरी)
१६ ऒक्टोबर २००७- राहुरीत घरोघरी नवरात्रोत्सव उत्साहात सुरु आहे. अनेक मंडळेही सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरे करतात. जोगेश्वरी आखाडा येथिल प्रसिद्ध जगदंबा मातेच्या मंदिराचा सध्या जिर्नोधार चालु आहे. पुर्ण तालुक्यातुन येथे भाविक दर्शनासाठी येतात. तेथील देविची हि स्वयंभू मुर्ती.
०४ ऒक्टोबर००७- ’महाजल’ पाणीयोजनेअंतर्गत वांबोरी येथे मुळा धरणातुन थेट जलवाहिनी आणून उभारण्यात आल्येल्या ७२ लाखांच्या पाणीयोजनेचे उद्भाटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. आर आर पाटील यांच्या हस्ते पार पडला. समवेत मा. आमदार प्रसाद तनपुरे
०२ ऒक्टोबर २००७- राहुरी शहरात गांधी जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने विद्या मंदिर प्रशाले नी फेरी काढली.
२३सप्टेबर २००७- राहुरीतील श्री द्न्य़ानेश्वर गणेश मंडळातफे शाळेतील गरीब विद्यार्थांना वह्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
२१ सप्टेबर २००७-राहुरी हे तुळजाभवानी देवीचे माहेरघर. दरवर्षी नवरात्रीच्या आधि देवीची पालखी राहुरीत तयार होते. ती तयार करण्याचा मान काही ठराविक कुटूंबांचाच आहे. पालखी तयार होवून ती तयार करणा-यांचा कारखान्याचे चेअरमन यांनी सत्कार केला व पालखीचे दर्शन घेतले.
१४ सप्टेंबर २००७- राहुरीचा मानाचा गणपती आझाद तरुण गणेश मंडळात कारखान्याचे चेअरमन श्री. रामदास पाटील धुमाळ यांच्या हस्ते पुजा करण्यात आली.
०३ सप्टेबर २००७- शार्दुल आण्णासाहेब गागरे यास दुबई येथे झालेल्या एशियाई युथ चॆंपियन स्पर्धेत सुवर्ण पदक मिळाले. ते स्विकारताना शार्दुल. भारताचे आंतरराष्ट्रीय पातळिवर प्रतिनिधित्व करणारा शार्दुल हा पहिलाच राहुरीकर होय.
जुन्या बातम्या व फोटोंसाठी येथे क्लिक करा
This Website is Developed & Owned by
Mr. Nilesh Pande, Rahuri
Hello- 9850192780 / 9270587989