मूळ गंगेच्या काठी
- सुरेश जोशी, नगर
(दि. ०९ जून १९९३ रोजीच्या दै. सकाळ वृत्तपत्राच्या राहुरी विशेष पुरवणीतील लेख)
हरिश्चंद्र गडाजवळून उगम पावणारी मूळगंगा राहुरी तालुक्याच्या सीमेवर चांदगाव येथे प्रवरेला मिळते आणि द-याखो-यातून, डोंगरातून ती त्याच तालुक्यात मैदानात शिरते आणि प्रवरेत विलीन होते. ती मूळगंगा म्हणजेच प्राचीन आणि मूलक देशाची जीवनात्रीच म्हणता येईल. आर्यांच्या आगमनापुर्वीही अगदी अश्मयुगापासून मानवी संस्कृतीचे अवशेष या भागात आढळलेले आहेत. अमृत मंथनात राहूचा शीरच्छेद करण्यात आला, त्या राहूची पुरी व नागरी म्हणून 'राहुरी' असे समजण्यात येते. अर्थात हि कथा आर्य व एतद्देशीय लोकांमधील संघर्षाची 'आर्य दृष्टीकोनातून' सांगितलेली कथा म्हणून पाहिल्यास एक नवेच 'परिमाण' या भागाच्या इतिहासाला मिळते. दंडकारण्यात या अनार्यांना हरवून ऋषी मुनींनी आपले आश्रम स्थापले. त्यांची नावेच अनेक गावांना आढळतात. उदा. वाल्मिक (वांबोरी) आदी.
या भागाच्या इतिहासाचे स्पष्ट दर्शन घडू लागते ते सातवाहन काळापासून (इ.स.पू. २५० ते इ.स. पू. ५०) गाथा सप्तशतीत प्रवरा, गोदावरी बरोबर 'मुईला' मुळा नदीकाठचे मनोहर चित्र रेखाटलेले आढळते. इतकी प्रदीर्घ परंपरा या मूळ गंगेकाठ्च्या मानवी संकृतीला लाभली आहे. मात्र या संस्कृतीचे वैशिठ्य असे, कि राजकीय उलाढाली, जीवघेणे संघर्ष, विध्वंश या मातीत सजला नाही. समाजजीवन अध्यामिक जीवनावर आधारित असेच राहिले. त्यामुळे लोकसंस्कृती अनेक अंगांनी येथे फुलली. अनेक पंथ, संप्रदाय, परंपरा येथे विकसित झाल्या.
या मूळगंगेच्या परिसरात एकूण ९४ गावे आहेत. त्यात ६० टक्के गावांची नावे वनस्पती, किव्वा निसर्गाधीष्टीत आहेत. २० टक्के नावे धार्मिक, ऋषी, देव-देवतांवर तर उरलेली मानवी अवयव, प्राणी इ. अशी विभागणी करण्यात येते. गावाचे प्राचीनत्व शोधणा-या दृष्टीनेही त्याचा उपयोग होऊ शकतो.
अहमदनगर ऐतिहासिक वास्तुसंग्रहालायातर्फे राहुरी महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या वतीने ऐतिहासिक सर्वेक्षण प्रकल्प पूर्ण करण्यात आला. त्यात प्रत्येक गावची पाहणी करण्यात आली. त्यात अनेक महत्त्वाच्या गोष्टी उजेडात आल्या. त्यापैकी काही निवडक गावांची ओझरती ओळख.
महिपतीचे ताहाराबाद:-
हे पूर्वीचे तारापूर. निजामशाहीत येथे मोठा किल्ला होता. बारागाव नांदूर परगण्यातील हे महत्वाचे गाव. मात्र प्रसिद्ध आहे ते महिपतीचे ताहाराबाद म्हणूनच. संताचारीत्राची गोडी त्यांनी लावली. शके १६३७ मध्ये महिपातींचा जन्म झाला. वडिलांच्या निधनानंतर २६ व्या वर्षीच प्रपंचाचा भर पडला. मोरोबा ताम्भेरकर हे त्यांचे गुरु. शिक्षण अल्पच. 'म्या नाही पहिला अमरकोश ! गीर्वाण भाषा तीही नि:शेष ! नाना पुराने विशेष ! श्रवण सायासे न केली कि- असे उद्गार त्यांनी काढले. त्यातील विनय सोडला, तरी ते अल्पशिक्षितच होते. कुलकर्णी वृत्ती होती. स्नान संध्या, पूजा अर्चा नियमित करीत. एकदा सरकारचा तातडीचा हुकुम आला. तेव्हा दोन धान्याचे चाकरी होणे नाही म्हणून विठ्ठल मूर्ती पुढे लेखणी ठेवून वृत्तीचा त्याग केला. तुकाराम महाराजांनी दृष्टांत देऊन संतचरीत्र्ये
लिहिण्यास सांगितले. त्याप्रमाणे 'भाक्तविजय' हा ग्रंथ शके १६८४ मध्ये लिहून पूर्ण केला. नंतर कथासारामृत, पांडुरंग महात्म्य, संत लीलामृत व इतर छोटी-मोठी आख्याने निहिल्यावर भक्त लीलामृत शके १६९६ मध्ये पूर्ण केला. वयाच्या ७५ व्या वर्षी शके १७१२ मध्ये ते मरण पावले.
जयरामाची वांबोरी:-
वांबोरी म्हणजे वाल्मिकपुरी. हे जुने नाव ! सातवाहनकालीन प्रचंड पंढरीच्या देकाडीवर आता उध्वस्त झालेली ब्राम्हण गल्ली. तेथील गणपती मंदिराजवळच जयराम स्वामींचा मठ होता. येथे नाथ शाश्तीचा मोठा उत्सव होतो. त्यांची समाधी खंडोबा वेशीजवळ आहे. गुरुचरीत्रकार वामनबुवा वैद्य हा सिद्धपुरुष होऊन गेला. त्यांचा मराठी ओवी बद्ध ग्रंथ पेशवाईच्या उत्तर काळात फार लोकप्रिय होता. त्यांची समाधी बडोद्यास आहे. याशिवाय अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेली एक प्रचंड बारव आहे.
ब्राह्मणी:-
हे गाव रामायण काळापासून प्रसिद्ध असावे. राम वनवासात पंचावातीकडे जाताना त्यांचा जो मार्ग दाखविण्यात आला, त्यात ब्राह्मणी, सोनई चा उल्लेख आहे. पण त्यापेक्षा येथील बल्लाळई मंदिर हे महत्वाचे आहे. तळ्याकाठी हे हेमाडपंथी मंदिर नाथसंप्रदायाचे केंद्र असावे. या देवतेलाच मुक्ताई म्हणतात. आठ फुटी उंच सतीस्थंभ आहे. रेड्याची निद्रिस्थ मूर्ती हि जशी तेथील वैशिठ्ये आहेत, तसेच गोरखनाथाची मुर्तीही दुर्मिळ मानवी लागेल. या गावात काही खास प्रथा आहेत. देवीला जे आवडत नाही ते येथील लोक वापरत नाहीत. घराला पंधरा रंग देत नाहीत. कुंभाराचे चाक नाही. दोन मजली घरे नाहीत. आता कालमानाप्रमाणे बदल होत आहेत. येथील बल्लाळ घराण्याची हि कुलदेवता आहे. अश्विनात मोठी यात्रा भरते. या गावचे दुसरे वैशिठ्य म्हणजे शिवाजी महाराजांचे आजोळ. शिंदखेड राजाणे. पण त्यांपैकी एकाचा ब्राह्मणीची जहागिरी होती. निजामशाहीत प्रचंड मोठी गढी होती.
देवळाली प्रवरा:-
हे गाव यादवकाली फार प्रसिद्ध होते. देवगिरीचा राजा भिल्लन (तृतीय) याने पौष शु. १५ शके ९७४ (४ डिसेंबर १०५२ ई.स.) मध्ये श्रीधर या ब्राम्हणास दान दिले. त्याचा ताम्रपट उपलब्ध आहे. तर दुसरा एक ताम्रपट ई.स. १०७६-१०९८ या काळातील यादव नृपती सरुंचंद्र (द्वितीय) याने दिलेला आहे. १५ व्या शतकाच्या अखेरीस त्रंबकबुवा नावाचा मोठा ग्रंथकार होऊन गेला. योगमार्ग व अध्यात्मावर त्याचा 'बालबोध' हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. लेखणी तत्कालीन समाजावर कोरडे ओढणारी होती.
This website is developed by
Computronics Cyber Cafe,
Prop. Nilesh Manohar Pande,
Main Road, Shivaji Chowk, Rahuri,
Tal. Rahuri, Dist Ahmednagar
Phone: (02426) 2-3-4-5-6-8
Mobile: 9850192780 /9890366002