सामाजिक एकतेची पालखी
पुरातन काळापासून अमृतमंथना नंतर जे देव - दानवांचे युद्ध झाले त्या वेळी राहू राक्षसाचा वध राहुरीस झाला म्हणून या गावाला 'राहू हरी'...'राहुरी' असे नाव पडले अशी आख्यायिका आहे. या गावात दरवर्षी तुळजाभवानीच्या पालखीचा उत्सव होतो. राहुरी हे तुळजाभवानीचे माहेर गाव असून, तुळजापूर येथील नवरात्र उत्सवात या गावास वेगळा मान आहे.
भाद्रपद कृष्ण पक्षातील प्रतिपदेला हि पालखी तुळजापुरकडे जाते. दर वर्षी आषाढ शुद्ध सप्तमीला येथे खास पालखी मंदिरात पालखी मंदिरात पालखीची प्रतीस्थापना केली जाते. पालखी बनविण्याची जबाबदारी पवार या सुतार घराण्याकडे आहे. पालखी चे लोखंडी काम येथील रणसिंग हे लोहार घराणे करते. पालखी साठी लागणारे खास लाकूड मेहेत्रे घराणे तर पालखी ठेवण्यासाठी लागणारे घोंगडे खेडेकर घराणे पुरविते. पालखीच्या दांड्याचे विशेष लाकूड पुरविण्याचे काम शेख कदर बादशहा यांच्या घराण्याकडे आहे. पालखी प्रस्थान वेळी पानसुपारी वाटण्याच्या कार्यक्रमाची जबाबदारी तांबोळी पानवाले घराण्याकडे आहे. बुरुड समाजातील सोनावणे घराण्याकडेही काही जबाबदारी आहे.
लोहार व कोळी समाजाकडे पालखी नदीमधून मार्गस्थ करण्याची जबाबदारी आहे. पूर्वी मुळा नदीला- विशेषतः भाद्रपद महिन्यात- मोठा पूर येई. पुरातून पालखी पलीकडील देसवंडी गावात नेण्याची जबाबदारी डोहार घराण्याकडे आहे. पालखीचे पूजन करून फेटा स्वीकारण्याचा मान मराठा समाजातील शेते घराण्याकडे आहे. घोगरे यांनी पालखी मंदिरासाठी जागा दिली आहे. त्यांच्या घराशी या पूजेत मनाचे स्थान आहे. पालखीची अनेक वर्षांची परंपरा तीळवन तेली समाजाने जतन केली आहे. तेल्यांच्या येथे सार्वजनिक भोजन करून पालखी प्रस्थानास निघते. नगरपर्यंत पालखी पायी नेली जाते.
नगरहून खास रेल्वेने राहुरीची पालखी व जुन्नरचा पलंग तुळजापूरला नेला जातो. तुळजापूरला पोहोचल्यानंतर पालखीचा मुरवणूक सोहोळा होतो. नंतर पाखीचे होमात विसर्जन केले जाते. फक्त पालखीचा दांडा बु-हाननगरला श्रावण अमावास्सेपर्यंत ठेवला जातो. या उत्सवात विविध जाती धर्मातील लोकांचा सहभाग असतो. या सोहोळ्यात सामाजिक एकता व भावनिक ऐक्य आहे. राहुरीचे माजी नगराध्यक्ष्य भास्कर पाटील भूजाडी यांनी पालखीच्या मानक-र्यांचा पालिकेतर्फे सत्कार करण्याची प्रथा सुरु केली.
This website is developed by
Computronics Cyber Cafe,
Prop. Nilesh Manohar Pande,
Main Road, Shivaji Chowk, Rahuri,
Tal. Rahuri, Dist Ahmednagar
Phone: (02426) 2-3-4-5-6-8
Mobile: 9850192780 /9890366002