मराठी कविता
आपणांकडेही काही मराठी कविता असल्यास nbond007@gmail.com वर मेल करा,
नावासहीत प्रसिध्दी दिली जाईल.
ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात....
मी बोलतच नाहीडोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात....
तिला कळतच नाहीतिच्याकडे पाहिलं की पाहतच राहतो...
स्तब्ध होऊनतिच्याकड नाही पाहिलं की तीच निघून जाते...
क्षुब्ध होऊनचंद्र तारे तोडून तिला आणून द्यायचं मनात येतं
पण हे शक्य नाही हेही लगेच ध्यानात येत
मग मी माझी इच्छा फुलावरच भागवतो
बुकेही नाहीच परवडत हाही हिशेब आठवतो
पण फुल तिला द्यायची हिम्मतच होत नाही
बोलणच काय, तेव्हा तिच्या बाजुलाही फिरकत नाही
मग एखाद्या जाड पुस्तकात फुल तसच सुकत जातं
सगळी तयारी सगळी हिम्मत नेहमी असंच फुकट जातं
काही केल्या तिच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही
माझं मन तिच्याशिवाय काहिसुद्धा मागत नाही
ती नाही म्हणेल याची भीती वाटते
ती नाही म्हणेल याची भीती वाटते
पण तरीही आज ठरवलंय तिला सांगायचं
तिच्यसाठी असलेलं आयुष्य तिच्याच स्वाधीन करायचं
कुणास ठाऊक?तिच्याही एखाद्या पुस्तकात
माझ्यासाठीची सुकलेली फुलं असतील.
पहिला पाऊस
पहिला पाऊस पडतो तेंव्हा
एकच काम करायचं...
हातातली कामं टाकुन देउन
पावसात जाऊन भिजायचं!
आपल्या अंगावर झेलून घ्यायच्या
कोसळणार्या धारा
श्वासांमध्ये भरून घ्यायचा
सळाळणारा वारा
कानांमधे साठवुन घ्यायचे
गडगडणारे मेघ
डोळ्यांमध्ये भरुन घ्यायची
सौदामिनीची रेघ
पावसाबरोबर पाऊस बनून
नाच नाच नाचायचं
अंगणामधे, मोगर्यापाशी
तळं होऊन साचायचं!
आपलं असलं वागणं बघुन
लोक आपल्याला हसतील
आपला स्क्रू ढिला झाला
असं सुध्दा म्हणतील
ज्यांना हसायचं त्यांना हसू दे
काय म्हणायचं ते म्हणू दे
त्यांच्या दुःखाच्या पावसामधे
त्यांचं त्यांना कण्हू दे
असल्या चिल्लर गोष्टींकडे
आपण दुर्लक्ष करायचं!
पहिला पाऊस एकदाच येतो
हे आपण लक्षात ठेवायचं!
म्हणून...
पहिला पाऊस पडतो तेंव्हा
एकच काम करायचं...
हातातली कामं टाकुन देउन
पावसात जाऊन भिजायचं!
नुकताच मी
नुकताच मी
नदीवर जाऊन आलो
डोळ्यात साठलेलं एक तळं
अगदी थेंब थेंब पिळून आलो
वेळ होती ती किर्र रात्रीची
तरी नदीला भरती आली
तिलाच कळले नाही
कोणाची वेदना वरती आली
बांध तोडून काठाचा
ती गावभर फिरू लागली
माझा शोध घेण्यासाठी
हरेक घरात शिरू लागली
तिला ही पहायचं होत
कोणाच इतक दु:खी घर होत
मीही नित्य मिसळते सागराशी
पण कुठे त्याची पातळी वर येते
माझ्या घरापाशी ती येताच
एक थेंब माझ्या डोळ्यातून गळाला
मी वाहिलेल्या तळयातील अवशेषांशी
माझा गळलेला थेंब जुळाला
ओळखलं तिने मला
जागच्या जागी ती स्तब्ध झाली
नजर माझ्याशी मिळताचं
स्व:तास म्हणू लागली अभागी
म्हणाली,
आजवर माझा समज होता
जगातली सर्वात दु:खी मीच आहे
पण, तुझ्याशी मापल्यावर कळलं
माझे दु:ख किती कमीच आहे
रोज स्वत:स बुडवते सागरात
पण कधी कुठे फरक पडला
तू एकदाच दु:ख जाहीर केलसं
माझ्या अंत:करणातून पूर आला
मी म्हणालो.....
आपल्याहून सुखी जणांकडे पाहीलं
की आपणास आपण दु:खी वाटतो
आपल्याहून दु:खी जणांकडे पाहण्याचा
आपण प्रयत्नच कुठे करतो
जोपर्यंत ही वृत्ती बदलत नाही
तोपर्यंत हे असचं चालणार
सुख-समाधानात नांदणाराही
मी दु:खी आहे असचं बोलणार
पाखरे परत येतील
पाखरे परत येतील साजं टळून गेल्यावर
मेघ दाटून येतील उंन पोळून गेल्यावर
सरी धावून येतील रानं जळून गेल्यावर
सुखही परत येईल दु:खं छ्ळून गेल्यावर.
होतील मार्ग मोकळे वळणं टळून गेल्यावर
शब्द टोचतील मनाला ते बोलून गेल्यावर
भिजतील डोळे तुझे, माझे सुकून गेल्यावर
पुन्हां तु ही परत येशील मी दूर गेल्यावर.
झोप धावून येईल स्वप्नं जळून गेल्यावर
कळ्तील तुला चुका पण मी माफ़ केल्यावर
कळेल प्रेम तुला विरहात मन पिळून गेल्यावर
तुही धावून येशील मी राखेत मिळून गेल्यावर.
आठवण माझीही येईल मी विसरून गेल्यावर
पुन्हां तु शोधशील खुणा राखही उडून गेल्यावर
तुझ्याही डोळ्यात आसवे ओघळतील कधी
पण माझ्या कविता तुझ्यापुढे रडून गेल्यावर.
मी तिच्यात नव्हतो
मी तिच्यात नव्हतो पण ती माझ्यात होती
तीची नव्हती कधी पण माझी साथ होती
मी आजवर कदीलांच्या उजेडात जगलो
ती चमकणा-या ता-यांच्या प्रकाशात होती
तीचा प्रवास होता मोठ्या महामार्गावरचा
माझी ती बिचारी लहान पायवाट होती
तिच्या स्वप्नांना दोरखडं जखडलेले नेहमी
माझी कधीही सुटणारी निसरति गाठ होती
तीच सुखांशी नेहमी अजोड नातं गुफ़लेल
माझ्या वाट्याला दुःखंच भरमसाठ होती.
नेहमी साखर झोपेची तिची पहाट रोजची
मी डोळे मिटले नाही माझी सदा पहाट होती.
तिच्या ओठी नेहमी हसु उमलायच सुखाच
माझ्या डोळ्यानां नेहमी आसवांची साथ होती
तिने कधी हात जोडले नाहीत कशासाठी देवापुढे
तीच्यासाठी देवळात नेहमी माझीच वरात होती
आज म्हणतेय मी चुकली पण काय फ़ायदा
खरच फ़ार उशीरा तीची ही साद होती.
मी स्मशांन वाटेवर असताना तिला कळाल
आज म्हणे ती दिवसभर देवळात होती.
नव्हतीस तू तेव्हा.......
मंतरलेली रात होती
तारकांची प्रणयी वरात होती
चंद्राची धुंद साथ होती
मौनाची नीरव साद होती
दिलात तुझी रे याद होती
सोबतीच्या तुझी आस होती
अनिवार अशी ती रात्र होती
फितूर सारी गात्रं होती
श्वासात आर्जवी ओढ होती
उरात हुरहुर गूढ होती
रात सरता सरत नव्हती
तुझ्याविना जणू व्याकुळ होती
नि:शब्द उसासे टाकीत होती
उष:काल ती मागत होती
मी पण
माझे मी पण मी कधीच विसरले
सवे जेव्हा तुझ्या मी पहिल्यांदा बहरले
स्पर्शातून तुझ्या रे मोरपीस फुलले
मनातले तरंग सारे अधरांवर उमटले
सारं विश्व माझं व्यापून तू टाकलंस
मला मात्र पुरतं वेडं करुन सोडलंस
सूर्य, चंद्र, तारे, आकाश सारं काही तूच
हृदयातली छेडली जाणारी हर एक तार तूच
तुझ्यापासून सुरु आणि तुझ्यापर्यंतच सारं
वृथा आता माझ्यासाठी बाकी जग सारं
परीसस्पर्श
तुझी आठवण येताच
खुलतं ओठावर हसू
मनातले भाव जणू
दाखवतात तसू तसू
लकाकतात रे ती
डोळ्यातली निरांजनं
अन पापण्या ही जपतात
ती प्रकाशाची स्पंदनं
उजळलेला मुखचंद्रमा
अधिकच होतो लाजरा
मनातले भाव बोलून
होतो कावराबावरा
जीवाची तगमग
वाढवते हुरहुर
तुझ्या आगमनाचे वेध
करतात मन आतूर
दिसताच तू रे मग
सुखावतात ही नेत्रं
परीसस्पर्शाने तुझ्या
उजळतात गात्रं
येशील कां?
सांग सख्या रे येशील का
स्वप्नात माझिया येशील का
वारा नांदी घेऊन आला
हसू गालावर खुलवून गेला
मिटूनी डोळे वाट पाहते, हरवूनी सकला येशील का
आसमंत तो धुंद जाहला
तुझ्याचसाठी व्याकुळ झाला
अलगद येऊनी, हळूच स्पर्शूनी, मोरपीस तू होशील का
रातराणीचा सुगंध आता
गात्रातून या वाहू लागला
मिठीत तुझिया विसरुनी सारे, बेहोश मला तू करशील का
या वेडीला काही ना कळे
तुझ्याविना ना काही उकले
एकदाच रे फ़क्त एकदा, माझा तू रे होशील का?
This Website is Developed & Owned by
Mr. Nilesh Manohar Pande,
372, Main Road, Shivaji Chowk,
Rahuri, Dist- Ahmednagar (Maharashtra)
Hello- 9850192780 / 9890366002