मराठी विनोद- ४
'' आपले बाबा!!!!''
अवघ्या पंधरा वर्षांचा अभिषेक कॅबरे डान्स बघायला गेला होता, हे समजल्यावर त्याची आई संतापलीच. त्याला खूप फैलावर घेतल्यानंतर तिनं विचारलं, ''तू तिथे असं काही पाहिलं नाहीस ना, जे तू पाहायला नको होतं?''
त्यानं उत्तर दिलं, ''पाहिलं.''
कानावर हात ठेवून तिनं विचारलं, ''काय पाहिलंस?''
'' आपले बाबा!!!!''
''चंगा हूँ पापे, चंगा हूँ!!!!!''
बिल गेट्सने एकदा मायक्रोसॉफ्टच्या युरोप शाखेचा प्रमुख नेमण्यासाठी ५००० उमेदवारांना अंतिम मुलाखतीसाठी बोलावलं. त्यांच्यातलाच एक होता संता.
बिलने सर्व उमेदवारांना एकत्र बोलावून सांगितलं, ''ज्यांना जावा प्रोग्रामचा अनुभव नसेल त्यांनी कृपया निघून जावं.'' २०००जणांना बाहेर पडावं लागलं. संता मनाशी म्हणाला, ''काय जावा, कसलं जावा कोण जाणे? पण, आपण थांबू.''
नंतर बिलने सांगितलं, ''ज्यांच्या हाताखाली १००पेक्षा कमी माणसांनी काम केलं असेल, त्यांनी निघून जावं.'' आणखी २००० जण बाहेर पडले. संता मनात म्हणाला, ''माझ्या हाताखाली तर एकाही माणसानं कधी काम केलेलं नाही. पण, थांबून तर बघूयात...''
बिल म्हणाला, ''ज्यांच्याकडे मॅनेजमेंटचा डिप्लोमा नाही, त्यांनी बाहेर पडावं.'' ५००जण बाहेर पडले. संता मनात म्हणाला, ''माझ्याकडे तर दहावीचं सटिर्फिकेटही नाही. पण थांबायला हरकत काय?''
शेवटी बिलने सांगितलं, ''ज्यांना स्वाहिली भाषा बोलता येत नाही, त्या सर्वांनी बाहेर जावं.'' ४९८जण बाहेर पडले. संता म्हणाला, ''या नावाची भाषा आहे, हेच मला आत्ता कळतंय. पण, असूदेत. थांबू अजून.''
आता हॉलमध्ये उरलेल्या दोघांना उद्देशून बिल गेट्स म्हणाला, ''आता तुम्ही दोघे एकमेकांशी स्वाहिली भाषेत बोलून दाखवा.''
संता धीर एकवटून समोरच्या उमेदवाराला म्हणाला, ''ओय, कैसा है तू?''
दुसरा उत्तरला, ''चंगा हूँ पापे, चंगा हूँ!!!!!''
अमेरिकेतल्या डेल्टा एअरवेजचा किस्सा
एक दिवस एअरपोर्टवर अनाऊन्समेंट झाली की डेल्टाच्या फ्लाइट ५७०ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी गेट नंबर ४१वर यावे.
सगळे बोजे सावरत तिथे.
पाचच मिनिटांत तिथे दुसरी अनाऊन्समेंट झाली की, फ्लाइट नंबर ५७०च्या प्रवाशांनी गेट नंबर ३५वरून बोडिर्ंग करावे.
प्रवासी त्या गेटवर.
तिथे पुन्हा पाच मिनिटांनी उद्घोषणा झाली की फ्लाइट नंबर ५७०च्या प्रवाशांना गेट नंबर ४० मधून प्रवेश दिला जाईल.
प्रवाशांच्या संतापाचा कडेलोट होणार, इतक्यात त्याच अनाऊन्समेंटची अखेर या वाक्यानं झाली, ''डेल्टाच्या फिजिकल फिटनेस प्रोग्राममध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद!!!!''
विमानातील अनाऊन्समेंट
एकदा एका विमानात अनाऊन्समेंट झाली, ''ब्रिटिश एअरवेजच्या न्यू यॉर्क-लंडन फ्लाइटमध्ये आपलं स्वागत. मी तुमच्या विमानाचा पायलट. तुमचं विमान सध्या अटलांटिक समुदावर ३५ हजार फुटांवरून उडतंय. तुम्ही दोन्ही बाजूंच्या खिडक्यांमधून खाली पाहिलंत, तर तुम्हाला दिसेल की आपल्या विमानाची दोन्ही स्टारबोर्ड इंजिन्स जळताहेत. पोर्ट साइडच्या खिडक्यांमधून पाहिलंत, तर तुम्हाला दिसेल की दोन्हीकडचे पोर्ट विंग्ज म्हणजे पंखे पडून गेले आहेत. तुम्ही समुदात नीट निरखून पाहिलंत, तर तुम्हाला एक पिवळी लाइफबोट दिसेल. तिच्यावर तीन माणसं विमानाकडे पाहून हात हलवताना दिसतील. ती माणसे म्हणजे या विमानाचा को-पायलट, एक स्टुअडेर्स आणि मी... तुमचा पायलट.
रेकॉडेर्ड सूचना शांत चित्ताने ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद!!!!''
अमेरिकेतल्या डेल्टा एअरवेजचा किस्सा
एक दिवस एअरपोर्टवर अनाऊन्समेंट झाली की डेल्टाच्या फ्लाइट ५७०ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी गेट नंबर ४१वर यावे.
सगळे बोजे सावरत तिथे.
पाचच मिनिटांत तिथे दुसरी अनाऊन्समेंट झाली की, फ्लाइट नंबर ५७०च्या प्रवाशांनी गेट नंबर ३५वरून बोडिर्ंग करावे.
प्रवासी त्या गेटवर.
तिथे पुन्हा पाच मिनिटांनी उद्घोषणा झाली की फ्लाइट नंबर ५७०च्या प्रवाशांना गेट नंबर ४० मधून प्रवेश दिला जाईल.
प्रवाशांच्या संतापाचा कडेलोट होणार, इतक्यात त्याच अनाऊन्समेंटची अखेर या वाक्यानं झाली, ''डेल्टाच्या फिजिकल फिटनेस प्रोग्राममध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद!!!!''
......................................................
नुकतेच एका सवेर्क्षणातून असे सिद्ध झाले आहे की जगात फक्त २० टक्के पुरुषांनाच मेंदू असतो...
...
बाकीच्यांना...
बायको असते!!!!
This Website is Developed & Owned By
Mr. Nilesh Pande, Rahuri
Hello- 9850192780 / 9270587989