अप्पासाहेब ढूस
- प्रथम भारतीय स्कायडायव्हर
(आधुनिक हनुमान)
सन १९९० मध्ये माझे १२ वी पर्यंत चे शिक्षण अहमदनगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा या माझ्या गावी झाली.. बालपणीच वडील की. भीमराज रामजी ढूस यांचे निधन झालेने सन १९९१ मध्ये भारतीय सेनादलाच्या भरतीची लेखी परीक्षा उत्तीर्ण होऊनही केवळ घरच्या भावनिक विरोधामुळे देशाच्या सेनादलात जाता आले नाही... घरच्या आर्थिक हालाकीच्या परिस्थितीमुळे सन १९९१ मध्येच देवळाली प्रवरा नगरपालिकेत नोकरीत रुजू झालो... नोकरी करता करता आई श्रीमती चांगुणाबाई यांच्या मार्गदर्शनाखाली वडिलोपार्जित ६ एकर शेती सांभाळून पुढील पदवीपर्यंत चे शिक्षण राहुरी येथे politics विषयात पूर्ण केले. त्याच बरोबर नगरपरिषदे मध्ये अत्यंत महत्वाचे मानले जाणारे एल. जी. सी. तसेच एल. एस.जी.डी. सारखे विविध पदवी कोर्स पूर्ण केले... संगणकाचे शिक्षणही पूर्ण केले... सन १९९३ मध्ये सौ. नंदा हिच्याबरोबर विवाह झाला.. मोठा मुलगा चि. वैभव इयत्ता १२ वी तर लहान मुलगा चि. प्रसाद ७ वी मध्ये सध्या शिक्षण घेत आहे.. असा एकूण परिवार सांभाळून आपल्या सर्वांच्या आशीर्वाद व सहकार्याने पुढील ध्येयाकडे यशस्वी वाटचाल सुरु आहे....
ध्येय- श्रीलंका ते भारत हे अंतर हवेतून तरंगत पार करून रामायणातील प्रभू श्री. हनुमान यांचे नंतर हे अंतर हवेतून तरंगत पार करणारा प्रथम मानव बनत ऐतिहासिक विश्व विक्रम नोंदविणे.
बालपणापासून रामायणातील हनुमानाप्रमाणे हवेत उडण्याची मनीषा... सन १९८४ साली इयत्ता सहावीमध्ये शिकत असतांना याराना चित्रपटातून पहिल्यांदा हवेत उडण्याचे साधन म्हणजे हैन्ग ग्लायडिंग द्वारे (मोठा पतंग) हवेत उडता येते याची माहिती मिळाली... लगेच इलेक्ट्रिक वायर व पोत्याचा बारदानापासून हैन्ग ग्लायडर सदृश मोठा पतंग बनवून घराच्या छतावरून पहिला अयशश्वी प्रयत्न केला. त्यामध्ये हात पाय मोडण्यापासून थोडक्यात बचावलो. उडण्याचे शोध कायम ठेऊन अत्यंत आर्थिक हलाकीच्या परिस्थितीत सन १९९९ मध्ये अहमदनगर येथे डोंगरावरून उडण्याचा खेळ म्हणजे पैराग्ल्याडींग या खेळाचे बेसिक प्रशिक्षण पूर्ण केले... लागत पंधरा दिवसातच पाचगणीच्या हैरीसन फोली डोंगरावरून साडेतीन हजार फुटांचे पहिले यशवी उड्डाण केले... आर्थिक परिस्थिती अभावी प्रती पाच हजार रुपये वर्गणी करून दहा लोकांमध्ये जुने पैरा ग्लायडर विकत घेऊन अहमदनगर च्या गोरक्षनाथ डोंगर व मिरवली पहाड तसेच पुणे येथे सराव प्रशिक्षण सुरु केले.. सन २००० व २००१ मध्ये याच जुन्या साहित्यावर पैरा ग्लायडिंग खेळाच्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतला. सन २००५ मध्ये रेमंड कंपनीचे मालक dr विजयपथ सिंघानिया यांच्या बरोबर बलून मध्ये जाऊन जास्तीत जास्ती उंचीवरून उडी मारण्याचा विक्रम नोंदविण्याची इच्छा प्रकट केली. मात्र तांत्रिक कारणांमुळे सिंघानियांबरोबर बलूनमध्ये बसता आले नाही. मात्र सिंघानियांच्या अनमोल मार्गदर्शन व प्रेरणेमुळे १ मार्च २००६ रोजी बालपणीची मिशन हनुमान रिटर्न मोहिमेची संकल्पना समोर आली... स्थानिक दानशूर व्यक्ती व संस्थांच्या मदतीने सन २००८ मध्ये दुबई येथील उम अल क्वीन एअरोक्लब मध्ये विमानातून १२ हजार फुट उंचीवरून १२ वेळेस विमानातून उडी ठेण्याचे अत्यंत खडतर व जोखीम असलेले प्रशिक्षण पूर्ण केले... प्रशिक्षण कालावधीतच या उंचीवरून इतक्या वेळेस उडी घेणारा प्रथम भारतीय स्काय डायवर म्हणून लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड बुक २००९ मध्ये राष्ट्रीय विक्रमाची नोंद झाली. जानेवारी २००९ मध्ये पुणे येथे जानिमिवरून उडता येणारा पॉवर पैरा ग्लायडिंग चे प्रशिक्षण पूर्ण केले. १ फेब्रुवारी २००९ रोजी शिर्डीच्या श्री साई बाबा मंदिराच्या सुवर्ण कलशाला पॉवर पैरा ग्लायडिंग च्या मदतीने प्रदक्षिणा पूर्ण केली व हवेतून सुवर्ण कलशावर पुष्पवृष्टी करून श्रीलंका ते भारत या हनुमान उडीच्या मिशन हनुमान रिटर्न्स मोहिमेचा श्रीगणेशा केला.... दि. २४ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०१० या कालावधीत पॉवर हैन्ग ग्लायडर म्हणजे मशीनद्वारे उडणारा मोठा पतंग याचे भारत सरकारचे अधिकृत पी.एच.जी. पायलट प्रमाणपत्र प्रशिक्षणासह दक्षिणेतील केरळच्या समुद्रावर जवळपास १० तास उड्डाणाचा अनुभव घेतला.. भारत सरकारकडे पुढील मोहिमेच्या परवानगीसाठी अर्ज सदर केला असून लवकरच केंद्र शासनाचा हिरवा कंदील मिळाल्यानंतर या ऐतिहासिक मोहिमेची अधिकृत घोषणा होईल.
अप्पासाहेब ढूस यांची वेबसाईट - www.appasahebdhus.co.cc
हे संकेतस्थळ श्री. निलेश मनोहर पांडे यांनी डेव्हलप केल आहे.
पत्ता- ७५५, मेन रोड, शिवाजी चौक,
विद्या मंदिर प्रशाले जवळ, राहुरी,
जि. अहमदनगर, महाराष्ट्र.
संपर्क- (२४२६) २-३-४-५-६-८
भ्रमणध्वनी- ९८५०१९२७८० / ९८९०३६६००२