ब्रेकींग न्युज/चालु घडामोडी
राहुरी शहर व तालुक्यातील चालू घडामोडी मी राहुरीकर तर्फे फोटोंसहीत, कमी वेळेत खास राहुरीकरांसाठी उपलब्ध करुन देत आहोत. फोटो मोठा करुन बघण्यासाठी फोटोवर एक सिंपल क्लिक करावे. आपणांकडेही काहि ब्रेकींग न्यूज असल्यास त्वरीत पुढिल पत्त्यावर मेल करा, नावासहीत प्रसिद्ध केली जाईल.
संपर्क: nbond007@gmail.com
याआधिच्या व जुन्या बातम्यांसाठी व फोटोंसाठी येथे क्लिक करा.
०४ मे २००८- गेल्या अनेक दिवसांपासुन बारागांव नांदुर शिवारात धुमाकुळ घालणारा बिबट्या अखेर वनखात्याच्या कर्मचा-यांनी पिंजरा लावुन जेरबंद केला.
०3 मे २००८- राहुरी सुतगिरणीच्या लिलावासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री ना. विलासराव देशमुख यांना निवेदन देताना Dr. तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष रामदास पा. धुमाळ दिसत असुन शेजारी सहकारमंत्री ना. पतंगराव कदम, खा. बाळासाहेब विखे पा., आ. राधाकृष्ण विखे पा., आ. जयवंतराव ससाणे आदि दिसत आहेत.
०३ मे २००८- राहुरी पिपल्स बैंकेच्या निषेधार्थ श्री. अनंत औटी उर्फ बालु गुरू यांनी बैंकेसमोर आमरण उपोषण सुरू केले.
०३ मे २००८- राहुरी विद्यापीठ प्रकल्पग्रस्तांना लेखी आश्वासन मिळाल्यानंतर उपोषण कर्त्यांचे उपोषण सोडवितांना महाराष्ट्राचे कृषी मंत्री ना. बाळासाहेब थोरात.
०२ मे २००८- २९ एप्रिल रोजी सुरू केलेल्या राहुरी तालुका शिवसेना व विद्यापीठ प्रकल्पग्रस्तांनी कुटूंबासहीत उपोषनास शिवसेना आमदार व शिवसेना उपनेते श्री. अनिलभैय्या राठोड यांनी पाठींबा दिला व विद्यापीठ अधिका-यांशी चर्चा केली. सोबत राहुरीचे आमदार श्री. चंद्रशेखर पा.कदम.
३० एप्रिल २००८- श्री. आबा कोळपकर यांच्या नगराध्यक्ष पदाच्या राजीनाम्यानंतर श्री. अनिल कासार यांची ’नगराध्यक्ष’ म्हणून निवड झाली. प्रसंगी त्यांना पुष्प हार घालतांना मावळते नगराध्यक्ष. सोबत माजी आमदार मा. प्रसाद तनपुरे (साहेब), Dr. सौ. उषाताई तनपुरे, उपनगराध्यक्ष सौ. प्रतिभाताई उंडे.
२९ एप्रिल २००८- म.फु.कृ.विद्यापीठ प्रकल्पग्रस्त शेतक-यांना विद्यापीठ येथे कायम नोकरीत सामाउन घेण्यासाठी राहुरी तालुका शिवसेना व प्रकल्प ग्रस्त शेतक-यांनी आजपासुन आमरण उपोषण सुरू केले.
२८ एप्रिल २००८- राहुरीच्या खंडोबा यात्रेतील दुस-या दिवशी कुस्त्यांचा जंगी हंगामा झाला, त्याचे उदघाटन करताना मा. रामदास पा. धुमाळ व यात्रा कमिटी पदाधिकारी.
२८ एप्रिल २००८- राहुरीच्या खंडोबा यात्रेतील अतिशय महत्वाचा भाग असलेला ”बारा गाड्या ओढण्याचा” कार्यक्रम पार पडला.
२७ एप्रिल २००८- Ward No. 18 मधील (मी राहुरीकरचा बालेकिल्ला) श्री. दत्त गणेशोत्सव मंडळा तर्फे खंडोबा यात्रेतील पाणी आणणा-या कावडीवाल्यांना सालाबादप्रमाणे थंडगार सरबताचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात मंडळाचे अध्यक्ष सुहास पवार व पदाधिकारी सुनील देशपांडे, निलेश पांडे, रवी जग्गी, मिलींद सातभाई इत्यादीनी सहभाग घेतला.
२७ एप्रिल २००८- राहुरी शहराचे ग्रामदैवत श्री. खंडोबाच्या यात्रेसाठी पुणतांबा, ता. कोपरगांव येथुन पायी कावडीने पाणी
आणणारे राहुरीकर
२६ एप्रिल २००८- नगरचे आमदार व शिवसेना उपनेते मा. श्री. अनिल भैय्या राठोड यांनी राहुरी खुर्द येथे शिवसेना शाखेचे उदघाटन केले. प्रसंगी उपस्थीत राहुरी तालुका शिवसेना प्रमुख रावसाहेब खेवरे व शिवसैनिक.
२४ एप्रिल २००८- राहुरी कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या सभापती पदी मा. श्री. अरूणसाहेब तनपुरे यांची व उपसभपतीपदी मा. श्री. साहेबराव म्हसे (दादा) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. प्रसंगी संचालक मंडळ.
११ एप्रिल २००८- महात्मा फुले जयंती निमित्त व सांवता माळी युवक संघटनेतर्फे नाका नं ५, खळवाडी चौकास ”महात्मा जोतिबा फुले” असे नांव देण्यात आले, फलकाचे आवरण करतांना राहुरीचे नगराध्यक्ष व ward no. १८ चे नगरसेवक (विद्या मंदिर ward) श्री. आबा कोळपकर.
याआधिच्या व जुन्या बातम्यांसाठी व फोटोंसाठी येथे क्लिक करा.
This Website is Developed & Owned by
Mr. Nilesh Pande, Rahuri
Hello- 9850192780 / 9271691018