मराठी चारोळ्या
आपणांकडे संग्रहीत असणा-या चारोळ्या
nbond007@gmail.com ला मेल करा, नावासहीत प्रसिद्धि दिली जाईल.
माझ्यातही असेल हा सुप्त गुण
काडीच्या टोकाला असतोच ना गुल
पण पेटत नाही चूल
तुझ्याच प्रेमाचा हा सुप्तगुण
आजचा दिवस माझा होता
जगण्यामरण्यातला दुवा होता
उद्याचा दिवसही माझाच असेल
मग मात्र मृत्यूचा काही कावा दिसेल.
लहान मुलांचं आपल बरं असत
सगळं कसं मानण्यावर असतं
दाटीमुटीच्या संसारातही पोट भरतं
मोठ्यांच मात्र कसं करायचं
यातच सगळं आयुष्य सरतं
शोक आणि दु:ख
यात फार फरक आहे
एकाच एकदम थांबण होतं
दुस-याच कायम लांबण होतं
नेहमीच डोक्यानं विचार करू नये
कधी भावनांनाही वाव द्यावा
आसूसलेल्या डोळ्यांना
स्वप्नांचा गाव द्यावा
चाळीतले दरवाजे
मनाने रूंद असतात
तर फ्लॆटमधील दरवाजे
जवळ येण्याआधीच बंद होतात
ह्या डोळ्यांनी हे जग
आता नजरेआड केले
इतके पाहण्याआधी
ते बंद का नाही झाले?
तुला आपले बनविणे स्वप्न आहे हे सुंदर
मिटवावे लागणार आहे त्यासाठी धरणी आकाश्यतील आंतर
फुलासारखे फुलून बघ फुलपाखरू होऊन उडून बघ
नाही सुकल्यावर फुलता येत
म्हणूंच म्हणतो आत्ता च प्रेमात पडून बघ
छोट्या छोट्या गोष्टीत पोर बनून शिरता यावे
क्षणभर का होईना भोकाड पसरून राडता यावे
प्रत्येकाला आशा असते
आशेवरच जो तो जगत् असतो
हाती काही ही नसले तरी
सुंदर स्वप्न बघत असतो
सगळे काही विसरून चाललोय
जग तुझे सोडून
फक्त एकच सांग काय मिळा व ल स
माझ्याशी आस वागूण
This Website is Developed By
Mr. Nilesh Manohar Pande, Rahuri
Hello- 9850192780 / 9890366002