ब्रेकींग न्युज/चालु घडामोडी
राहुरी शहर व तालुक्यातील चालू घडामोडी मी राहुरीकर तर्फे फोटोंसहीत, कमी वेळेत खास राहुरीकरांसाठी उपलब्ध करुन देत आहोत. फोटो मोठा करुन बघण्यासाठी फोटोवर एक सिंपल क्लिक करावे. आपणांकडेही काहि ब्रेकींग न्यूज असल्यास त्वरीत पुढिल
पत्त्यावर मेल करा, नावासहीत प्रसिद्ध केली जाईल.
संपर्क: nbond007@gmail.com
याआधिच्या व जुन्या बातम्यांसाठी व फोटोंसाठी येथे क्लिक करा.
दि. २१ फेब्रुवारी २००९- महाराष्ट्र सरकारच्या संत गाडगेबाबा स्वच्छ्ता अभिनातील पहिला पुरस्कार (४० लाख रुपये) मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते स्विकारताना दे. प्रवरा नगरपालीकेचे नगराध्यक्ष मुरलीधर कदम. त्याप्रसंगी जलसंपदामंत्री अजित पवार, गृहमंत्री जयंत पाटील व पालीकेचे नगरसेवक.
दि. २१ फेब्रुवारी २००९- मा. राधाकृष्ण विखे यांची कैबिनेट पदी निवड झाल्यावर प्रथमच राहुरीत आले. त्याप्रसंगी सत्कार करतांना मराठा महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव डौले पा.
सत्कार करतांना खरेदी विक्री दुध संघाचे अध्यक्ष श्री. तानाजी धसाळ.
दि. १८ फेब्रुवारी २००९- राहुरी शहरात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्यापैकी शिवाजी चौक येथील दृश्य
दि. १८ फेब्रुवारी २००९- राहुरी फैक्टरी येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवछत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करताना कारखान्याचे चेअरमन रामदास पा. धुमाळ.
दि. १८ फेब्रुवारी २००९- (कृपया कैप्शन वाचावे.)
दि. १७ फेब्रुवारी २००९- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राहुरीत मेळावा संपन्न झाला. त्यावेळी मनसैनिकांना मार्गदर्शन करतांना मनसे जिल्हा संपर्क प्रमुख श्री. अविनाश अभ्यंकर.
दि. ९ जानेवारी २००९- देशभरात सुरू असलेल्या पेट्रोल कंपनींच्या संपाने राहुरीत पेट्रोल पंपावर मोठ्या रांगा लागल्या होत्या.
दि. ८ जानेवारी २००९- गुजरात बौम्बस्फोटात सहभागी असल्याच्या संशयावरून दे. प्रवरा येथील एका डौक्टरला अटक करण्यात आल्यानंतर त्याच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.
दि. २५ डीसेंबर ते ५ जानेवारी दरम्यान राहुरीतील युवकांनी हिमाचल प्रदेश येथे जाऊन हिमवृष्टीचा आनंद लुटला
दि. १३ Oct २००८- श्री. पाटीलबा बाळाजी म्हसे व सौ. कलावती पाटीलबा म्हसे पा. यांच्या अभिष्टचिंतन सोहोळ्यानिमीत्त महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. श्री. आर.आर. पाटील साहेब उपस्थित होते. या प्रसंगी निव्रुत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) याचे हरीकिर्तन सपन्न झाले.
अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी उपमुख्यमंत्र्यांबरोबर 'मी राहुरीकर' कम्युनीटीचे निलेश पांडे.
दि. २५ Oct २००८- केन्द्रीय क्रुषीमंत्री ना. शरद पवार साहेब राहुरी विद्यापीठाच्या दौ-यावर आले असता शेतकरी निवासाचे उदघाटन केले. याप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते.