मराठी कविता- ३

 

 

स्वगृह- टाईमपास

आयुष्यात प्रेम करायचय मला ...

 

दूर कुठेतरी समुद्रकिनारी

हातात हात घालुन बसायचय मला,

आकाशातील तारकांकडे बघताना

भविष्याचे हितगुज करायचय मला

आयुष्यात प्रेम करायचय मला ...

माझ्या मांडीत डोक ठेऊन

तिला झोपी गेलेल पहायचय मला,

तिच्या शांत चेहेऱ्याकडे पहाताना

स्वतःशी स्मित करायचय मला

आयुष्यात प्रेम करायचय मला ...

तिच्यासोबत थोड दुष्टपणे वागुन

तिला रागाने लालबुंद करायचय मला

तिची आसवें पुसता पुसता पटकन मिठीत घ्यायचय तिला

आयुष्यात प्रेम करायचय मला ...

आयुष्यातील तिचा हिमालय

तिच्या बरोबरीने चढायचाय मला

शिखरावर पोहोचताना माझ्या सोबतीच आनंद

तिच्या डोळ्यातुन व्यक्त झालेला अनुभवायचाय मला

आयुष्यात प्रेम करायचय मला ...

ति माझ्यापासुन दुर जात असताना

विरहाच्या कल्पनेने खिन्न व्हायचय मला

ति नसल्यामुळे होणाऱ्या वेदनांना

डोळ्यावाटे मुक्त करायचय मला

आयुष्यात प्रेम करायचय मला ...

तिच्यसोबतचे माझे आयुष्य

झऱ्याप्रमाणे अवखळ जगायचय मला

पुन्हा जन्मेन तर जिच्यासाठी

तिचा चेहेरा पहात जायचय मला

आयुष्यात प्रेम करायचय मला ...

 

 

 

 

 

 

 

 

 

 

आजही........

आजही अगदी तशीच नटली आहेस

जशी तेव्हा नटलेलीस.....

आठवतं तुला......

जेव्हा तु मला पहिल्यांदा भेटलेलीस ?

आजही आहे तुझ्या रूपात तो

पहिल्या भेटीचा नवखेपणा

आजही पुन्हा सावरतोय मी

माझ्या धडधडणा-या मना....

मी न बोलताही मनातले

सारे शब्द तुला कळलेले

आजही मनापासून जपलंय मी

ते नातं तेव्हा जुळलेले....

पुन्हा एकदा नव्याने

हे सारं घडावंसं वाटतंय.....

पुन्हा एकदा नव्याने

तुझ्या प्रेमात पडावंसं वाटतंय..!!!

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

विरहं !!!!

सागरातुन् उसळणारी प्रत्येक लाट

आज मला फक्त तुझीच आठवण करुन देते !

तुझ्यातला तो अवखळपणा

आज मला त्या लाटेत पुन्हा एकदा नव्यानं जाणवला,

अनंताचा प्रवास करुन,

एका अनामिक ओढीनं येऊन

त्या लाटेच किना-याला बिलगणं

आज मला खुप काही सांगुन जातं !

त्या खडकांतुन निखळणारं ते पाणी,

आपल्या निखळ् प्रेमाची आठवण् करुन देते,

ज्यावर आपलं प्रेम उभं आहे.

परंतू,

किना-याला भेटुन परतणारी ती लाट माझ्या मनाला एक अनामिक हुरहुर लावुन जाते,

कारण त्यात् दड्लेला असतो एक् विरहं......

पण, प्रेमाचं तेच वास्तव् रुप असावं,

नाहीतर...

एक जीवघेणा प्रवास त्या लाटेनं तरी केला असता कशाला ?

 

 

 

 

 

 

 

 

आठवतो तो समुद्र किनारा

आठवतो तो समुद्र किनारा जिथे

तू मला भेटायला यायचीस

लाटां सारखं परतून परतून

तू मला मिठीत घ्यायचीस

 

आठवतो तो समुद्र किनारा जिथे

हसता हसता आपण भांडायचो

आकाशाला धरतीवर ओढून

डोळ्यातलं नक्षत्र सांडायचो

 

आठवतो तो समुद्र किनारा

जिथे वाळूत बोटे रूतलेली

छोट्याश्या आपल्या घराची

स्वप्नांची पहिली वीट घातलेली

 

आठवतो तो समुद्र किनारा जिथे

वचनांची बरसात असायची

साक्ष म्हणून, दूर कुठेतरी

एक क्षितिजरेष दिसायची

 

मला सारं सारं आठवतं

आठवतं नाही ते तुला काही

आपण बांधलेल्या वाळूच्या घराची

वीट मात्र ढासळली नाही

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

साधं सोपं आयुष्य

साधं सोपं जगायचं

हसावंसं वाटलं तर हसायचं

रडावंसं वाटलं तर रडायचं

जसं बोलतो तसं नेहमी

वागायला थोडंच हवं

प्रत्येक वागण्याचं कारण

सांगायला थोडंच हवं

ज्यांना सांगायचं त्यांना सांगायचं

ज्यांना टांगायचं त्यांना टांगायचं!

मनात जे जे येतं ते ते

करून बघितलं पाहिजे आपण

जसं जगावं वाटतं तसंच

जगून बघितलं पाहिजे आपण

करावंसं वाटेल ते करायचं

जगावंसं वाटेल तसं जगायचं...

आपला दिवस होतो

जेंव्हा जाग आपल्याला येते

आपली रात्र होते जेंव्हा

झोप आपल्याला येते

झोप आली की झोपायचं

जाग आली की उठायचं!

पिठलं भाकरी मजेत खायची

जशी पक्वान्नं पानात

आपल्या घरात असं वावरायचं

जसा सिंह रानात!

आपल्या जेवणाचं, आपल्या जगण्याचं

आपणच कौतुक करायचं

असेलही चंद्र मोठा

त्याचं कौतुक कशाला एवढं

जगात दुसरं चांदणं नाही

आपल्या हसण्या एवढं!

आपणच आपलं चांदणं बनून

घरभर शिंपत रहायचं

साधं सोपं आयुष्य

साधं सोपं जगायचं

हसावंसं वाटलं तर हसायचं

रडावंसं वाटलं तर रडायचं

 

राहीले ओठांवरी.....

बोलायचे काहीच होते

बोलले काहीतरी

ओठातले हे शब्द माझे

राहीले ओठांवरी

स्वप्नातली मुर्त तीही

राहीली स्वप्नांतरी

ओठातले हे शब्द माझे

राहीले ओठांवरी

साहवेना ही व्यथा तू

भेट ना रे क्षणभरी

ओठातले हे शब्द माझे

राहीले ओठांवरी

ऐक ना अखेर ही रे

चालले मी दुसर्‍या तीरी

ओठातले हे शब्द माझे

 

 

 

 

 

 

 

 

 कशी ही प्रीत

 अवचित भेट कशी रे घडली

ध्यानी मनीही नसताना

नकळत प्रीत कशी ही फुलली

गाफिल मन हे असताना

क्षणात बदले सारी दुनिया

गुलाब पखरण चोहीकडे

फुले पिसारा मनमोराचा

नर्तन त्याचे तुझ्यापुढे

एकांती मग उगाच हसणे

तुला आठवून उगीच झुरणे

स्वप्नामधल्या सहवासाने

पुन्हा पुन्हा ते पुलकित होणे

समय गुलाबी पंख पसरुनी

असाच अलगद विहरावा

चिंब भिजावे प्रीतसरींनी

मनात दरवळ पसरावा

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 जगायलाच आज वेळ का नाही????????.....

अमाप सुख आहे सगळ्यान्च्याच

पदरात पण ते अनुभवयला

आज वेळ नाही.....

आईच्या अन्गाईची जाणिव आहे

पण आईला आज

'आई' म्हणायलाच वेळ नाही.....

सगळी नाती संपवुन झालीत

पण आज त्या नात्यान्ना

पुरायलाही आज वेळ नाही.....

सगळ्यान्ची नाव मोबाईल मध्ये सेव आहेत

पण प्रेमाचे चार शब्द

बोलायलाही आज वेळ नाही.....

ज्या पोराबाळान्साठी मेहनत दिवस-रात्र करतात

त्यान्च्याकडे क्षणभर

बघायलाही आज वेळ नाही....

सान्गेल कोण कशाला दुस-याबद्द्ल

जेव्हा ईथे स्वतःकडेच

बघायला वेळ नाही......

डोळ्यावर आलीये खुप झोप

पण आज कोणाकडे

झोपयलाही वेळ नाही.....

ह्रुदयात वेदनान्चा पुर वाहतोय

पण त्या आठवुन

रडायलाही वेळ नाही....

परक्यान्ची जाणिव कशी असेल

जर ईथे आपल्याच माणसान्साठि वेळ नाही...

आयुष्यात पुढे जाण्यासाठी चाललेल्या

या संघर्षात जरा माग वळुन

पहायलाही वेळ नाही........

अरे जीवना तुच सान्ग

जगण्यासाठीच चाललेल्या या धावपळीत

जगायलाच आज वेळ का नाही????????.....

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

ठरवलं ना एकदा

मागे वळुन पुन्हा,

आता नाही बघायचं...

विसरलेल्या आठवणींना,

आता नाही आठवायचं...

चुकार हळव्या क्षणात,

आता नाही फसायचं...

अपेक्षांचे ओझे आता,

मनावर नाही बाळगायच...

नागमोडी वळणावर आता,

नाही जास्त रेंगाळायचं...

निसरड्या वाटेवर आता,

नाही आपण घसरायचं...

स्वतःच्या हाताने आता,

स्वतःला सावरायचं...

नी स्वतःचे आयुष्य,

स्वतःच आपण घडवायचं...

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

जी माणसे हवीशी वाटतात

 

जी माणसे हवीशी वाटतात

ती कधी भेटत नाही

जी माणसे नकोशी वाटतात

त्यांचा सहवास संपत नाही

ज्यांच्याकडे जावेशे वाटते

त्यांच्याकडे जायला जमत नाही

ज्यांच्याकडे जाऊ नये असे वाटते

त्यांच्याकडे जावेच लागते

जेंव्हा जीवन नकोसे वाटते

तेंव्हा काळ संपत नाही

जीवनामध्ये सुरुवातीस ज्यात अथ नाही असे वाटते,त्यातच खूप अथ भरलेला आहे असे आयुष्याच्या शेवटी कळते

जेंव्हा जीवनाचा खरा अथ कळतो

तेंव्हा काळ संपलेला असतो

नशीब हे असच असते

त्याच्याशी जरा जपून वागाव लागत

तिथे कोणाचेच चालत नाही

जिकडे नेईल तिकडे जावेच लागते

 

 

 

 

 

 

 

 

 

कधी कधी

 

कधी कधी ओळख अलगदपणे मैत्रीमध्ये बदलते,

गप्पा रंगतात, वादही होतात, नवे नाते उमलते....

गाण्याची एखादी मैफल जशी उत्तरोत्तर रंगत जाते,

तशीच ही मैत्री आयुष्याला संगीतमय करत राहते....

अशा मैत्रीला नियमांचे अन अटींचे बंध नसतात,

चेहरे दिसले नाही तरी मनं मात्र नक्की दिसतात....

आपली मैत्री अशीच आहे कायम मनात जपण्यासारखी,

चिरकाळ आनंद देणाऱ्या गोड सुरेल गाण्यासारखी!!!! 

 

 

मराठी कविता-        ३   

This Website is Developed  By

Mr. Nilesh Manohar Pande,

372, Main Road, Shivaji Chowk,

Rahuri, Dist- Ahmednagar (Maharashtra)

Hello- 9850192780 / 9890366002