दि. २८ फेब्रुवारी २०११ (दै. सकाळ मधून) - देसवंडी, ता. राहुरी येथील चित्रकार रावसाहेब गागरे यांच्या चित्रांचे प्रदर्शन उद्यापासून (दि. १ मार्च २०११) सात मार्चपर्यंत मुंबईतील बजाज आर्ट गैलरीत होत आहे.
'अवतार' हा त्यांच्या यावेळच्या चीत्रप्रदशानाविषय आहे. सभोवतालच्या आकाशाचे मानवी मनाला सतत आकर्षण राहिले आहे. आकाशात अनेकदा ढगांची गर्दी होते. सतत संथ गतीने ढगांच्या आकारात काही आकार परिचयाचे वाटतात, तर काही अनोळखी वाटतात. या आकारात सतत बदल होत असतो. काही आकार हवेहवेसे वाटतात. तर काही नकोसे वाटतात. मानवाच्या गर्दीतही आपल्या संपर्कात आलेल्या आपल्याला दिसलेल्या काही काही व्यक्तींनी आपल्या मनाच्या आकाशात अशीच जागा व्यापलेली असते. त्यातही या ढगांच्या आकाराप्रमाणे बदल होत असतात. आकाशातील काही ढग त्यांना मोकळे होण्यासाठी जागा शोधतात, तद्वतच माणसालाही मोकळे होण्यासाठी अवकाशाची गरज आहे. कलाकार रावसाहेब गागरे यांच्या अंतर्मनात माणसाची अशीच ढगांप्रमाणे गर्दी झाली. या अंतर्मनातील माणसांच्या गर्दीला त्यांनी कागदावर चित्र रूपाने आकार दिला. बाह्यविश्वातले अनेक आकार कधी पाहिलेले तर कधीच न पाहिलेले, काही तर्कापलीकडील तर काही कल्पनातील अशी मनातील माणसांच्या ढगाप्रमाणे गर्दीला त्यांनी चित्र रूप दिले आहे.
या विषयावर आधारित हे प्रदर्शन मुंबईत भरत आहे. ते सर्वांसाठी खुले आहे. यात ३२ चित्रे आहेत.
या आधी दोन वर्षापूर्वी जहांगीर आर्ट गैलरीतही त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरले होते. त्याला अपेक्षेपेक्षाही खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्या प्रदर्शनातील फोटो बघण्यासाठी येथे क्लिक करा.
दि. २३ फेब्रुवारी २०११- आज वादळी पावसाबरोबर झाल्येल्या गारपिटीमुळे अनेक ठिकाणची उभी पिके आडवी झाली. (फोटो झूम {मोठा} करण्यासाठी कृपया फोटोवर क्लिक करा)