'वरदान' मुळा धरण
'वरदान' मुळा धरण
अहमदनगर जिल्हयातील गभगीरीच्या कुशीत वसलेला व ऐतिहासीक,भैगोलिक व राजकीय पार्श्वभूमी लाभलेल्या या सहकाराच्या वैभवशाली राहुरी तालुक्याची किर्ती जिल्हयात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोप-योत झळकलेली आहे. त्यात भर पडली ती शेतक-यांना वरदान ठरलेल्या मुळा धरणाची...
सह्याद्री पर्वताच्या आजोबा डोंगराजवळ मुळानदी उगम पावते. उगमापासून 136 कि.मी. अंतराच्या वहनानंतर ती राहुरी तालुक्यातील बारागांव नांदूर परिसरात प्रवेश केलेल्या या मुळानदीला अडवून त्याठिकाणी एक धरण बांधण्यात आले ते म्हणजेच आजचे मुळाधरण होय. 1958 ते 1972 च्या दरम्यान हे मातीचे धरण बांधण्यात आले होते. धरणाचा पाया खोदताना काही भागात वाळू, चिकणमाती व गेरु तसेच कारा प्रकारचे दगडाचे थर लागलेले आढळून आले होते. त्यामुळे धरणाच्या बांधकामाकरीता अनेक अडचणी आल्या होत्या. त्यामधून मार्ग गाढत हे 26 द.ल.घ.फूट पाणी साठवण क्षमता असलेले हे मुळा धरणाचे काम पूर्ण करण्यात आले होते. देशात पहिल्यांदाच जलविरोधी क्रांक्रीटचा अत्याधुनिक पडदा टाकून धरणाच्या पायाच्या बांधकाम करताना त्याला मजबूती देण्यात आली होती. मुळा धरणाच्या भिंतीची लांबी 2856 मीटर उभारण्यात आली तर उंची 4817 मीटर पर्यंत उचलण्यात आलेली आहे. मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्राखाली 2275.86 कि.मी. क्षेत्र अच्छादित झाले आहे. अतिशय अडी-अडणींतून बांधण्यात आलेल्या या मुळा धरणासाठी 13 हजार 200 एकर जमीन व्यापलेली समजून येत आहे. अहमदनगर जिल्हयातील सर्वांत मोठे धरण म्हणून मुळा धरण उर्फ ज्ञानेश्वर सागर जलाशयाला आज ओळखले जात आहे.
राहुरी तालुक्यात 1950 च्या दशकात पाण्याची उपलब्धता नसल्याने शिवाय पर्जन्यमान केवळ 13 ते 18 इंच असल्याने तालुक्यातील विस्तीर्ण शेती पाण्यावाचून उजाड बनली होती. या परिस्थितीत शेतक-यांना वरदान म्हणून मुळा धरण अस्तित्वात आले. व त्यानंतर ख-या अर्थाने तालुक्यातील शेतपीके फुलू लागली. त्यामधून शेतकरी समृध्द होत बागायतदारांचा तालुका म्हणून राहुरीची ओळख राज्यात होऊ लागली. मुळा धरणाच्या मुबलक पाण्याने शेतकरी सुखावला. मुळा धरणातून डाव्या व उजव्या कालव्यामधून तालुक्यासह बाहेरील शेतीला हंगामाच्या गरजेनुसार आर्वतनामधून पाणीपुरवठा सुरु झाला. जशी शेती बहरु लागली तसे शेतक-यांच्या चेह-यावर समाधानाच्या छटा दिसू लागल्या व ख-या अर्थाने राहुरी तालुका व शेतक-यांच्या सर्वांगिण विकासासाठी मुळा धरणाचे योगदान समोर आले. आज याच मुळा नदीच्या माध्यमातून धरणात असलेल्या पाण्याच्या जीवावर हजारो हेक्टर शेती जिवंत आहे. फक्त राहुरी तालुक्यातच नव्हे तर नेवासा, शेवगांव, पाथर्डी, तालुकयाला देखील मुळाधरणाने आपल्या पाणी स्पर्शाने सुजलाम सुफलाम केले आहे. याशिवाय या धरणातून जिल्हयाचे ठिकाण असलेल्या अहमदनगर शहराला पिण्याचे पाणी पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसांपासून धरणाकडे पर्यटकांचे विशेष ओढ लागलेली दिसून येत आहे.
सह्याद्री पर्वताच्या डोंगररांगेतून उगम पावणारी शेतक-यांची भाग्यविधाती असलेली ही मुळा नदी राहुरीतून वाहत-वाहत नेवासा परिसरातील प्रवरा नदीला जावून मिळते. महाराष्ट्राची दक्षीण गंगा म्हणून संबांधल्या जाणा-या गोदावरीचीही मुळा नदी ही उपनदी म्हणून ओळखली जाते. मुळा नदी आपल्या प्रवाहाद्वारे सुमारे 145 कि.मी. अंतरापर्यंतच्या शेतीला वरदान ठरु पहात आहे.
शेतक-यांचे जीवन सुखी व समृध्द बनविणा-या या मुळा धरणाच्या उजव्या कालव्याखाली महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या हजारो हेक्टर क्षेत्रासह उंबरे, ब्राम्हणी, चेडगांव, मोकळ-ओहळ, देसवंडी, सडे इत्यादी गावांमधील क्षेत्र ओलिताखाली आलेले आहे. याशिवाय उजवा कालवा राहुरी तालुक्याशिवाय नेवासा, शेवगांव व पाथर्डी तालुक्यातील शेतक-यांना देखील शेती व पिण्यासाठी पावर्तनाच्या माध्यमातून पाणी पुरवितो. अतिशय लांबच्या अंतरांच्या वहन क्षमतेमुळे व भरपूर ओलिताखाली क्षेत्र असल्याने उजव्या कालव्याला किमान 35 दिवसांचे आवर्तन पाटबंधारे विभागाकडून सोडले जाते. शेतक-यांना पाणी वाटपासाठी उजव्या कालव्याखाली सुमारे 264 पाणी वापर संस्था कार्यरत आहेत. याशिवाय डाव्या कालव्याखाली बारागांव नांदूर, देवळाली प्रवरा, या मोठया गावांसह परिसरातील छोट्या मोठया गांवामधील मोठे क्षेत्र डाव्या कालव्याचे लाभक्षेत्र म्हणून ओळखले जाते. या कालव्याखाली उजव्या कालव्याच्या तुलनेत लाभक्षेत्र हे अत्यल्प असल्याने डाव्या कालव्याचे आवर्तन हे 10 ते 15 दिवसांकरीता मर्यादित असते. डाव्या कालव्याच्या पाण्याच्या नियोजनाखाली सुमारे 24 पाणी वापर संस्था कामकाज पाहत आहेत. एकूणच मुळा धरणाच्या कृपाशिर्वादाने आज उजवा व डाव्या कालव्यांच्या माध्यमातून तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्रावरील शेती फुलल्याने शेतकरी राजा सुखावलेला दिसून येतो आहे. धरणाच्या पाणी र्स्शाने तालुक्यात ऊस, कापूस, कांदा या पिकांबरोबरच तृणधान्य व चारापिकांना शेती बहरुन येत आहे.
हे संकेतस्थळ श्री. निलेश मनोहर पांडे यांनी डेव्हलप केल आहे.
पत्ता- ७५५, मेन रोड, शिवाजी चौक,
विद्या मंदिर प्रशाले जवळ, राहुरी,
जि. अहमदनगर, महाराष्ट्र.
संपर्क- (२४२६) २-३-४-५-६-८
भ्रमणध्वनी- ९८५०१ ९२७८०
९९२३५ ९२७८०