शिवशाहीर विजय तनपुरे
लोककला हे महाराष्ट्रच वैभव. शाहिरी हा तर प्राणच. शिवशाहीपासून स्वातंत्र्यलढयापर्यंत अनेक शाहिरांनी आपल्या पोवाड्यांनी समाजप्रबोधन केल. शाहिराची ललकारी ऐकली अन उसळून उठणार नाही, असा तरुण सापडणे सुश्कील. शाहीर अनंत फांदी, राम जोशी, होनाजी प्रभाकर, तसेच स्वातंत्र्यलढ्यात गोविंद खाडिलकर, आत्माराम पाटील, अमर शीख आणि नंतर बाबासाहेब देशमुख यांनी लोक जागृती केली. आता रैप, पॉप, रिमिक्स चा जमाना आहे. समाजाची अभिरुची बदलली आहे हार्मोनियम, तुनतुण्याची जागा सिंथेसायझर ने घेतली. मात्र आज अस्तंगत होऊ पाहणारी शाहिरी कला जपण्यासाठी काहीजण धडपडतात. राहुरीतील विजय तनपुरे हे त्यातीलच एक. अपंगत्वावर मात करीत त्यांनी अंगावर शाहिरी साज चढवलाय. आतापर्यंत त्यांच्या ७१ पोवाद्यांच्या कैसेट निघाल्यात. वीस-पंचवीस पुरस्कार त्यांनी पटकावलेत. शिर्डीचे साई बाबा, शनिदेव, अक्कलकोट स्वामी, पंढरीचा विठोबा, श्रीतुळजाभवानी, आदींचा त्यात समावेश आहे. तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरचा पोवादाही त्यांनी गायला आहे. मुंबई, पुणे, नगर, जळगाव आकाशवाणीवर, तसेच दूरदर्शनवरील 'सुरभी' तही त्यांच्या पोवाड्याची ललकारी दुमदुमली आहे. झी टीव्हीनेही त्यांचा कार्यक्रम सदर केला. एखाद्या धडधाकट माणसाचा हा जीवनप्रवास असता तर एकवेळ ठीक. परंतु एका पायाने अपंग असलेल्या शाहिराची हि कथा. अशा व्यक्तिमत्वाला अपंग तरी म्हणावे कसे?
शाहिरीन तनपुरे यांना रोजीरोटीच नव्हे, तर पत आणि प्रतिष्टा मिळवून दिली. गेली २० वर्ष ते महाराष्ट्रभर कार्यक्रम करीत आहेत. सर्वत्र त्यांचा चाहता वर्ग आहे. अशोक सराफ, महेश कोठारे, सचिन पिळगावकर यांच्यापासून आदित्य पांचोली, धर्मेंद्र पर्यंत. ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे, माजी मंत्री शबीर शेख यांच्यापासून बाळासाहेब ठाकरेंपर्यंत सर्वांशी त्यांचे स्नेहाचे संबंध आहेत. शाहिरीबद्दल अनेक दिग्गजांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे. जकार्ता, सिंगापूर व ऑस्ट्रेलियातील महाराष्ट्र मांडलाच त्यांन्या शाहिरीचा कार्यक्रम करण्याच निमंत्रण आल आहे.
इथपर्यंत चा प्रवास साहजिकच सहजी झालेला नाही. त्यापाठी आहे अहोरात्र मेहनत, जिद्द आणि विजिगीष वृत्ती. वयाच्या दुसर्या वर्षी त्यांना पोलीओने घेरले. त्यात एक पाय निकामी झाला. वडिलांनी त्यावर उपचार करण्यासाठी होती नव्हती तेव्हढी जमीन विकली. परंतु काडीचा उपयोग झाला नाही. आई धार्मिक वृत्तीची. त्यामुळे ती भजन-कीर्तनाला कडेवर घेऊन जायची. 'मुकं करोति वाचालं पडगु लंघयते गिरिम यत्कृपा तमहं वंदे परमानान्द्माधावं' या श्लोकावर तिचा पूर्ण भरवसा. पंढरपुरचे सुदर्शन महाराज राहुरीला कीर्तनाला यायचे. ते क्र्तानातून पोवाडा म्हणायचे. त्यांचा माझ्यावर प्रभाव पडला. शाळेतही अशोक पैठणकर यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी केल. वेळोवेळी मिळालेल्या कौतुकामुळे काहीतरी करण्याचा निर्धार केला, असे शाहीर तनपुरे सांगतात.
शाहीर बाबासाहेब देशमुख यांच्या पोवाड्यांनी तंपुरेंना अक्षरशः वेड लावल. त्यांच्या प्रमाणे आपलाहि कैसेटवर फोटो छापून आला पाहिजे, अशी मनीषा बाळगली. मग सुरु झाली एकलव्यासारखी तपश्चर्या. पोवाडे. कवन, लिहायची आणि स्वतःच गायची. हळूहळू कार्यक्रम मिळू लागले. कुठे मानधन तर कुठ नुसताच मन मिळायचा. कैसेट काढण्यासाठी अनेकांच्या पाय-या झिजवल्या. मात्र, पदरी आली घोर निराशा. पण मनातील स्वप्न करपू दिली नाहीत, अस शाहीर तनपुरे नमूद करतात.
अनेक ठिकाणच्या पोवाड्याच्या कार्यक्रमामुळे नाव झाल. अशीच एके दिवशी चित्रपट-नाट्य अभिनेते प्रकाश इनामदार यांच्याशी ओळख झाली. त्यांनी नगरच्या सहकार सभागृहात पोवाड्याचा कार्यक्रम घडवून आणला. मग विजय सेठी यांच्याही प्रयत्नांना यश आल. त्यांच्यामुळे माझी शनिदेवाचा पोवाडा हि पहिली कैसेट आली. नंतर पद्मश्री विठ्ठलराव विखे यांची पोवाड्याची कैसेट निघाली.
शिवसेना नेते विलास भानुशाली यांनी शिवसेनाप्रमुखांवर पोवाडा करण्याच सुचवलं. बाळासाहेबांवर पोवाडा म्हणजे शिवधनुष्य पेलण्याच दिव्य. या पोवाड्याने नाव, प्रसिद्धी मिळवून दिली. बाळासाहेब यांच्या बरोबरची पहिली भेट त्यांना आजही आठवते. केवळ पाचच मिनिट मिळाली होते. ती संपल्यावर जाण भाग होत. परंतु हिम्मत धरून साहेबांना पोवाडा ऐकण्याची विनंती केली. त्यांनी परवानगी देताच पोवाडा सुरु केला अन ते ऐकतच राहिले. खुर्ची वाजवून त्यांनी दाद दिली. नंतर यथावकाश पोवाड्यांची कैसेट आली.
प्रकाशनावेळी सर्व मुंबईत माझे बैनर लागले. महेश कोठारे व सचिन पिळगावकर यांनी हि बातमी दूरध्वनीवरून दिली. हा माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण होता. नंतर मात्र मागे वरून पहिले नाही.
अरुण दाते यांचे चिरंजीव अतुल यांच्यामुळे 'टिप्स' मध्ये संधी मिळाली. एकदा रेकोर्डिंग सामावून बाहेर पडत असताना फुलनदेवी वर पोवाड्याची टिप्स कडून मागणी झाली. त्यावेळी मी गडबडलो. फुलनदेवी पूर्वाश्रमीची डाकू आणि तिच्यावर पोवाडा, असे अनेक प्रश्न सतावत होते. त्या वेळी साप्ताहिक लोकप्रभा चा आधार मिळाला. त्यात फुलनदेवी च आत्मचरित्र छापून आल होत. ते वाचून तिच्यावरील अत्याचाराची कल्पना आली ते वाचून एका रात्रीत पोवाडा केला. हा आयुष्यातील वेगळा अनुभव तनपुरे सांगत असतात. शनी शिंगणापूर भेटीत गायिका अनुराधा पौडवाल यांच्याशी ओळख झाली. त्यांनी विंग्ज मध्ये संधी दिली. टी सिरीजमध्ये वैष्णोदेवी, सती सावित्री, बारा ज्योत्रीलिंग, महात्मा फुले, संत एकनाथ आदी पोवाडे केले.
मुंबई दूरदर्शनवरील अधिकारी शशिकांत भोसले यांनी 'नाचू कीर्तनाचे रंगी' हा कार्यक्रम करण्याचा आग्रह धरला. परंतु याबाबत फारसे ज्ञान नसल्याने त्यांना नम्रपणे नकार दिला. अन कीर्तनाचे प्रशिक्षण घेण्याच ठरवल. २००५ मध्ये बाबा महाराज सातारकर यांचा वागयज्ञ ऐकायला मिळाला. पुन्हा मानाने कीर्तनकार होण्यासाठी उचल खाल्ली. सांस्कृतिक कार्य संचानालायाकडे अर्ज पाठवला आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील डिकसळ येथे प्रकाश महाराज बोधले यांच्या संस्थेत प्रवेश मिळाला. प्रशिक्षणा नंतर पहिले कीर्तन मुळा-प्रवराचे रावसाहेब कोळसे यांनी ठेवले. आज महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी त्यांना कीर्तनासाठी निमंत्रण येतात. आपण जे भोगल टी वेळ इतरांवर येऊ नये, या हेतूने त्यांनी १९८७ साली शिवगर्जना कला मंच स्थापन केला. अपंगांसाठी बचतगट हि काढलाय. पुढे त्याचा ट्रस्ट करण्याची त्यांची इच्चा आहे. त्यासाठी ते कीर्तन व स्हीरीच्या कार्यक्रमातून मिळणाऱ्या बिदागीतील १० टक्के रक्कम वेगळी काढतात. अपंगांचा मेळावा घेऊन प्रेरित करतात. त्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट शिवगर्जना डॉट कॉम नावाने वेबसाईट सुरु केली आहे. अपंगांनी काय गमावलं यापेक्षा काय शिल्लक आहे याचा विचार करा, असा सल्लाही देतात.
एमपीएस्सी ची परीक्षा देऊन तहसीलदार बनण्याचीही त्यांची मनीषा आहे. कोणतीही गोष्ट अशक्य नसते. हाच दुर्दम्य आशावाद त्यांच्यात ओतप्रोत भरलेला दिसतो. अशा शाहीर कीर्तनकाराच्या दुर्दम्य इच्छा शक्तीला समस्त राहुरीकारांचा मनाचा मुजरा.....
शिवशाहीर विजय तनपुरे यांची वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
हे संकेतस्थळ श्री. निलेश मनोहर पांडे यांनी डेव्हलप केल आहे.
पत्ता- ७५५, मेन रोड, शिवाजी चौक,
विद्या मंदिर प्रशाले जवळ, राहुरी,
जि. अहमदनगर, महाराष्ट्र.
संपर्क- (२४२६) २-३-४-५-६-८
भ्रमणध्वनी- ९८५०१९२७८० / ९८९०३६६००२