श्री केदारेश्वर मंदिर एक जागृत देवस्थान
राहुरीपासून 25 कि.मी. अंतरावर राज्यमार्ग क्रमांक 49 वर पूर्वेला निसर्गाच्या सानिध्यात निवांत व शांत निसर्गरम्य ठिकाणी वसलेले म्हैसगांव येथील श्री केदारेश्वर मंदिर देवस्थान. हे मंदिर पुरातन, स्वयंभू शिवलींग मंदिर आहे. प्रभू रामचंद्र, सिता, लक्ष्मण वनवासात असतांना दंडकारण्यातील एक भाग असलेल्या याच ठिकाणी त्यांनी मुक्काम केला होता. प्रभू रामचंद्रांची नियमित शिवभक्ती असल्याने त्यांच्या हातांनी याठिकाणी शिवलींगाची स्थापना करुन या अरण्यात त्यकाळी जे शिवलींग बनविले त्याचे नांव केदारेश्वर ठेवले. तेसच आजचे केदारेश्वर देवस्थान होय. तसेच या मंदिराविषयी अख्यायिका आहे की हे शिवमंदिर मध्ययुगीन काळात घनदाट वेलींनी अच्छादीत व दुर्लक्षीत असे ठिकाण होते. परंतु एकदा जनार्दन स्वामी यांच्या दर्शनासाठी गेलेल्या गांवक-यांनी स्वामीजींनी दाट झाडीत वेढलेल्या डोंगरदरीत प्रभू रामचंद्रांनी स्थपन केलेल्या ऋषिमुनी, साधक, तपस्वी यांनी याठिकाणी आत्मसाक्षात्कारासाठी कठोर योगसाधना केली असे गांवातील शिवभक्तांना सांगितले. यावरुन गांवक-यांनी स्वामीजींच्या आदेशावरुन या केदारेश्वर मंदिराची पुन्हा स्थापना केली. थोडयाच कालावधीमध्ये या क्षेत्राची प्रचिती वाढत गेली. दर सोमवारी या ठिकाणी शेकडो शिवभक्त भावीक दर्शनासाठी येवू लागले. हे शिवलंग स्वयंभू मंदिर, एक जागृत देवस्थान आहे. हे गांव-यांच्या लक्षात येवू लागले. दर सोमवारी या ठिकाणी अनेक वाटसरु थांबतात व थोडावेळ विसावतात. नतमस्तक होवून नवस बोलतात. मंदिरासमोर ओढा असून या ओढयात बाराही महीने पाणी असेत. अगदी उन्हाळयातसुध्दा म्हणतात ना देवाची करणी अन नारळात पाणी अगदी तसेच या ओढयात पाणी असते. येथे येणारे भाविक आनंदाने हातपाय तोंड धुवून दर्शन घेतात, पाणी पितात व गार थंड वडाच्या स
सावलीत विसावतात.
आज या पंचक्रोशितील शिवभक्त परिसरातील गांवकरी येथे येतात व त्यांच्याच सहकार्यातून आज मंदिराचे कळसाचे काम होवून मोठे मंदिर साकारले असून समोर सभामंडप देखील आहे व भक्तनिवासाचे कामही सुरु आहे. याठिकाणी गांवक-यांनी वर्गनी करुन प्रशस्त प्रांगण व परिसर सुशोभीत केला आहे. आज या ठिकाणी अनेक विवाह देखील होतात. दरवर्षी महाशिवरात्रीला याठिकाणी सांत दिवसांचा सप्ताह भरतो व या यात्रेला 70 ते 80 हजार भाविक उपस्थित असतात. या उत्सवात पारायणे, सोमवारी भंडारा, अभिषेक, सत्यनारायण महापूजा, दिंडी सोहोळा, भजन, किर्तीन व पालखी मिरवणूक असे कार्यक्रम घेतले जातात.
आज या ठिकाणी लक्ष्मण महाराज पांचाळ, भगवान महाराज यमगर हे श्री केदारेश्वर मंदिराचे व्यवस्थापन पुजा अर्चा व धार्मिक कार्यक्रम नित्यनियमाने करतात. नुकताच महाराष्ट्र शासनाकडून या मंदिराचा तिर्थक्षेत्र आरखडयात समावेश झाला असून 'क' वर्ग मान्यता मिळाल्याचे पत्र मंदिर समितीकडे आले आहे. त्यामुळे लवकरच श्री केदारेश्वर मंदिर हे जागृत देवस्थान तर आहेच, परंतु दुर्लक्षित होते, ते आता झपाटयाने विकास होत असून गांवक-यांनी इच्छाशक्तीप्रमाणे मदत देवून शिवभक्ती प्रकट केली आहे. त्यामुळे श्री केदारेश्वर मंदिराचे नांव आज जिल्हाभर पोहोचले आहे. येथे दर्शनासाठी येण्यासाठी राहुरीपासून पश्चिमेला रस्ता येतो. श्रीरामपूरहून राहुरी फॅक्टरी पासून पश्चिमेला कणगर मार्गे ताहाराबादला संत महिपती महाराज समाधीचे दर्शन घेवून भाविक केदारेश्वराच्या दर्शनासाठी येवू शकतात. संगमनेरकडून पारनेकरकडून लोणीकडून येथे येण्यासाठी रस्ता उपलब्ध आहे.
- दिलीप झावरे
हे संकेतस्थळ श्री. निलेश मनोहर पांडे यांनी डेव्हलप केल आहे.
पत्ता- ७५५, मेन रोड, शिवाजी चौक,
विद्या मंदिर प्रशाले जवळ, राहुरी,
संपर्क- (२४२६) २-३-४-५-६-८
भ्रमणध्वनी- ९८५०१ ९२७८०
९९२३५ ९२७८०