निलेश मनोहर पांडे प्रस्तुत
निलेश मनोहर पांडे प्रस्तुत
Mee Rahurikar
संपूर्ण राहुरी तालुक्याची परिपूर्ण माहिती असणारे संकेतस्थळ
आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवित फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचलेल्या राहुरीकरांना या माध्यमाने इंटरनेटवर एकत्र आणुन त्यांना जोडण्याचा व जगभरात आपल्या ’राहुरी’ तालुक्याची संपुर्ण माहिती इंटरनेटवर जगभरात पसरविण्याचा हा माझ्या कडून छोटासा प्रयत्न.
सोशल नेट्वर्किंग साईट च्या ग्रुप ला मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल हार्दिक आभार.
फेसबुक ला मी राहुरीकर या ग्रुपला 14000 मेंबर जॉईन आहेत.
‹(•_•)› निलेश ‹(•_•)›
महाराष्ट्रासाठी राहुरी तालुक्याचे योगदान:-
उत्तरेला प्रवरा नदी तर पश्चिमेला मुळा नदीचे सानिध्य लाभले असल्याने या दोन नद्यांच्या कुशित वसलेल्या राहुरीला ”कृषी पंढरी” म्हणून ओळखली जाते.
२६,००० दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमतेच्या मुळा धरणातून डाव्या व उजव्या कालव्याद्वारे तर ११,०३९ दशलक्ष घनफुट पाणी साठवण क्षमता असलेल्या भंडारदरा धरणाच्या उजव्या कालव्यातून १५% पाणी राहुरी तालुक्याला मिळत असल्याने बागायत भाग म्हणून राहुरीची संपुर्ण महाराष्ट्रात ओळख आहे. १९५९ साली जिल्ह्यातील सर्वात मोठे असलेल्या राहुरीच्या मुळा धरण उभारणीस प्रारंभ झाला. धरणाचे काम १९६९ साली पुर्ण होवून १९७० साली धरणात पाणी साठविण्यास सुरूवात झाली.
राहुरी तालुक्याच्या कृषी क्षेत्रास आर्थिक सुबत्त निर्माण करून देणा-या पाणी या प्रमुख घटकामुळे ऊसाचा कारखाना उभा करण्याचा संकल्प झाल्याने या कालावधित अंगावरचे दागदागिने, दारातील जनावरे यांची विक्रि करुन शेतक-यांनी राहुरी कारखान्याचे भागभांडवल खरेदि केले. १९५४ साली शेतक-यांच्या भागभांडवलावर राहुरी कारखान्याची उभारणी झाली. या काळात बेलापूर, देवळाली प्रवरा, कोल्हार या परिसरात मोठ्या प्रमाणात उसाचे पिक घेतले जात असे.
स्वातंत्र्य पुर्व काळात राहुरीची मोसंबी प्रसिध्द होती. मुंबईच्या बाजारात विक्रीसाठी जाणा-या राहुरीच्या मोसंबीला लंडनच्या बाजारात विक्रिसाठी मोठी मागणी असे. मात्र राहुरी सहकारी साखर कारखाना सुरू झाल्याने ऊसाच्या शेतीपासून मिळणारे अधिक पैसे पाहाता काळाच्या ओघात मोसंबीच्या बागा मागे पडल्या. साखर कारखानदारीच्या पुर्व कालावधित ऊसाला मिळणा-या योग्य भावामुळे शेतक-यांच्या दारात सुबत्ता येवून घरावरील पाचरट जावून या वास्तुचे पत्र्याची घरे, बंगल्यात रुपांतर झाले. सालकलवर फिरणा-या शेतक-यांच्या दारी मोटारसायकली आल्या, तर शेतीच्या मशागतीसाठी बैला ऎवजी ट्रैक्टर आल्याने कमी कालावधित जास्त कामे करणारी आधुनिक यंत्रणा अनेक शेतक-यांना लाभली.
मुळा धरण, साखर कारखानदारी बरोबरच आशिया खंडातील पहिली सहकारी विज संस्था म्हणून ओळखल्या जाणा-या मुळा प्रवरा या संस्थेचा लाभ राहुरी तालुक्यास झाल्याने बैलाच्या मोटे पाठोपाट आलेले डिझेल इंजिन मागे पडून विजेवर चालणा-या मोटारी विहिरीवर बसल्या गेल्या. आर्थिक सुबत्ता निर्माण करणारे पाणी, विज, साखर कारखानदारी हे घटक उपलब्ध झाल्याने राहुरी तालुक्याच्या कार्यक्षेत्राचा कायापालट झाला.
मुबलक जमिन, २६,००० दशलक्ष घनफुट पाणी साठवण क्षमतेचे मुळा धरण, रेल्वे स्टेशन, बस स्थानक, नगर-मनमाड मार्ग ही भौगोलिक परिस्थि असलेल्या राहुरी तालुक्याच्या आर्थिक व सामाजिक परिस्थिच्या विचारातुन महाराष्ट्रतील पहिल्या कृषी विद्यापिठाची स्थापना राहुरीला करण्यात आली. तदनंतर खोपोली, कोकण, पुणे[ अकोले या विभागीय कृषि विद्यापीठांची स्थापना झाली. राहुरी कृषि विद्यापिठाची स्थापना झाली. राहुरी कृषि विद्यापीठाच्या नवीन संशोधनामुळे विविध तंत्रद्न्यान शेतक-यांकडे आले. वेगवेगळ्या पिकांचे बि-बियाणे आल्याने पिकांचे वान काढून कृषी क्षेत्रात सुबत्ता आली. १९७२ साली राहुरी ग्रामपंचायतीचे ’क’ वर्ग नगरपरीषदेत रुपांतर झाले. या विकासाच्या घटकामुळे राहुरी तालुक्यात सुबत्ता निर्माण झाली.
हिंदुस्थानचे पहिले पंतप्रधान पं जवाहरलाल नेहरू महाराष्ट्राच्या दौ-यावर असताना महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हान यांनी पं. नेहरू यांनी महाराष्ट्रातील कुठले दोन तालुके सुजलाम सुफलाम असल्याबाबत विचारणा केली असता त्यावेळी यशवंतराव चव्हान यांनी राहुरीचे नांव प्रथम असल्याची ओळख करून दिली होती. या वैभवामुळे राहुरीचा नागरीक मुंबईला गेल्यावर श्रीमंत म्हणून प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. राहुरी ताल्यक्याच्या या वैभवामुळे डॊ. बाबुराव बापुजी तनपुरे यांचा महाराष्ट्राच्या मंत्री मंडळावर मोठा प्रभाव असल्याने महाराष्ट्राचे मंत्रीमंडळ राहुरी सहकारी कारखान्यावर ठरविले जात असे.
खरदि विक्रि संघ, राहुरी सुत गिरणी, श्रीशिवाजी प्रसारक मंडळ, फ्रुट ग्रोअर्स सोसायटी, कृषि उत्पन्न बाजर समिती, सहकारी साखर कारखाना या संस्थानमुळे राहुरी ताल्यक्याच्या कृषि क्षेत्रात सुबत्ता होती. महाराष्ट्राच्या तात्कालीन मंत्री मंडळात लक्ष्मण पा. कोळसे दारू उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री होते. तदनंतर आजपर्यंत राहुरी तालुक्याच्या पुढा-याला मंत्री मंडळात स्थान मिळालेले नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा दबदबा असताना देखिल वैभवशाली म्हणून ओळखल्या जाणा-या राहुरी तालुक्यातील पुढा-यांना महराष्ट्राच्या मंत्री मंडळात स्थान न मिळण्यास उत्तर नगर जिल्ह्यातील जुने राजकिय कार्यकर्ते कारणीभूत असल्याचे चर्चिले जाते. महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात सक्रिय असणा-या जुन्या कार्यकर्त्यांनी संधि असताना देखिल मंत्री मंडळाचे स्थान राहुरीला मिळू दिले नाही.
नगर जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून राहुरी ओळखले जाते. राहुरीच्या २६,००० दशलक्ष घनफुट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणामुळे नगर शहर, नगर तालुका, पाथर्डी, शेवगांव, नेवासा, पारनेर या तालुक्यातील उद्योगधंदे, शेतकरी व जनजीवन अवलंबून असल्याने उत्तरे प्रमाणेच दक्षिण नगर जिल्ह्यात आर्थिक सुबत्ता मिळवून देण्याचे काम राहुरीच्या मुळा धरणामुळे झाले आहे.
१९७० साली मुळा धरणाची स्थापना होवून १९७१ साली पाणी साठविण्यास प्रारंभ झालेल्या मुळा धरणातुन १९७२ साली सिंचन सुरू झाले. शेती व पिण्याच्या पाण्यास प्राधान्य या तत्वावर उभे राहिलेले मुळा धरण महाराष्ट्रातील दोन मातीच्या धरणांपैकी एक असुन गाळ न साचनारे धरण म्हणून या धरणाची ओळख आहे. धरणाच्या लाभक्षेत्रातील २६ किलोमिटर लांबीच्या डाव्या कालव्याद्वारे, तर ५२ किलोमिटरच्या उजव्या कालव्याद्वारे पाण्याचे वितरण केले जाते. ८७ हजार ८१० हेक्टर सिंचन क्षेत्र असलेल्या मुळा धरणाच्या डाव्या कालव्यावर बारागांव नांदूर, देवळाली प्रवरा, टाकळिमिया, आरडगांव, मानोरी, वळण, मुसळवाडी आदि गावांचे कृषीक्षेत्र ओलीताखाली आहे. तर उजव्या कालव्यावर राहुरी, नेवासा, शेवगांव, पाथर्डी यांचे क्षेत्र ओलीताखाली आहे.
बिगर सिंचन योजनेत नगर एम.आय.डी.सी., नगर शहर, राहुरी तालुक्यातील १४ गावांची पाणी योजना, राहुरी व पारनेरची ऒद्योगीक वसाहतीसाठी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे मुळा धरण हे दक्षिण नगरची कृषी पंढरी म्हणून ओळखले जाते. मुळा धरणामुळे सहकारी साखर कारखानदारी, दुग्ध व्यवसाय इतर उद्योग धंद्याची ८०० कोटी रूपायांची उलाढाल मुळा धरणावर अवलंबून आहे. धरणाच्या पाण्यामुळे राहुरी तालुक्यात सुबत्त निर्माण झाली असली तरी चा-या, पोटचा-या मधून ६० टक्के पाणी वाया जात असल्याने चा-यांची कामे हाती घेवून वाया जाणारे पाणी अडविण्याची गरज निर्माण झाली आहे.
राज्यातील पहिले महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीत असुन ३ दशकांपुर्वी स्थापन झालेल्या कृषि विद्यापिठाचे शेतीविषयक संशोधनाचा लाभ संपुर्ण महाराष्ट्रातील शेतकरी घेत आहेत. ज्वारी, श्रध्दा बाजरी, हरबरा, गहू, आंबा या पिकांवर मोठे शंशोधन झाले आहे. फुले त्रिवेणी गाय व पंढरपुरी म्हैस याच्या गोठित विर्य प्रयोगशाळा राहुरीच्या कृषी विद्यापिठात आहे. पशुधनासाठी चा-याची आवश्यकता लक्षात ठेवुन चारा पिकाच्या नविन जाती, व सुधारीत लागवडीचे तंत्र विकसित करण्यावर संशोधन करुन डॊंगरी, पवना, मारवेल, हे चा-याचे वाण विकसित करुन प्रसारीत केले आहेत. सध्या ज्वारी खुचीरा, बाजरी मळा, स्टायलो, फुले क्रांती, अफ्रीकन स्टॊल, संकरीत नेपियर, यशवंत या जातीचे बियाणे चारा पिके संशोधन करून गवत संशोधन योजनेद्वारे राहुरी विद्यापीठात विक्रिस उपलब्ध आहेत.
कॄषी विद्यापीठाचे ८ हजार हेक्टर क्षेत्र असुन महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यात या विद्यापीठाचा विस्तार आहे. मोठ्या प्रमाणात संशोधन झालेल्या कृषी विद्यापीठाच्या संशोधनाचा फायदा राहुरीच्या शेतक-यांनी घेणे गरजेचे आहे.
राहुरी तालुक्याची अर्थव्यवस्था Dr. तनपुरे साखर कारखान्यावर अवलंबुन आहे. एकेकाळी ९ ते १० लाख टन गळीताच्या ऊसाची निर्मीती करणा-या राहुरी तालुक्यात मागील ३ वर्षांपासुन दुष्काळ पडतो आहे. यंदा मात्र मुळा धरण पुर्ण क्षमतेने भरले असुन ऊसाच्या लागवडीत झपाट्याने वाढ होत आहे. कराराच्या नावाखाली ऊस बाहेर तोडुन नेला जात असला तरी, कामधेनु अबादित ठेवण्यासाठी सत्ताधारी व विरोधकांनी राजकारण बाजुला ठेवुन बाहेर जाणारा ऊस रोखण्याची गरज निर्माण झाली आहे.
शेतीला जोडधंदा म्हणून ऒळखला जाणारा दुग्ध व्यवसाय राहुरीत मुख्य व्यवसाय बनला आहे. तालुक्यात दररोज २ लाख लिटर दुधाची निर्मीती होते. मात्र पशुखाद्य, चारा, औषधे यांचे भाव भडकले असताना मात्र दुधाला मिळणारा कमी भाव हा शेतक-यांच्या दृष्टीने चिंतेचा विषय बनला आहे. मुळा धरणाच्या वरदानाने सुजलाम, सुफलाम म्हणून ऒळखल्या जाणा-या राहुरी तालुक्याचे राजकारण महाराष्ट्राच्या मंत्री मंडळात दबदबा निर्माण करणारे होते. Dr. बाबुराव बापुजी तनपुरेंच्या काळात एक वेळ महाराष्ट्राचे मंत्रीमंडळ राहुरी साखर कारखान्यावर ठरले होते. महाराष्ट्राच्या इतर कारखान्यांच्या तुलनेत राहुरीचा भाव १ रुपया प्रतिटन जास्त असे. साखर कारखानदारीच्या माध्यमातुन विवेकानंद नरसिंग होम, आयुर्वेदिक महाविद्यालय, फार्मसी महाविद्यालय, मंगल कार्यालय, इंग्रजी माध्यमाची शाळा, महाविद्यालये, शेकडो बंधारे, उपसा जलसिंचन योजना ही कृषी संजीवनी ठरणारी उभारणी तालुक्यात झाली आहे.
नगर जिल्ह्यातील शनी शिंगणापुर तसेच शिर्डीचे साईबाबा या धार्मीक स्थळांकडे जाणा-या मार्गावर मुळा नदिच्या काठी राहुरी शहर वसलेले आहे. ९६ गांवे असलेल्या राहुरी तालुक्यात ५० च्या पुढे सहकारी सोसायट्या, ७० पतसंथांचे जाळे विणले आहे. राहुरी तसेच देवळाली नगर परीषदेला संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानांतर्गत राज्यास्तरीय पुरस्कार मिळाला आहे. राज्यातील पहिले कॄषी विद्यापीठ, नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे पाणी साठवण क्षमतेचे धरण, साखर कारखानदारी हि प्रतिकुल परिस्थीती असताना मात्र राजकीय उलथापालथीमुळे राहुरीच्या विकासात अडसर निर्माण झाला आहे. शेतक-यांची जनावरे, दागदागीने विकुन साखर कारखानदारीचे भागभांडवल उभे राहिले आहे. तालुक्याचा कामधेनु (साखर कारखाना) बरोबरच मुळा धरण व कृषी विद्यापीठाच्या माध्यमातुन तालुक्यातील शेतक-यांना जास्तीत जास्त फायदा होणे गरजेचे आहे.
राहुरी सहकारी साखर कारखाना, महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ, आशिया खंडातील सहकारी तत्वावर चालणारी मुळा-प्रवरा विज संस्था, मुळा धरण, रेल्वे स्टेशन, अनेक सहकारी सोसायट्या[ नगर मनमाड महामार्ग, शनिशिंगणापुर व शिर्डी या धार्मीक स्थळांकडे जाणा-या मार्गावर असणा-या राहुरी तालुक्याचे महाराष्ट्राच्या जडण घडीत मोठे योगदान आहे.
हे संकेतस्थळ श्री. निलेश मनोहर पांडे यांनी डेव्हलप केल आहे.
पत्ता- मनोहर कलेक्शन / पांडेे कॉम्प्युटर्स,
७५५, मेन रोड,छत्रपती शिवाजी महाराज चौक,
विद्या मंदिर प्रशाले जवळ, राहुरी,
जि. अहमदनगर, महाराष्ट्र.
संपर्क- 02426796515
भ्रमणध्वनी- 7020529393 / 9850192780