बारागांव नांदूर पाणी योजना राज्यात आदर्शवत
बारागांव नांदूर पाणी योजना राज्यात आदर्शवत
राज्यात जिल्हा परिषदेअंतर्गत चालविण्यात येणा-या संयुक्त नळ पाणीपुरवठा योजना अनेक ठिकाणी बंद तसेच तोटयात गेलेल्या असतांना राहुरी तालुक्यातील बारागांव नांदूर व इतर 14 गावांची संयुक्त नळ पाणीपुरवठा योजना मात्र 1 कोटी 23 लाख 50 हजार रुपये नफ्यात असून ही योजना एकप्रकारे इतर योजनासाठी प्रेरणादायी ठरली असून लोकांच्या सहभागामुळे राज्यात आदर्श योजना म्हणून गौरविली गेली आहे. थकबाकी, वाढता खर्च, कुशल व्यवस्थापनाचा अभाव, यामुळे अनेक योजना अडचणीत सापडून बंद पडल्या. मात्र याला बारागांव नांदूर व इतर 14 गावांची योजना अपवाद ठरली असून योजनेसाठी खर्च करुन राहिलेली 1 कोटी 9 लाख रुपयांची शिल्लक समितीने जिल्हा सहकारी बँकेकडे ठेव म्हणून ठेवली आहे. तालुक्यातील अनेक पाणीपुरवठा तोटयात आहेत. दोन गावांच्या नव्हे तर ग्रामपंचायतीमार्फत व्यवस्थापन असलेल्या गावांच्या स्वतंत्र योजनाही सुरळीत चालत नाहीत. याला ही योजना अपवाद ठरली आहे. राहुरी पंचायत समितीचे सभापती शिवाजी रामभाऊ गाडे यांच्या अध्यक्षतेखाली ही योजना कार्यरत असून बारागांव नांदूर, डिग्रस, राहुरी खुर्द, देसवंडी, तमनर आखाडा, कोंढवड, शिलेगांव, केंदळ बुद्रुक, केंद्ळ खुर्द, चंडकापूर, पिंपरी वळण, मांजरी, आरडगांव, मानोरी अशा 14 गावांतील सुमारे 60 हजार लोकसंख्येस या योजनेतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. काही वर्षांपूर्वी मुळा नदीकाठच्या या गावांना पिण्याच्या पाण्याची मोठी गंभीर समस्या निर्माण झाली होती. क्षारयुक्त पाण्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात सापडले होते. गॅस्ट्रो, काविळ यासारख्या साथीच्या रोगांची साक्ष दरवर्षी या गावांत येवून थैमान घालीत होती. त्यामुळे या गांवातील नागरीकांना सुमारे 20 कि.मी. अंतरावरुन पिण्यासाठी पाणी आणावे लागत होते. त्यामुळे मुळा धरणातून या गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी पुढे आली. या मागणीसाठी या भागातील जनतेच्या भावना लक्षात घेऊन राज्य शासनाने या योजनेस मान्यता दिली. 15 मे 1998 रोजी योजनेच्या कामास प्रत्यक्ष प्रारंभ झाला. 20 फेब्रुवारी 2002ासारख्या रोग्य धोक्यात सापडत ला योजना पूर्ण झाली. योजनेला सुमारे 19 कोटी 45 लाख रुपये खर्च आला.
ही योजना 31 मे 2002 रोजी जिल्हा परिषदेकडे हस्तांतरीत करण्यात आली. तक्त्कालीन गटविकास अधिकारी विजयकुमार शिंदे यांनी गावोगावी पाणी पुरवठा समितीच्या सभा घेतल्या. प्रारंभी ऐवढी मोठी योजना हाती घेण्यास कोणीच तयार नव्हते. योजना यशस्वीपणे चालेल का? योजना सक्षमपणे चालविता येईल का? असा अनेकांच्या मनात संभ्रम होता. मात्र मुळा प्रवरा सह वीज संस्थेचे तत्कालीन चेअरमन शिवाजी रामभाऊ गाडे यांनी हा काटेरी मुकूट डोक्यावर घेऊन योजना चालविण्याचे धाडस केले. त्यामुळे सर्व गावांच्या समितीच्या सदस्यांनी अध्यक्षपद त्यांच्याकडे सोपविले. एवढी मोठी योजना चालविणे खरोखरच अशक्य होते. लोकांमध्ये प्रबोधन करुन त्यांना अवघड परंतु शक्य असणा-या कामगिरीविषयी जाणीव करुन देण्यात आली. मूळ योजनेच्या अराखडयात ोजनेच्या ी े ुळा प्रवरा सह वी वैयक्तीक नळ कनेक्शन नव्हते. ते देण्याला जीवन प्राधिकरणाने अनुकूलता दर्शविली व त्यासाठी अनामत व पाणीपट्टीची रक्कम जमा करण्यात आली व आजही दरवर्षी जमा होणा-या पाणी पट्टीपैकी 80 टक्के रक्कम गा्रमपंचायतीतर्फे या समितीकडे जमा करण्यात येते. त्यातून समिती पंप हाऊसची देखभाल, दुरुस्ती, पाणीपट्टी व वीज बील, चार कर्मचा-यांचा पगार तसेच 40 कि.मी. अंतराया मुख्य जलवाहिनीची देखभाल करणे. मुळा धरणातून पाणी उचलून शुध्द करुन साठवून पुन्हा उंचावरील टाकीत टाकून गावोगांवच्या पाणी टाक्यांत पाणी देण्याचे काम समिती करते. तर गावोगांवचे वितरण अंतर्गत जलवाहिन्यांची देखभाल, दुरुती ही 20 टक्क्यांतून ग्रामपंचायत करते. समितीकडे पाणीपट्टी, वीज बिल अगर इतर कोणतीही देणी थकीत नसून समितीकडे 1 कोटी 9 लाख रुपये रक्कम शिल्लक आहे. तर वीज बिलापोटी 100 टकके भरलेल्या 29 लाख रुपयांचे 50 टक्के फरकाची रक्कम रुपये 14 लाख पन्नास हजार मात्र येत्या 8 दिवसांत पुन्हा समितीला मिळणार आहे. या समितीवर सर्व 14 गांवचे सदस्य असून समितीची दर महिन्याला मासिक बैठक घेवून योजनेचा आढावा घेतला जातो. अनेक शासकीय, उच्चस्तरीय अधिका-यांनी या यशस्वी पाणीपुरवठा योजनेचा आजवर आवर्जुन पहाणी करुन माहिती घेवून तिचे कौतूक केले आहे.
- मुख्तार सय्यद, दै. सार्वमत दि. 2/6/2012
हे संकेतस्थळ श्री. निलेश मनोहर पांडे यांनी डेव्हलप केल आहे.
पत्ता- ७५५, मेन रोड, शिवाजी चौक,
विद्या मंदिर प्रशाले जवळ, राहुरी,
जि. अहमदनगर, महाराष्ट्र.
संपर्क- (२४२६) २-३-४-५-६-८
भ्रमणध्वनी- ९८५०१ ९२७८०
९९२३५ ९२७८०