वेगे वेगे खोदू., खोल-खोल जाऊ
राहुरी तालुक्यातील विहिरी खोल करण्याची कामे सुरु.,
पाणीपातळी घटली
वेगे वेगे खोदू., खोल-खोल जाऊ
राहुरी तालुक्यातील विहिरी खोल करण्याची कामे सुरु.,
पाणीपातळी घटली
विहिरीची पाणीपातळी अनेक वर्षांतील नीचांकी पातळीवर पोचल्याने सध्या राहुरी तालुक्यातील विहिरी खोल करण्याची कामे वेगात सुरु झाली आहेत. ही कामे करणा-या मजुरांची संख्या कमी असल्याने त्यासाठी शेतक-यांना प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे. या मजुरीचे दरही दुपटीने वाढले आहेत, तरीही त्यासाठी शेतकरी अशा मजुरांच्या शोधात पिफरत आहेत. तालुक्यात जणू विहिरी खोल करण्याची स्पर्धाच लागली आहे.
गेल्या वर्षी पावसाने सरासरी गाठलीच नाही. देवनदी, करपरा, मुळा या नद्यांना पावसाचे पाणी आलेच नाही. परिणामी, पावसाळयातही विहिरींची पातळी वाढली नाही. मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाची हजेरी जेमतेमच राहिली. परिणामी, धरणातूनही नदीपात्रात फारसे पाणी आले नाही. नदीपात्रातील कोटयावधी रुपये खर्चाचे डिग्रस, मानोरी, वांजूळपोई असे कोल्हापूर पध्दतीचे सर्वच बंधारे कोरडे राहिले. परिणामी, विहिरींच्या घटलेल्या पाणीपातळीने शेतकरी चिंतेत आहेत. गतवर्षीच्या तुलनेत पाणीपातळी दहा फुटांनी घटली आहे. मुळा व प्रवरा नदीपात्रांतील बेसुमार वाळूउपशामुळेही नदीकाठच्या विहिरींची पातळी घटली आहे. पाणीपातळी वाढविण्यासाठी शेतक-यांनी विहिरी खोल करणे, गाळ काढणे अशा उपाययोजना सुरु केल्या आहेत.
मागील वर्षी विहिर खोल करयासाठी तांदूळवाडी येथील सर्जेराव पेरणे यांना एका फुटाला दीड हजार रुपये खर्च आला होता. या वर्षी मात्र हा खर्च फुटाला तीन हजार रुपये येणार आहे. भास्करराव पेरणे यांनीही तीन हजार रुपये दराने विहीर खोल करण्याचे काम सुरु केले आहे. हे काम करणारे मजूर कमी आहेत. विहिरीतील गाळ काढणे, तसेच खोदाई केलेली माती काढण्यासाठी आता क्रेनचाच वापर केला जात आहे. त्यामुळे काम वेगात, चांगले व कमी खर्चात होते. काम सुरु असताना येणो पाणी उपसण्यासाठी विजेची गरज असल्याने, भारनियमाचा या कामात अडथळा येत आहे. हे काम करणा-या मजुरांचे वीस-पंचवीस गट म्हणजे टोळया असल्याने त्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे. विहीरीचा व्यास किती आहे, यावर प्रत्येक फुटाला दोन ते पाच हजार रुपये असा मजुरीचा दर आकारला जात आहे.
दैनिक सकाळ, दि. 19 जून 2012
हे संकेतस्थळ श्री. निलेश मनोहर पांडे यांनी डेव्हलप केल आहे.
पत्ता- ७५५, मेन रोड, शिवाजी चौक,
विद्या मंदिर प्रशाले जवळ, राहुरी,
संपर्क- (२४२६) २-३-४-५-६-८
भ्रमणध्वनी- ९८५०१ ९२७८०
९९२३५ ९२७८०