मुळा नदीच्या तिरावर वसलेले आरडगांव
राहुरी तालुक्याची भाग्यविधाती हरिश्चंद्र गडावर उगम पावणारी मुळा नदी नागमोडी वळण घेत गांवच्या बाजूने कूस बदलून पावसाळयात संथपणे वाहते आणि याच मुळामाईच्या तिरावर राहुरीपासून पुर्वेला आठ किलोमिटर अंतरावर सुमारे सात हजार लोकसंख्येचे आरडगांव नांवाचं खेड वसलेलं आहे.
असं म्हणतांत की, रमुद्रमंथनाच्या समयी अमृत प्राशन करण्यासाठी दानव देवांच्या पंक्तीला रुप बदलून बसले. भगवान विघू देवांच्या पंक्तीला अमृत वाटत होतेृ मात्र दानव अमृत प्राशन करुन अमर होतील ही गोष्ट भगवान विष्णूंच्या लक्षात येताच त्यांनी राहू व केतू या दोन दानवांना देवांच्या पंक्तीत बसल्याचे ओळखले व त्यांनी सुदर्शन चक्राच्या सहायाने राहू नांवाच्या दानवाचा शिरच्छेद करुन मानेपासून मुंडके उडवीले, ते मुंडके ज्या ठिकाणी ओरडले त्या ठिकाणांस 'आरडगांव' हे नांव पडले. पुढे ते मुंडके वळण गांवास वळसा घेवून पुन्हा राहुरीस गेले, अशी दंतकथा आहे.
हिरव्यागार नवलाईने नटलेले हे सुंदर, गोंडस नांवामध्ये धार्मिकता, सदभावना नांदत असल्याचे पुरावे आपणांस तेथील मंदिरांमुळे लक्षात यते. गांवामध्ये अनेक देवदेवतांचे मंदिरे आहेत, त्यापैकीच एक म्हणजे श्री विठ्ठल रुख्मिीणी मंदिर. हे मंदिर अशाप्रकारे वसलेले आहे की, ज्याप्रमाणे पंढरपूर येथे भिमानदीने चंद्राकार वळसा घेवून तिरावर विठ्ठलाचे मंदीर आहेण् त्याप्रमाणेच मुळानदीही चंद्राकार वळण घेवून चंद्रभागासारखी असल्याचा व प्रतिपंढरी असल्याचे आपणांस साम्य आढळून येते. सुमारे दोनशे पन्नास वर्षांपेक्षाही पूर्वी या मंदिराची उभारणी केली गेली असल्याचे वृध्द सांगतातृ सन 1984 साली कै. भानुदास मोरे डॉ. तनपुरे कारखान्याचे संचालक असतांना त्यांचे संकल्पनेतून गांवातील शेतक-यांचा कारखान्यासाठी जाणा-या उसातील टनामागे काही ठरावीक रक्कम कपात करुन जिर्णाध्दार करण्यात आला. मंदीराचा उंचच उंच गगनभेदी कलश आणि कलशावरील सुंदर मनमोहक साधूसंतांची बोलकी मूर्ती रुपातील कलाकृती मनमोहून टाकणारी आहे. सुमारे हजारो लोक एकाचवेळी बसू शकतील असा भव्य सभामंडप आणि मंदिर परिसरात उंच-उंच असणारे नारळाचे वृक्ष यामुळे मंदिर सभोवतालचे वातावरण नेहमीच प्रसन्न असते. त्यामुळे आरडगांव येथील विठ्ठल मंदिर हे अहमदनगर जिल्ह्यातील एक नंबर असल्याचे अनेक साधूसंत आवर्जुन सांगतातृ सरला बेटाचे महंत गगनगिरी महाराज, संत गाडगे महाराज, संत नारायणगिरी महाराज व संत बाळकृष्ण महाराज यांचे पदस्पर्शाने आरडगांव ही पावन झालेली भूमी आहे असे अनेक अबालवृध्द सांगतात. त्यामुळे गांवात चार तप म्हणजे सुमारे 48 वर्षांपासून ज्ञानेश्वरी पारायण सोहोळा तुकाराम गाथा पारायण सोहळा आयोजित केला जातो. तसेच हनुमान जयंतीला माऊलीची यात्रा भरते. घोगरगांव, ता. श्रीरामपूर येथून कावडीने पाणी आणून गंगास्नान, अभिषेक, पुजेने यात्रेला सुरुवात होते. रात्री मिरवणूक व मनोरंजन कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महाशिवरात्रीला महादेव मंदिरात मोठी गर्दी होते. गावामध्ये संत गोरोबा, दत्त, तुळजाभवानी, मुंजोबा, बहिरोबा, जंतोबा, खंडोबा, लक्ष्मीमाता, वरुंडीआई इ. देवदेवतांचे मंदिरे आहेत. मारुती मंदिरालगत विठ्ठल मंदिराच्या अगदी जवळच असणारे मुस्लीम समाजाचे पवित्र प्रार्थनास्थळ मस्जिद सर्वांचे लक्ष वेधून घेते. विशेष म्हणजे आरडगांव मध्ये दोन मंदिरांच्या मध्ये मस्जिद असल्याने हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन होते. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा तालुक्याच्या पूर्व भागात फक्त आरडगांव येथेच आहे. तसेच गांवामध्ये छ. शिवाजी महाराजांचा जयंत सोहळा आयोजित केला जातो.
पाणी, रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण या मुलभूत सुविधा नागरीकांना उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. कै. डी वाय वने यांच्या प्रयत्नातून गावामध्ये इ. दहावीपर्यंत माध्यमिक विद्यालय सुरु करण्यात आलेले आहे तसेच गांवामध्ये प्रार्थमिक शाळा, पिण्याच्या पाण्यासाठी थेट मुळा धरणातून जलकुंभात पाणी आणले जाते. प्राथमिक आरोग्य केंद्र व ब-यापैकी व्यापारी पेठ असल्याने जनतेच्या गरजा भागविल्या जातात. राहुरी, नेवासा या दोन तालुक्यांना जोडणारा मार्गावरच उत्तरेकडे गावाची वेस आहे. जगप्रसिध्द अशा निर्मला माताजींचा आश्रम गावाने दिलेल्या जागेत उभारण्यात आलेला आहे. आश्रम परिसरात कोरफडीसारख्या औषधी वनस्पतींचे उत्पादन मोठया प्रमाणात घेतले जाते. आरडगांवातील जवळपास पंच्याहात्तर टक्के लोक शेती व दुग्ध व्यवसायात गुंतलेले आहे. शेतीसाठी नदी, विहीर, पाटपणी, कुपनलीका, मानोरी येथील बंधारा असल्याने बागायती पट्टा म्हणून गांवाची ओळख आहे. गांवामध्ये ग्रामपंचायत, तलाठी, शेतगी, ग्रंथालय, बुाक, सोसायटी इत्यादी कार्यालये असल्याने नागरीकांचे प्रश्न पटकन सुटतात. अनेक तरुण तरुणी सैन्य, पोलीस दलात, शासकीय सेवेत डॉक्टर, वकील, इंजिनीअर, शेतीतज्ञ म्हणून आपल्या कार्याचा मोठा ठरा उमटविला आहे. कै. बन्सी काळे, बाबुराव ढेरे, कै. यशवंत ढेरे हे थोर स्वातंत्र्यसैनिकांचा खजिना गांवाला मोलाचा मार्गदर्शक ठराला होता.
एकंदर गांवाच्या आर्थिक, सामाजिक, भौगोलिक परिस्थितीचे अवलोकन करता आरडगांवच्या प्रगतीला अनुकूल असे वातावरण असलेने दिवसेंदिवस गांवाचा चेहरा-मोहरा बदलत आहे. त्यामुळे पंचक्रोशितील ग्रामस्थ आवर्जुन गांवाला भेटी देतात, त्यामुळे गांवाचा लौकिक दिवसेंदिवस वाढत असलेने म. गांधींनी सांगितल्याप्रमाणे खेडयाकडे चला हा मूलमंत्र या ठिकाणी लागू पडतो.
- राजेंद्र आढाव, दै. सार्वमत, 2 जून 2012
हे संकेतस्थळ श्री. निलेश मनोहर पांडे यांनी डेव्हलप केल आहे.
पत्ता- ७५५, मेन रोड, शिवाजी चौक,
विद्या मंदिर प्रशाले जवळ, राहुरी,
जि. अहमदनगर, महाराष्ट्र.
संपर्क- (२४२६) २-३-४-५-६-८
भ्रमणध्वनी- ९८५०१ ९२७८०
९९२३५ ९२७८०