रामपूर केस 3: विभागणीची - गडहिंग्लज न्यायालयातील | Rampur Civil Case 3: For Partition in Gadahinglj Court - Spl.C.S. 22/2024
रामपूर केस 3: विभागणीची - गडहिंग्लज न्यायालयातील | Rampur Civil Case 3: For Partition in Gadahinglj Court - Spl.C.S. 22/2024
महाराष्ट्रातील गरीब कष्टकरी शेतकऱ्यांचा भ्रष्टाचारा विरुद्धचा लढा आणि संघर्ष!!!
Maharashtra Farmers Against Corruption
रामपूर केस 3: विभागणीची - गडहिंग्लज न्यायालयातील | Rampur Civil Case 3: For Partition in Gadahinglj Court - Spl.C.S. 22/2024
गडहिंग्लज दिवाणी न्यायालय: Spl.C.S. 22/2024 - आजअखेर एकही हिअरींग झालेले नाही.
रामपूर केस 1: विभागणीची - चंदगड न्यायालयातील | Rampur Civil Case 1: For Partition in Chandgad Court - R.C.S. 70/2022
रामपूर केस 2: खोट्या दत्तक पत्राची - चंदगड न्यायालयातील | Rampur Civil Case 2: For False Adoption in Chandgad Court - R.C.S 98/2022
या चंदगड न्यायालयातील दोन्ही केसमध्ये दोन-अडीज वर्षांमध्ये एकही हिअरिंग न झाल्याने, आणि आमचे वकील या विलंबाने एकमेव कारण - "जज साहेबांना इतर महत्वाच्या केसीसमधून वेळ मिळत नाही." हे असल्याचे अगदी निराश होऊन आम्ही कनिष्ट न्यायालयातून केस Withdraw करून गडहिंग्लज दिवाणी न्यायालयात Spl.C.S. 22/2024 ही केस merged स्वरूपात दाखल केली.
इथेही वर्ष उलटून गेल्यानंतरही आजअखेर एकही हिअरींग झालेले नाही. आमच्या बहुतांश प्रतिवादीनी राजीखुशीने न्यायालयात येऊन आम्हाला सहमतीपत्र दिले. त्यामुळे काही महिन्यातच आमची केस निकाली येईल याविषयी आमचे नवीन वकील आशावादी आहेत.
गडहिंग्लज विभागीय अधिकाऱ्यांच्या कृपेने आणखी प्रतिवादी वाढल्याने आमचा ताप मात्र आणखीनच वाढला आहे. एका बेजबाबदार अधिकाऱ्यामुळे गरीब शेतकऱ्यांना विनाकारणचा किती मोठा मनस्ताप होतो, ते आम्ही प्रत्यक्ष अनुभवत होतो. त्यांनी बेकायदेशीरपणे खोट्या दस्तानुसार प्रलंबित कोर्टकेसवर परस्पर निकाल पारीत करून तिसऱ्याच व्यक्तीचे नाव चढवून आम्हाला आणखीनच गोत्यात आणले.
केस Withdraw करण्याची कारणे खालीलप्रमाणे आहेत:
आमच्या प्रथम वकिलांनी चंदगड न्यायालयात केस विलंबाची दिलेली कारणे खालीलप्रमाणे आहेत:
प्रांत / विभागीय अधिकाऱ्यांनी आपल्या जजमेन्ट मधून अनेक मुद्दे चुकीच्या पध्दतीने जस्टिफाय केले आहेत. उदाहरणार्थ पाहा कसे ते:
त्यांनी दत्तकपत्रामध्ये “28 वर्षांच्या प्रौढ व्यक्तीला - १० वर्षांचे अज्ञानी बालक दाखवणे" जस्टिफाय केले!
“80 वर्षांची वृद्ध विसरणग्रस्त आजारी व्यक्ती" मृत्यूपूर्वी काही महिने दत्तक घेऊ शकते, हे जस्टिफाय केले!
त्या "अज्ञानी बालकाचे लग्न होणे" जस्टिफाय केले!
"कोल्हापूर संस्थानाच्या कालबाह्य निरस्त निबंधानुसार" बनवलेले दत्तकपत्र जस्टिफाय केले!
शिवाय "सुप्रीम कोर्टच्या एका निकालाचा विपर्यास" करून दत्तकपत्र जस्टिफाय केले!
"दहा दिवसापूर्वी भावाचा मृत्यू झालेला असतानाही - घरी सुतक असतानाही”, सांग्रसंगीत विधीवत समारंभपूर्वक हिंदू प्रथेनुसार दत्तक विधी केला जाऊ शकतो, हे जस्टिफाय केले!
आमचे जाधव कुटुंब कोणत्यातरी "आदिवासी जनजातिशी (Tribe)” संबंधित असल्याचे खोटे दर्शवले!
आमचे "अनेकानेक मुद्दे आणि पुरावे" कोणतेही लॉजिकल आणि लिगल कारण न देता त्यांनी नाकारले”!
हे असं कसलं दत्तक आहे, जे दत्तक घेणाऱ्यालाच आपण दत्तक घेतले आहे, हे माहीत नाही! घरच्या लोकांना माहीत नाही! गावच्या लोकांना माहीत नाही!
Maharashtra Farmers Against Corruption
चंदगड तहसील नोंदणी कार्यालय, चंदगड, कोल्हापूर, महाराष्ट्र - ४१६५०९.
Chandgad Tehsil Registry Office, Chandgad, Kolhapur, Maharashtra - 416509.
Maharashtra Farmers Against Corruption - Chandgad, Kolhapur, Maharashtra, India