खोटी प्रतिज्ञापत्रे - False Affidavits
खोटी प्रतिज्ञापत्रे - False Affidavits
महाराष्ट्रातील गरीब कष्टकरी शेतकऱ्यांचा भ्रष्टाचारा विरुद्धचा लढा आणि संघर्ष!!!
Maharashtra Farmers Against Corruption
खोटी प्रतिज्ञापत्रे - False Affidavits
ग्रामसेविकेचे खोटे प्रतिज्ञापत्र (संदर्भ: केस R.C.S. 89/2018)
न्यायालयातील दाखल केस प्रभावित करण्यासाठी अशीलाने दिनांक 08/01/2020 रोजी "ग्रामसेविकेचे खोटे प्रतिज्ञापत्र" सादर केले. आम्ही दिनांक 14/06/2018 रोजी न्यायालयात दाखल केलेला श्रीमती शांताबाई मारुती जाधव यांचा "लग्न दाखला" खोटा असल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र डुक्करवाडीचे तत्कालीन ग्रामसेविका सौ सुवर्णा लक्ष्मण जाधव यांनी कोर्टात सादर केले. हे आमच्या साठी धक्कादायक होते. कारण आम्ही कोर्टात सादर केलेला दाखला ग्रामपंचायत डुक्करवाडी यांनी ग्रामसेविकेच्या सहीने जुन्या रजिस्टर नोंदीनुसार बनवून दिला होता. पण कोर्टात मात्र त्यांनी तो दाखलाच खोटा आहे, शिक्का खोटा आहे, आपली सही खोटी आहे आणि तशी लग्न नोंद रजिस्टर मध्ये नसल्याचे Affidavit दिले.
याविषयीची तक्रार आम्ही ग्रामपंचायत डुक्करवाडी आणि गावकरांच्या समक्ष केली. कारण लग्नाची नोंद रजिस्टर मध्ये होतीच, शिवाय गावातले बहुसंख्य लोकांना वैयक्तिकपणेही सत्य माहित होते. ग्रामपंचायत सदस्यांनी खोटे प्रतिज्ञापत्र दिल्याच्या कारणावरून तिला धारेवर धरले आणि तिची कम्प्लेंट करायचे ठरवले. तशी ती घाबरली आणि गयावया करू लागली - "चूक झाली, मला क्षमा करा. पुन्हा असे करणार नाही. पण जज साहेबाना माझी लबाडी समजली तर माझी नोकरी जाईल. माझी तक्रार करू नका." म्हणत हातापाया पडू लागली. गाववाले बोलले, "थोड्याश्या लोभापायी तिने चूक केली आहे, पण तक्रार केली तर तिची नोकरी जाणार हे नक्की. आपण असं करू, आम्ही स्वतःच कोर्टात रजिस्टर घेऊन येतो आणि लग्न दाखला खरा असल्याची साक्ष देतो. म्हणजे तुमचे कामही होईल आणि यांची नोकरीही जाणार नाही."
जुन्या रजिस्टर नोंदीची पडताळणी किंवा इंक डेटिंग टेस्ट करून, शिक्याची आणि सहीची पडताळणी करूनही खरे खोटे तपासाता येऊ शकते. शिवाय न्यायालयातर्फे ग्रामसेविकेला समन्स पाठवून प्रत्यक्ष साक्षही घेतली जाऊ शकते.
जी व्यक्ती खोटे FIR नोंदवू शकते, खोटी क्रिमिनल केस खोटे करू शकते, खोटे वाटणीपत्र बनवून घेऊ शकते, खोटे अपिल करू शकते; त्या व्यक्तीला एखाद्या ग्रामसेविकेकडून खोटे प्रतिज्ञापत्र करवून घेणे क्षुल्लक बाब आहे.
(ग्रामसेविकेने खटल्यातील एखाद्या पक्षाला मदत करण्याच्या उद्देशाने वस्तुस्थितीला सोडून किंवा चुकीची माहिती असलेले प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले तर त्यामुळे अशा खोट्या प्रतिज्ञापत्राचा निकालावर गंभीर परिणाम होऊ शकतो. ग्रामसेवक हे सरकारी पद असून, त्यांनी दिलेली माहिती ग्राह्य धरली जाते.)
वकिलांची खोटी प्रतिज्ञापत्रे (संदर्भ: केस R.C.S. 89/2018)
काही वकीलही स्वतःच्या पक्षकारांतर्फे खोटी प्रतिज्ञापत्रे करवून घेतात आणि न्यायालयासमोर ती सत्य म्हणून सादर करतात. आमच्या केसमध्ये चक्क वकिलांनी खोटे FIR करताना स्वतःच्या अशिलाच्या समर्थनार्थ खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले.
(वकील हे न्यायव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत आणि त्यांनी कायद्याचे आणि नैतिकतेचे पालन करणे अपेक्षित असते. काही वकील आपल्या अशिलांना फायदा मिळवून देण्यासाठी किंवा खटला जिंकण्यासाठी जाणीवपूर्वक खोटी माहिती असलेली प्रतिज्ञापत्रे सादर करतात. हे केवळ कायद्याचे उल्लंघन नाही, तर वकिली व्यवसायाच्या नैतिक मूल्यांच्या विरोधात आहे.)
अशीलांची खोटी प्रतिज्ञापत्रे (संदर्भ: केस R.C.S. 89/2018)
अशीलाने दाखल केलेली खोटी प्रतिज्ञापत्रे न्यायालयाच्या निष्पक्षतेला धक्का देऊ शकतात. अशा प्रकारामुळे संबंधित पिडीत पक्षांना हानिकारक नुकसान होऊ शकते. आमच्या केसमध्ये पक्षकाराने चक्क खोट्या मारामारीचे खोटे FIR नोंदवले. त्यासाठी खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले. त्या खोट्या FIR च्या आधारे खोटी क्रिमिनल केस दाखल केली. दिवाणी दाव्यामध्ये त्या क्रिमिनल केसचा खुबीने वापर करून गैरफायदा उठवायचा प्रयत्न केला.
(खटल्यातील पक्षकार / अशील स्वतःच्या फायद्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षाला नुकसान पोहोचवण्यासाठी शपथपूर्वक खोटी माहिती (Perjury) प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयासमोर मांडताहेत. न्यायालयाची दिशाभूल करण्याचा हा थेट प्रयत्न असून तो अत्यंत गंभीर गुन्हा आहे.)
महत्वाची नोंद: या वरील प्रकरणाशी संबंधित केसीस किंवा प्रतिज्ञापत्रे न्यायालयीन खटले या विभागात विस्ताराने दिलेली आहेत. हे फक्त उदाहरणादाखल आहे, बाकी दिवाणी केस R.C.S. 89/2018, Cri.M.A. 170/2020, R.C.S. 109/2023, R.C.S. 70/2022, R.C.S. 98/2022 (चंदगड कोर्ट), Civil M.A. 7/2020 (गडहिंग्लज कोर्ट) या सर्व केसीस मध्ये प्रतिपक्षाने कायदा अस्तित्वातच नाही, अशा विश्वासाने यथेच्छ खोटे दस्त, खोटे दावे आणि खोटी प्रतिज्ञापत्रे याचा वापर केला आहे. ही अनिष्ट प्रथा नष्ट करायची असेल तर वरिष्ट कोर्टासारखीच कनिष्ट कोर्टातूनही या गैरप्रकाराकडे क्षुल्लक प्रकार म्हणून न पाहता, गंभीर गुन्हा म्हणून पाहिलं गेले पाहिजे. त्यासाठी असे करणाऱ्या पक्षकाराला आणि अधिकाऱ्यांना तात्काळ शिक्षा केली गेली पाहिजे.
Maharashtra Farmers Against Corruption
चंदगड तहसील नोंदणी कार्यालय, चंदगड, कोल्हापूर, महाराष्ट्र - ४१६५०९.
Chandgad Tehsil Registry Office, Chandgad, Kolhapur, Maharashtra - 416509.
Maharashtra Farmers Against Corruption - Chandgad, Kolhapur, Maharashtra, India