Gen Z in India !!!
Gen Z in India !!!
महाराष्ट्रातील गरीब कष्टकरी शेतकऱ्यांचा भ्रष्टाचारा विरुद्धचा लढा आणि संघर्ष!!!
Maharashtra Farmers Against Corruption
Gen Z in India !!!
or Gen Zero in India ???
नेपाळ भ्रष्ट्राचारामुळे सुलगतोय - ऐकला असेलच तुम्ही!
आपल्या इथे होते, तसेच पक्ष - प्रतिपक्ष विरोधाचे नाटक करत नागरीकांना मिळून लुबाडत होते.
हा प्रकार असह्य झाल्याने शेवटी Gen Z ने हातात कायदा घेतला. पक्ष, प्रतिपक्ष, निष्क्रिय न्यायपालिका कुणाला सोडले नाही!
नेपाळ मधील हे "जेन झी" आहेत तरी कोण? त्यांनी संसद जाळली, सुप्रिम कोर्ट जाळले, पक्ष-विपक्ष दोन्ही नेत्यांचे बंगले, पंचतारांकित हॉटेल्स जाळली. काही मंत्र्यांना अक्षरशः लाथांनी बुकलले. काही मंत्री जीव वाचवून लपतछपत दुसऱ्या देशात लपून पळाले. पुरा देशच उलथा पालथा करून टाकणारी ही जेन झी आहे तरी कोण? आणि सदासर्वदा बेकिफिर असलेली जेन झी अचानक झपाटून का गेली? सर्व देश जाळून टाकण्या इतकी हिंसक का झाली? कारण काय?
या मागे होता केवळ अनियंत्रिक भ्रष्ट्राचार! आपल्या देशासारखाच बोकाळलेला भ्रष्ट्राचार! खा आणि खाऊ द्या, या सरकारी तत्वावर जोमाने जोपासलेला भ्रष्ट्राचार! अचानक एक ठिणगी पडली आणि जनतेचा संयम सुटला.
वर्षांनुवर्षे अगतिकपणे दाबून ठेवलेल्या रागाचा उद्रेक झाला. त्यानंतर मात्र सर्व देश धडाडून पेटू लागला. जनता काय करू शकते याचे हे एक अलौकिक उदाहरण आहे.
मग विचार पडतो, आपल्या इकडे Gen Z नाही, कि आपल्या इकडे भ्रष्टाचार नाही?
पाचशे वर्षांपूर्वी याच संह्याद्रीच्या कपारीत मोजून दिडशे Gen Z जमले होते! शंभू महादेवाच्या समोर, सुनामी सारखे सर्व नष्ट करत येणाऱ्या राक्षसी शक्तीशी लढायचा निर्धार करत होते. देवासमोर रक्ताभिषेक करून लढू किंवा मरू च्या शपथा घेत होते. त्यांचे नाव घेत गल्लीबोळातून फालतू संत्र्या मंत्र्यांसाठी जयघोष करणारा हा Gen Z स्वतःसाठी कधीच आवाज उठवणार नाही?
आपला Gen Z टेक सेव्ही आहे! असे अगदी संपूर्ण जगात त्याचे कौतुक होते. तो व्हाटस्ॲप, फेसबूक, इंस्ता, एक्स, इथे सतत ॲक्टीव असतो. नित्य नियमाने पोस्ट टाकत असतो - पण कसले?
आपल्या देशात भ्रष्ट्राचाराने काय बजबजपुरी माजली आहे याचे? नेता कसा हवा? प्रशासन कसे हवे? न्यायपालिका कशा हव्या? कायदे कसे हवेत? आपल्या स्थानिक ठिकाणी प्रशासन कसे चालले आहे? यावर चर्चा होते? एखादा भ्रष्ट्र पुढारी मंत्री कसा बनू शकतो? याने त्रास झाला म्हणून पोस्ट टाकली आहे?
नाही. सगळीकडे निरव शांतता आहे. स्थानिक पुढाऱ्यांनी अफू देऊन जनू त्यांना निष्क्रीय करून टाकले आहे.
महाराष्ट्र सरकारने भृष्ट्राचार बंद करावा, तिथे भ्रष्ट्राचारी अधिकाऱ्यांना अभय देणारा कायदा काढला! तरीही कुसळ चे मूसळ करून दाखवणारा प्रतिपक्ष, यावर मात्र मूग गिळून का गप्प आहे? यावर विचार झाला आहे?
भ्रष्ट्र नेते, भ्रष्ट्र सरकार, भ्रष्ट्र प्रशासन, निक्रिय न्यायव्यवस्था आपल्याकडे नाही? 50 वर्षापूर्वींचे खटले प्रलंबित आहेत. न्यायव्यवस्थेत जाणून बुजून काही खोट ठेवली गेली असेल, हे कुणाला खटकत नाही?
भारत स्वतंत्र झाल्यानंतर संविधान बनवून आम्ही 75 वर्षे देश त्यानुसार सुरळीत करायचा प्रयत्न केला. पण तो प्रयत्न पूर्णपणे असफल झाला. आता आम्ही नविन काही व्यवस्था निर्माण करू शकणार नाही का? असा प्रश्न Gen Z च्या डोक्यात येतो? Survival of Fittest हा निसर्गाच्या उत्क्रांतीचा आणि उत्कर्षाचा नियम आहे, कायदे प्रणालीलाही तो तितकाच लागू होतो.
लोकांसाठी जुने कायदेच सोयीचे आहेत, असे नेते तुम्हाला भासवून देतात. मग ते जुन्या काळाप्रमाणे घोड्यावरून किंवा खेचरावरून प्रवास का करत नाहीत? त्यांना लेटेस्ट लक्झरी टर्बो पॉवर गाड्या हव्या! त्याही जनतेच्या पैशातून! हा विरोधाभास आपल्या Gen Z ना खटकत नाही?
उज्जवल भविष्याची स्वप्नं पाहणारा, नविन काही घडवण्यासाठी झटणारा, नविन समाज व्यवस्था निर्माण करू पाहणारा, आपला Gen Z कुठे विलुप्त झाला? स्वातंत्र्य आलं, इतिहासाचा विपर्यास करून खूप हुशारीने मुलांचे कल्पनेचे पंख छाटून त्यांना बोन्साय करण्याची कुल्प्ती अभ्यास क्रमातूनच वापरली गेली!
आपला Gen Z बोन्साय केला गेला आहे का? मनाने खुरटून गेला आहे का? मोठी झेप, भरारी घेण्याची ताकद, हिंमत, बल, शौर्य, मनोधैर्य तो गमावून बसला आहे का?
आपल्यावर गुलामगिरी लादलेल्या जुलमी इंग्रजांनी बनवलेला 1860 सालचा IPC किंवा 1908 सालचा CPC आजही आमचे भवितव्य ठरवतो! जे कायदे लोकांना गुलाम बनवण्यासाठी बनवण्यात आले होते, तेच कायदे काही धूर्त नेत्यांनी इंग्रज आपल्यापेक्षा हुशार होते, असे भासवून नकळत आपल्यावर लादले! इतके तरी आपल्या Gen Z ला माहीत आहे का? कि, हा आपला प्रांत नाही, हा आपला विषय नाही, अस त्यांना वाटते?
तेव्हाचे आपले शिर्ष नेते, आपण भारतीय हिंन्दू असल्याचा न्यूनगंड झाकण्यासाठी, इंग्रजांच्या स्टाईलने शिगार ओढायचे, गोऱ्या मेमसोबत फोटो काढून मिरवायचे, इतके तरी आपल्याला माहित आहे का?
ही एक वेगळी क्रांती होती! अनेक वर्षांच्या गुलामगिरीच्या उत्कांतीतून निर्माण झालेली खुरटू क्रांती! इंग्रज, अकबर-बाबर या रानटी असंस्कृत जमातीला ग्रेट समजणारी ही नेतेमंडळी! श्रीराम, श्रीकृष्ण, चक्रवर्ती अशोक, गौतम बुद्ध, चंद्रगुप्त यांच्यापासून पृथ्वीराज, महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज यांची विस्मृती झालेली नेतेमंडळी, भारताचे भवितव्य घडवायचे घावूक ठेके मिळवून बसली होती!
आपल्या Gen Z ची बुद्धी एवढी बधिर झाली आहे? निष्ठा कुणाच्या पायाशी वाहावी एवढेही त्यांना समजू नये?
पूर्वी राजेशाहीत राजाचा मुलगा राजा व्हायचा, आज लोकांच्या लोकांसाठी असलेल्या लोकशाहीत मंत्र्याचा मुलगा-मुलगी-भाऊ-काका-मामा- मेव्हणा हेच फक्त मंत्री होताना दिसतात! स्वतःला कट्टर म्हणून मिरवणारे स्वयंःघोषित कार्यकर्ते आयुष्यभर केवळ सभेत निष्ठेने सतरंज्या गोळा करतात! पायी चालणारा नेता निवडून आल्याबरोबर मुलांबाळांसकट अचानक अब्जाधिश खब्जाधिश कसा होतो, हे कोडं Gen Z ने कधी सोडवायचा प्रयत्न केला आहे?
समाजात कधी आवाज उठलाच, तर फ्री चा डोस देऊन झोपवलं जात! देश मोठा की मंत्री? सरकार आपल्यासाठी आहे कि आपण सरकारसाठी? प्रशासन आपल्यासाठी आहे की आपण त्यांची कुटुंब व्यवस्था सदृढ करण्यासाठी? न्यायलये आपल्यासाठी आहेत की, आपण त्यांच्या समोर अजीजीने लोटांगण घालण्यासाठी? न्याय भीक आहे की आपला हक्क? तो वेळत नाही तर कुणाला दंड मारायचा, याचे उत्तर नको?
निष्क्रीय न्यायालये रद्दबादल करून नविन AI based न्यायालये निर्माण करता येतील का? नविन अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून न्यायालयात न जाता केवळ ऑनलाईन, तेही केवळ एका दिवसांत न्याय मिळवणे शक्य आहे का? प्रशासन विरहित समाज व्यवस्था कशी निर्माण करता येईल? एकदा निवडून आल्यावर आमदार, खासदारांना आयुष्यभर पोसायचा ठेका आम्ही का घेतला आहे? आमच्या हिश्शाची मलाई त्यांना का दिली जाते? पावसाळी आंळब्यासारखे विनाकारण इथेतिथे फोफावलेल्या राजकिय पक्षांशिवाय आपला देश चालू शकणार नाही का?
ज्या नेत्याच्या झेंडा घेऊन वारकऱ्यां सारखे तुम्ही त्यांच्या मागे धावता आहात, ते खरेच तुमच्या राजाचा वसा चालवण्यास लायक आहे का? त्याच्यात तेवढी नितीमत्ता, समजाविषयी कळकळ तळमळ आहे का? तुमच्यावर अन्याय झाला तर, तुमच्या मदतीला तो आला आहे का? कि, केवळ कळपाची भीती आहे म्हणून "विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती!", अशा संभ्रमावस्थेत हाती येईल तो झेंडा घेऊन तुम्ही नाचणार आहात?
आपण या प्रश्नांची उत्तरे कशी शोधतो, यावरही आपण Gen Z आहोत की, Gen Zero आहोत ते ठरणार आहे!
काही लोकांना प्रश्न पडला असेल Gen Z म्हणजे कोणत्या देशाचे वाशी? Generation Z म्हणजे सशक्त पण आभासी माध्यमांमध्ये वांझोट्या कल्पनेची निष्फळ रांगोळ्या चितारणारी तुमचीच तरुण मुले!
हे जागर आपापल्या ग्रुपवर शेअर करा. पाहू आपल्या देशात दिडशे Gen Z तरी जागे होऊन, सरकारला नसले, तरी स्वतःला तरी प्रश्न विचारतात का?
धन्यवाद!
गुंडू जाधव, रामपूर, चंदगड.
उदा. पाहा: https://sites.google.com/view/maha-farmers-agnst-corruption/
Maharashtra Farmers Against Corruption - Chandgad, Kolhapur, Maharashtra, India