खोट्या दस्तानुसार बेकायदेशीर घर मालकी हक्क बदल
खोट्या दस्तानुसार बेकायदेशीर घर मालकी हक्क बदल
महाराष्ट्रातील गरीब कष्टकरी शेतकऱ्यांचा भ्रष्टाचारा विरुद्धचा लढा आणि संघर्ष!!!
Maharashtra Farmers Against Corruption
खोट्या दस्तानुसार बेकायदेशीर घर मालकी हक्क बदल - ग्रामपंचायत रामपूर येथे.
घनशाम गावडे यांनी धोक्याने काही मामांच्या सह्या घेऊन आणि काही वारसदारांच्या खोट्या सह्या करून, जाधवांच्या गिरणी घरावर आपला मालकी हक्क दाखवला.
खालील लिंकवर घर मालकी दस्त जोडले आहे. त्यावर क्लिक करून ते पाहता येऊ शकते.
घर मालकी दस्त - मालमत्तेचे - सर्वे नंबर १०३ चे उतारे
घनशाम गावडे यांनी आमच्या गावठाण सर्व्हे नंबर 103 या जमिनीवर बेकायदेशीरपणे आपले नाव नोंदवले आहे. प्रापर्टी कार्डनुसार सदरची सर्व्हे नंबर 103 गावठाण ही जमिन आजही जाधव एकत्रित कुटुंबाची मालमत्ता आहे. त्यावर बांधलले कच्चे गिरणी घर ही जाधव कुटुबाची मालमत्ता आहे. सहा भावांच्या मालकीचे हे घर सर्व वारसदारांच्या संमतीने कायदेशीरपणे नोंदवले गेले असल्याचा पुरावा देण्यात ग्रामपंचायत असफल झाले आहे. 2022 साली या आमच्या घराची पडझड दाखवून, सदर व्यक्तिने पन्नास हजार रुपयांची, महाराष्ट्र सरकारकडून मिळणारी नुकसान भरपाईही मूळ मालकांना डावलून स्वतःच्या नावे वळवून घेतली. ही फक्त आमचीच नाही, तर माननीय महाराष्ट्र सरकारचीही फसवणूक आहे. ते घर आणि ती रक्कम मूळ मालकांना परत हस्तांतरिक करण्यासाठी उपाययोजना करण्यासही ग्रामपंचायत असफल ठरली.
जाधव कुटुंबाच्या एखाद्या कराराच्या नोंदीनुसार जर हे फेरबदल नोंदवलेले असतील, तर ग्रामपंचायतीने त्या करारातील सर्वंच नोंदीची व्यवस्थित पुर्तता केली गेली आहे का याची शहानिशा करणे गरजेचे होते. केवळ करारातील एखाद्या नोंदीचा फायदा उठवून, बाकी नोंदी अमलात आणल्या नसतील तर सदर नोंदही बाद / रद्द ठरवली जाणे आवश्यक असते. याचे कारण असे की, करार हा दोन्ही पक्षांसाठी समानपणे बाध्यकारी असतो.
मग सर्वांच्या सह्या नसताना ग्रामपंचायत रामपूर यांनी घनशाम गावडे यांचे नाव कसे चढवले हे गौडबंगालच आहे. (ही बाब 1995 नंतरची आहे. त्यावेळी आमच्या मोठ्या बाबाचा - कै भरमू जाधव यांचा मृत्यु झाला होता आणि सर्व्हे नंबर 103 गिरणी घरावर अमृत, राजू, आणि त्यांच्या बहिणींची नावे चढली होती.) ग्रामपंचायतीकडे आम्ही रितसर अर्ज करून त्या दस्तांच्या कॉपीची मागणी केली, नंतर RTI केले, तरी ते दस्त आम्हाला दिले गेले नाही. शिवाय ते गैरप्रकारे चढवलेले नाव काढावे याचीही मागणी केली होती. त्यावर मी RTI चे सेंकड अपिल टाकणार होतो. पण आपलेच दात आपलेच ओठ म्हणून गप्प बसलो. पण आता पाणी डोक्यावरून चालले आहे. आता सर्वांना सर्व गोष्टींचा हिशोब द्यावा लागणार आहे. यात ग्रामपंचायतीची काय भुमिका आहे, ते दस्त मिळाल्या शिवाय स्पष्ट होणार नाही.
कोणत्यातरी भांडणापायी एकसंध एकच घर असूनही मोठ्या बाबांच्या मुलींच्या लग्नात थोरलाबाबाने त्यांना आपल्या बाजूच्या दारात लग्नमंडप घालू दिला नाही. हळदी दिवशीच भांडणे काढली. पुढे मोठ्या बाबाचा अकस्मात मृत्यू झाला तेव्हाही - "बरं झालं मेला, गेली पिडा!" असे गैर बोलल्याने राज-अमृत त्या सर्वांचा राग मनात ठेवून होते. त्यामुळे ते सहया करणे शक्यच नव्हते. याचा अर्थ त्यांच्या आणि त्यांच्या बहिणींच्या, आणि कै गोपाळ जाधव यांच्या खोट्या सहया करून गिरणी घराच्या दस्तावर फेरफार केले गेले!
शिवाय राजू त्यावेळी लहान असला तरी तरबेज होता. तो डोळे झाकून सही करणाऱ्यापैकी नव्हता. घनशाम गावडेने "गिरणीला मोटर घ्यायची आहे" म्हणून माझ्या वडिलांकडून सही घेऊन गिरणीचं घरच नावावर करून घेतलं. योगायोगाने मीही तिथे होतो, पण मी काही ते पेपर वाचले नाहीत. जर घनशाम गावडेने नोंदवले आहे, त्यानुसार जाधव कुटुंब 1955 सालीच वेगळे झाले आहे, तर 1995 साली त्याला माझ्या वडिलांच्या सहीची काय आवश्यकता वाटली? हाही एकत्र कुटुंबाचा एक पुरावा आहे.
==========================================================
अर्जदार: श्री. प्रकाश मारुती जाधव
मु. पो. रामपूर, ता. चंदगड,
जि. कोल्हापूर, रा. महाराष्ट्र,
पिन - 416507.
दिनांक: मे 2025.
प्रति,
माननीय ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत,
ग्रामपंचायत रामपूर,
ता. चंदगड, जि. कोल्हापूर,
रा. महाराष्ट्र, पिन - 416507.
माननीय ग्रामसेवक, ग्रामपंचायत रामपूर यांना,
माननीय साहेब,
कृपया आम्हाला ढेरे गल्लीतील सर्व्हे नंबर १०३ वरील गिरणी घर ही जाधव एकत्र संयुक्त कुटुंबाची मालमत्ता आहे, पण त्यावर कोणतेही नोटीस न काढता किंवा संबंधित मालकांना आणि वारसदारांना अवगत न करता बहुदा 1995 नंतर केंव्हातरी फेरफार करून श्री घनशाम तुळसाप्पा गावडे यांचे नाव चढवण्यात आले. ग्रामपंचायतीने हे फेरफार नोटीस न काढता गुपचूप केल्याने, घराच्या मूळ मालकांना याची कल्पना आली नाही. आम्हाला त्या बेकायदेशीर फेरफारच्या अनुषंगाने खालील माहित अवगत केली जावी ही विनंती. हे फेरफार धोक्याने काही जणांच्या सह्या घेऊन आणि काही जणांच्या खोट्या सह्या करून तडीस नेले गेले, असा आमचा कयास आहे.
आमच्या वडिलोपार्जित जमिनीत बेकायदेशीर फेरफार नोंदवले गेले आहेत. त्यासाठी आम्हाला या सर्व कागदपत्रांची नितांत आवश्यकता आहे. या कागदपत्रांमध्ये खालील गोष्टींचा समावेश असू शकतो:
या फेरफारीशी संबंधित सर्व दस्त.
उतारे, फेरफार नोंदी.
ग्रामपंचायतीच्या बैठकीचे ठराव.
घर मिळकत हस्तांतरणाची कागदपत्रे.
सयुक्त्त कुटुंब जमीन वाटपाचे नोंदलेले जुने करार.
रजिस्टरमधील नोंद.
मालमत्ता हस्तांतरण करार.
फेरफार नोटीस काढली असल्यास त्याची प्रत.
हे फेरफार आमच्या मालमत्तेशी निगडित असल्याने ग्रामपंचायतीला ही माहिती देणे आवश्यक ठरते. शिवाय हे दस्त "पब्लिक डोमेन" वर आहेत आणि कोणत्याही खासगी गोपनीयतेच्या अधीन नाहीत. ग्रामपंचायत, तलाठी, तहसील कार्यालय, तसेच इतर सरकारी कार्यालयांमध्ये असलेले बहुतांश दस्तऐवज (documents) हे "सार्वजनिक नोंदी" (public records) मानले जातात, आणि सामान्य नागरिकांना त्यांची मागणी करण्याचा हक्क असतो. हे हक्क माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 (Right to Information Act, 2005) कायद्या अंतर्गत येतात. न्यायालयानाही या कायद्या अंतर्गत आणले गेले आहे.
घनशाम गावडे यांनी आमच्या गावठाण सर्व्हे नंबर 103 या जमिनीवर बेकायदेशीरपणे आपले नाव नोंदवले आहे. प्रापर्टी कार्डनुसार सदरची सर्व्हे नंबर 103 गावठाण ही जमिन आजही जाधव एकत्रित कुटुंबाची मालमत्ता आहे. त्यावर बांधलले कच्चे गिरणी घर ही जाधव कुटुबाची मालमत्ता आहे. सहा भावांच्या मालकीचे हे घर सर्व वारसदारांच्या संमतीने कायदेशीरपणे नोंदवले गेले असल्याचा पुरावा देण्यात ग्रामपंचायत असफल झाले आहे. 2022 साली या आमच्या घराची पडझड दाखवून, सदर व्यक्तिने पन्नास हजार रुपयांची, महाराष्ट्र सरकारकडून मिळणारी नुकसान भरपाईही मूळ मालकांना डावलून स्वतःच्या नावे वळवून घेतली. ही फक्त आमचीच नाही, तर माननीय महाराष्ट्र सरकारचीही फसवणूक आहे. ते घर आणि ती रक्कम मूळ मालकांना परत हस्तांतरिक करण्यासाठी उपाययोजना करण्यासही ग्रामपंचायत असफल ठरली.
जाधव कुटुंबाच्या एखाद्या कराराच्या नोंदीनुसार जर हे फेरबदल नोंदवलेले असतील, तर ग्रामपंचायतीने त्या करारातील सर्वंच नोंदीची व्यवस्थित पुर्तता केली गेली आहे का याची शहानिशा करणे गरजेचे होते. केवळ करारातील एखाद्या नोंदीचा फायदा उठवून, बाकी नोंदी अमलात आणल्या नसतील तर सदर नोंदही बाद / रद्द ठरवली जाणे आवश्यक असते. याचे कारण असे की, करार हा दोन्ही पक्षांसाठी समानपणे बाध्यकारी असतो.
मग सर्वांच्या सह्या नसताना ग्रामपंचायत रामपूर यांनी घनशाम गावडे यांचे नाव कसे चढवले हे गौडबंगालच आहे. (ही बाब 1995 नंतरची आहे. त्यावेळी आमच्या मोठ्या बाबाचा - कै भरमू जाधव यांचा मृत्यु झाला होता आणि सर्व्हे नंबर 103 गिरणी घरावर अमृत, राजू, आणि त्यांच्या बहिणींची नावे चढली होती.) ग्रामपंचायतीकडे आम्ही रितसर अर्ज करून त्या दस्तांच्या कॉपीची मागणी केली, नंतर RTI केले, तरी ते दस्त आम्हाला दिले गेले नाही. याचे कारण आणि यात ग्रामपंचायतीची काय भुमिका आहे, हे स्पष्ट केले जावे.
शिवाय, आमच्या शेतजमिनीही बेकायदेशीर दत्तक पत्राच्या आधारे बळकावण्यात आल्या आहेत. उपविभागीय अधिकारी, गडहिंग्लज यांनी दाव्याचा निकाल दिला १० ऑगस्ट २०२३ ला. आणि रामपूरचे तलाठी यांनी सदर दाव्यानुसार फेरफार केले ९ ऑगस्ट २०२३ ला! म्हणजे निकालाच्या एक दिवस अगोदर!
या कागदपत्रांची आवश्यकता आम्हाला हे सिद्ध करण्यात मदत करू शकते की, आम्हीच या जमिनींचे खरे मालक आहोत. काही बाहेरील लोक या जमिनी केवळ कै गंगाजी जाधव आणि कै गोविंद जाधव यांच्याच मालकीच्या आहेत हे सिद्ध करून, त्या बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत, हे तुम्हाला ज्ञात असेलच.
आमचे खालील सहा भावांचे एकञ जाधव कुटुंब खूप एकोप्याने डुक्करवाडी - सध्याचे रामपूर येथे पिढयानपिढया राहत होते हे सर्व गावाला माहित आहे. श्री घनशाम तुळसाप्पा गावडे, आसगाव, आता जाधव कुटुंब एकत्र नव्हतेच असे सिद्ध करून केवळ स्वतःच्या मुलाला खोट्या दत्तक पत्रानुसार सर्वांच्या जमनीचे वारसदार ठरवू पाहत आहेत.
हे सांगण्याचे कारण आणि तात्पर्य कि, आम्हाला ही कागदपत्रे खूप निकडीची कशी आहेत हे स्पष्ट करणे आहे.
आजोबा:
कै. गुंडू रानबा जाधव
कै. नागोजी रानबा जाधव
कै. बाळू रानबा जाधव
वडीलधारे:
कै. गंगाजी नागोजी जाधव
कै. रानबा बाळू जाधव
कै. भरमू गुंडू जाधव
कै. गोविंद नागोजी जाधव
कै. गोपाळ बाळू जाधव
कै. मारुती गुंडू जाधव
साक्ष काढू शकता:
ग्रामपंचायत सदस्य
गावातील लोक
कुटुंबातील सदस्य
आम्ही तुमच्याकडून या कागदपत्रांची तातडीने पूर्तता करणेची विनंती करतो आहोत.
धन्यवाद!
श्री. प्रकाश मारुती जाधव
श्री. राजेंद्र भरमू जाधव
श्री. अशोक रानबा जाधव
मु. पो. रामपूर, ता. चंदगड,
जि. कोल्हापूर, रा. महाराष्ट्र,
पिन - 416507.
संदर्भ: संदर्भासाठी आम्ही येथे संबंधित मालमत्तेचे - सर्वे नंबर १०३ चे दस्त जोडत आहोत.
Maharashtra Farmers Against Corruption - Chandgad, Kolhapur, Maharashtra, India