Blog 3 - देशाचा २०२४ चा भ्रष्टाचार बोधक निर्देशांक (Corruption Perceptions Index - CPI)
Blog 3 - देशाचा २०२४ चा भ्रष्टाचार बोधक निर्देशांक (Corruption Perceptions Index - CPI)
महाराष्ट्रातील गरीब कष्टकरी शेतकऱ्यांचा भ्रष्टाचारा विरुद्धचा लढा आणि संघर्ष!!!
Maharashtra Farmers Against Corruption
Blog 3 - देशाचा २०२४ चा भ्रष्टाचार बोधक निर्देशांक (Corruption Perceptions Index - CPI)
महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुका हा निसर्गसंपन्न, पावसाळी, डोंगराळ भूभाग आहे. येथील शेतकरी प्रामाणिकपणे कष्ट करतो. पावसावर अवलंबून शेती, दुर्गम रस्ते, अपुरे सिंचन प्रकल्प, अपुऱ्या बाजारपेठा यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती आधीच हलाखीची. पण या अडचणीवर उपाय करण्याऐवजी स्थानिक प्रशासन, महसूल अधिकारी, आणि इतर शासकीय यंत्रणा त्यांना भ्रष्टाचारामुळे आणखीनच अडचणीत आणत आहेत.
चंदगड, कोल्हापूर – महाराष्ट्रातील चंदगड तालुक्यातील शेतकरी सध्या प्रचंड मोठ्या आणि अनियंत्रित भ्रष्टाचाराच्या समस्या समोर उभे करत आहेत. देशाचा २०२४ चा भ्रष्टाचार बोधक निर्देशांक (Corruption Perceptions Index - CPI) जाहीर झाला असून, भारत १८० देशांपैकी ९६ व्या क्रमांकावर आहे. या आकड्याने देशातील भ्रष्टाचाराच्या गंभीरतेचा भांडाफोड केला आहे.
शेतकऱ्यांच्या संदर्भात पाहता, चंदगड तालुक्यातील भ्रष्टाचार हा केवळ स्थानिक समस्या नाही तर तो शेतकऱ्यांच्या जीवनातील सर्वात मोठा अडथळा बनला आहे. जमिनींचे अनियमित व्यवहार, योजनांचा गैरवापर, निधींचे दुरुपयोग आणि प्रशासनातील भ्रष्टाचार यामुळे शेतकरी आर्थिक व सामाजिक संकटात सापडले आहेत. पिडीत शेतकऱ्यांनी अनेकदा न्यायासाठी आवाज उठवला, तरीही अनेक वेळा भ्रष्ट व्यवस्थच्या निर्ढावले पणामुळे त्यांचे काहीच चालत नाही.
या प्रचंड मोठ्या भ्रष्टाचाराला थोपवण्यासाठी शासनाने कठोर उपाययोजना करणे अत्यावश्यक झाले आहे. स्थानिक स्तरावर प्रशासनाची जवाबदारी, पारदर्शकता आणि निष्पक्षता वाढवली गेली पाहिजे.
भारतातील ही समस्या फक्त चंदगडची नाही, तर महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागांमध्ये समान समस्या विद्यमान आहेत. त्यामुळे, स्थानिक शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी भ्रष्टाचाराविरुद्ध एकजूट होऊन न्यायासाठी, समता आणि प्रगतीसाठी लढायला हवे. भ्रष्ट व्यवस्थेला डोकेदुखी न मानता, त्यावर कठोर कारवाई करणे आणि जनतेच्या हितासाठी धोरणे राबवणे हे शासनाचे कर्तव्य आहे.
या संदर्भात शेतकऱ्यांनी, सामाजिक संघटनांनी आणि स्थानिक प्रशासनाने एकत्र येऊन कार्य करण्याची गरज आहे, जेणेकरून चंदगडसह संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी भ्रष्टाचाराच्या आहारी न पडता स्वावलंबी आणि समर्थ बनू शकतील.
Maharashtra Farmers Against Corruption - Chandgad, Kolhapur, Maharashtra, India