खोटे FIR - Forged Police Case at Chandgad Police Station.
खोटे FIR - Forged Police Case at Chandgad Police Station.
महाराष्ट्रातील गरीब कष्टकरी शेतकऱ्यांचा भ्रष्टाचारा विरुद्धचा लढा आणि संघर्ष!!!
Maharashtra Farmers Against Corruption
खोटे FIR - Forged Police Case at Chandgad Police Station.
रे. क. नं. 89/2018
मा. दिवाणी न्यायाधीशसो, क. स्तर, चंदगड
यांचे कोर्टात.....
वादी: श्री महादेव नाना पाटील
विरूध्द
प्रतिवादी: श्रीमती शांताबाई मारुती जाधव
अर्ज: Application for Re-Investigation of Forged Police Case at Chandgad Police Station. (या केसशी संबंधीत.)
प्रति, माननीय न्यायालय,
मा. न्यायाधीश महोदय,
चक्क पोलीस शक्तीचा आणि न्यायालयीन शक्तींचा गैरप्रकार करण्यासाठी अफलातून शक्कल लढवण्यात आली आहे. हा खूप गंभीर प्रकार आहे. गैरप्रकार करण्यासाठी चक्क पोलीस आणि न्यायालयीन शक्तींचा दुरुपयोग इतक्या सफाईने यापूर्वी क्वचितच झाला असेल!!!
सदरची खोटी पोलीस केस आणि फौजदारी केस प्रकरणाचा थेट संबंध या दिवाणी वादाच्या मुद्याशी आहे - प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षही. प्रत्यक्ष याच्यासाठी कि, त्यांनी या केसच्या संदर्भात ते दस्त पुरावा म्हणून सादर केले आहेत. आणि अप्रत्यक्षही दबाव बनवून ते बाजी मारायचा प्रयत्न करत आहेत. एकंदरीत श्री महादेव नाना पाटील यांनी त्याचा उल्लेख आणि उपयोग ही दिवाणी केस प्रभावित करण्यासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष केला आहे.
जमीन वादाच्या प्रकरणात एखाद्या पक्षाने खोटी मारामारीची पोलीस केस दाखल केली असेल, तर साहजिकच ते दबाव आणण्याचे साधन म्हणून वापरले जात असल्याचे सिद्ध होते.
शिवाय, त्यांनी बेकायदेशीर रणनीतीचा फायदा घेण्यासाठी, चंदगड फौजदारी कोर्टामध्ये खोटी मारामारीची केस दाखल केली - Cri.M.A. 170/2020.
माननीय न्यायालयाने खरोखरच खूप कुतूहलाने श्री महादेव नाना पाटील यांची मारामारी संबंधी केसचे अवलोकन करणे आवश्यक आहे. एकूण पंधरा लोकांनी कपडे फाटेपर्यंत बेदम मारल्याची नोंद पोलीस रिपोर्टला आहे. अंगभर बँडेज बांधलेल्या आवस्थेत तो कोर्टात हजर झाला होता. गेल्या चार वर्षांपासून फिर्यादी स्वतःच साक्षी-पुरावे सादर करण्यासाठी विलंब मुदत मागतो आहे! त्यांनी मारामारीचे केलेले वर्णन आणि मेडिकल रिपोर्ट अवलोकन करण्यासारखा आहे. ते Medico-Legal Certificate चंदगड ग्रामीण रुग्णालयाचे तज्ञ डॉ. साने आणि दिले आहे. मारामारीची आणि रिपोर्टची तारीख एकच आहे. म्हणजे त्यांची शारीरिक तपासणी करून डॉ. साने यांनी त्याच दिवशी दिनांक 08-12-2019 ला हा रिपोर्ट दिला आहे. त्या रिपोर्टनुसार श्री महादेव नाना पाटील यांच्या शरीरावर दोन जखमा आढळून आल्या.
पहिल्या जखमेचा प्रकार - Abrasion (ओरखडा), आकार - 1 सेमी x 1 सेमी, स्थान - उजवा गुढघा, जखमेची तीव्रता - साधी, हत्यार - कठोर आणि बोथट, वेळ - दोन दिवसांपूर्वीची!!!
दुसऱ्या जखमेचा प्रकार - Abrasion (ओरखडा), आकार - 1.5 सेमी x 1.5 सेमी, स्थान - उजवा पोटरी, जखमेची तीव्रता - साधी, हत्यार - कठोर आणि बोथट, वेळ - दोन दिवसांपूर्वीची!!!
(The meaning of Abrasion in medical terms is a wearing away of the upper layer of skin as a result of applied friction force.)
आता प्रश्न असा निर्माण होतो कि, असे कोणते हत्यार आहे ज्याने 1 सेमी किंवा 1.5 सेमी डायमीटरची जखम होते? शिवाय पोलीस नोंदीनुसार पंधरा लोकांनी लाथा बुक्क्यांनी बेदम मारल्यानंतरही श्री महादेव नाना पाटील यांच्या अंगावर एकही जखम, फ्रॅक्चर, किंवा सूज, वळ, किंवा जखमांचे व्रण का नाहीत?
मारामारीची चंदगड पोलीस ठाण्याला FRI नोंदवली:
N.C.R. Report Registered on: 08-12-2019.
Non-Cognizable Offense Information Report - Under Section 155 Cr.P.C.
अंगभर बँडेज बांधलेल्या आवस्थेत श्री महादेव नाना पाटील पोलीस ठाण्याला हजर झाला होता. संघटना, जमाव करून एका निष्पाप व्यक्तीला क्रूरतेने मारल्याने, पोलिसांनी कोणतेही इन्वेस्टीगेशन न करता तात्काळ हुकूमनामा काढून पंधरा तथाकथित आरोपीना बोलावले, दम दिला आणि रुपये 5000 दंड ठोठावला!
दिनांक 8 डिसेंबर 2019 रोजी कोवाड, चंदगड पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीसाठी बनावटी मारामारीचे नाट्य सादर करून, चक्क पोलिसांची दिशाभूल करत खोटी तक्रार दाखल करून, खोटा FIR नोंदवला गेला!!! या व्यक्तीने पोलिसांचाच काय तर, अनेकानेक खोटे दस्त सादर करून न्यायालयीन प्रोसिजरचाही गैरफ़ायदा घेण्यासाठी उपयोग केला आहे! त्याविषयीचे पुरावे आम्ही माननीय न्यायालयात तर्कासहित सादर केले आहेत.
पुढे त्या खोट्या मारामारीचा आणि FIR चा गैरफायदा घेत श्री महादेव नाना पाटील यांनी चंदगड फौजदारी कोर्टमध्ये खोटी क्रिमीनल केस दाखल केली (केस नंबर: Cri.M.A. - 170/2020). शिवाय तीन दिवाणी दाव्यामध्येही त्या खोट्या मारामारीच्या प्रकरणाचा गाजावाजा करून गैरफायदा उठवण्यासाठी उपयोग करण्यात आला (केस नंबर: R.C.S. 89/2018 Chandgad Court, Civil M.A. -7/2020 Addl Sessions Court Gadhinglaj आणि R.C.S. - 109/2023 Chandgad Court). आमच्या दुर्दैवाने निर्दोष असूनही चार वर्षे आम्हाला पुरावा नसल्याने काहीही करता आले नाही.
पण नुकताच योगायोगाने आम्हाला श्री महादेव नाना पाटील यांनी कोर्टात दाखल केलेला, खोटी FIR आणि खोटया केसीस करण्यासाठी वापरलेला, चंदगड ग्रामिण रुग्णालयातील डॉ साने यांचा शारीरीक तपासणी करून घटणेच्या दिवशीच - म्हणजे 8 डिसेंबर 2019 रोजीच बनवलेला मेडिकल रिपोर्ट मिळाला. त्या रिपोर्टनुसार हे सिध्द होते की, आमच्यावर केलेला मारामारीचा आरोप खोटा होता आणि पोलिसांना त्याने खोटी माहिती देऊन दिशाभूल करून, खूप हुशारीने खोटी कारवाई करायला भाग पाडलं होतं.
आरोपी ठरवण्यात आलेल्या पंधरा जनातील बहुतांश व्यक्तीकडे फोन असल्याने, त्यांच्या फोन लोकेशन द्वारेही त्यांचे तथाकथित घटनेच्या स्थानापासून त्यावेळचे ठिकाण नेमके समजून घेता आले असते. आजही ते शक्य आहे.
श्री महादेव नाना पाटील यांनी गंभीर जखमी झाल्यानंतर कोणत्या डॉक्टरकडून अंगभर बँडेज करून घेतले, कोणत्या हॉस्पिटलमध्ये अडमिट होते, कोणते मेडिकेशन घेतले, एक्स-रे रिपोर्ट, डॉ. साने यांचा रिपोर्ट, यावरूनही पोलिसांना सत्य समजून घेता येऊ शकले असते.
आरोपी ठरवण्यात आलेल्या पंधरा व्यक्ती आपण निर्दोष असल्याचे आणि मारामारी झालीच नाही असे कळवळून सांगत असताना, तथाकथित घटनेच्या स्थानाचे इन्वेस्टिगेशन करणे आवश्यक होते. पण तसे न करता, केवळ तक्रारदाराच्या वक्तव्यावर आणि दिखाव्यावर विसंबुन आरोप फ्रेम केले गेले, असे वाटते.
वरील गोष्टी विचारात घेऊन माननीय न्यायालयाकडे आम्ही विनंती करतो कि;
कृपया, या खोटया आरोपांमुळे आणि खोटया केसीसमुळे काही वर्षांपासून आमची मानहानी आणि आर्थिक नुकसान गृहित धरून, आपण पोलीस डिपार्टमेंटला Re-Investigation करण्याचे आदेश द्यावेत, अशी अजीजीने विनंती करत आहोत.
कृपया हे लक्षांत घ्या कि, डॉ साने यांचा मेडिकल रिपोर्ट प्रत्यक्ष स्वतःच श्री महादेव नाना पाटील यांनी कोर्टमध्ये दाखल केला आहे आणि आम्ही नाही.
वरील विपर्यास लक्षांत घेऊन, या सर्व प्रकारचे Re-Investigation करून चंदगड पोलीस डिपार्टमेंट तर्फे आम्हाला तत्परतेने न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील याची आशा आहे.
धन्यवाद!
आपली विश्वासू,
नाव: श्रीमती शांताबाई मारुती जाधव
स्वाक्षरी / ठसा:
अर्ज दिनांक: 6 जानेवारी 2025
=========================================================================
Application for Re-Investigation and Rectification of Forged/False FIR at Chandgad Police Station.
प्रति,
माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
चंदगड पोलीस स्टेशन,
ता. चंदगड, जि. कोल्हापूर,
रा. महाराष्ट्र, पिन – 416509.
पोलीस स्टेशन: चंदगड पोलीस स्टेशन.
दिनांक: 24 नोव्हेंबर 2024
विषय: Application for Re-Investigation and Rectification of Forged FIR at Chandgad Police Station.
अर्जदार:
श्रीमती शांताबाई मारुती जाधव, व
श्री प्रकाश मारुती जाधव
रा: मु. पो. रामपूर (डुक्करवाडी),
ता. चंदगड, जि. कोल्हापूर,
रा. महाराष्ट्र, पिन – 416507.
आरोपी:
श्री महादेव नाना पाटील.
रा: मु. पो. मांडेदुर्ग,
ता. चंदगड, जि. कोल्हापूर,
रा. महाराष्ट्र, पिन – 416507.
माननीय सर,
दिनांक 8 डिसेंबर 2019 रोजी कोवाड, चंदगड पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीसाठी बनावटी मारामारीचे नाट्य सादर करून, चक्क पोलिसांची दिशाभूल करत खोटी तक्रार दाखल करून, खोटा FIR नोंदवला गेला!!! या व्यक्तीने पोलिसांचाच काय तर, अनेकानेक खोटे दस्त सादर करून न्यायालयीन प्रोसिजरचाही गैरफ़ायदा घेण्यासाठी उपयोग केला आहे! त्याविषयीचे पुरावे आम्ही माननीय न्यायालयात तर्कासहित सादर केले आहेत, आपल्या अवलोकनासाठी तेही येथे देत आहे.
श्री महादेव नाना पाटील यांनी दिनांक 8 डिसेंबर 2019 रोजी माझ्या भावांनी आणि आईने इतर बारा जणांच्या मदतीने आपल्याला लाथा बुक्यांनी कपडे फाटेपर्यंत बेदम मारले आणि जखमी केले अशी पोलिस केस नोंदवली. संपूर्ण अंगभर बँडेज बांधून घेऊन तो पोलिस स्टेशनला आला होता. अर्थातच प्रथमदर्शनी पोलिसांना ही मारामारीची केस खूप गंभीर वाटली आणि त्याआधारे त्यांनी सर्व तथाकथीत आरोपींना तडकाफडकी पोलिस स्टेशनला बोलवून समज दिली आणि रुपये 9000 चा दंड लावला.
पुढे त्याने त्या खोट्या मारामारीचा आणि FIR चा गैरफायदा घेत श्री महादेव नाना पाटील यांनी चंदगड फौजदारी कोर्टमध्ये खोटी क्रिमीनल केस दाखल केली (केस नंबर: Cri.M.A. - 170/2020). शिवाय तीन दिवाणी दाव्यामध्येही त्या खोट्या मारामारीच्या प्रकरणाचा गाजावाजा करून गैरफायदा उठवण्यासाठी उपयोग करण्यात आला (केस नंबर: R.C.S. 89/2018, Civil M.A. -7/2020 Addl Sessions Court Gadhinglaj आणि R.C.S. - 109/2023). आमच्या दुर्दैवाने निर्दोष असूनही चार वर्षे आम्हाला पुरावा नसल्याने काहीही करता आले नाही.
पण नुकताच योगायोगाने आम्हाला श्री महादेव नाना पाटील यांनी कोर्टात दाखल केलेला, खोटी FIR आणि खोटया केसीस करण्यासाठी वापरलेला, चंदगड ग्रामिण रुग्णालयातील डॉ साने यांचा शारीरीक तपासणी करून घटणेच्या दिवशीच - म्हणजे 8 डिसेंबर 2019 रोजीच बनवलेला मेडिकल रिपोर्ट मिळाला. त्या रिपोर्टनुसार हे सिध्द होते की, आमच्यावर केलेला मारामारीचा आरोप खोटा होता आणि पोलिसांना त्याने खोटी माहिती देऊन दिशाभूल करून, खूप हुशारीने खोटी कारवाई करायला भाग पाडलं होतं. डॉ साने यांचा तो रिपोर्ट सोबत जोडत आहे. शिवाय त्यांनी केलेल्या अनेकानेक गैरप्रकारांची आपल्याला कल्पना यावी म्हणून आम्ही 14 नोव्हेंबर 2024 रोजी चंदगड दिवाणी न्यायालयांत सबमिट केलेल्या तत्थ आणि पुराव्यांची PDF दस्त अवलोकनासाठी सोबत जोडत आहे.
कृपया, या खोटया आरोपांमुळे आणि खोटया केसीसमुळे काही वर्षांपासून आमची मानहानी आणि आर्थिक नुकसान गृहित धरून, आपण पोलीस डिपार्टमेंटतर्फे आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी मदत करावी, अशी अजीजीने विनंती करत आहोत.
शिवाय, या खोटया प्रकाराशी संबंधीत केसची पुढील सुनावणी दिनांक 5 डिसेंबर 2024 रोजी मा चंदगड न्यायालयात होत असल्याने, सदर FIR चे आणि दस्ताचे पुनः रि-इनव्हेस्टिगेशन करून आपल्यातर्फे कोर्टामध्ये त्याचे सुधारीत रिपोर्ट जमा केले जावेत, ही विनंती. शिवाय श्री महादेव नाना पाटील यांच्यामुळे आम्हाला झालेला दंड त्यांच्याकडून वसूल करून आम्हाला देण्यात यावा. त्रास देण्यासाठी पोलिसांची फसगत करून खोटी FIR नोंदवणे हा गंभीर प्रकार गृहित धरून कारवाई केली जाईल याचा विश्वास आहे. प्रोसिजरनुसार इतर आवश्यक कारवाई करण्यास चंदगड पोलिस डिपार्टमेंट सक्षम आहे, याची आम्हाला खात्री आहे.
गैरप्रकार करण्यासाठी चक्क पोलीस आणि न्यायालयीन शक्तींचा दुरुपयोग इतक्या सफाईने यापूर्वी क्वचितच झाला असेल!!!
सदर प्रकारची रितसर तक्रार आम्ही ऑनलाइन सबमिट करत आहोतच. पण पूर्वी उल्लेख केल्यानुसार ऑनलाईन पोर्टलवरून दस्त पाठवायची गैरसोय लक्षांत घेऊन, या इमेलमधील PDF दस्तांचीही कृपा करून दखल घ्यावी ही विनंती. संदर्भासाठी येथे त्या गैरप्रकाराविषयी लिंकही देत आहे: https://tinyurl.com/mandedurg-court-case
माननीय सर,
आम्ही दिनांक 12 ऑक्टोबर 2024 रोजी ऑनलाईन पोर्टल द्वारे चंदगड रजिस्ट्री ऑफिस मध्ये बनवण्यात आलेल्या खोटया वाटणीपत्राच्या दस्ताविषयी (दस्त नं. ८५८/२०००) तक्रार दाखल केली होती. आणि विनंती केली होती की या दस्तासंबंधीत गैरप्रकाराची चौकशी केली जावी. ही तक्रार श्री महादेव नाना पाटील यांचेसंबंधी होती. पण आजअखेर त्या तक्रारी संबंधी आम्हाला काहीच अवगत केले गेले नाही. E-Complaint No.19386003072400026.
माननीय सर,
या खोटया फौजदारी केसचा उल्लेख करून, श्री प्रमोद घनशाम गावडे ही दुसरी व्यक्तीही नागणवाडी सर्कल यांच्याकडे दिनांक 8 नोव्हेंबर 2024 रोजी अर्ज करून आम्ही क्रिमिनल्स आहोत, असे भासवून गैरफायदा उठवण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यामुळे नागणवाडी सर्कल यांनाही आपल्यातर्फे सत्वर रि-इन्व्हेस्टिगेशनची एक प्रत पाठवली जावी, ही विनयपूर्ण विनंती करतो आहोत. चंदगड नोंदणी विभागांत खोटे बेकायदेशीर दत्तक पत्र बनवून त्या व्यक्तीने अगोदरच आमच्या जमिनी बळकावल्या आहेत. संदर्भासाठी येथे त्या गैरप्रकाराविषयी लिंक देत आहे: https://tinyurl.com/Mahar-Govt-mum-on-Corruption
माननीय सर,
इन्वेस्टिगेशन करताना पोलिसाकरवीही काही बाबी दुर्लक्षित केल्या गेल्याने आमच्यावर निर्दोष असूनही अन्याय केला गेला आहे, हे लक्षांत घेऊन या केसचे काळजीपूर्वक पुनर्वलोकन केले जाईल ही आशा आहे.
1. डॉ साने यांचा मेडिकल रिपोर्ट योग्य प्रकारे तपासाला गेला नाही. कृपया हे लक्षांत घ्या कि, डॉ साने यांचा मेडिकल रिपोर्ट प्रत्यक्ष स्वतःच श्री महादेव नाना पाटील यांनी कोर्ट मध्ये दाखल केला आहे आणि आम्ही नाही. त्यामुळे तो रिपोर्ट खोटा आहे, असा सोईस्कर आरोप आमच्यावर लावता येणार नाही. स्पष्टीकरणासहित तो रिपोर्ट पाहा:
हे Medico-Legal Certificate चंदगड ग्रामीण रुग्णालयाचे तज्ञ डॉ. साने आणि दिले आहे. मारामारीची आणि रिपोर्टची तारीख एकच आहे. म्हणजे त्यांची शारीरिक तपासणी करून डॉ. साने यांनी त्याच दिवशी दिनांक 08-12-2019 ला हा रिपोर्ट दिला आहे. त्या रिपोर्टनुसार श्री महादेव नाना पाटील यांच्या शरीरावर दोन जखमा आढळून आल्या.
पहिल्या जखमेचा प्रकार: Abrasion (ओरखडा / चिघळणे), आकार - 1 सेमी x 1 सेमी, स्थान - उजवा गुढघा, जखमेची तीव्रता - साधी, हत्यार - कठोर आणि बोथट, वेळ - दोन दिवसांपूर्वीची!!!
दुसऱ्या जखमेचा प्रकार: Abrasion (ओरखडा / चिघळणे), आकार - 1.5 सेमी x 1.5 सेमी, स्थान - उजवा पोटरी, जखमेची तीव्रता - साधी, हत्यार - कठोर आणि बोथट, वेळ - दोन दिवसांपूर्वीची!!!
आता प्रश्न असा निर्माण होतो कि, त्याच दिवशी झालेली जखम चिघळली कशी? शिवाय असे कोणते हत्यार आहे ज्याने 1 सेमी किंवा 1.5 सेमी डायमीटरची जखम होते? शिवाय नोंद केल्यानुसार पंधरा लोकांनी लाथा बुक्क्यांनी बेदम मारल्यानंतरही श्री महादेव नाना पाटील यांच्या अंगावर एकही जखम किंवा ओरखडा कसा नाही?
याविषयी पोलिसांचा तर्क काय आहे?
2. आरोपी ठरवण्यात आलेल्या पंधरा जनातील बहुतांश व्यक्तीकडे फोन असल्याने, त्यांच्या फोन लोकेशन द्वारे त्यांचे तथाकथित घटनेच्या स्थानापासून त्यावेळचे ठिकाण नेमके समजून घेता आले असते. आजही ते शक्य आहे.
3. श्री महादेव नाना पाटील यांनी गंभीर जखमी झाल्यानंतर कोणत्या डॉक्टरकडून अंगभर बँडेज करून घेतले, कोणत्या हॉस्पिटलमध्ये अडमिट होते, कोणते मेडिकेशन घेतले, एक्स-रे रिपोर्ट, डॉ. साने यांचा रिपोर्ट, यावरूनही पोलिसांना सत्य समजून घेता आले असते. विशेष म्हणजे डॉ. साने यांच्या रिपोर्टचा उल्लेख किंवा नोंद पोलीस रिपोर्ट मध्ये आढळून आली नाही!
4. आरोपी ठरवण्यात आलेल्या पंधरा व्यक्ती आपण निर्दोष असल्याचे आणि मारामारी झालीच नाही असे कळवळून सांगत असताना, तथाकथित घटनेच्या स्थानाचे इन्वेस्टिगेशन करणे आवश्यक होते. पण तसे न करता, केवळ तक्रारदाराच्या वक्तव्यावर आणि दिखाव्यावर विसंबुन आरोप फ्रेम केले गेले, असे वाटते.
वरील विपर्यास लक्षांत घेऊन, या सर्व प्रकारचे Re-Investigation करून चंदगड पोलीस डिपार्टमेंट तर्फे आम्हाला तत्परतेने न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील याची आशा आहे.
धन्यवाद!
श्रीमती शांताबाई मारुती जाधव, व
श्री प्रकाश मारुती जाधव
रा: मु. पो. रामपूर (डुक्करवाडी),
ता. चंदगड, जि. कोल्हापूर,
रा. महाराष्ट्र, पिन – 416507.
संदर्भासाठी सोबत पोलिसांचे इतर रिपोर्ट जोडत आहे:
टिप: महाराष्ट्र पोलीस CitizenPortal - "Crime and Criminal Tracking Network System (CCTNS)" योग्य ऑपरेशनल नसल्याने आणि मागील तक्रारींचा कोणताच माग लागत नसल्याने, कृपा करून सदर इमेल द्वारे दाखल केली तक्रार ग्राह्य धरली जावी ही विनंती. तपासात पोलिसांना आवश्यक ते सहकार्य करायला आम्ही तयार आहोत.
धन्यवाद!
संबंधित दस्त येथे जोडलेले आहेत:
Maharashtra Farmers Against Corruption
चंदगड तहसील नोंदणी कार्यालय, चंदगड, कोल्हापूर, महाराष्ट्र - ४१६५०९.
Chandgad Tehsil Registry Office, Chandgad, Kolhapur, Maharashtra - 416509.
Maharashtra Farmers Against Corruption - Chandgad, Kolhapur, Maharashtra, India