नाटकः डाकू लाखन
नाटकः डाकू लाखन
महाराष्ट्रातील गरीब कष्टकरी शेतकऱ्यांचा भ्रष्टाचारा विरुद्धचा लढा आणि संघर्ष!!!
Maharashtra Farmers Against Corruption
नाटकः डाकू लाखन
रामपूर गावातील ढेरे गल्लीतील जाधव कुटुंबाची कहानी सांगणाऱ्या "डाकू लाखन" या नाटकाचे वृत्तनिवेदन बातमी स्वरुपात ऐका:
==============================================
============================================================
ढेरे गल्ली सहर्ष सादर करत आहे -
नाटकः डाकू लाखन (भाग एक)
टिपः हे केवळ काल्पनिक नाटक आहे, कुणाला ते आपल्यावर लिहिलं आहे असे वाटत असेल तर तो केवळ योगायोग समजावा.
प्लॉट: एका सधन, संपन्न मोठया कुटुंबात एक डाकू सज्जनाचे सोंग घेऊन शिरतो आणि एकी असलेल्या भावांतून आपापसात कलह निर्माण करून आपलं इप्सित साध्य करतो, असे हे विलक्षण रहस्यमयी नाटक आहे.
केवळ खरेदी खतावर नाव नाही म्हणून एकत्र जाधव कुटुंबाच्या जमिनीवरून आमचे नाव हटवायची अशी अफलातून खेळी घनशाम गावडे, सविता गावडे आणि त्यांची उच्चशिक्षित बुध्दीमान मुले यांनी केल्याचे मागच्या आठवड्यात मी पुराव्यासह दाखवले होतेच. तिथून या नवीन नाटकाची सुरुवात होते.
वरील लोकांनी बामनाचा मोळ्यातील जमिन घ्यायला आम्ही काहीच आर्थिक मदत केलेली नव्हती असे दाखवले आहे. वास्तविक त्या जमिनीसाठी माझ्या वडिलांची सोन्याची चेन आणि माझ्या आईची सोन्याची बोरमाळ; इतर सर्व हिश्शेदारांच्या दागिण्यासोबत बँकेत गहाण ठेवून कर्ज काढले होते. बँकेत प्रत्येक दागिण्याची नोंद तारखेनुसार, नावासह, आणि तपसिलासह असते. त्यानंतर बँकेचे कर्जही आम्ही सर्वांनी मिळून फेडले आहे. माझा बाप लंगडा असला तरी इतर बाकी सर्वांची कमाई होती, त्यापेक्षा त्याची एकट्याची कमाई जास्त होती, हे सर्व गावाला माहित आहे. लांब लांब गावाचे लोक बैलगाड्या भरून दळप घेऊन आमच्या गिरणीत यायचे. याउलट सौ सविता गावडे ही स्वतः, तिचा नवरा, तिचे आई-बाप काय काम करायचे, हे प्रत्यक्ष घरातल्या लोकांनाही माहित नव्हते! घनशाम गावडे नित्यनेमाने जमिनीची कामे करायची हूल देऊन बुलेट घेऊन बेळगावला पाळायचा. मामांना त्याचे कोण कौतुक! ते आम्हाला सुनावयाचे, "आमचा बंड्या बघा, रोज बेळगावला जाऊन शेतीच्या कागदाची कामे करतो. शेतीची कामे सोपी, पण कागदांची कामे लई अवघड! शिका त्याच्याकडून काहीतरी!" महाराष्ट्रातल्या शेतीची कागदपत्रे कर्नाटकात काय करतात आणि वर्षांनुवषे दररोज कशी केली जातात, हे काही आम्हाला समजायचं नाही!
अर्धे मामा अडाणी आणि अर्धे अंधविश्वासू! तो बेळगावला मनसोक्त चैनी करून यायचा आणि वरून मामांचे कौतुकही मिळवायचा! इतका हुशार आणि हरहुन्नरी माणूस! मामा आपल्या स्वतःच्याच मुलांकडे तुच्छ नजरेने पाहायचे. किती काम करतो! बिचाऱ्याला एक दिवस उसंत मिळत नाही!
1986 साली गावच्या पंच आणि ज्येष्ट व्यक्तींच्या समक्ष, सहा भावांचे आमचे जावध कुटुंब वेगळे झाले. रिमोट कन्ट्रोलने थोरल्या बाबाच्या कानात काहीतरी कुजबुज केली. मग थोरला बाबा बोलला - "घराचे सहा हिश्शे करायचे आणि सर्व शेतजमिनींचे पाच!" पंचानी आश्चर्याने विचारलं - "असं कसं? तुम्ही तर सहा भाऊ आहात." उत्तर आले: "लंगड्याला जमिन कशाला द्यायची? दिली तरी त्याची जमिन पडसारच पडणार आहे आणि गावचे लोक आम्हाला बोलणार! त्यामुळे त्याला जमिनच द्यायची नाही!" पंचांना थोरल्या जाधवाचे हे लॉजिक पटले आणि घोषणा झाली - "शेतजमिनीचे पाच हिश्शेच होणार!" आम्ही सर्व हवालदिल होऊन गेलो. भितींला टेकून जमिनीवर बसलेला माझा अपंग लंगडा बाप गुढघ्यात डोकं पकडून रडायला लागला. सातवीची परीक्षा संपवून मी नुकताच हुरुपाने मित्रांबरोबर भरपूर खेळायला मिळणार म्हणून गावी आलो होतो. अनेपेक्षित पणे हा विपरित प्रकार पाहून हबकूनच गेलो. आतल्या खोलीतून ऐकत उभे असलेली माझी आत्त्या हा सर्व गैरप्रकार पाहुन संतापाने बाहेर आली आणि तिने पंचानाच धारेवर धरलं - "कुठून पंच झालाय रे भाडयानू? माझ्या मोडक्या भावास कुणाचा आधार नाय म्हणून सतवूल्याशीत काय? जाधवाचं शेण खावूनच तुम्हाला आयुष्यभर जगायचे आहे काय? तुम्ही माझ्या भावास जमिन नाही दिली, तर ती मी तुम्हालाही लाभू देणार नाही. माझ्या भावास पाठीवर घेऊन आणि पोरास्न हातास धरून कोर्टात जाते. कोर्टाच्या पायरीवर डोकं आदळून जीव देतो आम्ही सगळे!" ते एकूण पंच वरमले, हिस्सा घ्या बोलले, पण जाताना कुटिलतेच्या अशा काही गाठी मारून गेले कि, आजपर्यंत आम्हाला त्या सोडवता आल्या नाहीत.
चर्चा झाल्या, तर्क वितर्क झाले, नंतर त्यानुसार कागदपत्रे - करार बनवण्यात आले. पंचाच्या साक्षीदारांच्या सह्या झाल्या. गिरणी मारुती जाधव यांना, दुभती जनावरे, बैलजोड्या, शेतीची अवजारे, इतर साहित्य इतर भावांमध्ये, घाना, मोटार, इंजिन्स एकत्र, अशी विभागणी झाली.
शेवटी प्रत्येकी दहा दहा रुपये काढून पंचाना चहा पाणी करायचे ठरले. प्रत्येकाने खिशातून झटकन काढून पैसे पुढे दिले. आम्ही मागच्या दाराने जाऊन विठोबा ढेरे यांच्याकडून उसनवारी करून आणले. जाधव कुटुंब वेगळे होत आहे, हे समजल्याने गल्लीतले आणि गावातलेही बरेचसे लोक कुतुहलाने जमा झाले होते. सर्व श्री गोविंद ढेरे, भिकाजी ढेरे, विष्णू देवाण, राघोबा वर्पे, नारायण साबळे, बहुदा गजानन ढेरे आणि जोतिबा ढेरे, हे शेजारीही साक्षिदार म्हणून हजर होते. पंचांचे चहापाणी झाले. सोबत काही कानोकानी कुजबुज झाली आणि पुन्हा मिटींग बसली.
पंच बोलले थोडं राहून गेलं आहे - "जाधव कुटुंबांवर तिस हजारचे कर्ज आहे घनशाम बोलतो आहे. मामांनाही त्याच्यावर संशय घ्यायचं काही कारण वाटत नाही. तर, ते प्रत्येक सहा भावांनी पाच-पाच हजार प्रत्येकी करून भरायचे आहेत. किंवा दुसरा प्रर्याय आहे शेतात जो ऊस उभा आहे, तो एक वर्ष गंगाजी जाधव घेतील आणि बाकीच्या कुणालाही पैसे भरायची गरज पडणार नाही. चालेल का?. सर्वांनी माना हलवल्या; म्हणजे चालेल. आता तुम्हाला फक्त माळाची जमिन वाटणी करून मिळेल. ऊसाची जमिन येणारे गळीत घेतल्यानंतर गंगाजी जाधव तुम्हाला वाटणी करून देतील. आणखी थोडासा बदल झालेला आहे - फार मोठा नाही. मारुती जाधव यांना दिलेली गिरणी सदभावना म्हणून घनशाम गावडे यांना देण्याचे ठरले आहे. घाबरू नका, गिरणी घर मारूती आणि भरमू जाधव यांचेकडेच राहील. घनशाम गावडे यांनी गिरणी दुसरीकडे हलवायची आहे. त्या बदल्यात मारूती जाधव यांना दोन-तिन महिन्याचा एक रेडा, जुनी बैलगाडी, आणि शिलाई मशिन देण्यात येत आहे."
इकडे पंच न्यायाचं क्रियाक्रम आटपोपर्यंत, थोरल्याच्या लाडक्या लेकीने घरातील सर्व भांडी आणि महत्त्वाचे सामान परस्पर एका खोलीत भरून कुलूप लावून टाकलं! राहिलेलं साहित्य बाकीच्यांनी पळवलं. आम्हाला एखादं ताट-वाटीही शिल्लक ठेवली नाही. "सगळं फक्त माझ्याच बापाचं आहे!" - अशी तिने घोषणाच करून टाकली! गंमत म्हणजे तिचा बाप, आई, नवरा, आणि ती स्वत: काय काम करायचे; हे मलाच काय घरातल्या मोठ्या लोकांनाही माहित नव्हतं!
सर्व करार मदार दस्त सुशिक्षित, प्रामाणिक म्हणून घनशाम गावडे यांच्याकडे जपून ठेवण्या साठी देण्यात आले. पुढे त्या एक वर्षाच्या गळित हंगामाची काही वर्षे झाली, तिस हजारच्या कर्जालाही गोल गुटगुटीत बाळे होऊन त्याचे तीन लाख झाले, पुढे तीन लाखालाही नातवंडं-पतवंडं होऊन भरभराट होताच राहिली ...या त्यांच्या प्रतापामुळे आम्हाला तावरेवाडी क्षेत्रातील दीड एकर शेतजमिनही विकावी लागली.
एकत्र कुटुंबाची सांगता झाली. आम्हाला थोडे तांदूळ, तिखट, मीठ, पीठ, थोरल्या आईने पाठवून दिले. पण शिजवायचे कसे? शिजवायला भांडे नाही, खायला ताट नाही. आई कमळी मावशीच्या घरी जाऊन पदराखालून एक छोटं मडकं, एक तांब्या आणि एक जुनं ताट घेऊन आली. मडक्यात भात शिजवायचा, नंतर तो ताटात ओतायचा, त्याच मडक्यात नंतर पेजेत तिखट मीठ घालून बिना डाळीची, बिना तेलाची आमटी बनवायची - असा आमचा वेगळा संसार सुरु झाला.
पंचांसमोर आमच्या आत्याईने केलेला अपमान वरिष्ठ जाधव विसरले नव्हते, विसरणारही नव्हते. त्यांच्या संतापाच्या आगीत त्यानंतरचे आमचे सगळे बालपण होरपळून गेले. आठ दहा बारा वर्षांची पोरे आहेत याची दयामाया न करता, आम्हाला जेथे संधी मिळेल तेथे तुडवलं गेलं. आम्हाला मारतील, आमचा जीव घेतील ही धास्ती आमची पाठ सोडायची नाही. "याच्या पोरांना संपवलं तर, याचा हिस्सा कुणाला जाणार तेच बघायचे आहे आम्हाला!" असे माझ्या बापाला तोंडावर सुनावले जायचे. बाप घाबरायचा, आमची तर छातीच फुटायची.
जाधवांच्या वाळक्या काटकीलाही हात लावला, तर तुमच्या पोरांचे पाय तोडून त्याच लाकडाबरोबर चुलीत घालायला देऊ, अशी वरिष्ठाकडून आमच्या आईबापाला धमकी देण्यात आली. त्यामुळे मी आणि माझा भाऊ सोनारवाडीच्या डोंगरात काही किलोमिटर चालत जाऊन वाळक्या काटक्या मोडून जळणासाठी आणायला लागलो. एकेदिवशी तेथेही एक अनोळखी धिप्पाड माणूस हातात कोयता जोखत उभा राहिला, आणि त्यानेही उद्यापासून इथे दिसला तर पाय तोडीन अशी धमकी दिली. आम्ही रिकाम्या हातानी घरी येऊन आई बापाला घडला प्रसंग सांगितला. आई रडायला लागली, आत्याई समजावयाला लागली, "रडू नका, वाघीण आहे मी, माझ्या पोरांकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्याला फाडून खाईन मी! घाबरू नका. हेही दिवस जातील. शेणातले किडे काही शेणातच राहत नाहीत."
मग माझ्या लंगड्या बापाने कृष्णा सुतारकडून एक पत्र्याची शेगडी बनवून घेतली. त्यांच्या कार्यशाळेत बसून तो त्यांना करवतीने लाकडे कापायला वैगैरे मदत करायचा आणि पोत्यात भरून लाकडाचा भुसा घेऊन यायचा. त्यावर आमचे जेवण बनायचे. डाळ-तेल नसायचेच - भाताची पेज बाजूला काढून त्यात तिखट मिठ घालून आमटी तयार व्हायची. सनासुदीला बाकीची समवयस्क मुलं मौजमजा करत, गोडधोड खात. ते पाहुन माझी लहान भांवडे आवडा गिळत. मी त्यांना बळजोरीने ओढून आणून घरात कोंडायचा आणि रडायचा. आई त्यांना समजवायची, "तुमचा दादा अभ्यासात हुशार आहे. त्याला नोकरी लागली की आम्हीही दररोज चहा बनवू, तेलाची आणि डाळीची आमटी बनवू, आणि सनासुदीला गोडधोडही बनवू." असे समजवता समजवता आई आम्हाला मिठीत ओढून रडायची. आम्हीही सगळे ओक्साबोक्सी रडायचो. सगळे रडवायलाच टपल्याने, रडणे नित्याचेच झाले होते. कधीमधी कमळामावशी सनासुदीला आम्हाला आपल्या केंबळ्याच्या घरात घेऊन जायची आणि तिच्या मुलांना बनवलेलं आम्हाला खाऊ घालायची. मग तिची मुलं आमच्याकडे आवंढा मिळत केविलवाणी बघत बसत.
या वरिष्ठांनी गावातल्या लोकांनाही भीती घातली, यांना मदत करायची नाही किंवा यांच्या मदतीला यायचे नाही. गावासमोर आमची इज्जत काढतात काय, आता कसे जगतात बघू! या सततच्या भीतीच्या कोंडमार्यात आमचं बालपण मात्र होरपळून गेलं. एकसंध एकच राहते घर असल्याने, ते डाकू येऊन झोपेतच माझ्या पोरांचे गळे कापतील, या भीतीने माझी आत्याई, सुरवातीची काही वर्षे रात्ररात्र आमच्या उशाला बसून जागायची. खोलीला दार नव्हतं, राखण कशी करणार?
शेती नांगरून द्या दादा, माझा मारुती कपडे शिवून तुमची मजुरी चुकती करील मामा, अशा विनवण्या करत आत्याई गावभर हात जोडत फिरायची. पण आमच्या घरातल्या वांड लोकांशी कोण पंगा घेणार, म्हणून जो तो नाही आऊ म्हणायचा.
रिमोटधारी घनशाम गावडे या व्यक्तीने आमच्या हिश्शाच्या जमिनीच्या हव्यासाने आमचं सर्व बालपण उध्वस्त करून टाकलं, उमेदीचे वय खडतर करून टाकलं आणि आता तर तुम्ही काही वर्षापासूंनची आमची पळापळ पाहताच आहात. हा व्यक्ती आमच्या जाधव घराण्याला लागलेला शाप आहे. उपकारकर्त्यालाच संपवून त्यांची संपत्ती हडप करणारे काही सायलंट किलर खलनायक जुन्या हिंदी चित्रपटातून दिसायचे. याचा अभिनय पाहून तेही लाजले असते. मुलं तर बापापेक्षा सवाई निघाली. जाधवाचेच लोक आमच्या घरांत आश्रित म्हणून राहिले आहेत, पाहुणे आहेत, अशी आवई उठवायला सुरुवात केली.
गावातल्या नविन तरुण पिढीला या गोष्टी माहित असण्याचे काहीच कारण नाही. पण या सर्व गोष्टी खऱ्या आहेत कि, खोटया ते तुमच्या स्वतःच्याच घरच्या जाणत्या लोकांना विचारून खात्री केली जाऊ शकते.
धन्यवाद!
============================================================
ढेरे गल्ली सहर्ष सादर करत आहे -
नाटकः डाकू लाखन (भाग दोन)
माझ्या आईने आणि आत्याईने आमच्यासाठी जे कष्ट घेतले आहेत, ते आम्ही कधीच विसरु शकणार नाही. स्वतःच्या आईला मरण्यापूर्वी दिलेले वचन पूर्व करण्यासाठी माझ्या आत्याईने स्वतःच्या संसाराचा त्याग केला. त्याचा कसलाही गाजावाजा नाही, अपेक्षा केली नाही. मला तर ती नेहमीच रामाची शबरी वाटायची. कसलीही अपेक्षा न ठेवता तिने आमच्यासाठी ढोरकष्ट उपसले. माझ्या भावाची जमिन पडीक नाही तर सर्वांपेक्षा चांगली करून दाखवेन, असा तिने चंग बांधला. भाऊबंदानी मुद्दाम आमच्यावर लादलेले खडतर जीवन, दुष्टतेने पावलो पावली उभ्या केलेल्या अडचणी, आत्याई नसती तर त्यातून आम्ही कसं निभावलो असतो? मी देव मानत नाही, पण तो माझ्या आत्याईपेक्षा चांगला असूच शकत नाही. आत्याई नसती तर आज आम्ही सर्व जिवंत असतो कि नाही, हे ठरवणेही कठीण आहे.
एकत्र असतानाही माझ्या आईला क्रूरपणे छळण्यात आलं होतं. एकदा तर तिचा जीवही गेला असता. डॉक्टरने ती जगेल याची गॅरेंटीही दिली नव्हती. माझ्या आत्याईने ती जगावी म्हणून आजूबाजूच्या खेड्यातले सगळे देव पालथे घातले. कशी कोण जाणे त्या दुखण्यातून ती जगली. जाधवांच्या या पाशवी कृत्यावर आज कुणी विश्वास करेल याविषयीही शंका आहे. अपंग भावाच्या जमनीच्या हिश्श्यासाठी त्याच्या बायकोला आणि मुलांना मारायचा कट केला जाऊ शकतो, यावर विश्वास ठेवणे खरोखरच सोपे नाही. मी सांगतो आहे, पण तुम्ही ही घटना काल्पनिक आहे, असे समजून सोडून देऊ शकता.
पोरीच्या आई-बापात दोष आहे, असे ठरवून, माझ्या आईचे लग्न अपंग व्यक्तीबरोबर लावून दिले गेले. न आई, न बाप, न सासर धड. नवरा अपंग आहे, मागे माहेरी कुणी विचारपूस करणारे नाही, आधार नाही, म्हणून बारा दिवसांची बाळंतीण असतानाही तिला सासरच्या लोकांनी एकटीला वर्षभराचे शेणखत गायरीतून बाहेर काढायला लावले. संध्याकाळी ती बेशुध्द होऊन पडली. तिला एका कोनाड्या खोलीत टाकून सगळे काही झालेच नाही असे वागू लागले. अंधार पडल्यावर आत्याई शेतातून आली. तिने माझी शांता कुठे आहे, बाळ रडत का पडलंय, असं माझ्या लंगड्या बापाला विचारलं. तर, तो रडू लागला. फडाफडा तोंडात मारून घेऊ लागला. आत्याईला घडला प्रकार एकूण धक्काच बसला. तिने धावत जाऊन कोनाड्या खोलीत पाहिलं. अंगात जीवच नाही. आत्याई खूप घाबरली. नंतर रागाने तिने भावांना आणि घरातील सर्वांना शिव्याशाप दिले, उंबरे बडवले, चव्हाट्यावर जाऊन बोंब मारली, डोकं बडवून घेतलं. माझ्या भावजयीला डॉक्टरकडे न्यायला मदत करा, म्हणून घरोरघरी जाऊन हात जोडले. दिसेल त्याच्या पायावर डोकं ठेवलं. लोक जमा झाले, पण आमच्या घरच्यांच्या भीतीने कोणीच मदतीला येईना झाले. शेवटी देवणाचा सुभानकाका उभा राहिला. मला मारले तर मारूदे, म्हणत बैलगाडी जुंपून तयार झाला. माणगावच्या जोशी डॉक्टरनी ती जगेल याची गॅरंटी दिली नाही. पण नंतर झाला प्रकार समजून आल्यानंतर डॉ. जोशी संतापून गेले. त्यांनी दुसऱ्याच दिवशी थोरल्या जाधवाला बोलावले आणि सुनावलं - "आजपर्यत मी तुम्हाला प्रतिष्ठित व्यक्ती समजत होतो, पण तुम्ही तर शैतान निघालात!" डॉक्टरची बोलणी मुकाट एकूण मोठा जाधव परतला आणि पुन्हा जुन्या वळणावर पोहचला. महिन्याभर दवाखान्यात उपचार घेतल्यावर आईला थोडं बरं वाटू लागलं. यावरून आपण कल्पना करू शकता कि, आमचे आयुष्य कसे खडतर गेले असेल. त्या प्रसंगा नंतर मात्र आत्याईने माझ्या आईचा भावजय म्हणून नव्हे तर आई बनून सांभाळ केला. देवाने तिला आईची माया मिळू दिली नाही, पण नणंदेच्या रूपाने आईची सावली मात्र मिळवून दिली. कुण्या आईनेही आपल्या लेकीचं केलं नसेल, एव्हढ्या आत्मीयतेने तिने माझ्या आईसाठी हालअपेष्ठा काढल्या. तिच्या हिस्स्याचेही कष्ट केले. तिची संकटे आपल्या अंगावर झेलली.
आम्ही वेगळे झाल्यावर आत्याईने हट्टाने आमचा हिस्सा मिळवून घेतला, शिवाय त्यांचा अपमानही केला. हा राग त्यांच्या मनात खदखदत राहिला. आणि त्या धगीत आम्ही होरपळत राहिलो. अजूनही आमची जमिन हडप करायची यांची लालसेची आग विझलेली आहे असे वाटत नाही.
आधीच दारिद्र, त्यात बापाचं विक्षिप्त वागणं, खूप त्रास दायक व्हायचे. घरचे लोक आम्हाला मारायला धावले कि, आत्याई आमच्या समोर ठामपणे उभी राहायची आणि "माझ्या पोरांना हात लावला तर एकेकाच्या नरडीचा घोटच घेईन मी!" असे ओरडायची. किती दिवस पोरांना पदराखाली लपवून ठेवतेस बघू, म्हणत ते तणतणत निघून जात. प्रसंगावधान राखून बाप पोरांना टाकून कधीच पळून गेलेला असायचा. इकडे भांडण चालू आहे आणि तो दुसऱ्यांच्या कट्ट्यावर बसून शीळ वाजवत बसायचा आणि मी यांच्या भांडणांत नाही, असे सुचवून द्यायचा. असा पळपुटा बाप असेल तर धीर कसा येणार? माझे भाऊ घाबरत नसत, पण भीतीने माझ्या काळजाचे पाणी व्हायचे.
माझा बापामध्ये स्वत:चं भलं बुरं समजायचीही कुवत नव्हती. त्याने शेती करायला पाहिजे म्हणून आपल्या पाचवीत शिकणाऱ्या मुलाला शाळा सोडायला लावली, आणि वाटणीला आलेला दोन-तीन महिन्याचा रेडा सांभाळायला म्हणून आपल्या दुसरीत शिकणाऱ्या मुलाची शाळाही जबरीने सोडायला लावली. मी आठवीत होतो. मी बापाबरोबर भांडलो. रेडा विक, जमिन विक, खरं आम्हाला शिकायचं आहे बोललो. तो रागाने सोटा उचलून माझं डोकं फोडायला आला. तुझीही शाळा बंद करीन, अशी धमकी दिली. तो अपंग होता, कमजोर होता आणि दांडगट भावांबरोबर भांडू शकत नव्हता. त्यामुळे भावांवरचा सगळा राग तो बायको मुलांवर काढायचा. मीही हट्टाला पेटलो. मी शाळेव्यतिरिक्त सकाळ संध्याकाळ काम करून भावाला शिकवेन असं ठरवलं. शाळेत जाऊन दुसरीच्या वर्गशिक्षकांना हात जोडले. पुस्तके पाटी घ्यायची आमची परिस्थिती नाही, पण भावाला शिकवायचे आहे, असं सांगितलं. गुरुजीही चांगले होते. त्यांनी स्वतःकडची पाटी पुस्तके दिली. बाप स्वयंपाक घराच्या तोंडाशी सोटा घेऊन बसायचा - "यांना भाकरी भात कोण देतं तेच बघतो मी" अशी धमकी द्यायचा, शिव्या द्यायचा. आम्ही दोघे उपाशी पोटी कनगीच्या अडोशाला झोपून जायचो. सकाळी मी मागच्या दाराने भावाला घेऊन शाळेत जायचो. आम्ही दोघांनीही आठवडाभर उपाशीपोटी कसाबसा तग धरला. पोटात भुकेने वळ उठायचे पण इलाज नव्हता. एका सकाळी आठ वर्षांचा माझा भाऊ पोट पकडून रडायला लागला - "दादा लई भूक लागलेय. पोटात दुखतंय. जातो रेडकू घेऊन. शाळा नको. नाहीतर मरेन मी..." माझ्या छातीत धस्सं झालं. मी त्याला आडवलं नाही. तो रेडकू सोडून माळाच्या रस्त्याला लागला. आईने फडक्यात बांधून त्याच्या हातात भाकरी ठेवली. मी गॅलरीत उभा राहून तो दिशेनासा होईपर्यंत त्याच्याकडे बघत राहीलो आणि नंतर कनगीच्या अडोशाला जाऊन ओक्साबोक्शी रडायला लागलो. बापाचा मला खूप संताप आला. पहिल्याने वाटलं, कुठेतरी कायमचे निघून जावे. मग वाटले आपणही शाळा सोडावी. शेवटी ठरवलं, मी शिकेन पण नोकरी करणार नाही, आणि मूर्ख बापाला अद्दल घडवेन. त्यानंतर माझं पुढचं सगळं आयुष्यचं भरकटत गेलं. अभ्यासाची गोडी राहीली नाही. परिक्षेचे टाईमटेबल नोटीस बोर्डवर लागल्या शिवाय आभ्यासाचे पुस्तकही हाती घेत नव्हतो. अवांतर वाचन झाले. पण उपयोग शून्य. नकळत बापाचा तिरस्कार करायला लागलो. आई-आत्याईने माझी बाजू घेतली नाही, म्हणून त्यांच्या बरोबरही आबोला धरला. पुढची आठ-दहा वर्षे मी त्यांच्याबरोबर एका शब्दानेही बोललो नाही. गल्लीतल्या शाळेत जाणाऱ्या मुलांकडे जाऊन त्यांच्या संपलेल्या बॉलपेनाच्या काडया मला प्रयोग करायचा आहे म्हणून मागून घ्यायचा. घरी येऊन त्या सर्व काड्यांतली शाही एका काडीत फुंकांयचा आणि ती वापरायचा, असं चाललं. कॉलेजमध्ये मी नेहमी पहिल्या डेक्सवर बसायचा. बारावीला असताना एकदा फिरत नोटस देताना प्रोफेसरांना माझ्या वहीवर वेगळं काही तरी वाटलं. त्यांनी वही मागून घेतली. त्यांचे डोळे विस्फारले. त्यांनी सर्व पाने आलटून पालटून पाहीली आणि आश्चर्याने विचारलं - "बोरूने लिहितोस का?" नाही सर, पेनचे निप तुटले आहे. "वर्षभरापूर्वी? दुसरे बदलून घे!" हो सर, उद्या बदलतो, मी बोललो. निप बदलण्याची ऐपत नव्हती - डेक्स बदलला! पायात घालायला चप्पल मिळायचे नाहीत. एकदा कॉलेजला अनवाणी जातोय हे पाहून देसाईंच्या पुंडलिक मामाने सरकारी काटयातून मला परत आपल्या घरी नेऊन कॉलेजची मुलं तुला हसतिल म्हणून स्वतःचे चप्पल दिले. दहावीला असताना मला पावसात बेगड घेऊन माणगाव शाळेला जावं लागायचं. इतर मुलं हसत, पण त्याला इलाज नव्हता. हे सर्व सांगायचा उद्देश इतकाच कि, एका कृतघ्न माणसामुळे आमची वाताहत कशी झाली हे दाखवून देणे आहे. मला हे समजायचं नाही कि, जाधवांची सर्वांना हेवा वाटावी अशी धनसंपत्ती नेमकी गेली कुणाच्या खिशात?
पुढे बेळगावला ग्रज्युएशनला गेल्यावर हॉटेलातला पहिला कंटिंग चहा प्यायल्याचे आठवते. तोही आर्थिक नियोजन करून आठवड्यात एकदा प्यायला भेटे. कॉलेज मित्र कॅन्टीन मध्ये घुसले कि मी कॅन्टीन बाहेर उभा राहून त्यांची वाट पाहात ताटकळत उभा राहायचा . "मी बाहेरचं काही खात नाही " हा शिक्का मी माझ्यावर मारून घेतला होता. आमची अशी अवस्था जाणिव पूर्वक करण्यात आली होती. माझ्या लंगड्या बापाला विकलांग करायचे सगळे प्रयत्न करण्यात आले. त्याच्या उपजिविकेचे साधन खूप हुशारीने त्याच्याकडून हिरावून घेण्यात आले, गावातल्या लोकांनाही चलाखी समजू नये असे. हा माणूस एवढा कामचुकार होता कि, त्याला मोडक्या माणसाच्या तोंडावर मारून काढून घेतलेली गिरणीही धड चालवता आली नाही. वेगळे झाल्याच्या दुसऱ्याच दिवसापासून बाकीचे सगळे हुरुपाने हौसमौज करतात, काहीबाही नविन खरेदी करतात आणि त्यातला एकटा मात्र कर्जबाजारी होतो! असे कसे? पण आजही मला अभिमान वाटतो कि, माझा लंगडा बाप गरीब असेल, मूर्ख असेल, पण बेईमान नव्हता. एकत्र कुटुंबाच्या कमाईतला एक पैसाही त्याने लपवून खाल्ला नाही. सांगायचा उद्देश हा कि, वेगळे झाल्यानंतरही काही वर्षे हा बदमाश व्यक्ती हे कर्ज आहे, ते कर्ज आहे, ते सांगायचा विसरून गेले होतं, ते लिहायचे राहून गेले होतं - उसाची जमिन पाहिजे, तर ते द्यावं लागेल, असे डाव टाकत आमची तुटपुंजी कमाईही खात राहिला.
मी आणि माझा भाऊ रेड्याला गवत आणायला डोंगरात जायचो. मध्यरात्री थोरल्याईला कुणाच्यातरी दबक्या आवाजातल्या कुजबुजण्याने जाग आली. तिने झोपेचे सोंग घेऊन कान देऊन सर्व ऐकले. "पहिल्याने दोघांना मारून डोंगराच्या झाडीत खोल पुरून टाकू. कुणालाच समजणार नाही कुठे गेले. बाकिच्यांना नंतर केव्हांतरी संपवू." ते एकूण थोरल्याईच्या अंगाचा थरकाप झाला. सकाळी थोरल्या आईने मोका साधून हळूच माझ्या आत्याईला आणि आईला घडला प्रकार सांगितला. ते एकूण माझी आई आणि आत्याई हादरून गेल्या. आम्ही पहाटेच डोंगराकडे गेलो होतो. त्यांनी धावत गजानन ढेरे आणि पुंडलिक वर्पे यांच्याकडे जाऊन हातापाया जोडून, माझ्या पोरांना वाचवा, म्हणून हंबरडा फोडला. प्रसंगाचे गांभीर्य पाहून ते दोघे डोंगराच्या वाटेला दन्नाट धावत सुटले. टेकावर त्यांना आम्ही भेटलो. त्यांनी विचारले - "कुठून आला?" आम्ही बोललो, आतल्या पायवाटेने. "बरं झालं, चला. ते गाडी रस्त्याने गेले वाटते. भारे इथेच टाका नी चला लवकर. तुमची आई-आत्या मागणं पळत येताहेत." या गोष्टीचा कानोकानी गावभर ब्रभा झाला आणि त्यांनी ही योजना रद्द केली.
आम्हाला दोन-तीन महिन्याचा एक रेडा वाटणीला देण्यात आला होता. आमची आई म्हणायची, तिन चार वर्षांनी रेडा मोठा झाला कि, तो विकू आणि म्हैश घेऊ. मग तुम्हाला चहा मिळेल. पण पुढे तो रेडा मोठा झाल्यावर आम्ही घरी नसताना या लोकांनीच विकून खाल्ला! पुढचे काही वर्षे कुणी पाहुणा घरी आला तरी आम्ही घाबरून जायचो. पाहुण्याला चहा कुठून द्यायचा? आई मागच्या दाराने सुताराच्या काकूकडे पळायची, आणि एक कप चहाची तजविज करून घेऊन यायची.
आम्हाला फक्त माळाचे नापिक शेत देण्यात आले होते. स्वतःच्या हातात रिमोट कंट्रोल घेऊन घनशाम गावडे सर्वांना व्यवस्थित फिरवत होता. त्यांने मामांवर काय गारुड केलं होतं माहित नाही, पण सगळे खुळ्या सारखे वागायचे.
धन्यवाद!
============================================================
ढेरे गल्ली सहर्ष सादर करत आहे -
नाटकः डाकू लाखन (भाग तीन)
गैरप्रकार थांबतच नाहीत. चंदगड तालुक्यात प्रशासकिय अधिकाऱ्यांनी इतके भयानक "Societal terrorism" सामाजिक दहशत पसरवून टाकली आहे, कि गरीब शेतकरी वर्षांनुवर्षे दहशतीखाली दिवाभीतीचे जीवन जगत आहेत. भ्रष्ट अधिकाऱ्यांना सरकार इकडेच पाठवून देते - "राखीव कुरण आहे, मनसोक्त चरून या! " शेतकऱ्याच्या रक्ताचा स्वादच असा अविट आहे, कि भल्याभल्यांना मोह आवरत नाही!
चंदगड तहसिलदार, गडहिंग्लज प्रांत अधिकारी, नागनवाडी सर्कल यांना आम्ही टाहो फोडून सांगतो आहोत - " साहेबानू, एप्रिल २०२२ पासून सदर मालमत्तेची केस कोर्टात प्रलंबित आहे, फेरफार करू नका. हात जोडतो, पाया पडतो, आमचे आयुष्य भ्रष्ट रजिस्ट्रारने केलेल्या खोट्या दस्तामुळे बर्बाद होऊन जाईल. शेतीशिवाय आमच्याकडे दुसरा कोणताच रोजगाराचा मार्ग नाही."
- पण नाही .
ऑगस्ट 2023 मध्ये गडहिंग्लज प्रांत अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी गुपचुप फेरफार नोंदवून नंतर निकाल दिला !
डिसेंबर २०२४ मध्ये रामपूर तलाठ्यांच्या " व्हेरी कॉफिडेन्सीयल रिपोर्ट " नुसार नागनवाडी सर्कलनी आमच्या आणखी पाच जमिनीवर फेरफार नोंदवले. तो रिपोर्ट अजूनही आम्हाला देण्यात आलेला नाही. आम्ही रितसर तहसिल कार्यालयात अर्ज केलेला आहे. रिपोर्ट तयार आहे, पण त्यावर सही करणारे अधिकारीच गायब आहेत, असे सांगण्यात येते!
मे 2025 - आता काही थोडया शेतजमिनीवर आमची नावे आहेत ती उडवण्याचा सार्वजनिक कार्यक्रम चाललेला आहे .
साखळी अशी व्यवस्थित - जिल्ह्यापासून गावपातळीपर्यंत गुंफलेली आहे. कायदेशीर कामे होतील याची शाश्वता नाही, पण बेकायदेशीर कामे हमखास होणार - कारण त्यात कमाई मोठी!
आम्ही अचंबित होऊन जातो - ज्यावेळी आम्हाला प्रांत अधिकारी आणि तहसिलदार यांचेकडून सर्व तक्रारीवर एकच छापील उत्तर येते;
"केस न्यायालयांत प्रलंबित आहे, कोणताही निर्णय घेता येणार नाही."
- मान्य ! एकदम मान्य !
पण, त्याच मालमत्तेवर गैरप्रकारे फेरफार करताना मात्र प्रलंबित केसचा अडथळा येत नाही!!!
दत्तक पत्राचा प्रमुख साक्षिदार असलेला नंदकुमार तुर्केवाडकर प्रत्यक्ष भेटीत मला बोलला, "कसलं डॉक्युमेंन्ट रजिस्टर केले आहेत, ते मला आणि संजय गावडेला काहीच माहित नव्हतं. आम्ही दुसऱ्याच कामासाठी तिथे गेलो होतो. इथे सही करा बोलले, विश्वासातले आहेत, म्हणून आम्ही दोघांनीही पेपर वाचून न बघताच सही केली आणि निघून आलो. खरंच, आमचा काही दोष नाही. तुमच्या जमिनी हडपण्यासाठी बेकायदेशीर रजिस्टर केलंय, हे आम्हाला माहीत नव्हतं." - याचा अर्थ साक्षिदारांच्या सह्या धोक्याने घेण्यात आल्या. पण, नंतर विचार आला, डॉक्युमेंन्ट तर अगोदर बनवलेले असणार. यांची नावे दस्तावर छापलेली आहेत, आधारकार्ड जोडलेली आहेत. मग नंदू खरं बोलतोय कि खोटं?
दुध डेअरीचे दोन वर्षांचे पैसे घेऊन पोबारा केला होता आणि आजमितीस ते बुडवले आहेत. त्या डेअरीचा भुतकाळही विलक्षण आहे. त्या अनुषंगाने एका हळव्या तरुणाची अंधुकशी आठवण झाली.
गावातील एका गरीब प्रामाणिक होतकरू संवेदनशील मेहनती तरुणाने त्या दुध डेअरीची स्थापना केली आणि ती कष्टाने वाढवली होती. दुधगाडी गावात यायची नाही. तो तिन-चार किलोमीटर लांब सायकलवरून दुध वाहून न्यायचा. पुढे काही वर्षांनी दुधगाडी गावात यायला लागली. डेअरीची भरभराट झाली, उत्पन्न वाढलं. लोक खेळत्या पैशाच्या आशेने आपल्या मुलांच्या तोंडावर मारून दुध डेअरीत घालायला लागले. दुधाचा एकटाकी खळाळता पैसा पाहून काही लोकांचे डोळे पांढरे झाले. त्या तरुणावर पैसे खाल्ल्याचा आरोप ठेवून त्याला डेअरीतून काढण्यात आलं. त्या धक्क्याने तो भ्रमिष्ठ झाला. त्याला वेड लागलं. प्रत्येक संध्याकाळी नित्यनेमाने लोकांच्या कोंडाळ्यात बसून भरदार बुलंद आवाजात तो तरुण अशी भारदस्त शाहिरी म्हणायचा की लोक गुंग होऊन जात. त्याच्यावर आरोप झाल्यावर मात्र तो एकलकोंडा झाला, आणि त्यानंतर त्याचा भरदार आवाज नंतर कुणी ऐकलाच नाही. त्याने पैसे खाल्ले होते, तर त्याची गरीबी का दूर झाली नाही? कुणा अधिकाऱ्याला त्याने पैसेही चारले नाहीत, मग तरीही नंतर त्याला अंगावर घालायला कपडेही का मिळू नयेत? भ्रमिष्ठ अवस्थेत वेडापिसा होऊन तो रानोमाळ भटकायचा किंवा घरी कोनाडा पकडून बसायचा. काही वर्षांनी दुःखद अवस्थेत त्याचा मृत्यू झाला. नक्की काय झाले होते, हे समजून घ्यायचा कधीच कुणी प्रयत्न केला नाही. एकाच दिवशी मूठमाती देऊन लोकांनी हात झाडले आणि त्याला कायमचे विसरून गेले.
धन्यवाद!
============================================================
ढेरे गल्ली सहर्ष सादर करत आहे -
नाटकः डाकू लाखन (भाग चार)
खूप हुशारीने बिचाऱ्या साध्या-भोळ्या तात्यालाही फसवण्यात आलं. तात्याने आणि काकूने पप्पूला दत्तक घ्यायचं, म्हणून पहिल्या पासूनच खूप प्रेमाने सांभाळलं होतं. दहावी पर्यंत आपल्या आईबापाला सोडून तो तात्या काकू जवळच असायचा. काकू तर हा माझाच मुलगा म्हणून सर्वांना सांगायची. पुढे त्यांचाही खूप हुशारीने काटा काढण्यात आला.
कै गोविंद जाधव यांची फसवणूक करून संयुक्त कुटुबांची जमिन हडपण्यासाठी अनवधानाने बेकायदेशीर दत्तकपत्र बनवून घेतले गेले. तात्या वारंवार "बेळगावात मोठा फ्लॅट घेणार, बेळगावात मोठा फ्लॅट घेणार" म्हणायचा. कदाचित त्याला फ्लॅटची हुल देऊन दत्तक पत्रावर सहया घेतल्या गेल्या असण्याची शक्यता आहे. गावातल्या लोकांना तात्याचा स्वभाव माहितच आहे. तो निष्कपट साध्याभोळ्या स्वभावाचा होता. एकच गोष्ट चारचार वेळा सांगायचा. तरीही त्याचा भोळा भाबडा स्वभाव माहित असल्याने लोकांना त्यांचा राग येत नसे. तो तात्या आपण दत्तक घेतल्याचे आपल्या मृत्यूपर्यंत कसे आणि का लपवून ठेवेल? आमच्या सारखेच गावच्या लोकांनाही दत्तकपत्राची माहिती तात्याच्या मृत्यूनंतर समजली. राजूने सावध केलं म्हणून तात्याचा मुर्त्यू झाल्यानंतर तातडीने आम्ही तलाठ्यांकडे तक्रार तरी दाखल केली, नाहीतर सगळेच आपसूक फसलो असतो.
जाधव कुटुंबियांचा पैसा वापरून घनशाम गावडे यांनी दुसरीकडे जमिनी खरेदी करून ठेवल्या आहेत. त्याची तारखेसहीत माहिती मला आहे. पण ते सर्व वेळ आल्यावरच मी काढेन, असे राजू म्हणतो.
आपल्यावरची इडापिडा दुसऱ्यावर फुंकण्यासाठी वारंवार देवदेवस्की आणि करणी करून बकरी-कोंबडी कापली जातात, या प्रकाराने माझ्या घरचे लोक खूप घाबरून जातात. त्यांना मी समजावतो, "शनि दुसऱ्यावर जावी म्हणून करणी करून कापलेले बकरे खाणाऱ्या लोकांना पिडा जाईल, आपल्याला कशी लागेल? कुठे भंडारा असेल तर लोकं पिडा मागे लागू नये म्हणून जेवण जेवण्या अगोदर दहा विस रुपये दान पेटीत टाकतात. करणी केलेले बकरे खाल्ले तर, उलटी होते, काम बिघडते, घरी कुणी अचानक आजारी पडते, घरी अशांती येते, घरची आर्थिक स्तिथी खराब होते, असे म्हणतात ते खरे आहे की खोटे, हे खाणाऱ्यालाच समजणार, आपल्याला कसे समजणार? तशी लक्षणे दिसत नसतील, तर करणीचेही खायला काही हरकत नाही, दाबून खा. काही होत नाही. मनात शंका आली तरच पिशच्च्य मागे लागतात. आपल्याला काही तरी होणार ही शंका मनात न घेता खायचं, मग काही होत नाही."
मंजुळाकाकूची आजची अवस्था बिकट आहे. तिने तुमच्याबरोबर मलाही माझ्या हिश्शाची जमिन विकता येईल असं काहीतरी कोर्टात करा, अशी आमच्याकडे गयावया केली. म्हातारपणी आता पैशाची खूप गरज असते. नवरा माझी काही वेगळी सोय न करताच वारला. दुसऱ्यांच्या आधाराने जगायचं नशीबी आलंय. गावी यायचे तर जीवाची भीती वाटते. हे तिचे आमच्या प्रत्यक्ष भेटीतले शब्द आहेत. राजू आणि मी तिला भेटलो होतो. तिला स्वतःची जमिन विकायला गावातल्या लोकांनी सहकार्य करावं ही विनंती.
कै गंगाजी जाधव यांची पत्नी मंजुळा हिला स्वतःच्या घरांत राहू दिलं गेलं नाही. क्रित्येक वर्षांपासून जिवाच्या भीतीने ती आपल्या बहिणीच्या घरी परावलंबी आयुष्य जगते आहे. तिला तिचा लिगल शेअर पण विकू दिला जात नाही. 2005 पासून तिच्या पतीचा मृत्यू झाल्यापासून 20 वर्षे गावडे यांनी तिच्या मालमत्तेवर निघणारे उत्पन्न लुबाडले आहे. त्याची भरपाई आणि दंड म्हणून तिला रुपये पंधरा लाख देणाची तजविज आपल्यातर्फे केली जावी ही विनंती. शिवाय तिची विकल अवस्था समजून घेऊन तिला तिचा लिगल शेअर विकायचा हक्क ग्रामपंचायती तर्फे मिळवून द्यावा. ही तिची स्वतःचीच आमच्यातर्फे केलेली मागणी आहे.
या लोकांनी तिच्या घरावर आणि मालमत्तेवर कब्जा केलेला आहे. तिला स्वतःच्याच घरातून बेदखल करण्यात आले आहे. तिला मुलगा होईल आणि आपले षडयंत्र विफल होईल या कुटीलतेने त्यांनी फसगतीने गोळ्या देऊन तिचा गर्भपात केला आणि तिला पुन्हा मुल होऊ नये याची तजविज केली, असे ती सांगते. आजही ती जिंवत आहे - आपल्या बहिणीच्या घरी निर्वासिताचे जिवन जगते आहे. तिला विचारून, तिच्या बहिणींना विचारून, आणि आमच्या घरातील ज्येष्ठ व्यक्तिंना विचारूनही याची खात्री केली जाऊ शकते.
घनशाम गावडे यांनी आमच्या गावठाण सर्व्हे नंबर 103 या जमिनीवर बेकायदेशीरपणे आपले नाव नोंदवले आहे. प्रापर्टी कार्डनुसार सदरची सर्व्हे नंबर 103 गावठाण ही जमिन आजही जाधव एकत्रित कुटुंबाची मालमत्ता आहे. त्यावर बांधलले कच्चे गिरणी घर ही जाधव कुटुबाची मालमत्ता आहे. सहा भावांच्या मालकीचे हे घर सर्व वारसदारांच्या संमतीने कायदेशीरपणे नोंदवले गेले असल्याचा पुरावा देण्यात ग्रामपंचायत असफल झाले आहे. 2022 साली या आमच्या घराची पडझड दाखवून, सदर व्यक्तिने पन्नास हजार रुपयांची, महाराष्ट्र सरकारकडून मिळणारी नुकसान भरपाईही मूळ मालकांना डावलून स्वतःच्या नावे वळवून घेतली. ही फक्त आमचीच नाही, तर माननीय महाराष्ट्र सरकारचीही फसवणूक आहे. ते घर आणि ती रक्कम मूळ मालकांना परत हस्तांतरिक करण्यासाठी उपाययोजना करण्यासही ग्रामपंचायत असफल ठरली.
जाधव कुटुंबाच्या एखाद्या कराराच्या नोंदीनुसार जर हे फेरबदल नोंदवलेले असतील, तर ग्रामपंचायतीने त्या करारातील सर्वंच नोंदीची व्यवस्थित पुर्तता केली गेली आहे का याची शहानिशा करणे गरजेचे होते. केवळ करारातील एखाद्या नोंदीचा फायदा उठवून, बाकी नोंदी अमलात आणल्या नसतील तर सदर नोंदही बाद / रद्द ठरवली जाणे आवश्यक असते. याचे कारण असे की, करार हा दोन्ही पक्षांसाठी समानपणे बाध्यकारी असतो.
मग सर्वांच्या सह्या नसताना ग्रामपंचायत रामपूर यांनी घनशाम गावडे यांचे नाव कसे चढवले हे गौडबंगालच आहे. (ही बाब 1995 नंतरची आहे. त्यावेळी आमच्या मोठ्या बाबाचा - कै भरमू जाधव यांचा मृत्यु झाला होता आणि सर्व्हे नंबर 103 गिरणी घरावर अमृत, राजू, आणि त्यांच्या बहिणींची नावे चढली होती.) ग्रामपंचायतीकडे आम्ही रितसर अर्ज करून त्या दस्तांच्या कॉपीची मागणी केली, नंतर RTI केले, तरी ते दस्त आम्हाला दिले गेले नाही. शिवाय ते गैरप्रकारे चढवलेले नाव काढावे याचीही मागणी केली होती. त्यावर मी RTI चे सेंकड अपिल टाकणार होतो. पण आपलेच दात आपलेच ओठ म्हणून गप्प बसलो. पण आता पाणी डोक्यावरून चालले आहे. आता सर्वांना सर्व गोष्टींचा हिशोब द्यावा लागणार आहे. यात ग्रामपंचायतीची काय भुमिका आहे, ते दस्त मिळाल्या शिवाय स्पष्ट होणार नाही.
कोणत्यातरी भांडणापायी एकसंध एकच घर असूनही मोठ्या बाबांच्या मुलींच्या लग्नात थोरलाबाबाने त्यांना आपल्या बाजूच्या दारात लग्नमंडप घालू दिला नाही. हळदी दिवशीच भांडणे काढली. पुढे मोठ्या बाबाचा अकस्मात मृत्यू झाला तेव्हाही - "बरं झालं मेला, गेली पिडा!" असे गैर बोलल्याने राज-अमृत त्या सर्वांचा राग मनात ठेवून होते. त्यामुळे ते सहया करणे शक्यच नव्हते. याचा अर्थ त्यांच्या आणि त्यांच्या बहिणींच्या, आणि कै गोपाळ जाधव यांच्या खोट्या सहया करून गिरणी घराच्या दस्तावर फेरफार केले गेले!
शिवाय राजू त्यावेळी लहान असला तरी तरबेज होता. तो डोळे झाकून सही करणाऱ्यापैकी नव्हता. घनशाम गावडेने "गिरणीला मोटर घ्यायची आहे" म्हणून माझ्या वडिलांकडून सही घेऊन गिरणीचं घरच नावावर करून घेतलं. योगायोगाने मीही तिथे होतो, पण मी काही ते पेपर वाचले नाहीत. जर घनशाम गावडेने नोंदवले आहे, त्यानुसार जाधव कुटुंब 1955 सालीच वेगळे झाले आहे, तर 1995 साली त्याला माझ्या वडिलांच्या सहीची काय आवश्यकता वाटली? हाही एकत्र कुटुंबाचा एक पुरावा आहे.
जीवनातले शेवटचे काही दिवस बाकी असताना मोठा बाबा डोळ्यात पाणी आणून वारंवार म्हणायचा, "थोरल्याचं ऐकून तुझ्याशी खूप वाईट वागलो रे मारुती. तुझ्या माझ्या पोरांना चांगलं सांभाळा. ऐकी करून राहा. गिरणीचं घर तुझ्या आणि माझ्या हिश्श्याला आलं आहे ते लवकर घ्या. उद्या वेगळाच बनाव करतील". पण सर्व सावरायला खूप उशिर झाला होता आणि मोठा बाबा काही दिवसांनी मरण पावला.
थोरला बाबाही आपल्या शेवटच्या दिवसात ओसरी वरूनच आमच्या जेवण घरात डोकावायचा आणि म्हणायचा, "शांता खूप वाईट वागलो गं तुमच्याशी. देवबी मला माफ करणार नाही. मेल्यावर नरकात जाणार मी. भूक लागलेय, एक भाकरी दे."
तात्याही मरण डोळ्यांसमोर आलं तेव्हा माझ्या भावांचा आणि आईचा हात हातात घेऊन रडायचा. बोलता येत नव्हतं त्यामुळे कासावीस व्हायचा. तोंडाकडे हात घेऊन काहीतरी खाऊ घाल म्हणायचा. काही खायला दिलं तर रडत रडतच गिळायचा. माझ्याजवळ बसा बसा म्हणून हातानेच खुणवायचा. त्याला काहीतरी सांगायचं होतं, पण बोलता येत नव्हतं. "माझा घात झाला रे!" हे हॉस्पीटलमध्ये असताना तात्याचे शेवटचे शब्द होते. आजूबाजूला नको ते लोक जमा झाल्याने तो पुढचे काही बोलू शकला नाही, आणि त्याच दिवशी तात्याचा आवाज कायमचा गेला, असं ढोलगरवाडीचा त्याचा नातू सांगतो.
आज तात्या जिवंत नाही, त्यामुळे त्याच्या नावावर केले गेलेले सर्व उपदव्याप तात्यानेच केलेत का, हे समजण्यासाठी तात्याची मनोवृत्तीच प्रमाण मानली पाहिजे.
सावध व्हा! सावध राहा!!
धन्यवाद!
============================================================
ढेरे गल्ली सहर्ष सादर करत आहे -
नाटकः डाकू लाखन (भाग पाच)
आठवड्यापूर्वी आम्ही फॅक्ट नुसार मागच्या सर्व फेरफार मधील गैर प्रकार दाखवून, एप्रिल २०२२ नंतरचे सर्व बेकायदेशीर फेरफार रद्द करावेत, असे निवेदन दिल्यानंतर दोनच दिवसांत सर्कल साहेबांनी तलाठ्यांना पत्र पाठवलं आणि आम्ही त्याची माहिती देणारे नोटीस पाठवले. कामे अशी झटपट होत असतील तर न्याय लवकर का मिळणार नाही? सॉरी सॉरी सॉरी. थोडंसं थांबा. थोडासा, मायनरसा प्राब्लेम आहे - त्या निकालपत्रात काय लपलं आहे, ते मात्र आम्हाला अजून समजलेलं नाही! नाटकाच्या पुढच्या भागात आम्ही तुम्हाला ते सांगू. पण त्यांच्या कामाचा स्पिड वाखावण्याजोगा आहे हे नक्की.
सर्कल अधिकाऱ्यांनी खरेदीपत्रावर मारुती जाधव यांचे नाव नाही म्हणून ते काढायचे नोटीस काढले, पण त्याचवेळी प्रमोद गावडे यांनी ही जमिन कशी खरेदी केली, हे मात्र सांगितले नाही. बरे खोट्या दत्तक पत्रकानुसार चढवले म्हणावे तर, गोविंद जाधव यांचेही नाव खरेदीपत्रावर नाही. याविषयी मात्र सविता गावडे यांनी, "गोविंद जाधव आणि प्रमोद गावडे यांचेही नाव खरेदीपत्रावर नसल्याने ते आमचे कोणीही नाहीत, आणि त्यांना आम्ही ओळखत नाही", असा दावा केलेला नाही! खूप झाले. इथून पुढे अशी बदमाशी नाही चालणार. प्रत्येक खोट्या दाव्याची, खोट्या दस्ताची खणखणीत किंमत वसूल केली जाईल. कोणताही गुन्हा अनचेक राहणार नाही.
आमच्या अर्ध्या अधिक जमिनी आधीच कब्जात केल्या गेल्या आहेत, आणि बाकी राहिलेल्यावरही सर्कल अधिकाऱ्यांच्या भाषेत "कायदेशीररीत्या" दुरुस्ती करून आमची नावे कमी केली जात आहेत. काही दिवसांपूर्वी आम्हाला आमचे 7/12 दुरुस्तीचे नोटीस आले. त्यावर कसली दुरुस्ती, कशासाठी दुरुस्ती, काहीच उल्लेख नाही. बरे, फक्त आम्हाला एकट्यालाच नोटीस आली. त्या उताऱ्यावर आणखी विशेकजण सहहिश्शेदार आहेत. त्यांना काहीच थांगपत्ता नाही. चंदगड तहसिल कार्यालय, नागनवाडी सर्कल कार्यालय, येथे पळापळ केल्यावर आमचे नाव काढण्यासाठीचे अर्ज दाखल होते हे समजलं आणि आम्हालाच पत्ता नाही! मॅनेज करून जाणीवपूर्वक कळवलेही जात नाही. माझ्या भावाने त्या अर्जाचे गुपचुप फोनवरून फोटो काढून घेतले. ते पाहुन आम्ही हादरून गेलो. जुना कटू अनुभव गाठीशी असल्याने लगबगीने आम्ही सर्कल अधिकाऱ्यांकडे मुदत वाढवून देण्याचा अर्ज केला. पण तिसऱ्याच दिवशी सर्कल अधिकाऱ्यांचे संक्षिप्त असे आणखी एक नोटिस आले. त्याचा संदर्भ काहीसा असा होता,"तुमचे दस्त ग्राम महसुल अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केलेले आहेत, त्यांच्याशी संपर्क साधावा!" आम्ही फोन करतोय, ऑफिसच्या चकरा मारतोय - ग्रामविकास अधिकारी संपर्क क्षेत्राबाहेर!
भ्रष्ट अधिकारी काही धन्ना शेठना सोबत घेऊन खोटे दस्त बनवतात आणि त्याआधारे गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी हडप केल्या जात आहेत. हे गैरप्रकार इतके प्रचंड आहेत कि, चंदगडचे रजिस्ट्रार ऑफिस झाडून काढले तर चंदगड दिवाणी न्यायालयातील अर्ध्या अधिक केसिस बंद होतील! आणि ही काही अतिशयोक्ती नाही. न्यायालयाच्या आणि तहसिल कार्यालयाच्या आवारात एक बोर्ड लावा: "ज्या कुणा शेतकऱ्याच्या जमिनी खोटे दस्त बनवून गैरप्रकारे बळकावण्यात आल्या आहेत, त्यांना आम्ही सरकारतर्फे न्याय मिळवून देऊ. पुराव्यासहीत संपर्क साधावा. - चंदगड तहसिलदार." एकाच दिवसात हजारो लोक जमा होतील!
कुणीतरी करतंय आणि कुणीतरी भोगतंय अशी एक म्हण आहे. निरपराध असून आपणच वर्षांनुवर्षे कोर्टाच्या वाऱ्या करायच्या. सर्वच अजब! हेच पाहा ना, भ्रष्ट अधिकाऱ्यांनी शेण खाल्लं. आणि त्याची किंमत विनाकारण वर्षांनुवर्षे आम्ही चुकवत आहोत.
७/१२ वरच्या बाकीच्या हिस्सेदारांना नोटिस काढणे बंधनकारक असताना केवळ एकालाच पाठवण्यात आल्या. एकूण विशेक सहहिस्सेदार आहेत. काय चालले आहे?
ग्रामिण कनिष्ठ न्यायालयांची अवस्थाही ही दयनिय आहे. तुमच्याकडे प्रर्याप्त पुरावे आहेत म्हणून तुम्हाला न्याय मिळेलच याची खात्री नाही. वेळेत मिळेल हे तर दिवास्वाप्न! मुळात तेथे खोटे दस्त रजिस्टर करणे, ते खरे म्हणून प्रेझेंट करणे, खोटे ॲफिडेव्हीट, प्लॉन्टेड पुरावे, खोटे दस्त, खोटे साक्षिदार, खोटे दावे, खोटे FIR, खोटी क्रिमिनल केस, खोटे रिप्रेझेन्टशन गुन्हाच समजलाच जात नाही! जय हो! कुणाला हवे असतील तर याचे पुरावेही मी देईन.
1986 साली जाधव कुटुंब वेगळे झाले होते, याचे डॉकुमेन्ट भलेही त्यांनी गायब केले गेले असतील. पण त्यावेळी उपस्थित असलेले पंच, साक्षिदार, पक्षकार, घरची एकसंध इमारत, काही गायब करता येणे शक्य नाही. साधं सिंपल लॉजिक आहे - स्वतः च्या मुलांना वगळून कोणताही बाप आपल्या चुलत भावाच्या जावयाच्या मुलांच्या नावे मालमत्ता का करेल? इतकं पुण्यकर्म फक्त बाबासाहेब वाघमोडे सारखा एखादा प्रामाणिक, तत्ववादी आधिकारीच करू शकतो! सामान्य बाप लोकांना असे बलिदान करने शक्य नाही.
गंगाजी जाधव आणि गोविंद जाधव यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या हाताचे ठसे स्टॅम्प पेपरवर घेतले गेले असल्याचे दृष्टीपथास आले होते. ते मरण पावल्याचे समजताच जमा झालेल्या गल्लीतील आणि गावातील लोकांनी त्यांच्या अंगठ्याला शाई पाहिली होती. या गोष्टीची कुजुबुजही चालू झाली होती. पण त्यावेळी कुणालाच त्यातला संभाव्य धोका कळला नाही. त्यामुळे असंभव वाटणाऱ्या पेपरवरच्या ठशांचे इंक डेटिंग टेस्टिंग व्हावे आणि मृत्यू तारखेशी त्याची पडताळणी व्हावी.
जावई आणि मुलगी म्हातारपणी आपली देखभाल करणार नाही, याची जाणिव झाल्याने थोरल्या बाबाने आपली सामाजिक प्रतिष्ठा पणाला लावून वयाच्या पन्नाशीत दुसरे लग्नं केले. यावरूनही हे सिध्द होते कि, थोरला बाबा याना आपले वारसदार मानत नव्हता.
काही महिन्यापूर्वी कै गंगाजी जाधव यांच्या बाकी दोन मुलींच्या वारसांना त्यांचा लिगल शेअर मिळू नये, त्यांच्या वारसांची नावे चढू नयेत, यासाठी घनशाम गावडे यांनी कुळाचे खोटे दस्त सर्कल कडे दाखल करून आपले नाव चढवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. मागेही बाकी दोन मुलींच्या वारसांनी कसलेली शेतपिके नांगरून आणि औषधे मारून जाळून टाकण्यात आली होती.
फक्त कै भरमू जाधव यांच्या नावे तिन गट नंबर होते, तसेच फक्त कै राणबा जाधव यांच्या नावेही तिन गट नंबर होते. 2017-18 मध्ये कै रानबा जाधव यांचा मुर्त्यू झाल्यानंतर घनशाम गावडेने त्यावर आपले दोन हिस्से चढवले. कसे? माहित नाही! शिवाय त्या गट नंबरच्या तहसिल मधील जुन्या नोंदीत ते बदल दिसून येऊ लागले. हे काय गौडबंगाल आहे काहीच समजत नाही. पण इंक डेटिंग टेस्टिंग केले तर सर्व खुलासा होईल.
घनशाम गावडे यांनी जाधवांची शेकडो मोठी प्रचंड झाडे विकून टाकली - केवळ विजबिल भरण्यासाठी! आमच्या घरात हिशोब दाखवण्याची आणि हिशोब मागण्याची प्रथा नव्हती! आणि घनशाम गावडे यांच्याकडून तर नाहीच नाही! सर्व गावच्या पंचासमक्ष तीस हजार असलेले कर्ज तीन लाख कसे झाले, हेही मामांनी विचारले नाही!
केस कोर्टात प्रलंबित असेल तर कोणतेही फेरबदल करण्यापूर्वी अधिकाऱ्यांना कोर्टाची परवानगी घ्यावी लागते. पण चंदगड तालुक्यात लोकशाही आहे कुठे? तलाठी, सर्कल, तहसिलदार, प्रांत - सगळेच राजे आहेत. हजारो प्रत्यक्ष साक्षिदार, घरपट्टी, पाणीपट्टी, एकत्र आर्थिक व्यवहार यांचे अनेक पुरावे असूनही तलाठी "1955 चा विभक्त कुटुंबाचा रिपोर्ट" देतात! भ्रष्ट अधिकाऱ्यांना मलिदा चारून हे लोक गैरप्रकारे जी बेकायदेशीर कामे करून घेताहेत, तो पैसाही त्यांच्या स्वतःच्या मिळकतीचा नाही. गंगाजी जाधव, त्यांच्या पत्नी, घनशाम गावडे किंवा सविता गावडे यांनी जाधवांच्या संयुक्त कुटुंबांत असताना कधी चुकूनही शेतीची कामे, किंवा घरकामे, किंवा नोकरी केलेली नाही. मग इतका अमाप पैसा त्यांच्याकडे आला कुठून? काही तर्क?
गावोगावी आमच्याविषयी चुकीची माहिती पसरवली जाते आहे. आम्हीच त्यांच्या जमिनी लुबाडल्या आहेत, अशी अफवा पसरवली जाते. काही वर्षांपूर्वी 1955 साली आमचे जाधव कुटुंब वेगळे झाले आहे, असे खोटे दस्त तयार करून, या हुशार लोकांनी आता कै गोपाळ जाधव यांच्या 16 शेतजमिनी, कै मारुती जाधव यांच्या 14 शेतजमिनी, कै भरमू आणि कै राणबा जाधव यांच्या प्रत्येकी 9 शेतजमिनी लुबाडल्या. वर आपुन बाई बापुडे असा आवही आणला. गावातल्या काही आक्का-बाया त्यामुळे गहिवरूनही आल्या. आमच्या घरच्याच लोकांचाही यावर विश्वास नव्हता. आणि आज वास्तव परिस्थिती पाहून त्यांचे डोळे पाढरे व्हायची पाळी आली आहे. त्यामुळे सर्व जाधव कुटुंब एक होऊन गडहिंग्लज कोर्टात दावा दाखल केला. आमच्या जवळजवळ सर्व सहहिस्सेदारानी, सर्व सहमतीने गडहिंग्ज कोर्टमध्ये सहमतीपत्र दिले आहे. त्याचा फोटो पाहा.
प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे, यास्तव पोलीस आमचे FIR ही नोंदवून घेत नाहीत. आई जेवू घालिना,आणि बाप भिक मागू देईना, अशी आमची अवस्था झाली आहे. तीन वर्षांपासून कोर्टात आमच्या पार्टिशन आणि खोटया Forged Adoption दत्तक पत्राच्या केसीस एकाही हिअरिंग विना पडून आहेत. आमचे वकिल साहेब नित्य निरंतर एकच कॅसेट ऐकवतात, "जज साहेबांना वेळ नाही! दुसरे कोणतेही कारण नाही!" आता न्याय कसा मिळायचा बोला?
बापापेक्षा मुलं सवाई निघाली! ती तर जाधवांचे लोकच गावड्याच्या घरात येऊन राहिले आहेत, आणि आता आमच्या शेतजमिनीवर हक्क दाखवत आहेत, पाहुण्यांचा कसा हक्क पोहचतो आमच्या जमिनीवर? असा ते सार्वजनिक जाब विचारत आहेत. सर्व गावाला मुर्ख समजण्याइतका कॉफिडन्स यांच्यात येतो तरी कुठून?
या आमच्या मागे लागलेल्या पिडेची, विपदेची सुरुवात एका भल्या माणसाने, एका कृतघ्न माणसाला दया येऊन स्वतःच्या घरी आसरा देण्यातून झाली. त्याच्या या भलेपणाची किंमत आज त्याची मुले चुकवत आहेत. साठ वर्षापूर्वी कै गोपाळ जाधव आर्मीतून सुटीवर घरी आल्यानंतर आपल्या बहिणीला आसगावाला तिच्या सासरी भेटायला गेले होते. बहिणीच्या घरचे दारिद्रय, शेण गोळा करून पोट भरणाऱ्या आठ वर्षांच्या भाच्याला पाहून मामाला पिडा झाली. तो बहिणीला बोलला, मी घनश्यामला माझ्या घरी घेऊन जातो, त्याला शिकवतो आणि चांगल्या नोकरीला लावून देतो. इथे राहीला तर त्याचं आयुष्य खराब होऊन जाईल. मामाने घनश्यामला घरी आणलं आणि आमच्या घरी ठेवून ग्रॅज्युएट पर्यंत शिकवलं. नंतर नोकरी कर म्हणाला. भाचा मामाला बोलला, मला नोकरी करायची नाही. तुमच्या घरात तसा कुणी फारसा शिकलेला नाही. घरचा आर्थिक व्यवहार मी सांभाळतो. आमचा एकत्र कुटुंबाचा मोठा प्रपंच होता. आणखी एकटा - दुकटा घरात राहून फारसा फरक पडणार नव्हता. वरून साध्या सरळ वाटणाऱ्या भाच्याच्या मनात काही कुटील आहे, याची त्याला शंकाही मामाला आली नाही.
पुढे घनश्यामने कुटुंबप्रमुख असलेल्या चुलतमामाच्या मुलीशी लग्न करून येथेच बस्तान ठोकलं ते कायमचं! शिकलेला भाचा म्हणून ज्या काळात लोकांना सायकल मिळत नव्हती, त्याकाळी मामांनी लाडक्या भाच्याला बुलेट घेऊन दिली. सर्वांचे डोळे पांढरे व्हायची वेळ तेव्हा आली, ज्यावेळी त्याच्या सख्या भाच्याने त्यांच्या सर्वांच्या जमिनीही स्वतःच्या मुलाच्या आणि बायकोच्या नावे करून टाकल्या! त्याची मुलंही बापापेक्षा सवाई निघाली. घरच्या मालकांना आणि त्यांच्या मुलांना ती आश्रीतासारखं वागवू लागली.
ज्या मामाने त्याला सात-आठ वर्षांचा असल्यापासून स्वतःच्या घरी ठेवून मोठं केलं, उच्च शिकण शिकवलं, त्याच कै गोपाल जाधव यांच्या जमिनी त्याने हडप केल्या. गोपाल जाधव यांच्याच शब्दात उद्वेग सांगायचा तर, "या कसायाला मी स्वतःच घरी आणले रे, आणि तुमच्या बरोबर माझ्या स्वतःच्या मुलांचाही गळा कापला. त्याच्याकडे यल्लुबाईच्या पटकीतल्या जमिनीत तीन गुंठे घ्यायला पैसे दिले होते, त्याने एक गुंठा घेतला आणि दोन गुंठ्यांचे पैसे खाल्ले. माझ्या जॉईंट अकाऊंटवरचे पंच्याहत्तर हजार रुपये परस्पर काढून खाल्ले. त्यावेळी ही खूप मोठी रक्कम होती, पाच पैशाला किंमत होती. याला घरी आणण्यापेक्षा चार कुत्री पाळली असती तर त्यांनी उपकाराची जाणिव तरी ठेवली असती." पुण्य करा आणि गंगेत टाका म्हणतात, आमच्या वडीलधाऱ्यांनी ते गटारात टाकले.
आमचे काका कै गोविंद जाधव हे साधेभोळे आणि विसरभोळ्या स्वभावाचे होते. आपल्या भावाच्या मुलांनाच त्यांनी आपले कुटुंब मानले होते. त्यांना जर दत्तक घायचे असते तर स्वतःच्या उमेदीच्या वयातच घेतले असते. वयाची ८० वर्षे होईपर्यंत वाट पाहीली नसती. उतारवयात त्यांना विस्मरणाचा त्रास चालू झाला. तिच-तिच गोष्ट ते वारंवार ऐकवायचे. त्यामुळे गावातले लोक कंटाळत. पण त्यांचा निष्कपट निर्मळ स्वभाव माहीत असलेने गावचे लोक त्याना कधी उलटून बोलत नसत.
त्यांच्या या साधेपणाचा फायदा कुटील लोकांनी बरोबर साधला आणि त्यांच्या विस्मरणाचा फायदा घेऊन दत्तक पत्राचा बनाव केला गेला. कै गंगाजी जाधव आणि कै गोविंद जाधव यांच्या हाताचे ठसे त्यांच्या मृत्यूनंतरही उमटवून घेण्यात आले. आणि ही गोष्ट त्यांचं अंतिम दर्शन घ्यायला आलेल्या लोकांनी पाहीली होती.
२०१८ साली अचानक श्री प्रमोद घनशाम गावडे (वय 32 वर्षे - नोकरदार) ही व्यक्ती कै गोविंद नागोजी जाधव (वय ८० वर्षे - आजारी, विस्मरणग्रस्त) या आमच्या काकाच्या मुर्त्यूनंतर त्यांचा दत्तक मुलगा म्हणून आणि आमच्या एकत्र कुटुंबाच्या सर्व जमिनीचा मालक म्हूणन उभा राहीला!
उपविभागीय अधिकारी, गडहिंग्लज यांनी दाव्याचा निकाल दिला १० ऑगस्ट २०२३ ला. आणि रामपूर, चंदगड चे तलाठी यांनी सदर दाव्यानुसार फेरफार केले ९ ऑगस्ट २०२३ ला! म्हणजे निकालाच्या एक दिवस अगोदर!
अविभाजित कुटुंब व्यवस्थेचे पुरावे म्हणून: घरपट्टी, फाळा, पाणीपट्टी, ग्रामपंचायतमध्ये नोंदवलेल्या जुन्या नोंदीनुसार कुटुंबप्रमुखाशी नाते, राष्ट्रीय जनगणनेचा रिंपोर्ट, मतदार यादीतील नोंदी, गावच्या ज्येष्ठ नागरिकांच्या साक्षी आणि प्रतिज्ञा पत्रे, प्रत्यक्षात झालेल्या जमिनीच्या वाटपाचे पुरावे, एकत्र कुटुंबात होणाऱ्या जमा खर्चाचे हिशेब, ग्रामपंचायतीतून दिले जाणारे दाखले, कुटुंब प्रमुखाच्या सख्या पत्नीला आणि बाकी दोन सख्या मुलींच्या वारसांनाही विचारून खरेखोटे करता येते. हेच नाही तर वेळप्रसंगी ग्रामसभा बोलावूनही खरे-खोटे ठरवता येऊ शकते.
प्रशासनात जसे पैसा खावून निकाल फिरविणारे अधिकारी असतात, तसे गावपातळीवरही माती खाऊन मत फिरविणारे काही लोक असतात. त्यामुळे विनंती आहे की गावातील ज्येष्ठ लोकांना बोलावून चावडीवर सर्व गावकऱ्यांसमकक्ष सत्य असत्य कथनाची खात्री केली जावी.
कनिष्ट कोर्टांची दयनिय अवस्था लक्षांत घेऊन, आम्ही हायर कोर्टमध्ये खोटे बेकायदेशार दस्त बनवून एकत्र कुटुंबाची संयुक्त शेत जमिन हडपल्या प्रकरणी क्रिमिनल केस दाखल करणार आहोत. त्यामुळे आपल्या रामपूर गावच्या स्थानिक लोकांकडून, अनवधानाने तपास किंवा न्याय यंत्रणेला काही चुकिची माहिती दिली जाऊ नये, म्हणून हे दिर्घ प्रवचण वाचायचा त्रास तुम्हाला देत आहे. व्हाट्सॲप वापरणाऱ्या तरुण पिढीला जुन्या भुतकाळातील गोष्टी माहिती असण्याचे काही कारण नाही. पण ते आपल्याच घरातील जाणत्या लोकांकडून हे खरं-खोटं असल्याची शहानिशा करून घेऊ शकतात. आम्ही खूप सहन केलं, पण पाणी आता डोक्यावरुन चाललं आहे. त्यामुळे भारताने नुकतीच पाकिस्तानात केली तरी स्ट्राईक करणे अत्यावश्यक झाले आहे. पाकिस्तान सारख्या काही लोकांना सद्विवेकबुद्धी, प्रामाणिकपणा, कृतज्ञता, उपकाराची जाणीव यांचा अर्थ समजत नाही. काही लोकांना फक्त ऑपरेशन शिंदूर" ची भाषा समजते. आपल्या संपूर्ण रामपूर गावच्या लोकांना आमचे नम्र निवेदन आहे कि, आम्हाला न्याय मिळवण्यात आणि आमची गमावलेली शेती मिळवण्यात आम्हाला मदत करावी. गावचे सगळेच लोक काही पार्ट्या खावून चांगभलं म्हणणारे नसतात, यावर विश्वास आहे. गावच्या नावातला राम अनेकांच्या अंतरंगातही वसत असेल, या विश्वासानेच आम्ही हे पुढचे पाऊल टाकतो आहोत.
हे सार्वजनिक सांगण्यामागे यासाठीही महत्वाचे आहे की, गावात आणि पाहुण्यांतून आमच्या विषयी वर्षांनुवर्षे खोटी माहिती पसरून बाजी मारायचा प्रयत्नं होतो आहे. गोबेल्स तंत्र आम्ही वापरलं नसलं, तरी ते तंत्र काय आहे हे मात्र आम्हाला माहित आहे. खोटी गोष्ट शंभर वेळा सतत सांगत राहून, ती खरी असल्याची भासवणं म्हणजे गोबेल्स तंत्र! पण हे तंत्र निर्माण करणाऱ्याचा आणि वापरणाऱ्याचा शेवट कसा झाला, हे या हे लोकांनी वाचल्याचं दिसत नाही.
सावध व्हा! सावध राहा!!
नाटकः डाकू लाखन (भाग सहा, सात लवकरच सादर होणार आहेत.)
धन्यवाद!
============================================================
ढेरे गल्ली सहर्ष सादर करत आहे -
नाटकः डाकू लाखन आणि माखन (भाग सहा)
घटस्पोट होताना माझ्या आत्याईला नवऱ्याने पाटणे फाट्याची वीस गुंटे जमिन पोटगी दाखल दिली होती. पण ते कागद छनशाम गावडे यांनी लपवले. शेवटपर्यंत तोशीस लागू दिली नाही.
"माझे जमिनीचे कागद द्या . . . माझे जमिनीचे कागद द्या . . . असा वर्षांनुवर्षे तळतळाट करूनही, छनशाम गावडे यांने तिला जिवंत असेपर्यंत ते दस्त दिले नाहीत. लपवून ठेवले. बहुदा तिच्या मृत्यूनंतर परस्पर तिची जमिन हडप करण्याचा त्यांचा उद्देश होता कि आणखी काही माहीत नाही. तो तळतळाट घेऊनच ती मेली.
ती मेल्यानंतर काही वर्षांनी निल्हाद गावडे याने ते दस्त तत्कालीन रामपूर गावचे सरपंच श्री राजूदा शिवनगेकर यांच्याकडे मोठ्या दिलदार मनाने दिले! आणि ते मला द्यायला राजूदाला सांगितले. मी बाळू सुतारच्या घरी काही मित्रांबरोबर गप्पा मारत बसलो होतो. राजूदाचा बाळूला निरोपाचा फोन आला. बाळू बोलला, "गुंडू इथेच आहे की, फोन देतो थांबा."
राजूदा मला, "काम आहे, माझ्या घरी ये." असे थोडक्यात बोलला. राजूदाने मला असं अचानक कशासाठी बोलावले असेल, असा विचार करतच मी त्यांच्या घरी पोहचलो. मी त्यांना नमस्कार करून बसलो आणि विचारलं, "अचानक बोलावलं, काही काम . . . "
" थोडा थोडा चहा पिऊ आणि नंतर बोलू. आई, जाधवाचा गुंडू आलाय, थोडा चहा ठेव गं." - अशी आईला हाक दिली. " कसा आहेस रे बाळा ..." असे म्हणतच आई चहा घेऊन आली.
चहा पिता पिता राजूदाने इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या, विचारपूस केली. पण मी अस्वस्थ, कशासाठी बोलावलं असेल अंदाज येईना. मागच्या सारखी भावांनी काही उपदव्याप केल्याबद्दलची कुणाची तक्रार आली असेल, असा मी कयास करत होतो.
"निल्हाद गावडे आला होता माझ्याकडे. तुमच्या आत्याचे काही महत्वाचे कागद त्याने दिले आहेत." असे म्हणत राजूदाने काही अगदी खूप जूने कागद माझ्या हाती ठेवले.
मी ते वाचून बघितले आणि आवाकच झालो. ज्या कागदांसाठी माझ्या आत्याईने अनेक वर्षे तळतळाट केला, तेच दस्त माझ्या हातात होते. हे कागद वेळीच तिच्या हाती आले असते तर, तिने आयुष्यभर सोसलेला वनवास थोडाफार तरी कमी झाला असता, असे मला वाटून गेले.
तिच्या नवऱ्याने पोटगी दाखल तिला पाटणे फाटयाची विस गुंठे जागा नावे करून दिली होती, त्याचे ते कागद होते! तिचा तळतळाट आठवून मला छनशाम गावडेच्या कुटिलतेचा संतापही आला. दुष्ट माणसाच्या विकृतीलाही काही सीमा असते. माणूस कितीही गयागुजरा असो त्याच्यात थोडीतरी नितीमत्तेची चाड असतेच असते असे मला वाटायचे. पण हे प्रकरणच कल्पनेपलिकडचे होते.
मी उठलो, राजूदाच्या हातात ते पेपर परत ठेवले आणि म्हणालो, "राजूदा हे कागद ज्यांनी लपवले होते त्यांनाच परत द्या. माझ्या केऱ्याईची हाय आहे त्यात . . ." आणि मी निघून आलो. त्यानंतर त्या पेपरचे काय झाले, हे मी कधीच कुणाला विचारले नाही.
आत्याईच्या मृत्यूनंतर त्या दस्तांच्या आधारे तिची जमिन हडपण्याचा त्यांचा डाव बहुदा सफल झाला नव्हता!...
- म्हणून त्यांनी नविन डाव टाकला असावा. मी हुरळून जाऊन एखाद्या निष्फळ विवादात फसावे, यासाठीचा हा कावेबाज डाव खेळला गेला असावा, असे आता वाटते.
असे कावेबाज विघ्नसंतोषी लोक, घरी - शेजारी असतील तर एखाद्या कुटुंबाचे वाळवण झाल्याशिवाय राहणार आहे का? कलियुगात पापांची खरंच गणती होत नाही का? कुरुक्षेत्राच्या रक्तरंजित रणांगणावर शरपंजरी पडलेल्या भीष्म पितामहाला उद्देशून भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेली कर्मयोगाची महती फक्त एक दंतकथाच आहे का? कि आजही देवाधी देवाच्या त्या वचनात काही सत्व आहे?
चंदगडच्या दप्तरांत नसली तरी, चित्रगुप्तांच्या दस्तरांत सर्व लहांन मोठ्या पाप पुण्याची नोंद होते. त्यांच्या दरबारांत करोडो लोकांची पाप पुण्याची नित्य दैनंदिन नोंदणी असल्याने केस थोडी उशिरा चालू होते इतकंच!... पण निकाल आधीच कर्मयोगे ठरलेला असतो. कुणालाच कधी टाळता न येणारी सुनावणी आणि शिक्षा फक्त बाकी असते.
तेथे खोटे दस्त, खोटे पुरावे, खोटे साक्षिदार, कावेबाज चलाखी - सर्व निष्प्रभ आहे. तेथे सर्वसाक्षी असते ते चंद्रगुप्ताचे दप्तर! आणि न्यायाधिश महाराज असतात - साक्षांत यमराज! तिथे एकदाच एकतर्फी निकाल सुनावणी होते - अपिल वकिल ही भानगडच नाही!!!
प्रत्येकाच्या आहिक कर्मा नुसार सीधा शिक्षा घोषित होते! चित्रगुप्ताच्या दरबारात चंदगड दरबारा सारखी अपिलाची व्यवस्था नसते, कि चिरीमिरीची देवाण घेवाण नसते. तेथे न वकिल, न दलिल, न दस्त, न साक्षिदार - कर्म हेच एकमेव मर्म!
यालाच कर्मा इज बॅक, कर्माचे भोग म्हणतात. ते प्राक्तन आपल्याच पाठीशी विधात्याने लटकवलेल्या अदृश्य पोतडीत जमा होत जाते. दुसऱ्याला धक्का द्यायला आपण आडवळणी आडवाटेला एक मोठा खड्डा खणून ठेवतो. ऐके दिवशी आपलं प्राक्तन आपल्यालाच त्या खड्ड्याच्या निमुळत्या काठावर आणून उभे करते . . .
- पापांची परिपूर्ती झाली की त्यांची भूताटकी बनून कर्त्याच्याच मानेवर बसते. आणि ठावही न लागणाऱ्या काळ्याकुट्ट गर्तेतून विक्राळ काळ खदखदून भेसूर हसतो. . . . .
. . . . . हां हां हां हां हां . . . . .
आणि दचकून आपलाच पाय घसरतो. . . . . . .
=========================
जाधव कुटुंबांच्या एकून एक दस्तांच्या खजिन्यांवर मग कोणता कालिया नाग कुंडली मारून बसला आहे? "गावडे" व्यतिरिक्त जाधव कुटुंबांतील एकाही सदस्याने 1985 - 86 मध्ये वेगळे झाल्यापासून गेल्या 40 वर्षांत एकदाही स्वतःच्या मालमत्तेचे दस्त पाहिले असतील, तर कृपया त्याचे नाव आणि त्याने ते कधी पाहिले ते सांगावे. आमच्याच मालमत्तेचे दस्त या जन्मात आम्हां जाधवांना पाहायचे असतील तर ते केवळ कालिया मर्दन करणारा बासुरीवाला आला तरच शक्य आहे, असे वाटते. राजू जाधव, अशोक जाधव या काही "खास" व्यक्तींना खजान्याचं दर्शन घडलं असल्याची शक्यता वाटते - त्यांच्यावर जे गारुड चढलं आहे ते कदाचित त्यामुळेच असेल. पण बाकिच्यांचे काय? इंजिनिअर साहेबांनी आजआखेर "जाधव कुटुंबांची मालमत्ता ही केवळ दोन गावडे व्यक्तींची मालमत्ता आहे, जाधव कुटुंबियांचा त्या मालमत्तेत काहीही संबंध नाही! आणि हा तर्क अभियांत्रिकीच्या सिंद्धातानुसार बरोबर आहे!" असे सर्व रामपूर गावाला पटवून द्यायचा खटाटोप चालवला आहे. गावचे आजचे सर्व लोकं जून्या लोकांसारखे दुधखुळे आहेत का? इतका हुशार स्कॉलर मित्र सांगतो, म्हणजे हा सिद्धांत बरोबरच असणार, असे नंदू तुर्केवाडकर किंवा संजय गावडे, असे काही मित्र आणि काही "खास" माणसे मानू शकतात. पण बाकी 90% रामपूर वाल्यांचे काय? साम दाम दंड भेद कोणतीही कुटिल नीती वापरली तरी सर्वांचे वशिकरण करणं सदासर्वदा शक्य नसतं. जे समजणारे आहेत त्यांच्यासाठी ऐवढे पुरेसे आहेत. बाकी अर्ताकिक मुद्द्यांना 'होय बा' हलणारी डुलणारी मुंडी खूप पुरातन समस्या आहे, ती पुढेही राहणार आहे.
आपणच बोलतो, पोटगीचे कोणतेच दस्तऐवज उपलब्ध नाहीत. आणि पुरावेही देतो - त्या पोटगीच्या दस्तांमध्ये भावांच्या सह्या का नाहीत, आप्पाजी ढेरेंची सही कशी आली? इत्यादी!
भावांवर विश्वास कसा ठेवणार? त्याच कालावधीत तिच्या गरीब बहिणीच्या केंबळ्याच्या घरात राहणाऱ्या गरीब पोरीची जमिनी काढून घेण्यासाठी ज्या भावांनी तिच्या नवऱ्याला मारलं. तिच्या बहिणीच्या गरीब पोरीला देशोधडीला लावलं. त्या आश्राप निराधार पोरीला मदत करतात म्हणून, तिला आणि तिच्या मोडक्या भावाला अक्षरशः लाथा घातल्या. त्या भावांवर विश्वास ठेवायचा? कि, मोडक्या भावाचा काटा काढून त्याची जमिन गिळंकृत करू पाहणाऱ्या भावांवर विश्वास ठेवायचा?
सात वर्षांच्या मुलांने पोटगीचे कागद कसे लपवले असतील, हा प्रश्न तसा विचार करण्यासारखा आहे. पण काही मुले मुळातच हुशार असतात. ज्या मुलाला मोठ्या शिताफीने दोन वर्षांचे सर्व गावाचे दुधाचे पैसे गटम करता येतात, तीस हजाराच्या कर्जाचे तीन लाख करता येतात, एका खोटया दस्तानुसार जाधवांच्या जमिनींचा मालकीहक्क बदलता येतो, तो मुलगा सामान्य कसा असेल? येथे कलाबाजीत प्राविण्य असलेल्या एका अलौकिक मुलाच्या कर्तबगदारी बद्दल मुल्यांकन चालले आहे.
============================================================
Maharashtra Farmers Against Corruption - Chandgad, Kolhapur, Maharashtra, India