नाटकः डाकू लाखन पान 2
नाटकः डाकू लाखन पान 2
महाराष्ट्रातील गरीब कष्टकरी शेतकऱ्यांचा भ्रष्टाचारा विरुद्धचा लढा आणि संघर्ष!!!
Maharashtra Farmers Against Corruption
नाटकः डाकू लाखन पान 2
============================================================
ढेरे गल्ली सहर्ष सादर करत आहे -
नाटकः डाकू लाखन (भाग सात)
महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे एक पत्र परवा मिळाले. खोटे बेकायदेशीर दत्तक पत्र बनवून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताने आमच्या पिढीजात परंपरागत शेतजमिनी लुबाडल्याची चौकशी करण्यात यावी, यासाठी निरंतर दिड वर्षं केलेल्या आमच्या प्रयत्नांना थोडीशी आशेची पालवी फुटली. आता अशा पत्राने मी फारसा हुरळून जात नाही. पण ठीक आहे, सरकार अजिबातच झोपलेले आहे, असे मला आता म्हणता येणार नाही इतकेच.
पण आज मी याला अनुसरून, सर्वसामान्य पीडित शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी एक सार्वजनिक पत्र लिहायचे ठरवले आहे. ज्यात असे दर्शवायचे आहे कि, गैरप्रकार करणारे अधिकारी कितीही मोठे असोत, आपण जर ठामपणे त्यांचे गैरप्रकार सार्वजनिक केले तर, वेळ लागेल पण न्याय नक्कीच मिळेल. आशा आहे.
महसूल मंत्र्यांच्या या चौकशीलाही वाटाण्याच्या अक्षता लावायची क्षमता आणि कसब असलेले हुशार-हरहुन्नरी अधिकारी आपल्या जिल्ह्यात असल्याने - ग्राउंड लेवलच्या अधिकाऱ्यांकडून सदिच्छेची अपेक्षा ठेवणे तसे अवघड आहे. पण या ग्राउंड लेवलच्या अधिकाऱ्यांना त्यांनी केलेल्या चौकशीचा रिपोर्ट एक दिवस त्यांना कोर्टात प्रत्यक्ष जज साहेबासमोर वाचायला लावायची, आणि त्यांच्या हुशारीचे प्रात्यक्षिक अनुभवायची अनोखी संधी मात्र मला आपसूक मिळणार आहे.
मी आणि माझा चुलत भाऊ सुधीर यांनी सुस्त अधिकाऱ्यांच्या कानांत काड्या घालणारे अप्रत्यक्षपणे अनेकानेक गमतीशीर प्रयोग केले. आम्ही ठरवले होते; एक दिवस आपली केस महाराष्ट्रातल्या प्रत्येक अधिकाऱ्याला, प्रत्येक जजला, प्रत्येक मंत्र्याला, प्रत्येक पुढाऱ्याला आणि प्रत्येक नागरिकाला माहित पडेल; असे काहीतरी भन्नाट करायचे. आणि हे केवळ गंमतीपोटी नव्हते, तर त्यातून भ्रष्टाचारी अधिकाऱ्याची भंबेरी उडाली पाहिजे आणि पिडीतांना न्याय मिळाला पाहिजे, ही भावना होती. आता, ही बाब केवळ आमच्या एका केसपुरती मर्यादित राहिली नव्हती. आशावादी असणे नेहमीच चांगले असते. So, hope for the best and prepare for the worst! या सूत्रानुसार आम्ही एकाच वेळी अनेकानेक योजना आखल्या. अनेकानेक मार्गांनी तक्रार अगदी सेंट्रल गव्हर्नमेंट, राष्ट्रपती, सुप्रीम कोर्ट, लॉ मिनिस्ट्री यांचे दारापर्यन्त पोहोचवली!
परवा चंदगडचे, आताचे सब-रजिस्ट्रार यांचेबरोबर फोनवर बोलणे झाले. क्रिमिनल केस दाखल करायला आवश्यक आहे, यासाठी त्यांच्याकडे आम्ही आम्हाला दत्तक पत्राची सर्टिफाईड प्रत देण्यात यावी यासाठी अप्लीकेशन दिले होते.
ते बोलले, "मी समजू शकतो की तुमच्या जमिनीवर बेकायदेशीर दत्तक पत्र बनवून फेरफार केले गेले आहे, हे चुकीचे आहे. पण आम्हाला दत्तक पत्र आणि मृत्यूपत्र हे दोन दस्त तिसऱ्या पार्टीला परस्पर देता येत नाहीत. कायदेशीर बंधने आहेत. जर तुम्ही कोर्टातर्फे तशी मागणी केली तर आम्ही देऊ शकतो."
"ठिक आहे, ही केस मी स्वतःच रिप्रेझेन्ट करतो आहे. मी कोर्टतर्फे तसे अप्लीकेशन देईन. काही प्राब्लेम नाही."
"मी त्याची प्रत तयारच करून ठेवतो. मला कलेक्टर साहेबांकडूनही या दत्तक पत्राची चौकशी करून रिपोर्ट द्यायचे पत्र आले आहे."
"मीच ती तक्रार केली होती, पण त्याची दखल उशिराने घेतली जात आहे. सर, ज्या अधिकाऱ्यांने ते बनवले आहे, त्यांचे नाव मला द्या."
ते बोलले, "आता जो कोणी या खूर्चीवर असेल त्याचीच जबाबदारी गृहित धरली जाते."
मी बोललो, " ठीक आहे तसेही चालेल."
त्या तत्कालीन अधिकाऱ्यांकडून अपेक्षित आर्थिक आणि मानसिक नुकसानीच्या प्रमाणात नुकसान भरपाई न उकळताच त्यांना सोडून दिले तर गैरप्रकार थांबणार नव्हते. प्रत्येकाला प्रत्येक गैरप्रकाराची किंमत चुकवायला लावल्याशिवाय खरा हिशोब पुरा होत नाही. ती किंमत कोण चुकती करावी हे डिपार्टमेंटच ठरवत असेल तर, तेही ठीक.
चला, या प्रस्तावनेतून पुन्हा मुख्य नाटकात येऊ.
महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे एक पत्र परवा मिळाले. पण ते सहजच मिळाले का? त्याची सुरुवात एका प्रचंड निराशेतून झाली होती. त्याचे असे झाले...
आम्ही सर्व तत्कालीन प्रांत अधिकारी गडहिंग्लज, सर्कल अधिकारी नागणवाडी, तलाठी अधिकारी रामपूर आणि उप-निबंधक चंदगड यांच्याविरुध्द ह्यूमन राईट्स कमिशन येथे मुंबई हायकोर्टचे माननीय जस्टीस के के तातेड यांचेकडे अधिकाराचा गैरवापर करून फसवणूक केलेच्या - सुधीर जाधव आणि मी मिळून, दोन केसीस दाखल केल्या होत्या. त्या केसीस परिचयातील वकिलांच्या सल्ल्यानुसार आम्ही स्वतःच्या रिप्रेझेण्ट केल्या.
तेथील वातावरण आणि अनुभव मी मुद्दाम तुम्हाला सांगतो आहे. मी स्वतः पुढाकार घेऊन कोर्ट रूममध्ये जाऊन कोर्ट चालू होण्यापूर्वी तेथील सहाय्यकाकडून कोर्टाचे कामकाज आणि केस प्रेझेन्ट करायची तेथील पध्दत यांची माहिती करून घेतली. आमचा नंबर अकरावा किंवा बारावा असा काहीतरी होता. कोर्ट रूमच्या बाहेर अनेक बाकडे आणि कोच ठेवलेले होते. त्यावर महाराष्ट्रातील विविध राज्यातील खेडवळ लोक वकिलांसोबत बसलेले होते. बाकड्यावर अगोदरच स्थानापन्न असलेल्या मंडळींना विनंती करून आम्ही अडचणीतच त्यावर बसलो.
बसल्यानंतर कोर्टरूमबाहेर नोटीस बोर्डवर लावलेल्या लिस्टचा फोनमध्ये काढलेला फोटो मी पाहू लागलो. आमच्या अगोदर लागोपाठ तीन जिल्हा कलेक्टरचे नंबर होते, आणि आमच्या नंतर काही हाय रँकचे पोलीस अधिकारी होते. मी गंमतीने ती लिस्ट सुधीरला दाखवली आणि चूक झाली. तो तडातडा मोठ्याने बोलायलाच लागला;
"फसवणूक करून लोकांना लुबाडणाऱ्या अधिकाऱ्यांना फटके देत जेलमध्ये टाकले पाहिजे. सरकार यांना पगार कशासाठी देते - लोकांची मदत करायला कि लोकांना लुबाडायला? अशा गरीब लोकांची फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या केसीस घेणाऱ्या निर्लज्ज वकिलांनाही शिक्षा व्हायला हवी. न्यायालय म्हणजे काय, कायदेशीरपणे काळ्याचं गोरं करायचे ठिकाण वाटते कि काय यांना?"
मी त्याला थांबवायचा प्रयत्न करू लागलो, "अरे कोर्ट आहे हे, हळू बोल..." पण गडी ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. मी घाबरून इकडे तिकडे पाहू लागलो. कोर्ट रूमबाहेर रांगेत उभे असलेले पॉश अधिकारी आणि त्यांचे तेव्हडेच पॉश वकील कावरेबावरे होऊन खाली मानेने चोरून त्याच्याकडे पाहत होते. बहुदा जज साहेब आम्हाला आत बोलावून कायमचा बाहेरचा रस्ता दाखवतात कि काय, या चिंतेत मी होतो.
आमच्या बाजूला बसलेल्या एका टापटिप व्यक्तीने "काय आहे साहेब तुमचे प्रकरण?" असे आस्थेने विचारले. मग सुधीरने त्याला आमच्या घराण्याची सर्व हकीकत सांगितली. भ्रष्ट चंदगड सब-रजिस्ट्ररच्या मदतीने कसे बेकायदेशीर - लिगली व्हॉईड दत्तक पत्र बनवले गेले. लिगली व्हॉईड असल्याने ते कोर्टात साक्षी पुरावे न होता कसे रद्द होणे सहज शक्य असूनही, त्याची चंदगड न्यायालयात दखल घेतली जात नाही. आपला वकील फक्त वर्षांनुवर्षें जज साहेबांना वेळ नाही ही एकच टेप सतत कशी ऐकवतो. गरीब शेतकऱ्यांची खोटे दस्त बनवून राजरोस कशी फसवणूक केली जात आहे. नागणवाडी सर्कलने फसवणूक करून, लिगली व्हॉईड दत्तक पत्रानुसार कशी दुसऱ्याची नावे आमच्या जमनीवर चढवण्याचे आदेश काढले...असा सविस्तर वृत्तांत कथन केला.
"त्यानंतर आम्ही गडहिंग्लज प्रांत अधिकारी यांचेकडे अपिल दाखल केली. आमच्याकडे दत्तक पत्र लिगली व्हॉईड आहे, याचे ठोस पुरावे होते. त्यामुळे आम्हाला विश्वास होता कि, आम्हाला तेथे न्याय मिळेल. पण कसचे काय, तेथील प्रांत अधिकाऱ्यांनी आम्हाला "विश्वास पानिपतवर गेला" हा पाठ शिकवला!"
"प्रतिपक्षाने आमचे जाधव कुटुंब आदीवाशी आहे, त्यामुळे अडॉप्शन लॉ आम्हाला लागू होत नाही, असा केलेला दावा सिध्द करणारे पुरावे; आम्ही त्यांच्याकडे सादर केले नाहीत म्हणून आम्हाला जबाबदार धरले! विश्वास ठेवाल याच्यावर? या अधिकाऱ्याची निवड कोणत्या निकषावर झाली आहे, त्याचा रिपोर्ट मिळावा आणि त्यांनी दिलेले जजमेंट जस्टीफाय करावे, असे आव्हान आम्ही प्रत्यक्ष MPSC सिलेक्शन कमिटीला दिले. कसले तोंड उघडते त्यांचे! त्यांनी अळिमिळी गुपचिळी करून टाकली! बरे तुम्ही कशासाठी आलाय?"
"मीही विभागीय अधिकारीच आहे, पण मी कुणाची फसवणूक नाही केलेली. मी या बाजूला बसलेल्या पीडित व्यक्तीला मदत करावी म्हणून आलो आहे." तो काहीसा बावचळुन बोलला.
"सॉरी! अहो, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. मला माहित आहे, चांगले अधिकारीही असतात. सगळेच काही शेण खात नाहीत. पण नीच असतात ते शेण खायचे चुकत नाहीत! त्यांच्या घरचे संस्कारच तसे असतात. प्रामाणिक आई बापाच्या पोटी जन्मलेला कोणताही व्यक्ती दुसऱ्याची धन संपत्तीं लुबाडण्यासाठी गैरप्रकार करणार नाही. संस्कार रक्तातूनच येतात."
त्या तिष्ठत रांगेत उभ्या असलेल्या अधिकाऱ्यांना कोणत्याही सामान्य माणसाने उठून जागा दिली नाही, किंवा आदराने त्यांच्याकडे पाहिले नाही. स्वतःच्या जिल्हयांत ते राजासारखे राहतात - पण येथे त्यांना बोलावले जाते ते संभावित गुन्हेगार म्हणून! या गोष्टीची गंमत वाटली मला.
एकेक जिल्हाधिकारी त्या चिल्ड AC असलेल्या कोर्ट रुममध्ये धास्तावलेल्या अवस्थेत जात होता आणि घामाने चिंब झालेल्या अवस्थेत बाहेर येऊन, खाली मान घालून पोबारा करत होता.
आमचा नंबर आला. आम्ही दोघेही आत गेलो. मी कोर्ट रूम बाहेर नोटीस बोर्ड शेजारी लावलेल्या रंगीत Human Rights Commission च्या सिध्दांताचे काही फोटो मुद्दामच काढून नेले होते. प्रथम ते न्यायाधीशांना वाचून दाखवूंन बोलायला सुरुवात केली. बहुदा त्याचा परिणाम झाला असेल, जजसाहेबांनी मला बोलायला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ दिला. माननीय जस्टीस तातेड यांनी आमचे सर्व 35 मुद्दे आणि पुरावे यांचे क्रमाने अवलोकन केले.
त्यांनी आमची बाजू समजून घेतली. अधिकाऱ्यांनी गैरप्रकार केल्याने आमच्यावर अन्याय झाला आहे, दत्तक पत्र लिगली व्हॉईड आहे, सर्कल आणि प्रांत अधिकारी यांचे निकाल बेकायदेशीर आणि अन्यायकारक आहेत, हे त्यांनी स्पष्टपणे मान्य केले. शिवाय आमच्याकडे आमचा दावा सिध्द करायला more than sufficient मुद्दे-पुरावे आहेत हेही मान्य केले.
पण शेवटी ते जे बोलले. त्याने आम्हाला धक्काच बसला: "तुमची बाजू न्याय आहे, हे सिध्द होत असूनही दुर्दैवाने मी तुमची केस स्विकारू शकत नाही!"
आम्ही दोघेही सुन्न झालो. मी विचारले, "का सर? का शक्य नाही?"
ते बोलले, "त्याचे एकमेव कारण, लीगल प्रोसिजर्स! आपल्या देशातल्या कोणत्याही - लहान असो कि मोठया न्यायालयात अगोदरच दाखल असलेली केस, आम्हाला स्वीकारता येत नाही."
मी बोललो, "येथे परिस्थिती वेगळी आहे सर. आम्ही चंदगड दिवाणी न्यायालयात पूर्वी ज्या केसिस दाखल केल्या आहेत, त्यांचा संदर्भ वेगळा आहे. येथे आम्ही जी केस दाखल केली आहे ती, त्या प्रलंबित केसचा फायदा घेऊन बेकायदेशीर फेरफार केल्याच्या गैरप्रकाराची आहे. हा वेगळा गुन्हा आहे. त्यामुळे ही केस वेगळी बनते. एकाच प्रकाराशी दोन वेगवेगळ्या वेळी, दोन वेगवेगळे गुन्हे घडले तर, तर दोन वेगवेगळ्या केसीस बनू शकतात सर. आम्ही येथे दाखल केलेल्या केसमध्ये प्रांत अधिकारी आरोपी आहेत. त्या जुन्या केसीस मधून त्यांचा कुठेच उल्लेख नाही. त्या केसीस दाखल केल्यानंतर एक वर्षां नंतरचा हा प्रकार आहे. शिवाय आपल्यासारखे एखादे वरिष्ठ कोर्ट जर प्रलंबित केसवर हस्तक्षेप करू शकत नाही, मग प्रांत अधिकाऱ्यांना तो अधिकार कसा आहे?"
"त्यांनी गैरप्रकार केला आहे, म्हणून मीही तसेच करावे असे नसते. मला तुमच्या बद्दल पूर्ण सहानुभूती आहे, पण मी तुम्हाला काहीच मदत करू शकणार नाही."
"असे कसे असू शकते सर? हे आपल्या राज्यातले सर्वोच्च कोर्ट आहे. येथे न्याय भेटत नसेल तर लोकांनी जायचे कुठे? चंदगड कोर्ट मध्ये केवळ न्यायाधीशांना वेळ नाही म्हणून आम्हाला न्याय मिळत नाही, असे आमचे वकील आम्हाला सांगतात! मग लोकांना न्याय मिळणार कसा? लोकांच्या आशेचे न्यायालय हेच शेवटचे ठिकाण आहे. आमची अवस्था आई जेवू घालीना आणि बाप भिक मागू देईना, अशी झाली आहे सर."
"सर, दुर्दैवाने आमच्या चंदगड तालुक्यात आणि कोल्हापूर जिल्ह्यात असे ईरसाल अधिकारी पाठवले जातात की, जे गरीब शेतकऱ्यांची नेसती लंगोटही चोरून घेतील. चंदगड रजिस्टार ऑफिसमध्ये शेतजमिनी हडपण्यासाठी राजरोसपणे चक्क खोटे दस्त बनवले जातात! या बेकायदेशीर दत्तक पत्राशिवाय माझ्या आईच्या वडीलांचे त्यांच्या मृत्युनंतर वीस वर्षांनी खोटे वाटणीपत्र बनवणात आले, माझे आजोबा गुंडू जाधव वारल्याची नोंद आणि त्यानुसार वाटणी झाल्याचा उल्लेख तलाठयांनी माझ्या आजोबांच्या मृत्यूपूर्वी तीन वर्षें अगोदरच दस्त बनवून करून ठेवला होता, असे दस्त बनवण्यात आले आहे! 1953 मध्ये हे दस्त बनवून ठेवल्याचा उल्लेख आहे, पण त्यांचा मृत्यू झाला होता सप्टेंबर 1955 मध्ये! शिवाय त्यावर महाराष्ट्र राज्याचा शिक्का आहे! महाराष्ट्र राज्याची निर्मितीच झाली आहे १ मे १९६० ला! त्यावेळी महाराष्ट्रचे नाव मुंबई प्रांत होते आणि चंदगड तालुका कर्नाटक मध्ये होता. तो कोल्हापूर जिल्ह्याचाही भाग नव्हता, तरीही कोल्हापूर संस्थानाचे 'दत्तक कोण घेऊ शकेल' या निबंधानुसार बनवलेले दत्तक पत्र ग्राह्य धरणारे हुशार अधिकारीही आमच्याच जिल्हयाच्या नशिबी आहेत! लोकांना न्याय कसा मिळणार सर? वरूनपासून खालपर्यंतच्या सर्व अधिकाऱ्यांना हे गैरप्रकार माहित आहेत, पण कोणी दखल घेत नाही. अप्पर कलेक्टरना तर आम्ही याची पुराव्यासह वारंवार माहिती दिली आहे. पण त्यांच्यासाठी हे सर्व दखल न देण्यासारखे सामान्य प्रकार असावेत, असे वाटते. सर, येथे केस दाखल करायचा काहीतरी पर्याय असेलच. Please त्यानुसार उपाय सुचवा."
"महाशय, मी येथे जज आहे, मला उपाय सुचवता येत नाही, किंवा तुम्ही काय करावे हे सांगता येत नाही. तुम्ही स्वतःच ते ठरवावे लागेल. तुम्हाला विश्वास वाटत नाही ना. थांबा..." असे म्हणत त्यांनी आपल्या सहाय्यकाकडून कसले तरी कायद्याचे पुस्तक मागून घेतले आणि त्यातली आमची केस दाखल करायला त्यांना काय अडचण आहे, ती प्रोसेस आम्हाला वाचून दाखवली.
शेवटी ते म्हणाले "तुमच्या बद्दल मला सहानुभूती आहे. तुमच्याकडे मागेच म्हटल्याप्रमाणे more than sufficient पुरावे असल्याने तुमची केस निकाली यायला काहीच अडचण दिसत नाही. तुमच्या वकीलांशी बोला, तुम्हाला न्याय मिळेल. शिवाय वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याकडे अपिलही करा. पण एक गोष्ट लक्षांत ठेवा, तुम्ही प्रयत्न थांबवले तर कालांतराने तुमच्या प्रतिपक्षाची खोटी बाजूही खरी समजली जाईल. त्यामुळे थांबू नका."
खूप हताश होऊन "थँक यू सर!" म्हणत आम्ही बाहेर पडलो.
न बोलता चालत चालत आम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस च्या बाकड्यावर बसलो. "पुढे काय?" या प्रश्नाचे उत्तर आम्हां दोघांकडेही नव्हते. त्यामुळे उदास हळू उगाचच इकडच्या तिकडच्या गप्पा सुरु केल्या. पण आमचे दोघांचेही त्यात लक्षं नव्हते.
नंतर मी मुद्द्याला सुरुवात केली, "मला आता माहित नाही कसे. पण या अधिकाऱ्यांना मी एक दिवस भांगडा करायला लावीनच लावीन! आता वकिल नाही द्यायचा, आपणच उभे राहायचे - अगदी सुप्रीम कोर्टात सुद्धा! भारतातला सर्वश्रेष्ठ वकिल जरी समोर आला तरी आपणच केस लढवायची. आपल्या सारखी आपली केस जगातला कोणताच दुसरा वकिल रिप्रेझेन्ट करू शकणार नाही. ठरलं तर, आता दुसऱ्यांवर विसंबून राहायचे नाही. मी वेळ मिळेल तसा लॉ चा अभ्यास करतो. पाहू कायद्यात असे काय आहे, जे सामान्य माणसाला समजत नाही!"
मी सुधीरला समजावत होतो कि मला स्वतःलाच, हे समजलं नाही, पण त्यामुळे त्याचा हिरमुसलेला चेहरा उजळला आणि तो झटक्यात बोलला - "तू करू शकतोस. इतर वकिलांना जे शक्य नाही, तेही तू शक्य करू शकतोस. मला विश्वास आहे. असेच करूया. एक रस्ता बंद झाला म्हणून सर्व आशा संपत नाही. असे अनेक रस्ते असतील - जे आज आम्हाला माहित नाहीत. प्रत्येक गोष्टीला पर्याय असतात. हाय कोर्ट मध्ये न्याय मिळत नसेल तर आपण सुप्रीम कोर्ट पर्यन्त जाऊ. आजचे तुझे जज साहेबांच्या समोरचे बोलणे एकूण मला विश्वास वाटतो आहे - उशिरा का होईना आपण जिंकणार. तू जशी केस प्रेझेंट केलास, तशी कोणताच वकिल करू शकणार नाही. इथे नकार मिळाला म्हणून काय झाले. आपली गावाकडची केस हाय कोर्ट मध्ये घेऊ आणि इथे आपण दोघे केस लढवूं."
त्याच्या बोलण्याने मलाही हुरूप आला आणि आमची निराशा कुठच्या कुठे पळाली. नंतर केस जिंकल्याच्या अविर्भावात आम्ही चहा नास्ता केला आणि मस्त गप्पा मारत कॉफर्ड मार्केट मध्ये फेरफटका मारत डेकोरेशनच्या साधनांची खरेदी केली.
खूप संध्याकाळी एकमेकांचा निरोप घेऊन खूप आनंदाने आम्ही माघारी फिरलो.
एक वेगळीच आशा आणि ऊर्जा घेऊन.....
धन्यवाद!
============================================================
ढेरे गल्ली सहर्ष सादर करत आहे -
नाटकः डाकू लाखन (भाग आठ)
***********************
सोबत जोडलेला मेसेज प्रल्हाद गावडे यांनी ग्रामविचारमंच या व्हाट्स अँप ग्रुप वर माझ्याविषयी टाकलेला आहे. त्याविषयीचे उत्तर मी येथे देत आहे. काही वर्षांपासून आमच्याच जमिनी लुबाडून, आम्ही त्यांच्याच जमिनी लुबाडल्या आहेत, असे गैरसमज त्यांनी गावात आणि गावागावांत गोबेल्स तंत्र वापरून पसरवून दिले आहेत. त्यामुळे सत्य परिस्थिती गावासमोर स्पष्ट करणे आम्हाला आवश्यक झाले आहे. त्यामुळे रामपूर वासियांना विनाकारण होणाऱ्या त्रासाबद्दल आम्ही सर्वांची माफी मागतो. धन्यवाद! - गुंडू जाधव.
***********************
नाटक चालू करण्यापूर्वी याची थोडी प्रस्तावना आणि पार्श्वभूमी समजून घेऊ.
माननीय इंजिनिअर साहेब यांनी परवा "ग्रामविचारमंच" या व्हाट्स अँप ग्रुप वर माझ्याविषयी टाकलेला खालील मेसेज आहे.
"जर हा अति बुद्धिमान व्यक्ती मांडे येथे अनिवासी मुलीच्या (शांताबाई) हिस्स्यासाठी वैयक्तिकरित्या केस लढत असेल तर!!!!
मी पण त्याला सविता गावडे (सुधाताई) या निवासी मुलीच्या हिस्स्याच्या केसला प्रतिनिधी म्हणून नियुक्ती देऊ इच्छितो 😆.
ही हरिशचंद्राची अवलाद दोन मुलींची केस कशी लढतो ते मला पहायचे आहे."
- इति प्रल्हाद गावडे.
***********************
माननीय इंजिनिअर साहेब,
ज्याची फसगत झालेली आहे तो आणि ज्याने फसवणूक केली आहे तो, या दोन परस्पर विरोधी प्रवृत्ती आहेत! तुम्हाला दिसतात तशा, त्या एकच नसतात. राहुद्या, तुम्हाला त्यातला फरक नाही समजणार. फसवणूक लुबाडणुक करणं ही हुशारी आहे, याचे बाळकडू ज्याला मिळाले आहेत, त्याला मी बालबुद्धी काय समजावू शकणार आहे? असो.
बरे, तुम्ही म्हणता आहात तशी सविता बाईंची केस मी घेतली, तर न्यायालयात ती केस कशी सादर करता येईल तेही थोडं सांगा बरं.
उदाहरणार्थ, मी असे बोलावे का? :=
"न्यायाधीश महोदय, सविता बाईंवर खूप अन्याय झालेला आहे. बिचारी ती एकत्र जाधव कुटुंबाच्या जीवावर लहानपणांपासून खूप सुखाने, आनंदाने जीवन जगत होती. सकाळी उठल्यानंतर एखादी काकू तिला तोंड धुवायला माडीवरच पाणी नेऊन द्यायची. तिचे अंथरून पांघरून आवरायची. नंतर माडीवरच चहा नेऊन द्यायची. सोबत दुसऱ्यांना लपवून केवळ तिच्यासाठी राखीव ठेवलेले बटर बिस्किट असायचे. दुपारी पुन्हा काकू तिला जेवण नेऊन द्यायची. परत खरकटे ताट घेऊन यायची.
आयुष्यात तिने कधी घराबाहेर पाय ठेवला नाही. शेती कुठे आहे, ती कशी उगवते, कशी वाढत जाते, बांध कसे सरपटत जातात, भुईमुगाची झाडे आणि भात पिकांची बेटे कशी आपोआप जमिनीतून उगवतात आणि त्यावर फळे लगडतात, हेही तिला माहीत नव्हते. अशा निष्पाप व्यक्तीने घरी बसून काही कागदांवर आपल्या मुलांची नावे लिहिली, म्हणून या जाधवाच्या कारट्यांनी एवढा आरडाओरडा का करावा? वेगळ्या नजरेने पाहिले तर, ही एक अद्भुत कला आहे याची जाणिव आपल्याला होते. खूप शिकलेल्या भल्याभल्यांना या अबला स्त्रिने केवळ पेनाच्या साहाय्याने पाणी पाजलं, ही सामान्य बाब नाही. याविरुद्ध विकडातांडव करून प्रतिपक्ष एका अबला नारीचे खच्चीकरण करत आहे, हा दखलपात्र गुन्हा आहे मीलॉर्ड!
तिला सुखी ठेवायला आईशिवाय एक काकूही नेहमी तिच्या किमतीला असायची. तिच्या बाबाने, तिच्या आईला, तिची मनोभावे सेवा करणे, हे ऐकमेव काम नेमून दिले होते. बाबा राजकारणाच्या कामानिमित्त कधी चंदगड, कधी बेळगांव, अधीमधी ग्रामपंचायतीचे ऑफिस, यातच व्यस्त असायचा. नवरा बुलेट घेऊन सकाळी कामानिमित्त बाहेर जायचा, ते रात्री जेवण वक्ताला परतायचा. तिचे आणि तिच्या गोंडस मुलांचे आयुष्य सुखात जावे म्हणून आई, बाप, नवरा यांनी घेतलेले आपार कष्ट न्यायाधीश महाराजांनी विचारात घ्यावे. तिचे हे सुख निरंतर राहावे म्हणून तिच्या नवऱ्या-मुलांनी थोडी चालाखी करून, दुसऱ्याच्या काही जमिनी तिच्या नावे करून दिल्या म्हणून बिघडलं कुठे? समाजाला आणि भाऊबंदांना तिचे हे सुख पाहवत नाही, हे सनातन दुखणे आहे महाराज! त्यामुळेच सविता बाईंना ऐनकेन प्रकारे छळले आणि लुबाडले जाते आहे.
तिला सुखी ठेवण्यासाठी नवऱ्याने काय काय नाही केले? तात्याला तुझ्या नावाने बेळगावला मोठा प्लॅट बुक करुया, असे सांगून त्याच्या जमिनी बुक केल्या. आपल्या 28 वर्षांच्या प्रौढ मुलाला "अज्ञानी बालक" ठरवण्यासाठी दुय्यम निबंधक साहेबाला खुष करणे सोपे का होते? नंदकुमार तुर्केवाडकर आणि संजय गावडे अशा शिक्षकांना शेतकऱ्याची बंडी मुंडासे घालून अस्सल शेतकरी बनवणेही सोपे नव्हते. कै गोविंद जाधव यांचा भाऊ दहा दिवसांपूर्वी त्याच घरी वारलेला असतानाही, सख्खा मामा असूनही असिम दुःखं पोटात ठेवून, 15 मे 2015 रोजी घनश्यामने मोठ्या समारंभ करून - पैपाहुणे, शेजारी-पाजारी, गावातले प्रतिष्ठित - सरपंच, उपसरपंच, सदस्य, तलाठी साहेब, ग्रामसेवक साहेब, सोसायटी दुध डेअरीचे पदाधिकारी, शिवाय गावातील इतर प्रतिष्ठित, नंदकुमार-संजय या जोडगोळीसारखे इष्टमित्र, यांनी घरी "सुतक" असतानाही यतेच्छ मिष्ठाणं ग्रहण करून, अज्ञानी बालकाला आर्शिवाद दिले. नंदकुमार-संजय, गावचे सरपंच, सदस्य, गल्लीतले प्रतिष्ठित, यांना विचारून तुम्ही, त्यांनी दत्तक विधानाच्या विधिवत कार्यक्रमात कोणत्या प्रकारचे मिष्ठांन्न खाल्ले याची खात्री करू शकता. असे अनेकानेक प्रतिष्ठित साक्षिदार असतानाही भाऊबंदनी, कार्यक्रम झालाच नाही अशी वावडी उठवली आहे.
सविताबाईनी या सभारंभाला भाऊंबंदाना बोलावलं नाही साहेब. त्यामागे कारण आहे. गोविंद जाधवांची जमिन हातची जाते हे पाहून त्यांना पिडा होत होती. त्यामुळे त्यांनी हा दत्तक कार्यक्रम झालाच नाही, अशी खोटी आवई उठवायला सुरुवात केली. भाऊंबंदानी पार्ट्या देऊन काही धूर्त लोकांना आपल्या बाजूला करून खोटी माहिती पसरवायला सुरुवात केली आहे.
कार्यक्रमात गोविंद जाधवांनी दिमाखदार भरगच्च केशरी कोल्हापूरी फेटा बांधला होता, भारी कपडे अंगात घातले होते. त्या दिवशी ते किती आनंदी होते म्हणून सांगू - अज्ञानी दत्तक बालकाला त्यांनी स्वतःच्या हातात जोजावत गल्लीभर बसलेल्या पंततीतून फिरून त्यांनी निमंत्रकांना आग्रहाने वाढायला लावले. त्यांच्या आयुष्यातील तो सर्वांत सुखाचा दिवस होता. पोटाला मुलबाळं नव्हते, पण आज ते खऱ्या अर्थांने "तात्याचे बाबा" झाले होते.
पण विघ्नसंतोषी भाऊबंदांना हे सुख पाहावलं नाही. या कार्यक्रमाचा पुरावा असावा म्हणून, आणि एक अलौकिक घटनेची आठवण राहावी म्हणून, घनशाम गावडेनी खास बेळगावहून व्हिडीओ शुटिंगवाला बोलावला होता, शिवाय पैपाहुण्यानीही ही अलौकिक घटना स्वतःच्या फोन मध्ये चित्रित केली होती. पण भाऊबंदांचा दुष्टपणा पाहा महाराज, या सर्व चित्रफिती, हजारो फोटो त्यांनी नष्ट करून टाकले! पण एक गोष्ट ते नष्ट करू शकणार नाहीत - कै गोविंद जाधवांच्या आत्म्याचा आवाज! ज्यावेळी सर्व प्रर्याय संपतील, त्यावेळी तो आवाज दिवसरात्र सर्वत्र घुमत राहील. घराच्या कानाकोपऱ्यांतून, भिंतीच्या फटी भेदून,तो गैरप्रकार करणाऱ्यांच्या छाताडावर थयथया नाचेल. सत्य आत्म्या सारखेच अमर असते महाराज - ते मरून नष्ट होत नाही, जाळून राख होत नाही, आणि लपवून अज्ञात राहात नाही. योग्य वेळी, योग्य स्थळी, ते अचूक अपसूक प्रकट होते. त्याचे वर्म भेदणारा अजूनही जन्माला नाही आलेला. या वर्मालाच भगवान श्रीकृष्ण भगवत गीतेत कर्म म्हणतात. तुम्ही शेतात विषारी बी पेरले तर, त्यातून मधूर फळे पिकत नाहीत - हे शेतकऱ्याइतकं दुसऱ्या कुणालाच नाही कळत.
दुर्दैवाने कथेतल्या राज्य कन्येसारख्या सुखात वाढलेल्या सविताच्या सुखावर पहिला आघात केला तो तिच्या बापाने! त्याना मुलगा हवा होता - आपल्या संपत्तीला वारस हवा होता, म्हणून त्यांनी उतार वयात दुसरे लग्नं केले! बापाला म्हातारचळ लागला तर मुलीने ते कसे सहन करावे? त्यामुळे झाली असेल नख लावायची थोडी चूक. एवढ्या छोट्याशा चुकीची तिच्या दुसऱ्या आईने धिंडोरा पिटायची गरज होती का? या व्यतिरिक्तही काय काय आरोप लावले तिने - बुट्टीत मुत भरून डोक्यावर वावायचे आरोप काय, जेवणात अंगारे धुपारे टाकायचे आरोप काय. वीस वर्षे घर सोडून तिला बहिणीच्या घरी राहायला थोडेच तिने सांगितले होते? न्यायाधीश महाराज तुम्हीच विचार करा - फुकटची घरांत राबायला मोलकरीन आणि शेतात राबायला कामकरीन सोडून, तिला कुणी घराबाहेर काढेल का? याच्यात काही कॉमन सेन्स, लॉजिक आहे का सर?
बरं, मुलाचे नाव निकाला अगोदर 7/12 वर लावले, असा आरोप तिच्यावर लावला जातो आहे. एवढा मोठा प्रांत अधिकारी - तो जाधव कुटुंब आदिवाशी आहे, 28 वर्षांचा प्रौढ अज्ञानी बालक असतो, ॲडॉप्शन लॉ चे कायदे काही खास लोकांसाठी शिथील आहेत, दावा कोर्टात प्रलंबित आहे म्हणजे तो वादीविरुद्ध गेला आहे, हे सिद्ध झाल्याशिवाय निकाल द्यायला; प्रांत अधिकारी या हरिच्छंद्रा सारखा मूर्ख-मठ्ठ आहे का?
त्या बिचाऱ्या दुय्यम निबंधकावरही आरोप होतो आहे. तो अधिकारी झाला म्हणून त्याने आपल्या बायका मुलांचे सुख पाहूच नये का? स्वतःच्या मुलांचे सुख पाहण्यासाठी एखादे कर्म करणे कायद्याने गुन्हा कसा होऊ शकतो साहेब? तुम्हीच सांगा - तुम्हांलाही बायकांमुले आहेत ना? त्यादृष्टीने विचार करा!
रामपूरच्या तलाठयांवर आणि नागनवाडीच्या सर्कलवरही आरोप केले जातात साहेब. तेही तुमच्या आमच्या सारखेच कायद्याआधी आणि कर्तव्याआधी, कर्माने बांधलेले आहेत.
सुख मिळवण्यासाठी नख लावणं हे काही पाप नाही. प्रत्येक प्राणिमात्राचा तो ईश्वर निर्मित गुणधर्म आहे. जे ईश्वर निर्मित असेल ते विष्णू पुराणांनुसार पाप ठरत नाही, याची दखल घ्यावी.
ही हतभागी स्त्री किती दुर्भागी आहे पाहा. तिच्या बहिणींनीही तिच्यावर गलिच्छ आरोप केले आहेत. तिने आणि तिच्या नवऱ्याने वर्षांनुवर्षांच्या मेहनतीने सांभाळून ठेवलेली जमिन, त्यांना फुकाफुकी हवी आहे! दुर्दैव पाहा, हिला आपल्या मढयावरही घेऊ नये, असे त्यांनी आपल्या मुलांना सांगून ठेवले होते! ढोरलगरवाडीच्या मुलांनी तर तिला मढ्यावरून भांडून चक्क हकलले! मोठया बहिणींवर आईसारखी माया लावलेल्या या छोट्या बहिणीची त्या प्रसंगाने काय अवस्था झाली असेल, याची कल्पना करून पाहा. फक्त त्यांच्या हिश्शाची जमिन बळकावली या क्षुल्लक गोष्टीपायी, त्यांनी नातेगोते विसरून, तिला सार्वजनिक ठिकाणी एवढे अपमानित करायची गरज होती का? समाजाचे काय दुर्दैव आहे पाहा साहेब, जमिन आज रक्ताच्या नात्यापेक्षा मोलाची ठरवण्यात आली आहे!
न्यायाधीश महाराज, कसल्यातरी लाभाच्या अपेक्षेने संपूर्ण रामपूर गाव, जाधव कुटुंब 1985-86 साली विभक्त झाले आहे, अशी खोटी साक्ष देत आहे. सविता बाईंचा नवरा-मुलगे म्हणतात तसे, जाधव कुटुंब सप्टेंबर 1955 सालीच वेगळे झालेले आहे, याची दखल घेण्यात यावी. तत्कालीन तलाठ्यांनी नोंदलेले हे "हक्काचे पत्रक" पाहा. त्यात जाधव कुटुंब सप्टेंबर 1955 सालीच वेगळे झालेचे स्पष्ट नोंदवण्यात आले आहे. "ध" चा "मा" करतात तसे, जाधवांच्या काही ईरसाल कार्ट्यांनी 1955 चे 1953 करून हे दस्त खोटे आहे, असे भासवायचा प्रयत्न चालवला आहे. पण न्यायाधीश महाराज आपण जाणताच, "ध" चा "मा" करता येतो याचा इतिहासात पुरावा आहे. पेशव्यांना "धरावे" तिथे पेशव्यांना "मारावे" असा आनंदी बाईंनी "ध" चा "मा" केला! त्यावरून हे सिद्ध होते की, 1955 चे 1953 करता येते, बापाला मामा, आणि आजोबाला बाप करता येतो, यालाही इतिहासाचा आधार आहे. त्यामुळे केवळ कायद्यामध्ये रक्त नात्यातील दत्तक निषेध आहे, म्हणून ते रद्द केलं जाऊ नये. त्यामागे सविता बाईंनी केलेले अपार कष्ट, धडपड, बौद्धिक कसरत, लक्षांत घेऊन काही चुका क्षम्य ठरवाव्यात. आपल्या नवऱ्याचे, मुलांचे, नातवंडांचे, पतवंडांचे आयुष्य सुखाने जावे, या उदात्त हेतूने तिने इतरांच्या जमिनीवर हस्तक्षेप केलेला आहे, या कृती मागची सदभावना समजून घ्यावी.
आता भाऊबंद! भाऊबंद तर तुम्ही जाणतच! रामायणात कैकयी आणि महाभारतात शकुनी! - म्हणजेच भाऊबंद! म्हणून त्यांचे साहित्यीक मूल्य काही कमी होत नाही! त्यांचा संपत्तीवरचा आणि मालमत्तेवरचा रचनात्मक ताबा नाकारल्यानंतर त्या बिचाऱ्यांनी करावे तरी काय?
भाऊबंद बिचाऱ्या सविताच्या आश्राप, मृदूभाषी, मितभाषी, सदाचारी, गणाचारी, साध्या लाघवी पतीदेवावर अनेकानेक खोटी बालंटे लावताहेत. त्यांची अर्धी जमिन घेतली म्हणून काय झाले? राहिलेल्या अर्ध्या जमिनीवर जगणार नाहीत का ते अनपढ निर्बुद्ध सुंभ? लहानपणां पासून स्वतःचे गावघर सोडून मामाच्या घरी राहणाऱ्या गरीब बिचाऱ्या भाच्याने मामांच्या थोड्या जमिनीवर हक्क दाखवला तर बिघडलं कुठे? त्याने कधीच सख्खा मामा, सख्खा चुलत मामा, चुलत चुलत मामा, असा भेदभाव केला नाही - सर्वांनाच समान अक्षदा लावल्या! स्वतःच्या सख्ख्या मामाला तर थोडया जास्तच! या निरपेक्ष वृत्तीचे कौतुक राहीले दुर - आरोपांचे भडीमार झाले. आता बोला! - भल्याचा जमाना राहीला नाही.
गावच्या दुधडेअरीत सर्व गावचे दोन वर्षांचे पैसे खाल्ले म्हणे! गावाला त्याचे काही सोयरसुतक नाही, मग यांना त्रास का? यातून भाऊबंदांची विघ्नसंतोषी मनोवृत्ती सिध्द होते.
तिसरा आरोप आहे - तीस हजाराच्या कर्जाचे तीन लाख केले! महाराज पाहा, इतर बाप पाहा - लाखाचे बारा हजार केले तर मुलांवर रागावतात. इथे हजाराचे लाख केले याचे कौतुक होणे गरजेचे होते - पण झाले उलटेच! यातून भाऊबंदांचा दृष्टभाव दिसून येतो.
चौथा आरोप आहे - जाधव कुटुंब वेगळे झाल्यानंतर चार पाच वर्षांनी त्यांची नदीकाठची दोन एकर जमिन विकली. ऐंशीतून दोन वजा झाले तर फारसा फरक पडणार आहे का साहेब?
पाचवा आरोप आहे - शेकडो जुनी पुरानी झाडे विकली. लाईटबील भरले नाही जाधव भाऊबंदांनी - घरांत पुन्हा दिवा पेटावा या सद्भावनेतून झाडे विकली. सद्हेतू लक्षांत घ्यावा!
सहावा आरोप - तीन घरे खोटे दस्त बनवून स्वतःच्या नावे करून घेतली असा आहे. आता साहेब तुम्हीच पाहा आणि तर्क करा. डोळे झाकून समोर आलेल्या कागदांवर सही आंगठा लावणारे सहा द्रष्ठे मामा पाठीशी असताना, भाच्याला खोटे दस्त बनवायची गरजच काय? त्यामुळे ती तीन घरे मामांनीच स्व:खुशीने सद्भावनेने भाच्याला भेट दिली असल्याची शक्यता आहे. शक्यता नाही, हे असेच झाले आहे! आता मामांच्या मुलांना त्या जमिनींची हाव सुटली आहे, हेच यातून सिध्द होते आणि आरोप निराधार सिद्ध होतात.
सातवा आरोप - मोटर, मिटर परस्पर स्वतःच्या एकट्याच्या नावे करून घेतल्याचा! ही गोष्ट खूप क्षुल्लक, अगदी क्षुल्लक आहे! एवढया मोठ्या माणसांवर तो छोट्या ठिपक्यां एवढाही दिसत नाही, त्यामुळे तो दुर्लक्षित करण्यात यावा .
आणखी काही आरोप आहेत - पण ते खूप क्षुल्लक असल्याने न्यायालयीन कामकाजातून वगळण्यात यावेत, अशी नम्र विनंती मी न्यायालयाला करत आहे.
आम्ही न्यायाधीश महाराज्यांना सांगू इच्छितो कि, " जावई माझा लाडका आणि भाऊ माझा दोडका" या कायद्यातील कलम नंबर 420 नुसार, भारतातील कोणतीच अपंग व्यक्ती, खरेदी केलेल्या मालमत्तेवर हिस्याचा दावा करू शकत नाही. त्यामुळे कै मारुती जाधव यांच्या जमिनीवर केवळ सविताचाच रचनात्मक ताबा आहे.
शेवटी न्यायालयाच्या चरणी निवेदन आहे;
आपले आसगावचे स्वतःचे घरदार, नातीगोती (जमिन मालमत्ता सोडून असे वाचण्यात यावे) यांचा त्याग करून रामपूरला, मामांच्या सेवेत आलेल्या परोपकारी भाच्यांवर जे अनेकानेक गलिच्छ लांच्छण लावले गेले आहेत, ते धूवून न्यायालयांने त्यांचे चारित्र्य शुभ्र धवल करावे, अशी नम्र विनंती करून मी माझे छोटे निवेदन संपवतो!
टाळ्या!!!
============================================================
ढेरे गल्ली सहर्ष सादर करत आहे -
नाटकः डाकू लाखन (भाग नऊ)
***********************
सोबत जोडलेला मेसेज प्रल्हाद गावडे यांनी ग्रामविचारमंच या व्हाट्स अँप ग्रुप वर माझ्याविषयी टाकलेला आहे. त्याविषयीचे उत्तर मी येथे देत आहे. काही वर्षांपासून आमच्याच जमिनी लुबाडून, आम्ही त्यांच्याच जमिनी लुबाडल्या आहेत, असे गैरसमज त्यांनी गावात आणि गावागावांत गोबेल्स तंत्र वापरून पसरवून दिले आहेत. त्यामुळे सत्य परिस्थिती गावासमोर स्पष्ट करणे आम्हाला आवश्यक झाले आहे. त्यामुळे रामपूर वासियांना विनाकारण होणाऱ्या त्रासाबद्दल आम्ही सर्वांची माफी मागतो. धन्यवाद! - गुंडू जाधव.
***********************
त्यांनी विचारले आहे, "सविताच्या हिस्साची टक्केवारी आजपर्यंत हरिचंद्राने सांगितलेली नाही. टक्केवारीचे महत्त्व (probability of percentage) काय असू शकते, हे फक्त अभियंतालाच (इंजिनियरलाच) कळू शकते."
इंजिनिअर लोक तुम्ही-आम्ही शाळेत शिकलो ते अंकगणित ग्राह्य धरत नसल्याने, आणि अभियांत्रिकी गणित आम्हाला ज्ञात नसल्याने आम्ही ते गणित घेऊन श्री संजय ढेरे गुरुजींना भेटलो, असा नाटकाचा प्लॉट आहे.
चेतावणी: हे काल्पनिक नाटक आहे, कुणाला त्यात वैयक्तिक मजकूर आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा.
***********************
यापूर्वी पत्रावळीचा संबंध फक्त जेवणाशी आणि पळसाच्या / पनसोडीच्या पानाशी असतो एवढेच आम्हाला माहीत होते!
शिवाय, वडिलांच्या मालमत्तेवर फक्त पत्नी-सह केवळ, मुला-मुलांचीच हक्क असतो, असे आम्ही अज्ञानी लोक आतापर्यंत ऐकून होतो. मुलीबरोबर मुलीच्या मुलांचाही हक्क असतो हे नविनच विज्ञान आहे, हे मान्य! अभियांत्रिकी विज्ञानानुसार याला कोणता कायदा म्हणतात?
ही कायदेशीर नातू संकल्पना "जावई माझा लाडका आणि भाऊ माझा दोडका" या कायद्याअंतर्गत आहे का?
ज्याच्या घरात मी राहतो, त्यांची मालमत्ता कायदेशीरपणे माझी होते, असे उघड सार्वजनिक ठिकाणी बोलत जाऊ नको बाबा. नाहीतर, कुणाच्या घरी गेलास तर लोक कुत्रे सोडतील अंगावर! कुत्र्यांना कायदेशीर भाषा येत नाही. नको नको तिथे सूया टोचून घ्याव्या लागतील.
बरे, हे दुसरे दत्तक विधान कधी झाले? शिवाय कुमार प्रल्हाद गंगाजी जाधव यांच्या दत्तक विधी कार्यक्रमात कुणी कुणी पंचपक्वाने खाल्ली? नंदकुमार तुर्केवाडकर आणि संजय गावडे शिवाय कुणी आर्शिवाद दिले ते समजेल का? असो. नाटक चालू करू.
***********************
प्रसंग पहिला:
डाकू लाखन आणि माखन दरोड्यात मोठी लुट मिळवून आपल्या गुहेत आले. सर्वांनी आपापल्या पोतडीतील लुट सरदारांसमोर उपडी केली. आता वाटणी करायची होती.
सरदार लाखन बोलले, "मी योजना आखली म्हणून अर्धी लुट माझी, माझा मुलगा म्हणून अर्धी लुट माखनची,आणि राहिलेली बाकी तुम्हां सर्व विसजणांची! सरदार खूष हुआ!"
बाकी विसजण बिचारे अडाणी होते, त्यांना हे अभियांत्रिकितले गणित काही उमगले नाही. पण सरदार बोलतो आहे, म्हणजे हिस्सेवारी बरोबरच झालेली असणार, हे उमगून नेहमी सारखेच जोषात ओरडले - "जी सरदार!"
डाकूनी वेष पालटून थिएटरमध्ये घुसून रंविद्र महाजनींचा गाजलेला "देवता " चित्रपट पाहीला होता. त्यामुळे इंजनिअरही डाकू असू शकतो, हे त्यांना माहीत होतं. आणि इंजिनिअरचं गणित चुकेल, असं अडाणी डाकूंना तरी कसं वाटणार?
त्या चित्रपटातले "ढोलकीच्या तालावर, घुंगराच्या बोलावर..." या गाण्या बरोबरच आणखी एक गाणे, त्यांना बेहद आवडले होते.
"खेळ कुणाला दैवाचा कळला,
मी असो, तू असो, हा असो, कि इंजिनिअर असो,
दैवलेख ना कधी कुणा टळला
खेळ कुणाला दैवाचा कळला..."
***********************
प्रसंग दुसरा:
इंजिनिअर दोन लाखांच्या तात्यासाठी घेतलेल्या बुलेटवरून रुबाबात रामपूर गावी आला. त्याला समजलं, रामपूर गावातील शंकरापासून डुब्याच्या वडाच्या झाडापर्यंत पुण्यासारखाच झकपक डांबरी रोड बनवला गेला आहे. गावाने असे सुधारणे, शिकणे, सुशिक्षित होणे, जाणकार होणे, त्याच्यासाठी नवलाईचे होते. चहा न घेताच, लगबगीने दोन लाखांच्या बुलेटला किक देत तो सुसाट डोंगराच्या डांबरी रस्त्याला लागला. थेट जाधवाच्या लंबराच्या टोकाला जाऊन, त्याने बुलेट रोखली.
आता तो विचार करू लागला, अभियांत्रिकीच्या कोणत्या कोष्टकात बसवून या रस्त्याचे गणित आपल्याला अनुकूल होईल? रस्त्याला लागून राजूमामाचा हिस्सा त्याचे अभियांत्रिकीचे गणित बिघडवत होता...
अनेकानेक अभियांत्रिकीचे प्रमेय अजमावून झाल्यावर त्याने बुलेट फिरवली आणि सुसाट माघारी निघाला. वाटेत त्याने काही तरी पाहिले आणि बुलेटला गचकन ब्रेक लागले. शर्थीचा म्हातारा बैल कण्हावा तशी बुलेट कुरकुरली.
गावडे मामा शेताच्या बांधावर असलेल्या एका झाडाच्या बुंध्याला फावडीने माती चढवत होता. इंजिनीअर तावातावाने त्याच्याकडे जाऊन बोलला, " शेतकरी मामा, तुम्ही हे काय करता आहात? केवळ सुकी माती देऊन तुमच्या या झाडाला चांगले पेरू येणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला 20:3:13 या गुणोत्तराने अमोनियम फॉस्फेट सल्फेट द्यावे लागेल. तुम्ही चुक करताय!"
शेतकरी मामा थंडपणे बोलले, "नाही साहेब, तुमचे गुणोत्तर मला नाही कळले; तर झाडाला कसं कळायचे?"
"अहो त्यात अवघड काही नाही. तुम्ही ही बुंध्याला टाकलेली माती आधी संपूर्णपणे बाहेर काढा. आणि नंतर त्या बुंध्याला मी सांगितलेल्या गुणोत्तराने रासायनिक खत टाका आणि वरून माती झाकून घ्या. बघा तुमच्या झाडाला किती पेरू लागतील ते! शेतकरी मी सांगितलेले अभियांत्रिकीचे गणित समजून घेत नाही, म्हणून त्याचे नुकसान होते."
"साहेब याचे गणित करा, किंवा भुमिती करा, याला पेरू अजिबातच येणार नाहीत!"
आता साहेब वैतागला, "माझे ऐकत नाही तुम्ही? मी इंजिनिअर आहे! इंजिनिअर! माझे गणित वापरले तर याला भरघोस पेरूचे उत्पन्न येईल, पाहाच तुम्ही!"
शेतकरी काकुळतीने हात जोडून बोलला, "साहेब, काहीही केले तरी या झाडाला पेरू येणार नाहीत , कारण हे आंब्याचे झाड आहे!"
शेतकरी जोमात - इंजिनिअर कोमात !
***********************
सूचना: वरील काल्पनिक घटनेची संकल्पना या नाटकाच्या प्रमुख पात्राची मनोभूमिका स्पष्टपणे समजून देण्यासाठी करण्यात आली आहे.
हे सर्व वातावरण निर्मितीसाठी होतं. आता इथून पुढे खऱ्या नाटकाची सुरुवात होत आहे. जसे नाटकात म्हणतात ना – सूर लावणे, ताल लावणे तसं काहीसं!
एक एकत्र कुटुंब, त्यातला एक जावई, एक जावयाची पत्नी आणि जावयाची मुले, ही प्रमुख पात्रे आहेत. बाकी जाधव कुटुंबाला नाटकात फारसा वाव नसल्याने त्यांना सहकलाकार समजू शकता.
इंजिनिअर साहेबांचा प्रश्न आहे: "सविता (सुधाताई) गावडे यांचा तिच्या वडिलांच्या (कै गंगाजी जाधव यांच्या) मालमत्तेत किती टक्के हिस्सा आहे?"
जाधव कुटुंबात मी थोडाफार शिकलेला असल्याने सर्वांनी अपेक्षेने माझ्याकडे पाहिले. अभियांत्रिकीतले मला हो कि ठो कळत नाही. पण मला काही येत नाही कसे दाखवायचे? त्यामुळे मी एक क्लुप्ती केली.
हे गणित सोडवायचं असेल, तर प्रथम एकत्र जाधव कुटुंबियांच्या संकिर्ण मालमत्तेमध्ये कै गंगाजी जाधव यांचा किती हिस्सा निघतो ते काढावं लागेल.
हे अंकगणितानुसार असे होईल: जाधवांचे एकूण सहा भाऊ - त्यानुसार प्रत्येकाचा हिस्सा एक शष्टांश (1/6) होतो. म्हणजे कै गंगाजी जाधव यांचा एकूण मालमत्तेत सहावा हिस्सा होतो. बरोबर आहे का हो?
पुढे कै गंगाजी जाधव यांच्या सहाव्या हिश्शात, त्यांची पत्नी श्रीमती मंजुळा गंगाजी जाधव, त्यांची थोरली मुलगी (आता तिचे वारसदार), त्यांची दुसरी मुलगी (आता तिचे वारसदार), आणि त्यांची तिसरी मुलगी यांचे चार समान हिश्शे बनतात.
बाकी जावई, नातू हे हच्च्यामध्ये येतात! गणित चुकत असल्यास, सर्व गावाला समजेल अशा सोप्या भाषेत सांगावे ही विनंती .
आता कायदेशीर हिस्सा - किंवा हिसका असेही समजता येईल. कायद्यानुसार एकाद्याने गैरप्रकारे इतरांचा हक्क डावलायचा प्रयत्न केला, तर त्याचा स्वतःचा हिस्साही त्याला गमवावा लागतो. आता हा हिशोब तुम्ही सांगा.
कै गंगाजी जाधव यांनी तुम्हाला दिलेला कौटुंबिक हिस्सा: लाडक्या नातूला डावलून कै गंगाजी जाधव यांनी आपल्या मालमत्तेला वारस हवा म्हणून उतारवयात दुसरे लग्न केले. त्यांना अपेक्षित वारस असता तर तुम्हाला किती हिस्सा भेटला असता? हे गणित आमच्यासाठी थोडं अवघड आहे. आपल्या कृतीतून त्यांनी स्वतःच दाखवून दिले होते कि, जावई हा घरजावई नव्हता तर आश्रीत होता.
कै गंगाजी जाधव यांच्या बाकीच्या हिस्सेदारांनी यांना आपला हिस्सा स्व:खूषीने दिला आहे का ते पाहू:
1. श्रीमती मंजुळा गंगाजी जाधव - राजू जाधव आणि मी तिला एका वर्षांपूर्वी बेळगावला भेटलो होतो. त्या भेटीत तिने आणि तिच्या बहिणीने जे सांगितले, ते धक्कादायक होते. दुसऱ्याची मालमत्ता बळकावण्यासाठी लोक कोणत्या थराला जाऊ शकतात, हे कुणीही राजूला विचारून खात्री करून घ्यावी. बिकट अवस्थेत नाइलाजाने ती आपल्या बहिणीच्या घरी वीस वर्षांपासून आश्रित म्हणून राहते. तिला तिची मालमत्ता विकायची आहे, पण जिवाच्या भीतीने ती स्वतःच्या घरी येत नाही.
2. कै गंगाजी जाधव यांची पहिली मुलगी - मेल्यानंतरही मला त्या बाईचे तोंड दाखवू नका, असे तिने आपल्या मुलांना सांगून ठेवले होते. दिड वर्षांपासून अप्पर कलेक्टर त्यांच्या अपिलच्या फाईलवर बुड टेकून बसला आहे.
3. कै गंगाजी जाधव यांची दुसरी मुलगी - तिच्या नवऱ्याने जाधवांची जमिन लुबाडायला तिला मदत केली नाही, यास्तव वैर आलं. त्यांनीही आपला हिस्सा दान केलेला नाही.
वरील वस्तुस्थिती लक्षांत घेता, गणित अवघड आहे, त्यामुळे आम्ही ते गणित संजय ढेरे गुरुजी यांच्याकडे घेऊन जाऊ आणि सविता यांचा हिस्सा किती येतो ते विचारू:
"नमस्ते गुरुजी !"
"नमस्ते! या, या. संपूर्ण जाधव कुटुंब आणि गावडे कुटुंब मिळून माझ्याकडे कसे काय येणे केले?"
"गुरुजी, एक गहन गणित आहे. 1985 सालापासून आम्ही जीव तोडून प्रयत्न करतो आहोत, पण अजूनही आम्हाला ते सुटत नाही, मदत करा. जगज्जेता सिकंदरलाही सोडवता आली नाही, त्या गाठी सारखीच ही समस्या जटिल आहे. 'गाठी गाठी खेळत बसणारे, कधी जग जिंकू शकत नाहीत!' अशी आरोळी ठोकत सिंकदरने ती गाठ तलवारीने कापून काढली होती. पण काही गाठी अवघड जागी असतात, कापता येत नाहीत! हे अवघड गणित तुम्हीच सोडवू शकता. शिवाय आमची कौटुंबिक परिस्थिती तुम्हाला लहानपणा पासून चांगलीच परिचयाची आहे."
"नक्की, नक्की. प्रथम चहा घ्या, नंतर निवांतपणे आपण तुमचे गणित सोडवू. मी शिक्षक असल्याने फळा खडू माझ्या घरीही आहे."
चहा पाणी झाले आणि गुरुजी फळ्यावर सराईतपणे गणित सोडवू लागले. जटिल समस्या आली की, राजे लोकही गुरुच्या पायावर लोटांगण का घालायचे, ते आज समजलं. कुणालाही न समजणारं इंजिनिअरचे कोडगणित गुरुजींनी बघता बघता सोडवून टाकले.
"ही गणिती समस्या टप्याटप्याने समजून घ्यावी लागेल:
🔹 टप्पा 1: सहा भावांची एकत्रित मालमत्ता समजा A आहे.
एकूण मालमत्ता ६ भावांत समान वाटली जाते, म्हणजे प्रत्येक भावाला मिळणारा हिस्सा:
प्रत्येक भावाचा हिस्सा = A/6
🔹 टप्पा 2: गंगाजीचा हिस्सा = A/6
🔹 टप्पा 3: गंगाजीचे निधन – 4 वारसदार.
प्रत्येक वारसदाराचा हिस्सा = (A/6 )/4
= A/24
🔹 उत्तर: गंगाजीच्या मृत्यूनंतर प्रत्येक वारसदाराचा हिस्सा: A/24
"मिळाले का तुमचे उत्तर?" गुरुजीने कुतुहलाने विचारले.
काही माना डोलल्या, काही माना मोडल्या...
मान मोडून संतप्त होऊन इंजिनिअर साहेब उठले, "कुणाला शिकवता गुरुजी शाळा! इंजिनिअर आहे मी! या अडाण्यांना तुम्ही बनवू शकता मला नाही! 1985 पासून अडलेलं गणित तुम्ही सहज सोडवलं, म्हणून खूष होऊ नका. अभियांत्रिकी विज्ञानात गणिताचा एकच टप्पा आहे, 'A = सविता'! तुमचे गणित पहिलीच्या मुलांनाच शिकवा, इंजिनिअरला शिकवू नका! माझा हा अभियांत्रिकी विज्ञानातला शोध येणाऱ्या कलियुगाचा प्रमुख प्रमेय म्हणून शिकवला जाईल. आईन्टाईनचा सापेक्षतावादाचा नियम जगातील फक्त हातांच्या बोटावर मोजता येईल इतक्याच लोकांना समजायचा म्हणतात. माझाही नियम आज तुम्हाला, किंवा रामपूर मधील कुणालाच समजणार नाही. त्यासाठी मंत्र्यांकडे किंवा अधिकांऱ्याकडे असते, तशी उच्च कोटीची बौद्धीक पात्रता लागते! आईन्टाईनचा Theory of Relativity कधी समजून घ्या, म्हणजे जाधवांच्या एकून सर्व मालमत्तेशी असलेला माझा सापेक्ष वादानुसारचा अधिकार तुम्हाला समजून येईल! जाधव कुटुंब एकत्र होतं, असं तुम्ही समजून चालता, म्हणून तुमचे गणित फसते! गंगाजींच्या बाकी मुली, नवऱ्यांना घेऊन इथेच राहिल्या नाहीत, त्यामुळे त्यांचाही मालमत्तेवरचा कायदेशीर हक्क नष्ट होतो. गल्लीतच राहता ना तुम्ही? मग माझ्या आई-बापांनी जाधवांच्या जमिनी वाढवण्यासाठी किती बौद्धिक कष्ट घेतले हे नाही दिसले तुम्हाला? कौटुंबिक वादात शाळेतले गणित नाही चालत मास्तर. इथे एक अधिक एक दोन नसते - अकराही होऊ शकते किंवा शून्यही होऊ शकते! ती किंमत मी कुठे उभा आहे, या सापेक्षतावादावर ठरते! फळ्यावरच्या गणितापेक्षा व्यवहाराचं गणित शिका. कुणाला कुठे-कसे, अधिक आणि कधी वजा करायचे, हे समजले नाही तर तुम्ही नापास!"
गुरुजीनी कपाळावर हात मारून घेतला आणि पुन्हा आमचं गणित तांत्रिक कारणास्तव बिघडलं. . . . .
इंजिनिअर जोमात आणि बाकी सगळे कोमात!
============================================================
ढेरे गल्ली सहर्ष सादर करत आहे -
नाटकः डाकू लाखन (भाग दहा)
***********************
सोबत जोडलेला मेसेज प्रल्हाद गावडे यांनी ग्रामविचारमंच या व्हाट्स अँप ग्रुप वर माझ्याविषयी टाकलेला आहे.
***********************
नाटकाचा विषय - "बांधांच्या इंजिनिअरांचे हिस्सांचे अजब अनोखे गणित!"
इंजिनिअर साहेबांनी शेताच्या बांधांचे माहात्म अलैकिक पद्धतीने वर्णन केले आहे. "शेत जमिनीच्या 4 चे 8, 10 चे 20 असे द्विभाजक पद्धतीने वाटण्या होत गेल्या तर कालांतराने त्याची स्थिती बदलते, बांधांची संख्या वाढते, त्यामुळे किंमती जमिन वाया जाते. असे झाल्याने पुढे जमिन विकायलाही प्राब्लेम होतो!" - असे सार्वजनिक हितासाठी स्पष्टिकरण दिलेले आहे.
थोडक्यात काय तर, "भविष्यात जाधवांच्या शेतजमिनींचे अनेक तुटक हिश्शे होऊन नुकसान होऊ नये, या सद्हेतूने मी आणि माझ्या पित्याने जमिन केवळ आमच्या नावावर ठेवल्या आहेत!" - असे प्रासंगिक आधार देऊन इंजिनिअर साहेब पटवून सांगताहेत.
साहेबांनी कै गंगाजी जाधव यांच्या माणगांव आणि ढोलगरवाडीतील मुलींनाही आमच्या जमिनी, आमच्या नावावर न करून देण्यामागे हेच कारण सांगितलं होतं म्हणे! जाधवांची लोकं म्हणजे डुकरं आहेत. जमिनी त्यांच्या नावावर केल्या तर ते तेथे आम्हाला राहू देणार नाहीत. तुम्हां दोघीनाही ती डुकरे सतत घाणेरडया शिव्या देत असतात, असे सांगून त्यांचे आमच्याशी वैरही घडवून आणले. इकडे आम्हालाही पिन मारली - "त्या दोघी तुम्हाला घाणेरड्या शिव्या देतात! त्यांना तुम्हाला जमिन द्यायची नाही!"
राजू-अमृत आणि आम्ही सख्खे चुलत भाऊ आहोत. आम्ही एक झालो तर, आपले ईच्छीत साध्य होणार नाही, हे धोरण ठेवून प्रत्यक्ष इंजिनिअर साहेबांनी कुटील योजना आखून, त्या यशस्वीपणे अंमलात आणल्या. त्याच्या योजनेला बळी पडून, आमची दोन्ही कुटुंबे काही वर्षे अगदी बिनडोक कुत्र्यांसारखी आपापसात भांडत राहीली. जिथे कारण भेटेल तिथे, जिथे कारण नसेल तिथे, विनाकारणची कळवांडी नित्याची झाली होती. कळवांडी हा काही प्राण्यांसाठी नित्य मनोरंजनाचा विरंगुळा असतो. त्याला विनाकारण विरजण घालून विरस का करावा?
इंजिनिअर साहेबाने खूप चतुराईने आमच्या थोरल्या वहिणीचा ही आग लावायला कौशल्याने उपयोग करून घेतला होता. मोठ्या वहिणीवर आम्हां दोन्ही कुटुंबांचा जबर विश्वास! शेवटी एका मिटिंगमध्ये प्रत्यक्ष श्री पुंडलिक वर्पे, श्री राजूदा शिवनगेकर, श्री दत्तू यमनाप्पा वर्पे यांच्या उपस्थितीत, अनपेक्षितपणे त्याच मुद्दयावरून भांडण सुरू झालं आणि इंजिनिअर साहेबाचा घडा फुटला!
पण यातून जी कटुता निर्माण झाली ती आजही तशीच आहे. त्यामुळे इंजिनिअर साहेबांची योजना यशस्वी झाली, असे म्हणता येऊ शकते. आज तोंडदेखलेपणा आहे, पण तिडे सुटलेले नाहीत. मी ते सोडवायचाही प्रयत्न करत नाही. कारण कुणाचीच ते समजून घेण्याची ऐपत नाही, इच्छाही नाही. आज प्रत्येकजण भावाकडे अपेक्षित भाऊबंद म्हणून पाहतो. भावाभावामध्ये रक्ताच्या नात्यापेक्षा भाऊबंदकीची नाती जास्त दृढ आणि मजबूत आहेत. विशेषत: बायका सहधर्मचारीणीचा वसा घेतल्याने त्या भावनेचे व्यवस्थित संगोपन करतात.
साहेबांनी कै गोपाळ जाधव आणि कै राणबा जाधव यांच्या कुटुंबातही असाच वणवा पेटवून दिला होता! आजही ते त्याच आगीत होरपळताहेत. जमिनीमध्ये तुम्हाला फसवण्यांत आलं आहे, असं दोघांनाही भासवलं जातं. शिकलेली मुलं म्हणतात - "मग जमिनी बदली करून घेऊ, किंवा पुन्हा वाटणी करून घेऊ." पण तसंही नको, असंही शिकवलं जातं!
कै गोविंद जाधव आणि कै गोपाळ जाधव हे दोघे, भावांपेक्षा मित्रांसारखे राहायचे. गोविंद जाधवांच्या पत्नीने गोपाळ जाधवांचा मोठा मुलगा ओठीत घेतला होता. आई-बापाला सोडून तो मुलगा नेहमी त्यांच्यासोबतच राहायचा-झोपायचा. गोविंद जाधव, हाच मुलगा आपला वारस आहे, असे सर्व गावाला अभिमानाने सांगत राहायचे. जुन्या जाणत्या लोकांना हे सर्व माहित आहे. त्यांचे घनिष्ठ नाते तोडायला, जो अघोरी डाव खेळला गेला, त्यात मात्र ते दोघेही स्वतःच्या मरणापर्यंत होरपळले. दोघांच्याही अगदी जिव्हारी घाव घातला गेला.
असो. प्रस्तावनेतून पुन्हा नाटकात येऊ:
"बाहेरुन सोपे वाटणारे हे गणित प्रत्यक्षात फारच किचकट आहे. "हा इंजिनिअर साहेबांचा इशारा बहुदा आमच्यासाठी आहे!
आमचाही एक गंभीर इशारा तुमच्यासाठी आहे, साहेब. जर तर चा नाही - प्रत्यक्ष वस्तुनिष्ठ असा! नसता शहाणपणा म्हणा हवंतर!
तुम्हाला खरेच वाटते की, आपण कागदी घोडे नाचवून यांच्या जमिनी लुबाडल्या तरी, जाधवांचे मूर्ख-मेंगळे-लालची लोक हांजी-हांजी केल्याशिवाय काहीच करणार नाहीत? तुम्ही लुबाडले तरी, आतासारखेच तुमच्या खांद्यावर हात टाकून लोचटपणे फिरत राहणार?
हां, काही गोष्टी मलाही अचंबित करतात. एका बाजूला दोन-तीन गुंट्यासाठी जन्मांतरीचे वैर पोसले जाते, डोकी फोडली जातात, घाव घातले जातात; आणि दुसऱ्या बाजूला बाराशे गुंटे गटकावलेल्याच्या गळ्यात गळे घातले जातात! हे सर्व अचंबित करणारे आहे नाही? हे जादू मंतर, वशिकरण असे काही असेल का? हा, अंगारा-धुपारा, बोकड-बळी, काळी-करणी, मळेकरणी यांचा प्रभाव असेल का? असेलही! विनाकारण किंवा क्षुल्लक लाभासाठी कोणताही हुशार माणूस असे विपरित वागणार नाही.
आता "बांधांच्या हिस्सांचे गणित" फिसकटल्याने कसे अघटित प्रकार घडतात ते पाहू:
मीही तुम्हाला एक बांधांचे महात्म सांगतो. मी आठ-नऊ वर्षांचा असेल त्यावेळची ही गोष्ट आहे. कै गंगाजी जाधव यांच्या हुंबरवाडीतील सख्ख्या बहिणीच्या मुलांचा एका एकमेव बांधासाठी खून झाला! आताही अशा गोष्टी घडताना आपण पाहतो - ऐकतो, पण शहाणपण काही घेत नाही. दुसरे मरणार आहेत, आपण अमर आहोत - हीच शेवटच्या श्वासापर्यंत बहुतेकांची कल्पना असते. नुकतेच मांडेदुर्गला असेच झाले, आपल्या गावीही झाले. बांध महात्म्य फक्त गावा गावातच नाही, घरां घरांतही आहे. प्रत्येक घरांत कुणी ना कुणी बांधांचा इंजिनिअर बनायचा प्रयत्न करतो! त्यामुळे सर्वांचेच कौटुंबिक स्वास्थ बिघडलेले आहे. ना ते स्वतः सुखी होतात, ना ते दुसऱ्याला सुख लाभू देतात.
आम्हीही मान्य करतो की "बांधाचे गणित" किचकट आहे. पण त्याचे समाधान तुम्ही म्हणता तसे नसते. तुमची योजना "गरीबांना मारून गरीबी हटाव" करा या धोरणावर अवलंबून आहे.
तर, वर वर्णन केलेली अघटित घटना अशी होती. भल्या पहाटे कुणी हुंबरवाडीच्या हत्याकांडाचा निरोप आणला आणि आमचं सर्व घर हादरलं. बांधासाठी आत्याच्या दोन्ही मुलांना भाऊबंदानी मारून टाकलं आहे, असे निरोप घेऊन येणारा भीतीने थरथरत सांगत होता.
"लांडग्यांनी फाडावं तशी थोरल्या पोराची आतडी कोयत्यांनी फाडून शेतभर केलेत. रक्ताचं न्हावान झालंय. थोरला जाग्यासच ठार झाला. रक्ताचा माग घेत गाववाले दुसऱ्याचं मढं शोधताहेत. मारणारे परागंदा झालेत ..."
एकणारे थिजून गेले. जाणते लोकं मिळेल ते वाहन घेऊन पळाले. फक्त बायका आणि आम्ही मुलं संचित होऊन दिवसभर कोंडाळं करून बसून राहीलो.
नंतर कळलेला प्रकार असा होता: एका बांधावरची पेंडी कुणी कापायची याबाबतचा काही वर्षांपासूनचा जुना वाद होता. वर्षानुवर्षे तो चिघळत गेला. एका दिवशी भाऊबंदांनी काहीतरी ठरवलं, रात्रभर कोयते पाजळले, चकल्या, गोडधोड सणगे करून ओरपत राहीले. रात्रभर जागरण केली, आणि भल्या पहाटे खाली वाकून तोंड धूत असलेल्याला मागून शिडीपलं, दुसऱ्याला शेतात खापललं. तोंड धूत असलेल्याने कोयता अडवायचा प्रयत्न केला त्याची बोटे तुटली. जखमी अवस्थेत तो उभ्या ऊसाच्या फडात पळाला. कोयते घेऊन मारेकरी मागे लागले...
== बहुदा आजही ते तिन्ही मारेकरी तुरुंगात आहेत. आणि दोन्ही कुटुंबांचे वाळवाण झालेले आहे... ==
हे आहेत, "आफ्टर ईफेक्टस ऑफ बांध इंजिनिअरिंग!"
***********************
दुसऱ्याच्या आयुष्याचे वाळवाण करून मारेकरी खरेच सुखी होतात का? लुटीच्या मालातून किती सुख खरेदी करता येते?
== इंजिनिअर साहेब, स्वानुभवाने तुम्हाला काय वाटते? ==
============================================================
ढेरे गल्ली सहर्ष सादर करत आहे -
नाटकः डाकू लाखन (भाग अकरा)
***********************
कोणतीही महिला विनाकारण माझे नाव गुंतवत असेल तर .............. God bless you ...... तुमचे भले व्हायची सुरुवात पूर्वीच झालेली आहे.........
- इंजिनिअर साहेब ऑन मोड.
सोबत जोडलेला मेसेज प्रल्हाद गावडे यांनी ग्रामविचारमंच या व्हाट्स अँप ग्रुप वर माझ्याविषयी टाकलेला आहे.
***********************
ऑन मोड मधील इंजिनिअर साहेबांच्या वरील उदगाराला उद्देशून हे नाटक आहे.
तुमची स्मरणशक्ती फार कमकुवत झालेली दिसते साहेब. प्रत्यक्ष गावच्या प्रतिष्ठित पंचासमोर आणि घराच्या सर्वांसमक्ष तुमच्या कतृत्वाचा पंचनामा झाला होता. प्रमोदने तुम्हाला स्पिकर फोन जोडून ठेवला होता. ते ऐकून तुम्ही लाज वाटून न घेता, निरपेक्ष भावनेने खीः खीः हसला होता!!!
आता काही आठवलं? - नाही! ठीक आहे, ती संपूर्ण कहाणीच तुम्हाला ऐकवेन म्हणजे तुमची स्मृती सजग होईल.
***********************
दुसरे, आमचे भले होण्याची सुरुवात म्हणाल तर, घनशाम गावडेनी आमच्या घरी पदार्पण केले, त्याच दिवसापासून आमच्या घरचे भले व्हायला सुरुवात झाली होती!
***********************
बहुदा 2017 सालची ही घटना आहे. तुमचा मला फोन आला, "मामा, मला सर्वांच्या जमिनी त्यांच्या त्यांच्या नावावर करून द्यायच्या आहेत. मी मावशींनाही त्यासाठी राजी केले आहे. तुम्ही, पप्पू मामा, मिंटू मामांना घेऊन तात्काळ गावी या. पहिल्या दिवशी सर्वजण तहसिलदारांकडे जाऊन रितसर वाटणी पत्रावर सह्या करून येऊ आणि दुसऱ्या दिवशी पासून फेरवाटणीही करून घेऊ. मला तात्याला गिरणीच्या घरांजवळ बंगला बांधून दाखवायचे आहे. माझे इंजिनिअर मित्रंही गावी येत असतात, जाधवांचे घाणेरडे घर बघून हसतात. लाज वाटते. ज्या घरांत दोन इंजिनिअर राहतात त्यांचे घर कसे हवे? तुम्हाला पुन्हा ही संधी मिळणार नाही, उद्याच्या उद्या गावी या. मीही गावी येतो आहे. नंतर मला दोष द्यायचा नाही! माझी आई फक्त मी सांगितले तरच सही करू शकते, हे लक्षांत ठेवा! शिवाय प्राईव्हेट मोजणी करणाऱ्यांना सांगून ठेवा. ते मोजणी करून लगोलग वाटणी करून देतात."
"ठीक आहे, आम्ही येतो." म्हणत मी त्याचा फोन ठेवून, लगोलग अनिलला फोन केला. त्याला प्रल्हादचे म्हणणे सांगितले. तो झटक्यात बोलला - "मूर्ख आहेत का तू? त्या लबाडावर तू कसा विश्वास ठेवू शकतोस? फेकू आहे एक नंबरचा! आतापर्यंत कमी चूना लावलाय का, त्या बाप लेकांनी? गावी बोलावून आमच्या सह्या घेऊन, आमचाच बँड वाजवेल तो! भावनेने विचार करू नको, डोक्याने विचार कर! गावी जाणे वैगेरे नको."
"त्याच्या बोलण्याच्या स्वरांवरून तो खरं बोलतोय असं वाटतं. शिवाय तात्यासाठी घर बांधतोय, ही चांगली गोष्ट आहे." मी बोललो.
"तू मला सांग, तात्या त्या घरात किती वर्षे राहणार आहे? तो साहेबराव, तात्यासारखा थेरडा इंजिनिअराच्या घरात शोभत नाही, म्हणणार नाही कशावरून! ज्या घराने आसरा दिला, त्या घराची आता लाज वाटते याना! तात्याची लाज वाटणार नाही कशावरून? तात्यासाठी गाडी, तात्यासाठी पाड्यांची जोडी, तात्यासाठी सोनं, तात्यासाठी अंगठी, तात्यासाठी फ्लॅट, तात्यासाठी बंगला ... कसं वाटतंय हे?"
"जाऊदे ना जूनं! यावेळी तो खरं बोलतो असं मनापासून वाटतं आहे. तात्यासाठी त्याच्या मनात आदर आहे, तो सर्वांना फसवेल तात्याला फसवणार नाही."
"अरे देवा, कुठल्या गावी राहतोस तू! सख्ख्या मामाला जे लुबाडायचे सोडत नाहीत, ते चुलत मामाला सोडणार आहेत का? आम्ही सर्व तात्याचा आदर करतो, मान ठेवतो, त्याचा गैरफायदा घ्यायचा आहे त्यांना!"
"प्रल्हादावर विश्वास ठेवायची, ही शेवटची वेळ आहे असे समजून जाऊ. जाधवांच्या मागे लागलेली पिडा, त्याच्या आईच्या एका सहीने दूर होऊ शकते. प्लिज यावेळी जाऊच!"
"ठिक आहे - तुझं समाधान म्हणून मी येतो. प्रकाशला चंदगडला पाठवून तो प्राईव्हेट मोजणी करणारा कुठे भेटतो बघ. पैसे वैगेरे देऊ नको, तिकडे गेल्यानंतर परिस्थिती बघून ठरवू . तू माझ्या इकडे ये, कारने निघू. सुधीरलाही सांगून ठेव. त्या प्रल्हादलाही सांगून ठेव. नाहीतर आम्हाला गावी बोलावून, तो पुण्याचा भामटा बसेल पुण्यामध्ये!"
"नाही नाही तो आमच्या अगोदर गावी पोहचणार आहे. तो बोलला आहे."
***********************
दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे मी, सुधीर, आणि अनिल कारने गावी निघालो. संध्याकाळी घरीच पंचांना बोलावून मिटिंग घ्यायचे ठरले होते. पहाटे मी प्रल्हादलाही फोन केला - तो बोलला, "मी निघालोय तुम्ही या!"
लांबचा प्रवास होता. इकडच्या तिकडच्या गप्पा मारता मारता, आमची गाडी पुन्हा पुन्हा जाधवांच्या परिस्थितीवर येत होती. पूर्वीचे जाधव घराण्याचे वैभव एका कृतघ्न माणसांमुळे कसे रसातळाले गेले. त्यात भर म्हणून मुलंही बापापेक्षा सवाई कशी निघाली. आसगावचे भामटे, जाधवच या घरांत कसे आश्रीत आहेत, ते जाधवांचे वारस नाहीत, हे गावाला पटवून देण्यातच मग्शूल आहेत. शिवाय आपला गावाशी संबंध तुटल्यामुळे, आपल्या मताला गावचे लोक कसे भिक घालत नाहीत, आपल्या घरचेच काही लोक - "घर का भेदी लंका ढाए" कशी करतात, असे अनेक विषय निघाले.
मी थोरला बाबाच्या मृत्यू वेळचा प्रसंग सांगितला, "थोरला बाबाचा मृत्यू होऊन बहुदा पाच सहा दिवस झालेले असतील. तलाठी साहेब घरी आले होते. त्यांनी घरांतल्या सर्वांना बोलावून घेतलं आणि सांगितलं, थोरले मामा नुकतेच वारले आहेत. त्यांच्या नावावर एकत्र कुटुंबांच्या जमिनी आहेत. त्या तुम्ही यावेळीच सर्वांच्या नावे उतरून घेतल्या, तर पुढे वादविवाद उत्पन्न होणार नाहीत. आज ते सोपं आहे, भविष्यात ते अवघड होईल."
सर्वांना सकारात्मक माना डोलावल्या. काहीतरी चर्चा करण्यासाठी गावडे फॅमिली तात्याला घेऊन आत गेली. नंतर केवळ सुधाताई बाहेर आली. ती बोलली, "तलाठीसाहेब, कायद्यानुसार बापाच्या सर्व जमिनी त्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांच्या नावे चढतात, भाऊबंदांच्या नाही! तुम्हाला कायदा समजतो का?"
"अहो मॅडम, एकत्र कुटुंबाच्या जमिनी आहेत या." तलाठी साहेब बोलले.
"तुम्हाला कुणी सांगितले? या जमिनी एकत्र कुटुंबाच्या जमिनी आहेत, हे तुम्हाला कुणी सांगितले? मी सांगतेय तसं करा, स्वतःचं ज्ञान स्वतःजवळ च ठेवा!"
राजू बोलला, "सुधाऊ, तलाठी साहेब म्हणतात ते बरोबर आहे. आज सोप्या पद्धतीने जमिनी सर्वांच्या नावे चढतील, मोडता घालू नको! हात जोडतो."
सुधाताई ठसक्यात बोलली, "तू तुझा बाबा वारला, त्यावेळी आमची नावे चढवलेस का?"
"आऊ, आमचा बाबा दहा वर्षांपूर्वी वारला होता! तेंव्हा किती वर्षांचे होतो आम्ही? लोकांनी सांगितले, तिथे सह्या केल्या. तीन गट नंबरवर आमची नावे आहेत. आमचे एकून सव्वीस गट नंबर आहेत. मी माझ्या बहिणीन्स आजच बोलावून घेतो, आणि आमच्या नावावर असलेल्या जमिनीवर सर्वांची नावे आधीच टाकून घेतो."
सुधाताई झटकन बोलल्या, "आता फायदा नाही त्याचा. माझ्या बाबाच्या जमिनी फक्त माझ्याच नावावर चढतील! तलाठी साहेब, बाकी काही लचांड सांगायच्या पेक्षा मी सांगतेय तसेच करा. काही फायदा नाही तुमच्या सांगण्याचा!"
तलाठी साहेबांनी अपेक्षेने कॉटवर बसलेल्या राणबा मामाकडे पाहिले. राणबा मामा बोलले, "साहेब, त्या पोराचे काय ऐकता. पोरानं केलं आणि वाऱ्यानं गेलं! कुठून शाळा शिकलाय माहित नाही. बाबाच्या जमिनी फक्त पोरीच्याच नावावर चढतात!"
ते ऐकून माझ्या बापालाही स्फुरण चढलं. त्याने तात्काळ आपले बौद्धिक सांडले, "डोंबलाची शाळा शिकतात ही पोरं! बापान्सच शाळा शिकवित्यात! बाबाच्या जमिनी फक्त पोरांच्याच नावावर चढतात! सुधाचे बरोबर आहे!"
बापाचा तो दशाअवतार बघून मी माझे ओठावरचे शब्द गिळले आणि मुकाट बसलो.
थोडा वेळ शांतता पसरली. तलाठी साहेब निःशब्द शांतता पाहून समजायचे ते समजले. "ठिक आहे जशी तुमची मर्जी!" म्हणत ते उठले आणि निघून गेले.
***********************
संध्याकाळी आम्ही गावी पोहचलो. रात्री घराच्या ओसरीवरच मिटिंग जमली. प्रल्हादने "काही महत्वाच्या कामानिमित्त मी माघारी पुण्याला गेलो आहे." असा ऐनवक्ताला निरोप पाठवल्याने, मिटिंगच्या सुरुवातीलाच अनिलने पोलिसी भाषेत माझे तोंडसुख घेतले. तेव्हा भामट्याने खरंच आपल्याला बनवलं की काय, अशी शंका माझ्या मनात आली.
मिटिंगला जाधवांचे सर्व लोक उपस्थित होते - गावडे कुटुंबातर्फे सुधाताई आणि प्रमोद उभे होते. सुत्रधार आतल्या खोलीत बसले होते, स्पिकर फोनवर साक्षात साहेब होते! पंच मंडळी मध्ये श्री पुंडलिक वर्पे, श्री राजूदा शिवनगेकर, आणि श्री दत्तू पुन्नाप्पा वर्पे होते.
तात्या बोलला, "पोरांनू, मागे काही बुरं-वाईट घडलं असेल, तर सोडून द्या. आम्हाला इथे गिरणीच्या घराच्या ठिकाणी घर बांधू द्या."
राजू बोलला, "तात्या, आम्ही स्वतःच्या बापाइतकाच तुझा आदर करतो. तू म्हणशील तसे. तुम्ही घर बांधा. आम्हालाही आनंद आहे. माझे आणि प्रकाशचे ट्रक्टर तुमचे घर बांधून होईपर्यंत फुकट तुमच्या हातात देतो आम्ही. मग ठरले तर! उद्या सगळे जण मिळून आपण चंदगडला जाऊ. प्रत्येकजण आपापल्या वारसांना बोलवून घेईल. सर्वांनी सह्या करायच्या. वाद मिटला!"
तेवढ्यात फोन मधून साहेबांचा घरघरणारा आवाज आला, "थांबा थांबा थांबा, योजनेमध्ये थोडा बदल झालेला आहे. आम्ही आता तात्यासाठी बंगला बांधून घेतो आणि दहा वर्षांनंतर तुमच्या जमिनी तुमच्या तुमच्या नावावर करून देतो!"
सगळे आवाक झाले. पप्पूने माझ्याकडे तिक्ष्ण कटाक्ष टाकला! पाहिलंस? असा.
राजू तात्याला बोलला, "तात्या हे मध्येच काय?"
तात्या बोलला, "पोरांनू, माझ्यावर विश्वास ठेवा. त्याचं एकू नका. मी सुधास घेऊन उद्याच चंदगडला तुमच्या बरोबर येतो."
फोन पुन्हा केकाटला, "तात्याला घेऊन आता जावा, त्याला बाहेर येऊ देऊ नका!" हा आदेश गावडेंसाठी!
प्रमोदने तात्याच्या हाताला धरून ओढत आत नेले, आणि बहुदा खोलीत बंद केले असावे. कारण त्यानंतर तात्या बाहेरच आला नाही.
पुढील आदेश जाधवांसाठी - "फक्त आता मी बोलेन, बाकीच्यांनी फक्त हो म्हणायचे आहे! नाहीतर कुणालाच जमिनी मिळणार नाहीत! माझ्या हातात सर्व अधिकार आहेत!"
साहेबांनी जुळून आलेले सर्व क्षणात विस्कटून टाकले!
पंचानी परोपरीने साहेबांना समजवायचा प्रयत्न केला. पण पंचानीसुद्धा इंजिनिअरिंग केलेले नव्हते! दुर्देवाने इंजिनिअरला ज्ञान शिकवू शकेल, असा ज्ञाता आमच्यात कुणीही नव्हता!
योगायोगाने तेव्हाच, माझ्या आईचे आणि राजूच्या आईचे, विनाकारणचे भांडण उफाळून आले. तू तू, मी मी, करता करता शपथेवर लपवलेलं भांडणाचं मूळ बाहेर आलं आणि साहेबांचं भांडं सार्वजनिक ठिकाणी फुटलं!
आमच्याबद्दल असं कुणी सांगितलं? तुमच्याबद्दल असं कुणी सांगितलं? - असे करता करता शपथेवर लपवलेलं थोरल्या वहिणीचे नावही बाहेर आले!
पंच बोलले, वहिणीला समोर बोलवा. कुचमत कुचरत वहिणी समोर आल्या, आणि त्यांनी सुधाताई आणि प्रल्हादने त्यांना हे करायला सांगितल्याचे सर्वांसमक्ष मान्य केले.
तेथे सुधाताई होत्या, प्रमोद होता, घरचे सर्व होते, आणि पंचही होते. आता यातले खात्रीचे खरे सांगणारे कोण आहेत ते प्रल्हादानेच ठरवायचे आहे!
अशाप्रकारे आमच्या मिटिंगीचे तिनतेरा झाले!
============================================================
ढेरे गल्ली सहर्ष सादर करत आहे -
नाटकः डाकू लाखन (भाग बारा)
***********************
महाराष्ट्राच्या छोट्याशा खेड्यातील ही गोष्ट आहे. पण गोष्ट म्हणावी की वस्तुस्थिती, हे ठरवणं तसे कठीण आहे. कारण आपल्या राज्यात सत्यापेक्षा खोटं अधिक प्रमाणपत्रं घेऊन फिरतं!
चाळेशेक वर्षांपूर्वी कोल्हापूर युनिव्हरसिर्टीत BA फायनलचे साठवलेले पेपर, उत्तर पत्रिका अकस्मात आग लागून जळाल्या. त्यात हौसे नवसे, ढवळ्या पवळ्या, लांडे मुंडे, गवळीपासून भटजी, कोळी पासून माळी — सगळे सरसकट पास करणेत आले! जळकी BA अशी एक नवी पदवी उदयास आली. त्याच राखेतून दिव्य शक्ती घेऊन काही फिनिक्स निर्माण झाले!
“विद्यापीठ जळलं, पण काहींचं भाग्यं उजळलं” अशी चर्चा त्या वेळी गाजली. त्या आगीत काहींना कष्ट न करता पदवी मिळण्याचा अनुभव आला, तर काहींच्या मेहनतीचा अपहार झाला.
त्या घटनेतून काही धूर्त पदवीधर तयार झाले. अभ्यास न करता, प्रश्न न सोडवता, मेहनत न घेता पदवी मिळाल्याची चव ज्यांनी चाखली, त्यांना कष्ट न करता पैसा मिळवायचे आयते शिक्षणही मिळाले!
त्या फिनिक्सनी पुढे जाऊन कष्ट न करता, फक्त दस्तऐवजांच्या आधारावर समाजात आपली प्रतिष्ठा उभारण्याची कला अवगत केली. त्यांनी रामपूरच्या ग्रामपंचायतीत अशाच काही करामती घडवल्या. कष्ट न करता, मेहनत न घेता - मालमत्ता मिळवण्याच्या करामती! नाटकाच्या या भागाचा तोच विषय आहे.
कोल्हापूर विद्यापिठा सारखीच आग कधीकाळी ग्रामपंचायत रामपूर मधील दस्तांना लागल्याचे सांगण्यात येते. मग जळक्या बिए मध्ये पदवीचा अनुभव गाठी असलेल्या एका फिनिक्स पदविधराने स्वःअनुभवाचा फायदा घेत आमची तीन घरे आपल्या नावे करून घेतली. येथेही तो आपसूक पास झाला. पण उत्तरपत्रीकेच्या एकच प्रति असल्या तरी, मालमत्तेच्या अनेक प्रति असतात, हे तो विसरला. जळक्या कर्मामुळे भाग्य काळवंडतं, उजळतं नाही. आगीचा प्रकाश कायमस्वरूपी नसतो, पण आगलाव्यांना ते कळत नाही.
ग्रामपंचायतीतील दस्त जळले याचा गैरफायदा घेत नावे बदलली तरी, ज्यांनी नावे बदलली त्यांना मूळ दस्त हजर करणे अनिवार्य आहे. केवळ ग्रामपंचायतीच्या भरवशांवर आणि पाठबळांवर कुठवर निभावणार आहे? सध्या ग्रामपंचायतीचे उदार धोरण त्यांच्या पत्थावर आहे, हे खरे.
ग्रामपंचायतीला पारदर्शकता आणि नोंदीच्या योग्य प्रक्रियेचे पालन करणे आवश्यक आहे. तसे झाले नाही तर लोकांचा ग्रामपंचायतीवर विश्वास हरवतो, ग्रामपंचायतीच्या निर्णयावर शंका निर्माण होते.
कुणीतरी खोट्या कागदानुसार आपले पिढीजात हक्क हिरावतो, तेव्हा फक्त मालमत्तेचं नुकसान होत नाही – तर आपला पिढ्यान् पिढ्या जगण्याचा विश्वास डळमळतो. घर गमावणे म्हणजे केवळ छप्पर हरवणे नाही, तर आयुष्यभरचा आधार धोक्यात येतो.
महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा, 1958 (Maharashtra Village Panchayats Act, 1958) नुसार ग्रामपंचायतीच्या फेरफारा संबंधी कायदेशीर प्रक्रिया काय आहे? खोटया दस्तांनुसार फेरफार नोंदवता येतात का? फेरफार करताना मूळ मालकांना नोटीस लागू नाही केली नाही, तरी चालतं का? एकाच्या घरांवर दुसऱ्याचं नाव गुपचुप चढवलं तर चालतं का?
तर नाही! ग्रामपंचायत कायदा + महसूल कोड + IPC च्या आधारे, अशी प्रकरणे सुस्पष्टपणे सुनियोजित संघटित अपराधाचे स्वरूप धारण करतात.
कोणत्याही गावातील ग्रामपंचायतीमध्ये वैयक्तिक हितसंबंधांसाठी सामाजिक बांधिलकी अव्हेरली जात असेल, तर गावाच्या दृष्टीने ही बाब गंभीर आहे.
रामपूर ग्रामपंचायतीतील मालमत्ता फसवणुकीची घटना ही सामाजिक, कायदेशीर आणि प्रशासनिक दृष्टिकोनातून खरोखरच गंभीर बाब आहे - असे गावातील किती जणांना वाटते? प्रत्यक्षात अगदीच थोड्या लोकांना! का? कारण चोरीला चलाखी, लबाडीला हुशारी, फसवणूकीला धूर्तपणा, चोराला साहेबराव - असे भारदस्त नामकरण झाल्याने प्रामाणिक सामान्य लोकं भांबावून चिडीचूप झाली आहेत. चोराला आहेर आणि सावाला नारळ, असे का, त्याला कळत नाही.
चोराला, डाकूला गावांतून फिरतांना, लोकांतून, समाजात वावरताना बिचकायला झालं नाही तर खुशाल समजावं - गावात चोरीचे समाजीकरण झाले आहे!
***********************
दोन वर्षांपासून आमच्या तीन घरांवर दुसऱ्याची नावे कशी चढली, याचे दस्त देण्यात यावेत, यासाठी दोन तीन वर्षांपासून आम्ही रामपूर ग्रामपंचायतीकडे अर्ज विनंत्या करत आहोत. अगोदर दस्त सापडत नव्हते, आता जळले आहेत असं कळलं! आम्ही म्हणालो, ठीक आहे, ग्रामपंचायतीतील दस्त प्रति जळल्या असतील, पण मूळ दस्त तर ज्यांने नाव चढवले आहे त्याच्याकडे असतील ना?
पण साहेबरावांकडे दस्त मागायला ग्रामपंचायतीला संकोच वाटत असावा. त्यामुळे त्यांनी मूग गिळून बसायचं, धोरणी धोरण अवलंबलं असावं. आम्हाला ग्रामपंचायतीचा राग नाही, दया येते. त्या संबंधित सोबत जोडलेला अर्ज पाहा.
रामपूर ग्रामपंचायत निर्णय घेण्यास असमर्थ आहे, हे लक्षांत आल्यावर आम्ही वरीष्ठ पातळीवर तक्रार दाखल केली. यामुळे रामपूर गावाचा अपमान होतो आहे, असा गैरसमज पसरवला जाऊ नये यासाठी आम्ही हे सार्वजनिक सांगत आहोत. आणि अपमान झालाच तर त्याला आम्ही नाही, तर ग्रामपंचायत स्वतः जबाबदार असेल. दोन तीन वर्षांमध्ये वारंवार अर्ज विनंत्या करूनही फेरफार कसे झाले, कोणत्या दस्तांच्या आधारे झाले, फेरफारची नोटीस बजावण्यात आली होती का, हेच ग्रामपंचायतीला सांगता येत नाही! इतकंच समजलं, ओले झालेले दस्त सुकवायला ठेवले आणि जळाले! बरे, आमचेच दस्त जळाले कि सर्व गावचेच जळाले, हे कळाले नाही.
जे डाकू आप्पा सारख्या खमक्या पंचाला जुमानत नाहीत, ते इतरांना कसे निभावणार? हेही कळतं. आप्पा ग्रामपंचायतीत असो वा नसो, आमच्या विनंतीला मान देऊन ते आमच्या जमिनींचा वाद सोडवायला नेहमी हजर असत. लाखन माखन काय चीज आहे, हे त्यांच्याइतके गावातील दुसऱ्या कुणी क्वचितच ओळखलं असेल. पुनः पुन्हा पंच बोलावून आम्हीही हैरान झालो होतो. पोरांनू माझ्यावर विश्वास ठेवा, म्हणणारा तात्या होता तोपर्यंत आम्हालाही आशा होती. तात्याचा मामा झाला आणि सत्तेची सूत्रे लाखन माखनच्या हाती आली! आम्ही खरे मालक असूनही आम्ही नम्र विनंत्या केल्या, हांजी हांजी केली, आणि कृपादृष्टी होईल याची आशा ठेवली. भल्या भल्या पंचाना नामोहरण करणारे कुशल कलाबाज आम्ही पंचायतीला अर्ज दिला, म्हणून लगेच सुधारतील या भ्रमात आम्हीही नाही.
मला रामपूर गावच्या तंटा मुक्तीच्या माजी अध्यक्षांनी आमच्या अर्जाचे उत्तर देताना कशी दिलगीरी व्यक्त केली होती, तो प्रसंग आठवला. ते खजिल होऊन म्हणाले होते, "मी त्यांना परोपरीने समजाऊन पाहिले - जाधवांच्या जमिनी सहा भावांची एकत्र मिळकती आहेत, आम्हालाही ते माहीत आहे. विनाकारण वाद का घालता, समजूतीने त्यांच्या हिश्शांच्या जमिनी त्यांच्या नावावर करून द्या. ते ज्या जमिनी कसत आहेत, त्याच त्यांच्या नावावर करून द्यायच्या आहेत. गोविंद जाधवांची जमिन मागत नाहीत ते, त्यांची हक्काची जमिन मागतात. पण ते, सगळ्या जमिनी गंगाजी जाधवांनी केवळ एकट्यांनी खरेदी केल्या आहेत, त्यामुळे सर्व जमिनी त्यांच्या एकटयाच्या आहेत असे ते म्हणतात. स्वतःच्या नावाचे कागद दाखवले त्यांनी, मग आम्ही काय करायचे सांगा?"
"मामा, तुम्हाला माहित आहे की नाही, सर्व जमिनी जाधवांच्या सहा भावांच्या समकाईतल्या आहेत ते?"
"अरे माहित असेना तर, वाटणी करताना आम्ही होतोच की!"
"आता पुढे आम्ही काय करावे म्हणता?
"इथे होणार नाही. खूप समजावून पाहिलं. तुमचा जमिनीशी काहीच संबंध नाही असं बोलतात. समजूतदारपणा असेल तरच तंटा मुक्तीत न्याय मिटतात."
समजूतदारपणाची बाधा आडवी आल्याने हा रस्ता कायमचा बंद झाला. . .
***********************
चुलत भाऊ अनिल फोन करून मला त्राग्याने एकदा ओरडलाच, "अरे, तू डाकू डाकू म्हणत सर्व गावांसमोर बोंबलून काही साध्य होणार आहे का? राजू, अमृत, अशोक - तू ज्यांना डाकू डाकू म्हणतोस त्यांच्या गळ्यांत गळा घालून उघडपणे गावात युगलगीत गात फिरतात! त्यांच्याच काय, तुमच्या घरांतल्या बायकांही त्यांच्या साड्या धुतात - माहित आहे का तुला! मी गावी जात नसलो तरी तुझ्यापेक्षा गावची जास्त माहिती असते मला. गावाला तूच खोटं बोलतोस, लिहितोस, असे का नाही वाटणार? स्वतःच्या नाही तर तात्याच्या हिश्शाच्या जमिनी हडप करण्यासाठी आम्ही केस केली आहे, असं त्यांनी जगभर केलंय! वर आपलेच भेदी त्यांना साथ देतात. तुझेच भाऊ, तुमच्याच बायका, तुझ्या पाठीत खंजीर मारतात - त्याला गाव काय करणार सांग? घर का भेदी, लंका ढाय - फक्त म्हण नाहीये!"
थोडं शांत होत त्याने पुढे समजावायला सुरुवात केली, "हे बघ, चार तुकडे, चार हडकं, चार चमड्या, आयुष्यभर पुरत नाहीत, असं म्हणतोस. ते बरोबरही आहे. पण ते तू आपले म्हणतोस त्या माणसांना पटवं - मग मानलं तुला! तुझ्या माघारी डाकूबरोबर तुझी बोली लावतील ते - आहेस कुठे! आम्ही डाकूंशी सलगी केल्याने तुमच्या केसमध्ये काही फरक पडणार नाही, याची ते तुला पटणारी अनेक कारणे सांगतात ना? राग मानू नको, पण खरं सांगायचं तर तू मूर्ख आहेस, म्हणून तुला ती पटतात! तू तोंडात काय आहे ते बघतो, आणि मी पोटात काय आहे ते बघतो! त्यामुळे तुझा अंदाज चुकतो आणि माझा हिशेब बरोबर येतो."
"ठिक आहे, तुझा त्यांच्यावर विश्वास आहे. चांगली गोष्ट आहे. काहीही असलं तरी ते आपले भाऊ आहेत. पण नको त्या लोकांवर डोळे झाकून नको तितका विश्वास ठेवतोस म्हणून मला राग येतो. राजू, अमृत, किंवा अशोक यांच्या एक गुंटा जमिनीवर तू कब्जा कर, किंवा तुझ्या भावाला सांग - पिंट्याला सांग ट्रक्टराने त्यांच्या शेतातली चार तासं नांगरायला - बघ कसे वागतात ते तुझ्याशी! त्यानंतर हजारो गुंटे लुटूनही डाकूंच्या खाद्यांवर प्रेमाने वात्सल्याचा हात ठेवणारे लोक तुझ्याही खांद्यावर तसेच ममतेने हात ठेवू लागले, तर ते संत तुकारामासारखे मोठे संत साधूपुरुष आहेत, असं समजायला हरकत नाही. मनाच्या मोठेपणामुळे त्यांनी डाकूंशी संगत केली आहे असं समजायला हरकत नाही. माझा म्हणशील तर - त्यांच्यावर दमडीचा विश्वास नाही! अनेक बनेल लोकांशी दररोज भेट होते माझी! कुणाला कशासाठी वात्सल्य येतं, का पान्हा फुटतो, हे मला पटकन समजतं. काहीतरी मोठा लाभ असल्याशिवाय या जगात कुणीच कुणाचं *** धूत नाहीत - हे माझं मत कुठेतरी लिहून ठेव. या लोकांनी पुढे जाऊन तुझ्या पाठीत सुरा खुपरला कि, वाचून माझी आठवण कर. लांडण्यांची कोल्हयांची दोस्ती चांगला माणूस विनाकारण करत नाही, हेही लिहून ठेव. तुझे डाकू लाखन - माखन - आणि तिसरा कोण तो - तुझी नाटके वाचतो मी. मलाही डॉयलॉग येतात. अगदी अस्सल डॉयलॉग येतात. तू लढून थकलास ना, की मी येतो फडात!"
मी सुन्न...!!!
माझ्या माघारी वेगळंच महाभारत घडवलं जातंय, ते मीही ऐकलं होतं. काही माणसाचा स्वभाव संत नामवदेवा सारखा सात्विक असतो. त्यामुळे शेकडो वेळा अंगावर थुंकलं तरी, शिवी न देता पुन्हा अंघोळ करून येतात. स्वतःचं नुकसान करणाऱ्यालाही ते आपलं मानतात, ऐवढे मोठे मन असते त्यांचं. आपल्याही घरी पूर्व पुण्याईने संत नामदेव, संत तुकाराम, अशी सात्वीक पात्रे जन्माला आली असतील, असा माझा कयास होता. माझे विचार आध्यात्मिक, याउलट अनिलचे विचार व्यवहाराने तावून सुलाखून निघालेले. त्याच्या वक्तव्याने नाही म्हणता मी बराच धास्तावलो. जाधव घरातल्या लोकांचे डाकू लोकांबरोबरचे असलेले धनिष्ठ संबंध संत नामदेवा सारखे उच्च दर्जाचे सात्विक असतील याची खात्री वाटेना. सात्विक मुखवटया आड काही कपटी कारस्थान शिजत असेल का, ही कल्पना अस्वस्थ करू लागली. या अगोदर आपल्या घरचे लोक मुर्ख, वेंधळे, मठ्ठ, निर्बुद्ध वैगेरे आहेत, त्यामुळे पुढे जाऊन त्यांचे होणारे अपरिमित नुकसान त्यांना कळत नाही, अशी माझी समज होती. त्यामुळे त्यांचे असे विपरित, उपराटे वर्तन रात्रदायक, नुकसानकारी असले तरी, मी ते दुर्लक्षित करून टाकायचा. अनिलने यामागे कदाचित कपटही असेल, हा नव्याने दाखवलेला अवसान घातकी किडा मात्र डोक्यात शिरून माझा मेंदू कुरतडू लागला. मी मोकळेपणाने ज्यांना आपली गुपिते सांगत असतो ते हस्तक आहेत का, या कल्पनेने माझे धाबे दणालले. शत्रूच्या ताटात जेवून आम्हाला तोंडदेखलेपणाने, आम्ही मनाने तुमच्या सोबत आहोत, असे म्हणणाऱ्या लोकांचा भरवशा वाटेना झाला.
अश्वस्थता वाढली तशी याविषयी मी सुधीरशी बोललो. त्याचेही तेच मत पडलं. तो बोलला, "गुंठे कशाला, पिंटयाला सांगून त्यांचा बांध नांगरायला सांग! तुला वाटतं, तसा हा प्रकार खाण्या पिण्याचा मुळीच वाटत नाही. आम्हाला समजत नसलं तरी कट कारस्थान काहीतरी खूप मोठं आहे. केवळ खाण्या पिण्यासाठी बाराशे गुंठ्यांवर पाणी सोडायला तू समजतोस तितके लोक दुधखुळे नसतात. त्या प्रकरणांत दोन्ही बाजूंनी आमचं मोठं नुकसान होणार हे मात्रं खरं. शनी राहू केतूच्या अनिष्ठ युतीमुळे आमच्या मागे मात्र साडेसाती लागणार आहे. बाराशे गुंठे हडपले त्यांच्याशीच लाळघोटेपणा, हे माणसाच्या मूळ नैसर्गिक प्रवृत्तीच्या विरुद्ध आहे. त्यांच्यासाठी जमिनीपेक्षा जास्त फायदा काय? असा विचार करून बघ. आणखी मोठा जमिनीचा हिस्सा? पैसे? बिघाड केला तर केस जिंकून मिळणाऱ्या जमिनीपेक्षा दोन तीन एकर तुला जास्तच देतो. बाकीच्यांचे नुकसान होते तर होऊदे, तुला काय करायचे आहे. तुझा लाभ बघ. मागच्या बाजूने तुला दोन तीन एकर जादा देतो, असा छुपा करार झालेला नसेल कशावरून? हपापाचा माल गपापाला! त्यांच्या बापाचे काय जाते? अस्सल डांकूशी सलगी करणारे अव्वल सज्जन असतात, यावर माझा विश्वास नाही. डाकूंशी सलगी केली तर डाकू सुधारतील, असे सलगी करणारे सांगत असले तरी मला ते पटत नाही. पाच हजार वर्षांच्या भारताच्या इतिहासात केवळ एकाच लुटारूचा वाल्मीकी झाला. बाकीचे अजूनही दरोडेच घालताहेत. त्यात हे कलियुग आहे. सख्ख्या भावाने भावाचा काटा न काढता सौंदाहर्य दाखवलं, तर वर्तमान पत्रांत कौतुकाने छापुन येतं. आपण तर चुलत भाऊ आहोत. आम्ही लबाड आहोत, हे गावाला न बोलता पटवून देण्यासाठी आणि आमची बाजू कमजोर करण्यासाठी खूप हुशारीने गेम खेळला जातो आहे, असं मला वाटतं. मनाने तुमच्या बाजूला, आणि तनाने डाकूंच्या टोळीत! हे कुठले शहाणपण? युद्धशात्रात शिकवलं जातं, शत्रूंशी हातमिळवणी करणारा एखादे दिवशी आपल्याला धोका देणार आहे हे पक्कं समजून चला! शत्रूशी जवळीक करणारा एकतर शत्रूच्या पाठीत सूरा खूपसतो किंवा स्वकियांच्या! तो स्वस्थ राहूच शकत नाही. राजकारणातही अशीच अनेक उदाहरणे आहेत. मनाचा मोठेपणा दाखवत विरोधी पक्षांशी जो घनिष्ठ संबंध ठेवतो आहे असे जो भासवतो, तो संधी मिळाली की, पाच दहा आमदार उचलून विरोधी पक्षांतच टूनकन उडी मारून जातो. आणि सरकार कोसळतं! गावांतही असं होतं, ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत तारखा जाहीर होईपर्यंत तुमच्या पक्षांत निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून मिरवणारा, विरोधी पार्टीचा प्रचार करताना दिसतो!"
अस्वस्थता आणखीनच वाढली. शत्रूपेक्षा जवळच्यांनी केलेले घाव खूप खोलवर लागतात हे खरे आहे. कारण तेच सर्वांत जवळ असतात, हा सिद्धांत इतिहास, भौतिक विज्ञान, आणि अभियांत्रिकी विज्ञानामध्येही शिकवला जातो.
ज्या मामाने लहानपणा पासून स्वतःच्या घरी पालन पोषन करून कॉलेजपर्यंतचा शिक्षणाचा खर्च उचलला. हौसमौज केली, लोकांना सायकल मिळत नव्हती त्याकाळी कौतुकाने त्यावेळची प्रसिद्ध राजदूत बुलेट दिली. त्या लाडक्या भाच्याने उपकाराची परतफेड म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्याच सख्ख्या मामाच्या, कै गोपाळ जाधव यांच्या अर्ध्यापेक्षा जास्त जमिनी आपल्या बायको मुलाच्या नावे केल्या! विश्वास ठेवताना माणसाची पत पहावी. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ, ही पोक्त अनुभवातून आलेली व्यावहारीक म्हण आहे.
या सर्व गैरप्रकारामागे सत्ताधारी पक्षातला ठाण्यातील कुणीतरी मोठा राजकिय नेता आहे, अशी कुणकुण ऐकली होती. तो कोण, हे अजूनही समजलेलं नाही. तो कोण हे समजलं तर, त्याच्याच पक्षांकडून त्याचा सार्वजनिक जाहीर सत्कार घडवून आणायचा प्रायोजित विचार तुर्तास प्रलंबित आहे. . .
डाकू लाखन आणि माखन फक्त गावांतच नाहीत, आज ते आपल्या अक्कल हुशारीने आणि बुद्धीचातुर्याने शिकून अगदी मोठे अधिकारी होतात. आज ते पूर्वीसारख्या अक्राळविक्राळ दाढीमिशा ठेवत नाहीत. ते वरून अगदी सभ्य जंटलमन दिसतात. ते चोऱ्या करतात, डाके दरोडे घालतात - अगदी समाजाच्या नजरेसमोर - उघडपणे! पण कुणाची बिशाद आहे त्यांना डाकू, चोर म्हणायची!
महाराष्ट्र मंत्रीमंडळाने कायदा करून, डाकू कुणाला म्हणायचे, किंवा चोर कुणाला ठरवायचे, हा हक्क स्वतःकडे राखून ठेवला आहे! त्यामुळे समाजाच्या मताला किंवा तक्रारीला किंमत शून्य!
आज दारू सारखाच दरोड्याचा धंदा सरकारमान्य केला गेल्याने, सोमू-गोमूही न बिचकता या धंदयात उतरले आहेत. त्यामुळे आता गांव-वाडयांतून हा धंदा सरकारी बोसा सारखा जोमाने फैलावला आहे. कुणी मंत्र्याने किंवा अधिकाऱ्याने दरोडा घातल्याचे समजले तरी, आज लोक आवाक् होत नाहीत. हां, कुणी अधिकारी प्रामाणिक निघाला तर टाळा जरूर वासतो! अरे, हे बेणं भांगेत तुळस उगवावी तसं आलं कुठून? असे उदगार येतात!
आजचा मतदार राजाही हुशार आणि सजग झाला आहे. दारूची बाटली, किंवा पाचशेची टिकली हातात पडली की, डोळे झाकून तो दणकून शिक्का हाणतो! एकदा मतपत्रिकेवर आणि कायमचा आपल्या मुलांच्या भवितव्यावर!!!
धन्यवाद!
============================================================
Maharashtra Farmers Against Corruption - Chandgad, Kolhapur, Maharashtra, India