तक्रार नोंदी - Complaints Filed
तक्रार नोंदी - Complaints Filed
महाराष्ट्रातील गरीब कष्टकरी शेतकऱ्यांचा भ्रष्टाचारा विरुद्धचा लढा आणि संघर्ष!!!
Maharashtra Farmers Against Corruption
तक्रार नोंदी - Complaints Filed Against Corruption - भ्रष्टाचाराच्या दाखल केलेल्या तक्रारी
भ्रष्टाचाराविरोधात आम्ही दाखल केलेल्या तक्रारी:
सरकार आणि प्रशासनाचा रयतेविषयीचा आणि सामान्य समाज्याविषयीचा उपेक्षाभाव उदासीनता तुच्छभाव स्पष्ट दिसून येतो.
आम्ही गेल्या दीड वर्षांच्या कालावधीत, महाराष्ट्र शासन, केंद्र सरकार आणि संबंधित प्रशासनाकडे भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांसंदर्भात तक्रारी दाखल केल्या आहेत. अत्यंत खेदाची बाब म्हणजे इतका काळ उलटूनही आणि वारंवार पाठपुरावा करूनही, या तक्रारींवर शासन किंवा प्रशासकीय स्तरावर कोणतीही दखल घेतली गेलेली नाही. या तक्रारींवर कोणतीही चौकशी किंवा कार्यवाही झाल्याचे दिसत नाही. सत्तेचे कान बधिर झाले आहेत आणि रयतेच्या प्रश्नाविषयी सरकार उदासीन आहे. नोकरशाही आणि राजकारण्यांच्या या मौन सांठवळ्यामुळे भ्रष्टाचारी निर्भय आहेत.
तक्रारींचा खालील तपशील पाहा:
1. चंदगड रजिस्ट्रार ऑफिस मध्ये बेकायदेशीर दस्त बनवून शेतजमिनी लुबाडण्याच्या गैरप्रकाराबद्दल तक्रार
या तक्रारीमध्ये चंदगड रजिस्ट्रार ऑफिसमध्ये बेकायदेशीर दस्त तयार करून गरीब असहाय्य शेतकऱ्यांच्या शेतजमिनीं गैरप्रकारे लुबाडल्या जात आहेत. पण वारंवार तक्रारी नोंद करूनही संबंधित अधिकार्यांविरुद्ध अद्यापही कोणतीच कार्यवाही झालेली नाही किंवा गैरप्रकाराची दखल घेतली जात नाही.
2. India's Corrupt Bureaucratic Vampires Feast on Poor Farmers Blood – A National Scandal
या तक्रारीत भारतातील भ्रष्ट नोकरशाहीकडून गरीब शेतकऱ्यांचे निर्घृण पणे कसे शोषण केले जात आहे, हे स्पष्ट केले आहे. या प्रकरण राष्ट्रव्यापी घोटाळा म्हणून सरकारकडून तत्काळ लक्ष दिले जाण्याची अपेक्षा होती. पण दुर्दैवाने याही गैरप्रकाराची दखल घेतली जात नाही.
3. PG Portal Feedback Regarding: DEPOJ/E/2024/0000165 - Extremely Frustrated & Hopeless
केंद्र सरकारची ही महत्वाकांक्षी योजना आहे, पण निष्क्रीय अधिकाऱ्यांमुळे आपल्या माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी कार्यान्वित केलेल्या या तक्रार निवारण प्रणालीच बोजवारा उडाला आहे. या यंत्रणेची अवस्था अत्यंत निराशाजनक आणि हताशकारी आहे. अनेक वेळा पाठपुरावा केला गेला असून, अजूनही कोणतीही कार्यवाही होत नाही.
Maharashtra Farmers Against Corruption
चंदगड तहसील नोंदणी कार्यालय, चंदगड, कोल्हापूर, महाराष्ट्र - ४१६५०९.
Chandgad Tehsil Registry Office, Chandgad, Kolhapur, Maharashtra - 416509.
Maharashtra Farmers Against Corruption - Chandgad, Kolhapur, Maharashtra, India