Blog 2 - महाराष्ट्रातील शेतकरी देशात सर्वाधिक कर्जबाजारी; चंदगडमध्येही भ्रष्टाचाराच्या गर्तेत पिडीत शेतकरी
Blog 2 - महाराष्ट्रातील शेतकरी देशात सर्वाधिक कर्जबाजारी; चंदगडमध्येही भ्रष्टाचाराच्या गर्तेत पिडीत शेतकरी
महाराष्ट्रातील गरीब कष्टकरी शेतकऱ्यांचा भ्रष्टाचारा विरुद्धचा लढा आणि संघर्ष!!!
Maharashtra Farmers Against Corruption
Blog 2 - महाराष्ट्रातील शेतकरी देशात सर्वाधिक कर्जबाजारी; चंदगडमध्येही भ्रष्टाचाराच्या गर्तेत पिडीत शेतकरी
चंदगड, कोल्हापूर: कृषीप्रधान भारताच्या ‘विकास’ाचा गाजावाजा होत असताना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सादर केलेली आकडेवारी हे अपयशाचे भेदक प्रमाणपत्र ठरते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर सर्वाधिक म्हणजे तब्बल 8.38 लाख कोटींचे कर्ज आहे, असे या अहवालात स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांचे जीवन हे केवळ कर्जाच्या ओझ्यामुळेच नव्हे, तर स्थानिक पातळीवरील भयावह भ्रष्टाचारामुळेही उद्ध्वस्त झाले आहे.
चंदगडमध्ये अनुदान योजना, सिंचन प्रकल्प, कृषी यांत्रिकीकरण, बियाणे वाटप, पशुधन योजना अशा अनेक सरकारी योजनांचे लाभ खऱ्या लाभार्थी पर्यंत पोहोचत आहेत हा, याची शहानिशा केली जायला हवी. शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा मोठ्या गाजावाजात होते, पण प्रत्यक्षात बहुतांश शेतकऱ्यांची नावे अपात्र ठरवली जातात. चंदगडमध्ये अनेक शेतकरी आजही मागील कर्जाच्या वसुलीसाठी बँकांकडून त्रास सहन करत आहेत. त्यातच महागडी खते-बियाणे, बाजारभावाचा फोल धोका आणि शासकीय यंत्रणेतील भ्रष्टाचार यामुळे शेतकऱ्यांचा गळा अधिकच आवळला जातो.
महाराष्ट्रासारख्या राज्यात देशात सर्वाधिक कर्जबाजारी शेतकरी असण्याचे मूळ कारण हे केवळ नैसर्गिक संकट नाही, तर शासकीय अपयश आणि भ्रष्टाचारच आहे.
दैनिक लोकमतच्या सौजन्याने.
Maharashtra Farmers Against Corruption - Chandgad, Kolhapur, Maharashtra, India