मांडेदुर्ग केस 4: विभागणीची - चंदगड न्यायालयातील - Mandedurg Civil Case 4: Partition in Chandgad Court - R.C.S. 109/2023
मांडेदुर्ग केस 4: विभागणीची - चंदगड न्यायालयातील - Mandedurg Civil Case 4: Partition in Chandgad Court - R.C.S. 109/2023
महाराष्ट्रातील गरीब कष्टकरी शेतकऱ्यांचा भ्रष्टाचारा विरुद्धचा लढा आणि संघर्ष!!!
Maharashtra Farmers Against Corruption
मांडेदुर्ग केस 4: विभागणीची - चंदगड न्यायालयातील - Mandedurg Civil Case 4: Partition in Chandgad Court - R.C.S. 109/2023
चंदगड दिवाणी न्यायालय: R.C.S. 109/2023 - प्रतिपक्षाचा गैरप्रकार सिध्द होऊनही तारीख पे तारीख.
रे. क. नं. 109/2023
मा. दिवाणी न्यायाधीशसो, क. स्तर, चंदगड
यांचे कोर्टात.....
1. श्रीमती अनुबाई उर्फ शांताबाई मारुती जाधव } वादी
विरुध्द
1) श्री. महादेव नाना पाटील वगैरे } प्रतिवादी
उद्देश: केस नंबर: R.C.S. 109/2023 संदर्भात पुरावे आणि म्हणणे दाखल करणे.
Stage of Case: Argument on Exh. - Unready
दस्त दाखल दिनांक: 28 ऑक्टोबर 2024
टिप: R.C.S. 89/2018 आणि R.C.S. 109/2023 या दोन्ही केसमधील सर्व बाबी, मुद्दे, साक्षीदार, पुरावे, दोन्ही पक्षकार एकाच मालमत्तेच्या समान विवादाशी संबंधीत असल्याने पूर्व केसमधील सर्व बाबी, पुरावे, साक्षी, न्यायालयाची निरीक्षणे, निकाल या कोर्टमध्ये पूर्वपिठीका म्हणून ग्राहय धरण्यात याव्यात. शिवाय या दोन्ही केसना "रेस जुडिकाटा" (Res Judicata) तत्व लागू करावे, ही विनंती आहे.
माननीय न्यायाधीश महोदय,
मी श्रीमती शांताबाई मारुती जाधव (लग्नापूर्वी अनुसया / अनुबाई नाना पाटील), मु. पो. रामपूर / डुक्करवाडी, तालुका चंदगड येथील रहिवासी आहे. माझे वडील कै नाना सुबराव पाटील हे मांडेदुर्ग, तालुका चंदगड येथील रहिवासी होते. माझे वडिल दिनांक 18 नोव्हेंबर 2003 रोजी निधन पावले. त्यांच्या निधनानंतर आमच्या वडिलोपार्जित आणि परंपरागत मालमत्तेवर मी कायदेशीर हक्कदार आहे. हिंदू वारसा कायदानुसार, आमच्या वडिलोपार्जित मालमत्तेचे वारस प्रथम ज्येष्ठ मुलगी म्हणून मी, आणि माझा कनिष्ठ सावत्र भाऊ आणि कनिष्ठ सावत्र बहिण आहोत.
माझ्या वडिलांचा कै नाना सुबराव पाटील यांचा माझ्या आईशी कै यल्लूबाई हिच्याशी तत्कालीन वैधिक पद्धतीने समाजमान्य विवाह झाला होता. त्या दोघांचे मी प्रथम अपत्य होते. त्यानंतर त्यांनी कै लक्ष्मीबाई हिच्याशी दुसरा विवाह केला. श्री महादेव नाना पाटील आणि सौ सरस्वती भैरू गावडे ही त्यांच्या दुसऱ्या पत्नीपासून झालेली अपत्ये आहेत.
माझा सावत्र भाऊ आणि बहिण अनुक्रमे श्री महादेव नाना पाटील आणि सौ सरस्वती भैरू गावडे यांनी माझा कायदेशीर हक्क नाकारला होता. त्यामुळे मी माननीय न्यायालयात दाद मागण्यासाठी जाणार होते, पण तत्पूर्वीच माझ्या सावत्र भावाने चलाखी करत माझ्याविरुद्ध स्वतःच केस दाखल केली. त्यांनी प्रथम माननीय न्यायालय चंदगड येथे आणि तेथे हार झाल्यानंतर माननीय न्यायालय गडहिंग्लज येथे दावा दाखल केला होता. मी सदर दोन्ही माननीय न्यायालयांच्या शेवटच्या निकालाच्या (Order on Exhibit) प्रति सोबत जोडत आहे.
1. माननीय चंदगड कोर्टचा (CIVIL AND CRIMINAL COURT CHANDGAD) निकाल संदर्भ थोडक्यात: केस नंबर: R.C.S. 89/2018
माझ्या सावत्र भावाने माझा कायदेशीर हक्क नाकारण्यासाठी दिनांक 19 जून 2018 रोजी CNR Number: MHKO140003122018, Filing Number: 105/2018, Case Type: R.C.S. - Regular Civil Suit, Under Acts: Hindu Succession Act, Section 6, Specific Relief Act, Section 38 .Registration Number: 89/2018 ही केस माननीय चंदगड न्यायालयात दाखल केली होती. पण न्यायालयाने स्पष्ट शब्दांत नोंदवले कि, मी सह-मालक असल्यामुळे माझ्यावर असा आदेश लागू होऊ शकत नाही. (Order on Exhibit पान नंबर .)
2. माननीय गडहिंग्लज कोर्टचा (ADDL SESSIONS COURT GADHINGLAJ) निकाल संदर्भ थोडक्यात: केस नंबर: R.C.S. 7/2020
माननीय चंदगड कोर्टचा निकाल माझ्या बाजूने आल्याने सावत्र भावाने नंतर माननीय गडहिंग्लज कोर्टमध्ये दिनांक 15 फेब्रुवारी 2020 रोजी CNR Number: MHKO080001212020, Filing Number: 66/2020, Case Type: Civil M.A. - Civil Misc. Application, Registration Number: 7/2020, ही अपिल केस माननीय गडहिंग्लज न्यायालयात दाखल केली होती. (Order on Exhibit पान नंबर .)
3. माननीय चंदगड कोर्टातील (CIVIL AND CRIMINAL COURT CHANDGAD) दुसऱ्या केस संदर्भात: केस नंबर R.C.S. 109/2023
श्रीमती शांताबाई मारुती जाधव यांचे पूर्व वकिल ठरल्याप्रमाणे वाटणी विभागणीसाठीयाच न्यायालयातील R.C.S. 89/2018 या केसमध्ये काऊंटर क्लेम टाकायला विसरल्यामुळे, R.C.S. 109/2023 ही वेगळी केस दाखल करावी लागली आहे.
या प्रकरणात आम्ही सादर केलेले मुद्दे, युक्तिवाद, तसेच संबंधित पुरावे आणि तथ्ये यांचे बारकाईने मूल्यांकन करून, माननीय न्यायालय ज्युडिशियल अंडरस्टॅण्डिंग नुसार संबंधित परिस्थितीचे आकलन आणि विश्लेषण करेल आणि न्यायपूर्ण निर्णय देईल, यावर आम्हाला संपूर्ण विश्वास आहे.
श्रीमती शांताबाई मारुती जाधव (लग्नापूर्वी अनुसया / अनुबाई / अनुताई नाना पाटील) ही कै नाना सुबराव पाटील, मांडेदुर्ग यांची जेष्ठ मुलगी आहे आणि त्यामुळॆ नैसर्गिक प्रमुख वारसदार आहे. पण श्री महादेव नाना पाटील यांनी कै नाना सुबराव पाटील यांना आणखी कुणीच वारस नाही, असे संबंधित महसूल विभागाला भासवून सर्व जमिनी आपल्या नावे नोंदवून घेतल्या. प्रतिपक्षाने न्यायालयीन प्रोसिजरचा टूलकिट सारखा वापर करून वारंवार श्रीमती शांताबाई उर्फ अनुबाई उर्फ अनुसया यांना वारंवार त्रास दिला आहे. न्यायालयीन अधिकारांचा गैरप्रकार करण्यासाठी टुलकीट सारखा वापर करणे हा गंभीर गुन्हा आहे, हे माननीय न्यायालय जाणतेच.
कोर्टातील केस प्रभावित करण्यासाठी प्रतिपक्षाने अनेकानेक खोटे दस्त, खोटी माहिती, खोटे दावे, Limitation Act Section 5 चा गैरवापर, हेच काय खोटी क्रिमिनल केसही दाखल केली गेली आहे. त्यांनी सादर केलेल्या सर्व बाबी खऱ्या कशा आहेत हे सिध्द करण्याची जशी प्रतिपक्षाची जबाबदारी आहे, तशीच आम्ही केलेले दावे खरे कसे आहेत, ते सिध्द करणे ही आमची जबाबदारी आहे. या तत्वाला अनुसरून आम्ही आमचे मुद्दे तथ्यासह सादर करत आहो:
1. खोटे वाटणीपत्र (Forged Partition Deed) बनवण्यात आले:
श्री महादेव नाना पाटील यांनी कै नाना सुबराव पाटील यांनी स्वतःच्या हयातीत चंदगड सब रजि. दस्त नं. ८५८/२००० या दस्ताने ता. २८/०६/२००० रोजी "दावा मिळकतीचे वाटणीपत्र" केले होते, असे खोटे दस्त तयार करवून घेतले आहे. ते दस्त RTI अंतर्गत मिळवले असता, ते अनेक बाबीवरून खोटे व Forged असल्याचे लक्षात आले. (त्यासंबंधीचे तथ्य-पुरावे आणि पुरावे पान नंबर वर दिले आहेत.) दुसऱ्याची मालमत्ता बेकायदेशीर हडपण्याच्या उद्देशाने याचा दुरुपयोग झाला आहे.
2. कोर्टाला खोटी माहिती दिली:
याच मालमत्तेशी संबंधित पूर्व चंदगड दिवाणी न्यायालयातील दावा R.C.S. 89/2018 (Exh 5) नुसार श्रीमती शांताबाई मारुती जाधव ही कै नाना सुबराव पाटील यांची मुलगी असलेचा, मा न्यायालयाने साक्षी-पुराव्या नुसार निकाली दिलेली बाब, कोणत्याही ठोस पुराव्याविना याच कोर्टात पुन्हा उपस्थित करून न्यायालयाच्या निकालावर संभ्रम निर्माण केला आहे. याच्याशी संबंधित पुरावे पान नंबर वर दिले आहेत.
3. खोटे दावे (False Claims) सादर केले गेले:
सहानुभूती मिळवण्यासाठी श्री महादेव नाना पाटील यांनी स्वतःविषयी खालील खोटे दावे कोर्टात सादर केले आहेत:
Old Aged Person - केस दाखल त्यावेळी त्यांचे वय ४८ वर्षें होते, या वयाच्या व्यक्तीला old समजले जात नाही.
Physical Impairment - शारीरिक अपंगता आहे ही बाब खरी नाही.
Physical Disability -शारीरिक अक्षमता ही बाब खरी नाही.
He is Helpless - प्रत्यक्षात पट्ट्या पुऱ्या गावाशी पंगा घेतो!
Mala-fide Intention - दुष्ट उद्देश किंवा वाईट हेतूने त्रास देण्याचा निराधार आरोप केला.
Mal Practices - त्रास देण्यासाठी अनधिकृत पद्धतींचा वापर केल्याचा आरोप केला.
4. मा. कोर्टात खोटे मुद्दे मांडले (Presentation of False Issues in Court):
प्रतिपक्षाने केस लांबविण्यासाठी आणि सहानभूती मिळवण्यासाठी उभ्या पिकाची नासधूस केली, मारण्याची धमकी दिली, असे खोटे मुद्दे मांडले आहेत. श्रीमती शांताबाई ही कै नाना पाटील यांची मुलगी नसल्याची आवई उठवली, पण त्याचवेळी ती दुसऱ्या कुणाची मुलगी आहे हे सिध्द करता आले नाही.
5. खोटेअंध आणि अपंग असलेचे सर्टिफिकेट सादर केले (False Locomotor Disability & Blindness Certificate):
कोर्टात लोकोमोटरी डिसॅबिलीटी आणि ब्लाईंडनेस सर्टिफिकेट सादर केलेली, ही व्यक्ती वर्षांनुवर्षे स्वतः कोर्टापर्यंत मोटरसायकल चालवत येते! न्यायालयातील CCTV फुटेज तपासून ही बाब खरीखोटी ठरवता येऊ शकते. खोटे दिव्यांग प्रमाणपत्र सादर केले असेल, तर हे फसवणुकीचे सरकारी कागदपत्र सादर करण्याचे गंभीर गुन्ह्यात मोडते.
6. चंदगड फौजदारी कोर्टामध्ये खोटी मारामारीची केस दाखल केली - Cri.M.A. 170/2020:
माननीय न्यायालयाने खरोखरच खूप कुतूहलाने श्री महादेव नाना पाटील यांची मारामारी संबंधी केसचे अवलोकन करणे आवश्यक आहे. एकूण पंधरा लोकांनी बेदम मारल्याने कपडे फाटल्याची नोंद पोलीस रिपोर्टला आहे. अंगभर बँडेज बांधलेल्या आवस्थेत तो कोर्टात हजर झाला होता. गेल्या चार वर्षांपासून फिर्यादी स्वतःच साक्षी-पुरावे सादर करण्यासाठी विलंब मुदत मागतो आहे! त्यांनी मारामारीचे केलेले वर्णन आणि मेडिकल रिपोर्ट अवलोकन करण्यासारखा आहे. ते Medico-Legal Certificate चंदगड ग्रामीण रुग्णालयाचे तज्ञ डॉ. साने आणि दिले आहे. मारामारीची आणि रिपोर्टची तारीख एकच आहे. म्हणजे त्यांची शारीरिक तपासणी करून डॉ. साने यांनी त्याच दिवशी दिनांक 08-12-2019 ला हा रिपोर्ट दिला आहे. त्या रिपोर्टनुसार श्री महादेव नाना पाटील यांच्या शरीरावर दोन जखमा आढळून आल्या. (पुरावा पान नंबर वर आहे.)
पहिल्या जखमेचा प्रकार - Abrasion (चिघळणे), आकार - 1 सेमी x 1 सेमी, स्थान - उजवा गुढघा, जखमेची तीव्रता - साधी, हत्यार - कठोर आणि बोथट, वेळ - दोन दिवसांपूर्वीची!!!
दुसऱ्या जखमेचा प्रकार - Abrasion (चिघळणे), आकार - 1.5 सेमी x 1.5 सेमी, स्थान - उजवा पोटरी, जखमेची तीव्रता - साधी, हत्यार - कठोर आणि बोथट, वेळ - दोन दिवसांपूर्वीची!!!
आता प्रश्न असा निर्माण होतो कि, त्याच दिवशी झालेली जखम चिघळली कशी? शिवाय असे कोणते हत्यार आहे ज्याने 1 सेमी किंवा 1.5 सेमी डायमीटरची जखम होते?
7. वरील मारामारीची चंदगड पोलीस ठाण्याला FRI नोंदवली:
N.C.R. Report Registered on: 08-12-2019.
Non-Cognizable Offense Information Report - Under Section 155 Cr.P.C.
अंगभर बँडेज बांधलेल्या आवस्थेत श्री महादेव नाना पाटील पोलीस ठाण्याला हजर झाला होता. वर डॉ. साने यांनी दिलेले Medico-Legal Certificate पाहून पोलिसांना घटनेचे गांभीर्य समजले. संघटना, जमाव करून एका निष्पाप व्यक्तीला क्रूरतेने मारल्याने, त्यांनी तात्काळ हुकूमनामा काढून पंधरा आरोपीना बोलावले, दम दिला आणि रुपये 5000 दंड ठोठावला! (पुरावा पान नंबर वर आहे.)
8. दैनिक पुढारी मध्ये धमकीवजा जाहीर निवेदन दिले:
श्री महादेव नाना पाटील यांनी दिनांक ११ जून २०२० रोजी दैनिक पुढारी मध्ये धमकीवजा जाहीर निवेदन दिले. ज्यात त्यांनी आत्महत्या करण्याची भीती घालून अतिरिक्त अनैतिक दबाव आणायचा प्रयत्न केला. (पुरावा पान नंबर वर आहे.)
9. सावत्र बहिणीने विष घालून आणि डोक्यात पाटा घालून जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचा ब्रभा केला:
माननीय प्रतिपक्ष वकिलांनी श्री महादेव नाना पाटील is Gentleman, simpleton in nature असे जे त्यांचे कोडकौतुक केले आहे, त्या व्यक्तीने सावत्र बहिणीने विष घालून आणि डोक्यात पाटा घालून त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचा ब्रभा गावोगावी केला. आणि त्यानंतर बिचारी आईविना पोरकी अश्राप पोर म्हणून तिच्याविषयी असलेली माहेरच्या गावातली अपुलकीही संपली. कपाळाचं कुंकू पुसलं, पण सावत्र भावाने कपाळी लावलेला बदनामीचा कलंक काही तिला पुसता आला नाही.
10. मालमत्ता हडपण्यासाठी नाते नाकारले - Absolutely Stranger दाखवले:
श्रीमती शांताबाई जाधव यांचा legal share बळकावण्यासाठी त्यांना आपण मुळीच ओळखत नाही, असे कोर्टाला भासवले. ही व्यक्ती आपल्या पत्नीसह श्रीमती शांताबाई जाधव यांच्या मुलाला लग्नात आहेत देण्याचा फोटो आहे. (फोटो पुरावा पान नंबर वर पाहा.)
हा फोटो खोटा असल्याचा कांगावा केला जाऊ शकतो, त्यामुळे advanced forensic technology द्वारे "दावा मिळकतीचे वाटणीपत्र" बरोबरच या "फोटो" ची सिध्दता शास्त्रीय पध्दतीने करायला आमची पूर्ण संमती आहे.
11. श्रीमती शांताबाई यांच्यावर स्वतःचा खोटा लग्न दाखला सादर केल्याचा आरोप केला:
कु. अनुबाई /अनुताई नाना पाटील हिचे लग्न दिनांक 23-03-2071 ला श्री मारुती गुंडू जाधव यांच्याबरोबर झाले होते. वडील / पालक: श्री गंगाजी नागोजी जाधव असे होते. यातील Typo Mistake "2071" चा अवांतर कांगावा करून, शिवाय वडील श्री गंगाजी नागोजी जाधव हे कसे असू शकतात, असा आक्षेप घेतला. पालकला कायदेशीर भाषेत "The person other than biological father" असे स्पष्ट अधोरेखित केले असतानाही, त्यांनी पुन्हा तीच बाब न्यायालयासमोर मांडली आहे. खोट्या अट्टाहासाला काही Legal Value असते का, याबद्दल आम्ही शांसक आहोत. (लग्न दाखला पान नंबर वर पाहा.)
पूर्व केसमध्ये ग्रांमपंचायत डुक्करवाडी यांनी मूळ रजिस्टर सहित आपला प्रतिनिधी कोर्टात पाठवून त्यांनी दिलेला दाखला खरा असल्याचे सिध्द केले होते आणि न्यायालयाने ते मान्य केले होते. (Order on Exhibit पान नंबर वर पाहा.)
12. DNA Test:
श्रीमती शांताबाई यांचे माहेराला असलेले सर्व पुरावे दस्त फोटो हेतुपूर्वक नष्ट केले गेले. पण एक पुरावा कुणालाच नष्ट करता येत नाही, तो म्हणजे DNA! कायदेशीर दस्तामधून ते पूर्वीच सिध्द झाले आहे, तरीही सावत्र बहिणीची आणि सावत्र भावाची DNA Test करून ही शंकाही दूर केली जाऊ शकते. दोघांची आई वेगळी असली तरी बापाकडून आलेले अर्धे DNA विज्ञानानुसार समान असतात. शिवाय DNA चाचणीचे परिणाम कायदेशीरदृष्ट्याही मान्य असतात.
13. गडहिंग्लज कोर्टमध्ये Limitation Act, Section 5 नुसार फसवा Psudo दावा दाखल केला:
चंदगड दिवाणी न्यायालयाचा दावा क्र. R.C.S. 89/2018 चा प्राथमिक निकाल प्रतिकूल आल्याने, न्यायालयीन प्रोसिजरच्या तांत्रिक बाबींचा गैरफायदा घेण्यासाठी श्री महादेव नाना पाटील यांनी गडहिंग्लज कोर्टमध्ये लिमिटेशन ॲक्ट, सेक्शन 5 नुसार दावा सादर करून आपल्याकडे काही खास दस्त असल्याचे भासवत ३ वर्षें विलंबात घालवली. त्यांनी केसचा निकाल त्याला अनुकूल आला नाही, पण त्याच्या या कुटील नितीमुळे श्रीमती शांताबाई यांची न्यायाविना तीन वर्षे फुकट गेली.
लिमिटेशन ॲक्ट, सेक्शन 5 नुसार मिळणारा विलंब न्यायालयाच्या दृष्टिकोनातून "योग्य कारण" असलेल्या परिस्थितीत मान्य केला जाऊ शकतो. ही मुभा श्री महादेव नाना पाटील यांना "विना कारण" दिली गेली हे ३ वर्षांनंतर समजून आले. प्सूडो दाव्यामध्ये व्यक्ती केवळ न्यायालयीन प्रक्रियेला गोंधळात टाकण्यासाठी किंवा तांत्रिक बाबींचा गैरफायदा घेण्यासाठी दावा सादर करतो.
14. बेकायदेशीर फेरफार (Illegal Transfers during Litigation):
जर प्रकरण न्यायप्रविष्ट असताना मालमत्तेचे हस्तांतरण केले गेले असेल, तर हे न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन आहे. श्री दत्तू परशराम पाटील हे सदर केसमधील साक्षीदार जमनीचे विनामोबदला लाभार्थी ठरले आहेत, कृपया याची नोंद घ्यावी.
गट नंबर: 190 (खाता नंबर: 225) - {या गटनंबर ची मालमत्ता 28 मे 2022 ला बेकायदेशीर फेरफार करून श्री दत्तू परशराम पाटील यांचे नावे नोंदवण्यात आली. माननीय न्यायालयांच्या निकालानंतर हे फेरफार नोंदवण्यात आले याची नोंद घेऊन कृपया ते फेरफार रद्द करावेत.}
गट नंबर: 846 (खाता नंबर: 366) - {या गटनंबर ची मालमत्ता 7 डिसेंबर 2023 ला बेकायदेशीर फेरफार करून सौ कल्पना महादेव पाटील यांचे नावे नोंदवण्यात आली. माननीय न्यायालयांच्या निकालानंतर हे फेरफार नोंदवण्यात आले याची नोंद घेऊन कृपया ते फेरफार रद्द करावेत.}
गट नंबर: 714/13 (खाता नंबर: 1101043) - {या गटनंबर ची मालमत्ता 29 एप्रिल 2018 ला बेकायदेशीर फेरफार करून सौ सरस्वती भैरू गावडे यांचे नावे नोंदवण्यात आली. सर्व कायदेशीर वारसदारांच्या संमतीविना हे फेरफार नोंदवण्यात आले असलेची नोंद घेऊन कृपया ते फेरफार रद्द करावेत.}
गट नंबर: 714/17 (खाता नंबर: 1101046) - {या गटनंबर ची मालमत्ता 29 एप्रिल 2018 ला बेकायदेशीर फेरफार करून लक्ष्मी नाना पाटील यांचे नावे नोंदवण्यात आली. सर्व कायदेशीर वारसदारांच्या संमतीविना हे फेरफार नोंदवण्यात आले असलेची नोंद घेऊन कृपया ते फेरफार रद्द करावेत.}
15. प्रमुख साक्षीदारांच्या साक्षी:
पहिल्या केसमध्ये मांडलेले तीन प्रमुख प्रमुख साक्षीदारांच्या साक्षी, जे कि, श्री महादेव नाना पाटील यांचे भाऊबंद आहेत आणि सत्य परिस्थिती वैयक्तिकपणे जाणतात. त्यांची साक्षी रितसर नोंदवल्या गेल्या असून, त्याचे न्यायालनीय प्रोसिजर नुसार रितसर रजिस्टर करण्यात आले आहे.
16. मालमत्तेची नासधूष (Destruction of Property):
जमीन किंवा मालमत्तेचे नुकसान करणे हा गुन्हा आहे. यासाठी पुरावे जसे की झाडांची कटाईच्या फोटो प्रती आम्ही यापूर्वीच न्यायालयाकडे सुपूर्द केल्या आहेत. आणि जमिनीच्या हस्तांतरणासंबंधी कागदपत्रे येथे सोबत जोडलेली आहेत. (पान नंबर वरील ७/१२ वरील फेरफार.)
17. स्वतःला गरीब दीनदुबळा, पिडीत, बिचारा म्हणून प्रस्तुत करणे दाखवणे (False Claim of Poverty):
स्वतःला दीनदुबळा, गरीब दाखवून श्री महादेव नाना पाटील यांनी चलाखीने अनेक खोटे दस्त तयार केले आहेत. त्याच्या मालकीचे ट्रॅक्टर आणि मोटार सायकल या गोष्टीतून त्यांच्या मालमत्तेची खरी स्थिती काही प्रमाणात दिसून येते.
18. खोट्या आरोपांवर कारवाई (Fraud and False Allegations):
श्री महादेव नाना पाटील यांनी माझ्यावर आणि माझ्या मुलांवरही खोटी फौजदारी केस माननीय फौजदारी न्यायालय चंदगड येथे (Case Number: Cri.M.A./0000170/2020) दाखल करून चार वर्षे उलटून गेल्यानंतरही फिर्यादीतर्फेच पुरावा देणेसाठी मुदतीचा अर्ज दाखल केला जातो आहे!!! आमच्यावर केल्या गेलेल्या खोट्या आरोपांवर न्यायालयातर्फे कारवाई केली जावी ही विनंती.
19. खोटा आरोप करून सावत्र बहिणीचे माहेर कायमचे बंद केले:
सावत्र बहिणीने विष घालून जीव घेण्याचा ब्रभा यशस्वी केल्यानंतर पंचवीस वर्षांपासून श्रीमती शांताबाई यांना माहेरचे दरवाजे कायमचे बंद केले गेले. आजारी बापाला भेटायला लेकीला बंदी केली गेली. दुसऱ्या बायकोच्या भीतीने थिजून गेलेला दुबळा असहाय्य बाप भेटायला आलेल्या लेकीला उंबऱ्यातूनच हात जोडून रडायचा आणि लेक दारात उभे राहून रडायची. सावत्र आई, भाऊ-बहीण, "भिकारी आली आमच्या दारात!" म्हणून हिणवयाचे आणि हसायचे. तिचा बाप चांगला होता, पण दुबळा आणि सादाभोळा होता. तिला बाबा वारल्याची बातमी त्रयस्थामार्फत समजली आणि माहेराला जोडून ठेवणारा तिचा शेवटचा दुवाही संपला.
गरीब पण कनवाळू मामाच्या घरीच तिचे बरेचसे बालपण गेले. त्या काळच्या रितीरिवाजानुसार तिच्या आईच्या आणि बापाच्या संसारांत दोष आहे, असे सिध्द झाल्याने तिच्या मामाच्या बाबाने नाईलाजाने गावातच एका अपंग माणसाशी तिचे लग्न लावून दिले. तिचा बाप परक्यासारखा लग्नमंडपाबाहेरूनच परस्पर अक्षता टाकून गेला! लेकीच्या लग्नाचा खर्च राहिला बाजूला, स्वतःच्या लेकीला एक माहेरची साडी द्यायची हिंमतही त्याला झाली नाही. पुढे आपल्या चुकीमुळे पोरीच्या आयुष्याची झालेली फरफट बघून बाप असहाय्यपणे ओकसाबोक्शी रडायचा आणि भरल्या डोळ्यांनी तिची माफी मागायचा. बापासाठी ती सगळा त्रास मुकाट विनातक्रार सोसत राहिली.
"आयुष्यात काहीच केलं नाही गे लेकी तुझ्यासाठी. दुसऱ्या बायकोच्या भीतीने तुझ्या लग्नात एक दमडीही खर्च करू शकलो नाही. सख्खा बाप जिवंत असताना तुझ्या मामाच्या बाबाने तुझं लग्न लावून दिलं. हे पाप कसं फेडणार गं मी? आता तुझ्यासाठी काही करतो म्हटलं तर, पोरगा मारतो मला. मी मेल्यावर माझ्या आत्म्याला शांती काही मिळणार नाही." ही खंत घेऊनच तो मेला.
आजही ती नित्यनेमाने यात्रेला वर्षांतून एकदा माहेरच्या गावी जाऊन, स्वतःच्या घरासमोर उभी राहून रस्त्यातूनच कुलदेवताला हात जोडून येते. तिचा सदाभोळा दुबळा बाप आज जिवंत नाही, पण त्याचा अशांत आत्मा तिथेच कुठेतरी घुटमळत असेल आणि नेहमीसारखाच भरल्या डोळ्यांनी हात जोडून माफी मागत असेल, असे तिला वाटून जाते.
आज तिचा साधाभोळा बाबा नाही, माहेरचे जुने जाणते निष्कपट लोक नाहीत - पण सावत्र भावाने, सावत्र आईने आणि सावत्र बहिणीने तिच्या कपाळावर लावलेला कलंक मात्र आजही तसाच ठसठशीत आहे…
- ही फक्त मनगढंत कहाणी आहे, या प्रतिपक्षाच्या अपेक्षित आक्षेपावर आम्हाला काहीच justification देता येणार नाही. दुर्दैवाने काही गोष्टीना खरोखरीच पुरावा नसतो. कायद्यापुढे भावनेला काही महत्व नसतं, तेथे पुरावे लागतात, हे माहीत असूनही केवळ दावा नक्की काय आहे, याचे कारण पूर्णपणे स्पष्ट व्हावे, यासाठी थोडक्यात लिहीले आहे.
खालीलप्रमाणे आमच्या एकत्रिक मालमत्ता आहेत:
खालीलप्रमाणे आमच्या शेतजमिनी आहेत:
1. गट नंबर: 188 (खाता नंबर: 713)
2. गट नंबर: 189 (खाता नंबर: 1100702)
3. गट नंबर: 190 (खाता नंबर: 225)
4. गट नंबर: 317 (खाता नंबर: 366)
5. गट नंबर: 565/8 (खाता नंबर: 1101100)
6. गट नंबर: 794 (खाता नंबर: 366)
7. गट नंबर: 846 (खाता नंबर: 366)
8. गट नंबर: 847 (खाता नंबर: 366)
9. गट नंबर: 989 (खाता नंबर: 225)
10. गट नंबर: 1271 (खाता नंबर: 225)
11. गट नंबर: 328/16 (खाता नंबर: 1101010)
12. गट नंबर: 565/30 (खाता नंबर: 1101065)
13. गट नंबर: 714/13 (खाता नंबर: 1101043)
14. गट नंबर: 714/17 (खाता नंबर: 1101046)
15. गट नंबर: 714/19 (खाता नंबर: 1101047)
16. गट नंबर: 974/10 (खाता नंबर: 225)
खालीलप्रमाणे आमच्या गावठाण जमिनी आणि घर आहे:
1. मांडेदुर्गमधील गावठाण जमिनी.
2. मांडेदुर्गमधील घर.
श्री महादेव नाना पाटील यांनी अनेकानेक खोटे दस्तऐवज तयार केलेचे प्रथमदर्शनी दिसून येत असलेने, आम्ही Judicial Enquiry of Evidence अंतर्गत न्यायालयाच्या आधारे कागदपत्रांच्या सत्यतेची चौकशी केली जावी असे निवेदन करत आहोत. श्री महादेव नाना पाटील यांनी अनेकानेक खोट्या केसिस दाखल करून श्रीमती शांताबाई मारुती जाधव यांचे मोठे नुकसान केले असलेने त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी.
कोणताही मुलगा केवळ एकटा पूर्णपणे वडीलोपर्जित किंवा परंपरागत मालमत्तेचा कायदेशीर मालक नसतो. आपला हिस्सा भावाला द्यायचे की नाही, ते बहिणीच्या ऐच्छिक सदिच्छेवर अललंबून आहे. आणि ही सदिच्छा भावाच्या वर्तनावर अवलंबून असते. भावाने वर्षानुवर्षे स्वतःच्या बापाला भेटू न देणं, दारातून बहिणीला हकलून लावणं, बापाला भेटायला आलेल्या बहिणीला भिकारीण म्हणून हिणवणं, तिच्यावर सार्वजनिक खोटे आरोप करणे - अशा गैर-वर्तवणूकीनंतरही भाऊ बहिणीच्या हिश्शाची जमिन विना उडथळा घेऊ पाहील, तर ते होणे नाही.
========================================
प्रतिपक्षाने याच न्यायालयात समान केसमध्ये निकाली निघालेले अनेक मुद्दे पुन्हा उपस्थित करून न्यायालयाच्या पूर्वनिर्णयावर संभ्रम निर्माण केला आहे. कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय न्यायालयाचा पूर्व निकाल नाकारल्याचेही दिसते, जे कायदेशीर दृष्ट्या अनुचित आहे आणि न्यायालयाचा अनादर करणारे कृत्य आहे. यावरून असे दिसते की, प्रतिपक्षाने आपल्या पूर्व केसमधील निकालाची माहिती पूर्णपणे आपल्या वकिलांना आणि न्यायालयाला दिलेली नाही. ही बाब यांनी हेतुपूर्वक लपवून ठेवली आहे हे उघड आहे. हे "रेस जुडिकाटा"च्या तत्त्वाचे उल्लंघन असून न्यायालयाने याची दखल घेणे आवश्यक आहे.
निकाली केसमध्ये न्यायालयाकडून नाकारले गेलेल्या मुद्द्यांची प्रतिपक्षाकडून जाणीवपूर्वक पुनरावृत्ती होत असल्यामुळे न्यायव्यवस्थेचा नियमबद्ध प्रोसिजर बाधित होत आहे. R.C.S. 89/2018 या केसमधील Order on Exhibit मध्ये माननीय चंदगड दिवाणी न्यायालयाने निरीक्षणावर आधारित नाकारलेले सर्व मुद्दे प्रतिपक्षाने पुनः मांडलेले आहेत. (पान नंबर वर Order on Exhibit ची प्रत जोडलेली आहे.)
श्रीमती शांताबाई मारुती जाधव यांचे पूर्व वकिल ठरल्याप्रमाणे वाटणी विभागणीसाठीयाच न्यायालयातील R.C.S. 89/2018 या केसमध्ये काऊंटर क्लेम टाकायला विसरल्यामुळे, ही वेगळी केस दाखल करावी लागली आहे. या दोन्ही केसमधील सर्व बाबी, मुद्दे, साक्षीदार, पुरावे, दोन्ही पक्षकार एकाच मालमत्तेच्या समान विवादाशी संबंधीत असल्याने पूर्व केसमधील या सर्व बाबी, पुरावे, साक्षी, न्यायालयाची निरीक्षणे, निकाल या कोर्टमध्ये पूर्वपिठीका म्हणून ग्राहय धरण्यात याव्यात, ही विनंती आहे.
एकच मुद्दा पुन्हा पुनः मांडल्याने न्यायालयीन संसाधनांचा अपव्यय होईल आणि पूर्वीच्या निकालांना आधार दिल्यास अनावश्यक पुनरावृत्ती टाळता येईल. याला ठोस कायदेशीर आधार आहे. पाहा:
1. येथे भारतीय दिवाणी प्रक्रिया संहिता (CPC) मधील कलम 11 म्हणजेच "रेस जुडिकाटा" (Res Judicata) लागू होते. कलम 11 अंतर्गत, जर पूर्वीच्या केसमध्ये समान पक्षकारांमध्ये समान बाबींवर निर्णय झाला असेल, तर तेच मुद्दे पुन्हा न्यायालयात उभे करू शकत नाहीत. या कलमानुसार, पूर्वीच्या केसमधील निर्णय, साक्षी आणि पुरावे हे वर्तमान केसमध्ये ग्राह्य धरले जाऊ शकतात.
2. याशिवाय, भारतीय पुरावा अधिनियम (Indian Evidence Act), 1872 मधील कलम 33 देखील लागू होऊ शकते, ज्यामध्ये पूर्वीच्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये दिलेली साक्षी वर्तमान प्रक्रियेमध्ये काही परिस्थितींमध्ये ग्राह्य धरली जाऊ शकते.
3. CPC, कलम 151: न्यायालयीन अधिकारांचा वापर (Inherent Powers of Court): नुसार पूर्वीचे सिद्ध निष्कर्ष आणि मुद्दे ग्राह्य धरले जावेत आणि अनावश्यक पुनरावृत्ती टाळावी, यासाठी मा. न्यायालयाला विशेषाधीकार आहे. न्यायालय CPC अंतर्गत कलम 151 चा वापर करून खटल्याचा गैरवापर रोखण्यासाठी तात्काळ आदेश देऊ शकते.
4. CPC कलम 13: नुसार जरी दुसऱ्या न्यायालयामध्ये याच मुद्द्यावर पूर्वी निर्णय झाला असेल, तरी तो निर्णय दुसऱ्या खटल्यातही ग्राह्य धरला जाऊ शकतो. यामुळे निर्णयाचे स्थायित्व राखले जाते.
5. CPC, Order 2 Rule 2: जर पूर्वीच्या खटल्यात समान मुद्दे मांडले गेले असतील, तर नवीन खटल्यात त्याच मुद्द्यांवर चर्चा करणे "Order 2 Rule 2" च्या उल्लंघनात येते. शिवाय या आदेशाचा उपयोग हा संबंधित सर्व दाव्यांचे एकत्रितपणे आणि एकाच वेळी निराकरण करण्यासाठी केला जातो.
======================================
वरील अनेक बाबीवरून हे स्पष्ट होते कि, श्री महादेव नाना पाटील यांनी दाव्यांना हेतुपूर्वक विनाकारण विलंब करणेची अन्यायिक, गैरकानूनी, बेकायदेशीर पध्दती अवलंबलेली आहे. आम्ही मा न्यायालयास विनंती करातो की, प्रतिपक्ष वारंवार न्यायालयीन प्रक्रियेचा दुरुपयोग करत आहे, सिध्द होत असलेने, ऑर्डर ऑन इक्झिबिट, डिक्री आणि इक्झिक्यूशन ऑर्डर देखील एकाच वेळी लागू करावी. विशिष्ट प्रसंगी सुप्रीम कोर्ट सहित वेगवेगळ्या न्यायालयांनी प्रक्रियेचा दुरुपयोग टाळण्यासाठी या नीतीचा अनेकदा अवलंब केला आहे. Many times in past Indian courts have handled cases with multiple orders simultaneously, addressing issues of execution, decrees, and evidence within the same proceedings.
सुप्रीम कोर्टाने अनेकदा स्पष्ट केले आहे की, आवश्यकतेनुसार न्यायालयीन वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी योग्य त्वरित निर्णय घेण्याचे अधिकार न्यायाधीशाना आहेत.
The Supreme Court of India has indeed ruled on multiple cases from 2015 to 2024 regarding the misuse of judicial processes, often emphasizing that legal procedures should not be exploited to delay justice or extend litigation unfairly. Here is a one example:
1. Jaipur Vidyut Vitran Nigam Ltd. v. MB Power Madhya Pradesh Pvt. Ltd. (2024) – The Court observed that state entities and companies should not use procedural tactics to further interests that disadvantage the public or create delays. The Court emphasized balancing consumer interests against corporate tactics used to prolong litigation.
विरुद्ध पक्ष वारंवार कोणतेही ठोस तत्थ्य न देता विलंब अर्ज दाखल करत आहे, ज्यामुळे खटला अनावश्यकपणे लांबवला जात आहे. केवळ एखाद्या दस्तातील Typo mistake चुकीच्या पध्दतीने सादर करून किंवा खोट्या बेकायदेशीर दस्तांचा बागुलबोवा निर्माण करून संभ्रम निर्माण करून गैरप्रकारे बाजी मारायचा प्रयत्न करतो आहे. जे कि न्यायालयीन प्रोसिजरला विघातक आहे.
जर विरुद्ध पक्षकार न्यायालयाच्या प्रक्रियेचा दिर्घ काळासाठी गैरवापर करत असेल, तेंव्हा न्यायालय कायद्याची प्रतिष्ठा अबाधीत ठेवण्यासाठी विशेषाअधिकार वापरून एकाच वेळी ऑर्डर ऑन इक्झिबिट, डिक्री आणि एक्झिक्यूशन आदेश देऊ शकते. न्यायालयाला त्याचे विशेष अधिकार (Inherent Powers) CPC कलम 151 अंतर्गत वापरून, पक्षकार न्यायालयाच्या प्रक्रियेचा दुरुपयोग करत असल्यास, न्यायालय त्वरित निर्णय घेऊ शकते. जर हे स्पष्टपणे दिसून येत असेल की विरुद्ध पक्षकार न्यायालयीन प्रक्रियेचा वापर केवळ केस प्रलंबित ठेवण्यासाठी करत आहेत, तर न्यायालय त्यावर कठोर कारवाईही करू शकते.
"आगीशी खेळू नये" म्हणतात, तसे "न्यायालयाशी खेळू नये" असा धाक निर्माण झाल्याशिवाय कोर्टात आत्मविश्वासाने खोटया केसीस दाखल करणे, खोटे दावे दाखल करणे, खोटे Forged पुरावे यासारखे गैरप्रकार कमी होणार नाहीत. कोर्टात दाखल होणाऱ्या प्रत्येक केसमध्ये एक पार्टी लबाडी करते, हे निर्विवाद स्पष्ट आहे हे न्यायालयही जाणते. खोटे दावे दाखल करणे हे न्यायालयाच्या मुलतत्वावरच घाला घालण्यासारखे आहे आणि असे प्रकार तेवढ्याच कठोरपणे तात्काळ निपटून काढणे क्रमप्राप्त आहे.
सबब श्रीमती शांताबाई मारुती जाधव यांची मा. कोर्टाना नम्र विनंती कि;
१. प्रथम दर्शनी न्यायालयीन प्रोसिजर चा गैरवापर दिसून येत असलेने केस तात्काळ निकाली काढावी.
२. दाव्यानुसार सदर मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी श्रीमती शांताबाई मारुती जाधव यांच्या बाजूने ऑर्डर ऑन इक्झिबिट, डिक्री आणि एक्झिक्यूशन चे आदेश देण्यात यावेत.
3. श्री महादेव नाना पाटील यांनी झाडे तोडून, अनेकानेक खोट्या केसीस टाकून श्रीमती शांताबाई यांचे मानसिक आणि आर्थिक नुकसान भरून द्यावे.
4. न्यायालयाच्या न्यायविवेकानुसार इतर हक्क द्यावेत.
5. जरूर तर अर्ज दुरुस्तीस परवानगी असावी.
येणेप्रमाणे विनंती असे.
ठिकाण: चंदगड
दिनांक: 28 ऑक्टोबर 2024.
वादी: श्रीमती शांताबाई मारुती जाधव,
रा. रामपूर (डुक्करवाडी),
ता. चंदगड,
जि. कोल्हापूर
प्रतिनिधी: श्री गुंडू मारुती जाधव
Maharashtra Farmers Against Corruption
चंदगड तहसील नोंदणी कार्यालय, चंदगड, कोल्हापूर, महाराष्ट्र - ४१६५०९.
Chandgad Tehsil Registry Office, Chandgad, Kolhapur, Maharashtra - 416509.
Maharashtra Farmers Against Corruption - Chandgad, Kolhapur, Maharashtra, India