आजोबा वारल्याचे खोटे दस्त - Forged, Fabricated, Fraudulent Our Grandfathers After Death Inheritance Documents Produced at Chandgad Tehsil Registry Office
आजोबा वारल्याचे खोटे दस्त - Forged, Fabricated, Fraudulent Our Grandfathers After Death Inheritance Documents Produced at Chandgad Tehsil Registry Office
महाराष्ट्रातील गरीब कष्टकरी शेतकऱ्यांचा भ्रष्टाचारा विरुद्धचा लढा आणि संघर्ष!!!
Maharashtra Farmers Against Corruption
फसवणुकीच्या उद्देशाने चंदगड तहसील नोंदणी कार्यालयात आमचे आजोबा वारल्याचे खोटे, बनावट वारसाहक्काचे दस्तऐवज बनवण्यात आले.
आजोबा वारल्याचे खोटे दस्त, खोटे का आहे?
खालील लिंकवर दत्तकपत्र जोडले आहे. त्यावर क्लिक करून ते पाहता येऊ शकते.
1955 साली वारलेल्या आमच्या आजोबांचे खोटे दस्त कसे बनवले.
अलीकडेच जुन्या दस्तऐवजात बदल करून ते जाधव कुटुंब 1955 मध्ये वेगळे झाल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. पुराव्यादाखल खाली दिलेला 1955 मधील कै गुंडू राणबा जाधव यांच्या मृत्यूनोंदीतील अलीकडेच केलेले बदल खालील तर्काद्वारे कसे खोटे सिद्ध होतात; ते पाहा:
सदर दस्तऐवज ओव्हरलॅप केल्याचे दिसून येते - या दस्तऐवजाचा वरील भाग जुन्या पेपरचा मळका आहे आणि खालील भाग स्वच्छ नवीन पेपरचा आहे.
जुन्या दस्तऐवजाचा खालील भाग कापून टाकल्याचे स्पष्ट दिसते. डाव्या बाजूला शिक्क्याचा छोटासा कापलेला भाग पुसटसा दिसतो आहे, तर उजव्या बाजूला काही मजकूर कापून टाकल्याचे दिसते.
या डॉक्युमेंटनुसार कै गुंडू राणबा जाधव, आमचे ज्येष्ठ आजोबा यांचा मृत्यू दिनांक 24 / 7 / 1955 रोजी झाला होता. पण तत्कालीन तलाठ्यांना ते या दिवशी मरणार आहेत, हे दोन वर्षे अगोदरच समजले होते असे दिसते! त्यामुळे त्यांनी हा करार दिनांक 13/4/1953 लाच त्यांच्या मृत्यूपूर्वी दोन वर्षे अगोदरच बनवून ठेवला होता का! तत्कालीन तलाठ्याची साक्षरी-सहित तारीख पाहा.
1955 साली चंदगड कर्नाटक राज्यात होते. 1960 मध्ये भाषावार प्रांतरचना झाल्यावर, बॉम्बे प्रांताचे दोन भागांमध्ये विभाजन झाले - महाराष्ट्र आणि गुजरात आणि त्यानंतर चंदगड महाराष्ट्र राज्यात समाविष्ट झाले. त्यामुळे 1955 मध्ये "महाराष्ट्र" राज्याचा उल्लेख असणे चुकीचे आहे. 1960 मध्ये, राज्याचे नाव बदलून "महाराष्ट्र" असे करण्यात आले.
1955 मधील चंदगड च्या इतिहास आणि प्रशासनाशी संबंधित इतर कागदपत्रांत असलेला उल्लेख विसंगत आहे त्यामुळे हे दस्तऐवज अधिकृत वाटत नाही. कागदपत्राचे स्वरूप अधिकृत दस्तऐवजासारखे दिसत नाही.
कागदपत्रात "महाराष्ट्र" राज्याचा उल्लेख आहे. १९५६ मध्ये राज्याचे नाव "मुंबई" होते. "महाराष्ट्र" हे नाव १९६० मध्ये स्वीकारले गेले.
"कुटुंब मॅनेजर / कुटुंब व्यवस्थापक" हा शब्द जमिनीच्या नोंदीत 1966 मध्ये लागू झालेल्या "महाराष्ट्र जमीन महसूल संहिता" मध्ये प्रथमच वापरण्यात आला. 1950 च्या दशकात, "कुटुंबप्रमुख" हा शब्द जमिनीच्या नोंदीमध्ये वापरला जात होता. 1956 मध्ये "बॉम्बे लैंड रेव्हेन्यू कोड" लागू झाल्यानंतरही "कुटुंब प्रमुख" हा शब्द जमिनीच्या नोंदींमध्ये वापरला जात होता.
A Serious Note:
चंदगड तहसील रजिस्ट्री ऑफिसमध्ये आमच्या स्वर्गीय आजोबांची खोटी वारसा कागदपत्रे दाखल केल्याचा गंभीर प्रकार सामोरा आला आहे. हे व्यवस्थेतील संभाव्य भ्रष्टाचाराकडे स्पष्टपणे निर्देश करते. अशा बनावट कागदपत्रांना अधिकृत नोंदींमध्ये स्थान मिळणे हे संबंधित शासकीय कार्यालय आणि अधिकाऱ्यांच्या सचोटीवर गंभीर प्रश्न निर्माण करते. यामुळे वारसा हक्काच्या कायदेशीर प्रक्रियेला धक्का बसतो आणि शासकीय संस्थांवरील जनतेचा विश्वास कमी होतो.
The submission of forged or fraudulent inheritance documents concerning our grandfather's estate at the Chandgad Tahsil Registry Office points towards potential deep-rooted corruption. This act goes beyond simple forgery; it raises serious questions about the integrity of the system and the officials involved.
याची तातडीने चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हायला हवी. पण महाराष्ट्रात, जेथे सरकारलाच वाटते कि, भ्रष्टाचार हा अधिकाऱ्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे, तेथे न्याय मिळणे शक्य आहे का?
Maharashtra Farmers Against Corruption
चंदगड तहसील नोंदणी कार्यालय, चंदगड, कोल्हापूर, महाराष्ट्र - ४१६५०९.
Chandgad Tehsil Registry Office, Chandgad, Kolhapur, Maharashtra - 416509.
Maharashtra Farmers Against Corruption - Chandgad, Kolhapur, Maharashtra, India