आमच्याविषयी
आमच्याविषयी
महाराष्ट्रातील गरीब कष्टकरी शेतकऱ्यांचा भ्रष्टाचारा विरुद्धचा लढा आणि संघर्ष!!!
Maharashtra Farmers Against Corruption
मी कोण आहे?
- मी तुमच्यापैकीच एक अतिसामान्य पिडीत आहे . वर्षानुवर्षे झगडूनही न्याय मिळत नसल्याने हताश खिन्न ! मी तुमचाच एक दुसरा चेहरा आहे . मी एका गरीब पिडीत शेतकऱ्याचा असहाय्य मुलगा आहे. आपल्या देशात न्याय किती महाग आणि अप्राप्य आहे हे मी प्रत्यक्ष अनुभवलं. नंतर लक्षांत आले की मी केवळ एकटा पिडीत नाही. या आपल्या चंदगड तालुक्यात हजारो गरीब शेतकरी पिडीत आहेत - आपल्या जिल्हयांत लाखो असतील - आपल्या राज्यात करोडो असतील - आणि आपल्या देशात तर ...
आपण आपल्या तालुक्यातल्याच काही पिडीत शेतकऱ्यांची ऐकी करून ऐक्यातून न्याय मिळवायचा प्रयत्न तर आपण नक्कीच करू शकतो. यातून कदाचित त्यांनाही आणि मलाही न्याय मिळू शकेल. या विचारातून ही वेबसाईट तयार केली आहे. " जबतक तोडेंगे नही तबतक छोडेंगे नही!" या मंत्रातून प्रेरणा घेऊन साधारण मांझीने प्रंचड पहाड तोडला. त्यामानाने आपली समस्या सर्वव्यापी आहे पण खूप छोटी आहे.
ज्यांच्यावर अन्याय झाला आहे ते पिडीत आहेत त्या सर्वांना मी विनंती करतो की, तुम्ही सर्वांनी आपली व्यथा थोडक्यात कथन करून आपल्यावर झालेल्या आन्यायाचे पुरावे खाली दिलेल्या ईमेल वर पाठवून द्यावेत. पुरेशा पुराव्या निशी असलेल्या तक्रारी केस स्टडी मध्ये पब्लीश केल्या जातील. एकटे एकटे गाठून भ्रष्ट अधिकाऱ्यांकडून आपला फडशा पाडला जातो आहे. आपण एक होऊन - संघटित होऊन ताकद वाढवली तर, शक्य आहे आपल्या सर्वांनाच न्याय मिळेल. चला तर मग एक नविन स्वांतत्र चळवळ निर्माण करू - भ्रष्ट्राचारा विरुद्ध! ही अप्रत्यक्ष देशसेवाही आहे. भ्रष्ट नोकरशहा आणि भ्रष्ट राजकारणी आपल्या पवित्र देशाला आतून खिळखिळे दुबळे करून टाकत आहेत. त्या भ्रष्ट पापी पिशाच्यापासून आपण आपल्या लोकांना आणि देशाला वाचवायला हवे. ते राक्षसारखे बलदंड बलशाली आहेत - चंगेजखान सारखे निष्ठूर क्रूर आहेत. वरून सभ्य दिसतात, पण आतून प्रत्यक्षात असभ्य आणि गल्लीच्छ आहेत. रोमसारखे महान प्रचंड साम्राज्य भ्रष्ट्राचारामुळे पतन पावले - हे इतिहासात वाचला असेलच तुम्ही.
आमच्या तक्रारीविषयी थोडक्यात :
प्रशासनातल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने आमच्या पिढीजात शेतजमिनी लुबाडण्यात आल्या. वर्षांनुवर्षे कोर्ट कचेऱ्या करून झाल्या - काहीच आशा दिसत नव्हती. अनेकानेक ठोस पुरावे असुनही आमच्या दाव्याची दाद कुठेच घेतली जात नव्हती. वयोवृद्ध निराशेने खंगलेल्या आईच्या चेहऱ्यावरची हताशा पाहावत नव्हती म्हणून माझ्या ऐपती नुसार मी प्रयत्न करत होतो. त्या कारणाने खर्च वाढल्याने मानसिक - आर्थिक खच्ची करण तर झालेच, शिवाय कौटुंबिक खच्चीकरणही झाले.
पण काही काळातच आपल्या विरुध्द असलेली लॉबी किती प्रंचड ताकदीची आहे याची मला कल्पना यायला लागली - तीन वर्षांत आमच्या केसचे एकही हिअरिंग होऊ शकले नाही! आमचे वकिल "जज साहेबांना वेळ नाही!" हे एकमेव कारण देत राहीले. तो सगळा इतिहास केस स्टडिमध्ये वाचायला मिळेलच.
त्यानंतर मात्र मी स्वतःच आमची केस लढायची ठरवले. पण हे सोपं होतं का? अनेकानेक पुरावे आणि सत्य आपल्या बाजूला आहे, त्यामुळे आपल्या केसचा निकाल लवकर लागेल, या माझ्या आशेला लवकरच लांबलचक न्यायालयीन प्रोसिजरचे ग्रहण लागले. न्यायालय गैरप्रकाराविषयी गंभीरतेने आणि तत्परतेने दखल घेईल, ही माझी कल्पनाही मृगजळ ठरली. देवाला प्रसन्न करून घायचे असेल तर भक्तीपेक्षा उपचार महत्वाचे आहेत, हे लक्षांत आल्याने न्याय बाजू असूनही, सबळ पुरावे असूनही, आपल्याला न्याय मिळेलच, ही आशा मात्र क्षीण होत चालली.
नंतर विचार आला, माझ्या सारख्या उच्च शिक्षित व्यक्तीची न्याय मिळवताना अशी हेलपाट होत असेल तर, अशिक्षित गरीब शेतकऱ्यांचे काय हाल होत असतील? आणि त्यातूनच हे स्फुरले कि, आपण केवळ आपल्यापुरते न पाहता, त्या गरीब पिडीत शेतकऱ्यांनाही काही प्रमाणात न्याय देता येईल का, हे पाहावे. त्यातूनच ही वेबसाईट बनवायची कल्पना आली.
Maharashtra Farmers Against Corruption
चंदगड तहसील नोंदणी कार्यालय, चंदगड, कोल्हापूर, महाराष्ट्र - ४१६५०९.
Chandgad Tehsil Registry Office, Chandgad, Kolhapur, Maharashtra - 416509.
Maharashtra Farmers Against Corruption - Chandgad, Kolhapur, Maharashtra, India