महाराष्ट्र सरकारचे भ्रष्टाचाराविषयी मौन - Maharashtra Govt is Mum on Corruption
महाराष्ट्र सरकारचे भ्रष्टाचाराविषयी मौन - Maharashtra Govt is Mum on Corruption
महाराष्ट्रातील गरीब कष्टकरी शेतकऱ्यांचा भ्रष्टाचारा विरुद्धचा लढा आणि संघर्ष!!!
Maharashtra Farmers Against Corruption
Maharashtra Govt is Mum on Corruption, Scams and Scandals within the Kolhapur District Administration
Jan 14, 2025, 4:03 AM
प्रति,
माननीय जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना,
विषय: खोटे बेकायदेशीर दत्तक पत्र बनवून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताने आमच्या पिढीजात परंपरागत शेतजमिनी लुबाडल्याची चौकशी करण्यात यावी यासाठी निवेदन अर्ज.
माननीय सर,
मी, श्री. गुंडू मारुती जाधव, रा. रामपूर / डुक्करवाडी, आपल्याकडे न्याय मिळण्यासाठी निवेदन करत आहे. साहेब, चंदगड तहसिलमधील काही तत्कालिन भ्रष्ट आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी खोटे Forged दत्तक पत्र बनवून आमच्या अविभाजित कुटुंबाच्या शेतजमिनी बळकावयाला श्री प्रमोद घनशाम गावडे या उच्चशिक्षित व्यक्तीला अप्रत्यक्ष मदत केली. गरीब शेतकऱ्यांसाठी हा प्रकार किती गंभीर जीवघेणा, आयुष्यातून बर्बाद करु शकणारा ठरू शकतो, हे आपण जाणू शकता.
प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या मालकीच्या जमिनीचा विषय किती जिव्हाळ्याचा असतो ते आपण जाणताच. आमच्या जाधव कुटुंबाच्या पिढीजात जमिनी श्री. प्रमोद घनशाम गावडे यांनी खोटे बेकायदेशीर दत्तक पत्र बनवून लुटल्याची तक्रार गेल्या वर्षभर तहसीलदार, प्रांत अधिकारी, अप्पर कलेक्टर, जिल्हाधिकारी यांना वारंवार करूनही कोणतीच दखल घेतली जात नाही. शेतकऱ्याला त्याची जमिन म्हणजे त्याचा जीवन मरणाचा प्रश्न असतो, त्यामुळे कृपया आमच्या निवेदनाची दखल घेऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही विनंती.
या गैरप्रकारात केवळ वरिष्ठ अधिकारीच नाही तर, गावपातळीवरील तलाठी आणि सर्कल अधिकारीही सामील आहेत. दत्तक पत्र खोटे असल्याचे जवळजवळ तीसहून अधिक मुद्दे आणि पुरावे आम्ही सर्व अधिकाऱ्यांना दिले होते. तरीही त्या पुराव्यांचा कोणताही उल्लेख न करता विरोधाभास असलेले निकाल सर्वच ठिकाणी दिले गेले.
उदाहरणार्थ;
1. भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने अनैतिक गैरफायदा घेतला जाऊ नये म्हणून दत्तक कायद्यात बनवण्यात आलेल्या दरतुदिंचे उल्लंघन करून बनवलेले दत्तकपत्र ग्राह्य ठरवले गेले. जसे कि, 28 वर्षांच्या प्रौढ व्यक्तीला अज्ञानी बालक दाखवणे आणि 80 वर्षांच्या आमच्या वृध्द विस्मरणग्रस्त आजारी ज्येष्ठ काकाला 55 वर्षांपेक्षा कमी दाखवणे.
2. चंदगड रजिस्ट्रार यांनी 28 वर्षांच्या व्यक्तिला जमिनी हडपण्यासाठी कागदोपत्री "10 वर्षांपेक्षा लहान अज्ञान बालक" दाखवणे कायदेशीर ठरवले गेले.
3. ज्या घरी सुतक आहे - त्याच घरी कै गोविंद जाधव यांनी दहा दिवसापूर्वी स्वतःच्या भावाचा मृत्यू झालेला असताना, दत्तक विधी सांग्रसंगीत हिंदू रिवाजानुसार केला, असे दाखवणे योग्य ठरवले गेले.
4. आम्हाला अपिल करता येऊ नये म्हणून निकाला अगोदर फेरफार नोंदवून प्रांत अधिकारी यांनी नंतर निकाल घोषित केला! उपविभागीय अधिकारी, गडहिंग्लज यांनी दाव्याचा निकाल दिला १० ऑगस्ट २०२३ ला आणि रामपूर, चंदगडचे तलाठी यांनी सदर दाव्यानुसार केलेले फेरफार ऑनलाईन दिसून आले ९ ऑगस्ट २०२३ ला! म्हणजे फेरफार निकालाच्या अगोदर केले गेले!
5. प्रांत अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षी ब्रिटिशकालीन रद्दबादल संस्थानाच्या निबंधानुसार निकाल देणे विधीग्राह्य ठरवले.
6. हे Adoption Deed बनवताना दत्तक घेणाऱ्या व्यक्तीच्या सख्ख्या बहिणी, सख्खे भाचे, चुलत भाऊ, जिवलग मित्र, गावचे प्रतिष्ठित कुणीच उपस्थित नाहीत. फक्त बाहेरील अनोळखी व्यक्ती आणि दत्तक व्यक्तीचे पार्टीमित्र! हे नियोजन प्रांत अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांना शंकास्पद वाटले नाही.
7. एखाद्याच्या दत्तक पत्रानुसार, खरे आहे असे गृहित धरले तरी; एकत्र कुटुंबाच्या इतर सर्व सहहिस्सेदाराच्या जमिनीही दत्तक व्यक्तीला दिल्या पाहिजेत, असं कोणत्या कायद्यात आहे, बाबासाहेब वाघमोडे यांनी स्पष्ट केलेले नाही.
8. न्यायालयातील प्रलंबित केस ओव्हरटेक करून निकाला अगोदर फेरफार करण्यामागे प्रांत अधिकारी यांचा उदात्त हेतू / Intention / motive काय असेल असे तुम्हाला वाटते?
9. दत्तक व्यक्तीने त्याने केलेल्या दाव्यानुसार पुरावे सादर केले नाहीत, यासाठी त्याची बाजू न्याय ठरवली! भोवळ आली ना?
10. हिंदू दत्तक कायदा, 1956 मधील कलम 11 हे समबंधू व्यक्तींमध्ये / Blood Relationship मध्ये दत्तक घेणे आणि देणे प्रतिबंधित करते. या कलमानुसार, "या कायद्याच्या तरतुदींनुसार, समबंधू व्यक्तींमध्ये दत्तक घेणे किंवा देणे निषिद्ध आहे." या कलमानुसार, दत्तक घेणारा आणि दत्तक देणारा व्यक्ती निषेध संबंधांमध्ये असल्यास, असे दत्तक अवैध ठरते. तरीही कायद्याला बगल देऊन प्रांत अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी ते विधिग्राह्य ठरवून टाकले!
दावा: क./आरटीएस/अपिल/113/२०२२ आणि /आरटीएस/अपिल/11२/२०२२, उपविभागीय अधिकारी कार्यालय, गडहिंग्लज विभाग, गडहिंग्लज, कोल्हापूर.
कोल्हापूर जिल्ह्यातील प्रशासनात गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडण्यासाठी वर्षानुवर्षे जिल्हा प्रशासनामध्ये एक प्रचंड मोठे रॅकेट कार्यरत आहे. रजिस्ट्रारने खोटे दस्त नोंद करायचे, त्याचा फायदा घेऊन इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मदतीने ते दस्त चुकीच्या पद्धतीने जस्टीफाय करायचे, अपिल झालेच तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केस प्रलंबित ठेवून न्याय मागायला येणाऱ्या व्यक्तीचीच लांडगेतोड करायची - अशी व्यवस्थित यंत्रणा उभी करण्यात आली आहे. अशा रॅकेटमध्ये फसलेल्या गरीब शेतकऱ्यांना न्याय मिळणे जवळपास अशक्य होऊन जाते. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मायबाप महाराष्ट्र सरकारला अशा मामुली गुन्ह्यांकडेकडे लक्ष द्यायला वेळ नसतो.
ते रॅकेट कसे चालते याचे प्रत्यक्ष उदाहरण पाहा:
1. चंदगड रजिस्ट्रारने कायद्याला बगल देऊन खोटे दत्तकपत्र नोंद करून दिले.
2. नागनवाडी सर्कलनी ते कायदेशीर ठरवून त्यानुसार जमिनीच्या नोंदी करण्याचे आदेश काढले.
3. प्रांत अधिकारी गडहिंग्लज यांनी हुशारीने हुलकावणी देत आम्ही सादर केलेले मुद्दे आणि पुरावे पूर्णपणे दुर्लक्षित करून, शिवाय कोर्टमध्ये वर्षभरापासून प्रलंबित असलेलया केसकडे दुर्लक्ष करून प्रभावित निकाल दिला. निकालपत्रात आम्ही सादर केलेल्या पुराव्यांचा आणि मुद्द्यांचा कुठेच उल्लेख नाही. ग्रेट!
4. वारंवार पुराव्यासह तक्रारी करूनही अप्पर कलेक्टर सर्व गैरप्रकाराकडे वर्षभरापासून का कानाडोळा करताहेत? - माहीत नाही.
5. चंदगड तहसिलदार वारंवार केलेल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या गैरप्रकाराविषयी पुरावे देऊनही सदासर्वदा निष्क्रिय का राहतात? - माहीत नाही.
6. रामपूर तलाठ्यांनी कोणत्या पुराव्याच्या आधारे दत्तक पत्र ग्राह्य ठरवले? त्यांना ती ऑर्थोरिटी आहे का? शिवाय आम्ही सादर केलेल्या पुराव्यांचा आणि मुद्द्यांचा उल्लेख कुठेच नाही, असे का? - माहित नाही.
7. नागणवाडी सर्कलनी तलाठ्यांनी दिलेला रिपोर्ट ग्राह्य धरून, निकालपत्रात आम्ही सादर केलेल्या पुराव्यांचा आणि मुद्द्यांचा कुठेच उल्लेख का केला नाही? - माहित नाही.
8. चंदगड रजिस्ट्रार ऑफिस मध्ये बेकायदेशीर दस्त बनवून शेतजमिनी लुबाडण्याच्या गैरप्रकाराबद्दल केलेल्या सर्व तक्रारी कोणत्याही स्पष्टीकरणाशिवाय निकाली का काढण्यात आल्या? - माहीत नाही.
या फसवणूकीच्या प्रकरणाशी संबंधीत दावे आणि पुरावे जे आम्ही MHRC कोर्टामध्ये माननीय हायकोर्ट जस्टिस श्री K. K. Tatted यांच्यासमोर सादर केले होते. त्यांनी आमचे सर्व ३५ दावे आणि पुरावे मान्य केले आणि आमच्यावर अन्याय झाला आहे हेही मान्य केले. तेही तुमच्या अवलोकनासाठी खूप मोठे दस्त असल्याने PDF स्वरूपात लिंक दिली आहे. सदर न्यायालयाने मान्य केले आहे की, गडहिंग्लज प्रांत अधिकाऱ्यांच्या निकालानुसार केलेले फेरफार बेकायदेशीर आहेत आणि दत्तकपत्रही अवैध आहे. केवळ संबंधीत प्रकरणाची केस खालच्या कोर्टात दाखल असलेने या प्रकरणी आपण दखल देणे लीगल प्रोसेस नुसार शक्य नसल्याचे सांगितले.
केवळ आमच्या एकाच प्रकरणात चंदगड तहसील कार्यालयात अनेकानेक गंभीर गैरप्रकार झाल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. जुने दस्तऐवज नष्ट करून त्याऐवजी बनावट दस्तऐवज तयार करणे, हा निश्चितच गुन्हा आहे आणि अशा कृत्यांमुळे न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते.
निकाला अगोदर फेरफार हा स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडण्यासाठी केल्या जाणाऱ्या Organised Crime/संघटित गुन्हेगारीचा शेवटचा छोटा हिस्सा आहे. या गुन्हेगारीचे मुख्य कर्ताधर्ता चंदगड तहसीलमधील रजिस्टार आणि इतर अधिकारी आहेत. सगळे गुन्हे कायदेशीरपणे अत्यंत हुशारीने केले जातात, ज्यामुळे त्यांना पकडणे सोपे नसते.
या अर्जासोबत प्रांत अधिकारी गडहिंग्लज यांचे अफलातून निकालपत्रही जोडले आहे. जर अतिरिक्त पुराव्यांची मागणी केली गेल्यास आम्ही ती पुरवण्यास बाध्य आहोत.
पाहा PDF स्वरूपात दस्त - https://tinyurl.com/Mahar-Govt-mum-on-Corruption
Kind Request: I would be grateful if anyone within India's administrative system or any judge across the country could provide justification for the judgment made by the Divisional Officer in Gadhinglaj.
आपल्या सहकार्याबद्दल आणि मदतीबद्दल आभारी आहे.
धन्यवाद!
श्री गुंडू मारुती जाधव
Jan 14, 2025, 10:31 AM
to SP KOLHAPUR <sp.kolhapur@mahapolice.gov.in> , me
कृपया पाठवलेला ई-मेल हा आपल्या विभागाशी संबंधित असल्यामुळे योग्य ती कार्यवाही करावी.
धन्यवाद,
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,
महाराष्ट्र राज्य,मुंबई.
जावक क्रमांक 569/2025 नुसार तक्रार नं. 737/2025 ला अनुसरून पुरावे जमा करून घेण्यासंबंधी अर्ज
Sun, Feb 9, 11:28 AM
to chandgadps.kop@mahapolice.gov.in, DG ACB MH <acbwebmail@mahapolice.gov.in>, SP KOLHAPUR <sp.kolhapur@mahapolice.gov.in>,
प्रति,
माननीय पोलीस निरीक्षक,
चंदगड पोलीस ठाणे,
ता. चंदगड जि. कोल्हापूर.
विषय: जावक क्रमांक 569/2025 नुसार तक्रार नं. 737/2025 अन्वये श्री प्रमोद घनशाम गावडे यांनी दिनांक एप्रिल 2017 रोजी चंदगड नोंदणी कार्यालयात खोटे बेकायदेशिर दत्तक पत्र बनवुन आम्हा जाधव संयुक्त कुटुंबियांच्या शेतजमीनी लुबाडल्याची चौकशी होणेबाबत दिलेल्या तक्रारी अर्जाला अनुसरून पुरावे जमा करून घेण्यासंबंधी अर्ज.
माननीय सर,
मी, श्री गुंडु मारुती जाधव, रा. रामपूर (डुक्करवाडी), ता. चंदगड, जि. कोल्हापूर, मा. पोलीस अधीक्षक सो, कोल्हापूर यांचे कार्यालयाकडे तक्रार नं. 737/2025 अन्वये श्री. प्रमोद घनशाम गावडे यांनी खोटे बेकायदेशिर दत्तक पत्र बनवून माझ्या कुटुंबाच्या मालकीची शेतजमीन हडपल्याची तक्रार दाखल केली आहे.
आपण जावक क्रमांक 569/2025 द्वारे मला दिनांक 09/02/2025 रोजी सकाळी 10.30 वाजता चंदगड पोलीस ठाण्यात हजर राहून या प्रकरणातील पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, मी स्वतः हजर राहू शकत नसल्याने, माझ्या भावातर्फे खालील पुरावे सादर करत आहे. आपल्या अवलोकनासाठी ते या ई-मेल द्वारेही पाठवत आहे.
1. गैरप्रकार झाल्याचे तथ्य, मुद्दे आणि पुरावे.
2. श्री प्रमोद घनशाम गावडे यांनी बनवलेल्या खोट्या दत्तकपत्राची प्रत. (ते खोटे फसवणूक करून बनवलेले आणि बेकायदेशीर का आहे; त्याचे तथ्य, मुद्दे आणि पुरावे सोबत जोडले आहेत.)
3. प्रांत/विभागीय अधिकारी, गडहिंग्लज यांचे प्रभावित निकालपत्र (ते निकालपत्र प्रभावित का आहे त्याचे तथ्य, मुद्दे आणि पुरावे सोबत जोडले आहेत.)
4. सर्कल अधिकारी, नागणवाडी यांचे प्रभावित निकालपत्र. (ते निकालपत्र प्रभावित का आहे त्याचे तथ्य, मुद्दे आणि पुरावे सोबत जोडले आहेत.)
5. शेतजमीनी संयुक्त कुटुंबियांच्या मालकीच्या असलेचे पुरावे.
प्रांत अधिकाऱ्यांनी आणि सर्कल अधिकारी यांनी आपल्या जजमेन्ट मधून अनेक मुद्दे चुकीच्या पध्दतीने जस्टिफाय केले आहेत. ते कसे, उदाहरणार्थ पाहा:
• त्यांनी “28 वर्षांच्या प्रौढ व्यक्तीला १० वर्षांचे अज्ञानी बालक दाखवणे" Adoption Law नुसार जस्टिफाय केले!
• “80 वर्षांची वृद्ध विसरणग्रस्त आजारी व्यक्ती" मृत्यूपूर्वी काही महिने दत्तक घेऊ शकते, हे Adoption Law नुसार जस्टिफाय केले!
• त्या "अज्ञानी बालकाचे लग्न होणे बालविवाह कायद्यानुसार" जस्टिफाय केले!
• "कोल्हापूर संस्थानाच्या कालबाह्य निरस्त निबंधानुसार" बनवलेले दत्तक पत्र जस्टिफाय केले!
• शिवाय "सुप्रीम कोर्टच्या एका निकालाचा विपर्यास" करून दत्तक पत्र जस्टिफाय केले!
• "दहा दिवसापूर्वी भावाचा मृत्यू झालेला असतानाही - घरी सुतक असतानाही”, सांग्रसंगीत विधीवत समारंभपूर्वक हिंदू प्रथेनुसार दत्तक विधी करणे जस्टिफाय केले!
• आमचे जाधव कुटुंब कोणत्यातरी "आदिवासी जनजातिशी (Tribe)” संबंधित असल्याचे खोटे दर्शवले!
• शिवाय आमचे "अनेकानेक मुद्दे आणि पुरावे कोणतेही लॉजिकल आणि लिगल कारण न देता त्यांनी नाकारले”!
• हे असं कसलं दत्तक आहे, जे दत्तक घेणाऱ्यालाच आपण दत्तक घेतले आहे हे माहीत नाही! घरच्या लोकांना माहीत नाही! गावच्या लोकांना माहीत नाही!
मी आपणास विनंती करतो की, कृपया माझ्या तक्रारीची योग्य चौकशी करून मला न्याय मिळवून द्यावा.
धन्यवाद!
श्री गुंडु मारुती जाधव,
रा. रामपूर, डुक्करवाडी,
ता. चंदगड, जि. कोल्हापूर.
Mon, Feb 10, 12:35 PM
to AMOL TAMBE <spacbpune@mahapolice.gov.in> , me
Maharashtra Farmers Against Corruption
चंदगड तहसील नोंदणी कार्यालय, चंदगड, कोल्हापूर, महाराष्ट्र - ४१६५०९.
Chandgad Tehsil Registry Office, Chandgad, Kolhapur, Maharashtra - 416509.
Maharashtra Farmers Against Corruption - Chandgad, Kolhapur, Maharashtra, India