सुप्रभात.
आनंदी राहा,सुखी राहा,शांत राहा,स्वस्थ राहा,मस्त राहा.
ll वाजवा टाळी बांधा माळी ll
वाजवा टाळी बांधा माळी, थोड विचित्र वाटत ना. पण हेच खर आहे. आजपर्यंत आपण एखाद्या कार्यक्रमात किंवा भजनातच टाळी वाजवली आहे व दुसऱ्याला प्रोत्साहन देत आलो आहे. दुसऱ्याला प्रोत्साहन देणे चांगलेच आहे.परंतु आपण कधी कधी स्वतः साठी टाळ्या वाजवून स्वतः लां सुद्धा प्रोत्साहित केले पाहिजे त्याने आपला आत्मविश्वास वाढतो,आरोग्य चांगले राहते,सकारात्मक ऊर्जा तयार होते.
तसेच वर लीहल्याप्रमाने आपण आपल्या मुलांना,मित्रांना, नातेवाईकांना व आजूबाजूच्या लोकांना चांगल्या गोष्टीसाठी टाळ्या वाजवून प्रोत्साहित केले पाहिजे. यामुळे त्यांच्यात ती गोष्ट पुन्हा करण्यासाठी उत्साह येतो. यामुळे इतरांच्या व आपल्या जीवनात आनंद येतो आणि आनंददायी जीवनाची माळी तयार होण्यास मदत होते.
यासाठी प्रत्येकाने शाळेतील हिवाळ्याचे दिवस आठवायला पाहिजे, सकाळीच परिपाठ होत असे आणि आपण टाळ्या वाजवायचो. त्यावेळेला थंडीने हुडहुडी भरायची पण उर्जायुक्त सुद्धा वाटायचे आणि संपूर्ण दिवस आनंदाने जात असे.
विशेषकरून लहान मुलांचे कौतुक करण्यासाठी आपण टाळ्या वाजवल्या तर त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमालीचा वाढतो व ती गोष्ट करण्यासाठी ते पुन्हा पुन्हा प्रयत्न करतात. यासाठी मी माझ्या मुलाचे उदा. देईल.
त्याला आम्ही ABCD म्हणायला लावतो आणि टाळ्या वाजवतो. तो पण स्वतः साठी टाळ्या वाजवतो. हीच अॅक्टिविटी तो पुन्हा पुन्हा दोन तीन वेळा करतो. आम्ही फक्त हे ABCD च्या बाबतीतच नाही तर इतर बाबतीत पण असेच करतो व तो पण त्याच पद्धतीने प्रतिक्रिया देतो.
आपल्या शरीरामध्ये एकूण ३४० अॅक्यूप्रेसर पॉइंट आहेत त्यापैकी २९ पॉइंट आपल्या हातात आहेत. टाळ्या वाजवल्यामुळे हातावर प्रेशर तयार होऊन अॅक्यूप्रेसर पॉइंट सक्रिय होतात व आपल्याला बऱ्याच त्रासापासून आराम मिळतो. माझे स्वतः चे कधी कधी खूप डोके दुखायचे तेव्हा मी हातातील डोक्याशी संबधित पॉइंट दाबून आराम मीळवायचो. आता माझे डोके दुखतच नाही ते कसे? याबद्दल पुढे मी लिहिलं.
टाळी वाजवण्याचे फायदे(source internet):
1. हृद्याच्या आणि फुफ्फुसांच्या कार्याला चालना मिळण्यासाठी,त्यासंबंधी व्याधी कमी होण्यासाठी मदत होते. यामुळे अस्थमाचा त्रासही कमी होतो.
2. पाठीचे, मानेचे आणि सांध्यांचे दुखणे कमी होते.
3. गाऊट्च्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी क्लॅपिंग थेरपी फायदेशीर ठरते.
4. लो ब्लड प्रेशरच्या रुग्णांना ही थेरपी फायदेशीर ठरते.
5. टाळ्या वाजवल्याने पचनाचे विकार सुधारतात.
6. लहान मुलांची आकलनक्षमता सुधारते. अभ्यासातील गती सुधारते.
7. मुलांचा मेंदू तल्लख होण्यास मदत होते.
8. शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते तसेच अनेक आजार दूर ठेवण्यास मदत होते.
9. मधूमेह, अर्थ्राईटीस, रक्तदाब, नैराश्य, डोकेदुखी, निद्रानाश,केसगळती, डोळ्यांचे विकार यासारख्या समस्या कमी करण्यासाठी मदत करते.
10. सतत एसीमध्ये बसणारे आणि काम करणार्यां मध्ये घाम येत नाही. अशा लोकांनी टाळ्या वाजवल्यास रक्तप्रवाह सुधारतो. यामुळे शरीर शुद्ध होण्यास मदत होते.
टीप:
या ग्रुप मधील कोणत्याही बाबींचा किंवा गोष्टीचा उपयोग वैद्यकीय सल्ला समजू नये.
आपल्या यु ट्यूब चॅनलला लाईक करा,शेयर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. ही विनंती.
https://www.youtube.com/watch?v=uROPm5WnzwY&t=7s
अजून लेख वाचण्यासाठी कृपया वेबसाईट ला जाऊन भेट द्या. वेबसाईट ची लिंक देत आहे.
https://sites.google.com/view/the-power-of-subconscious-mind/home
आपला ग्रुप जॉईन करण्यासाठी व्हॉट्सअँप लिंक खाली दिली आहे.
https://chat.whatsapp.com/BdtGl4K1D92LnbU5wKuCBp
धन्यवाद.
आनंदी राहा,सुखी राहा,शांत राहा,स्वस्थ राहा,मस्त राहा.
आपला नम्र
विठ्ठल गोरे.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻